Rakt Pishachchh - 1 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | रक्त पिशाच्छ - भाग 1

The Author
Featured Books
Categories
Share

रक्त पिशाच्छ - भाग 1

भाग 1

लेखक: जयेश झोमटे..

........

सन 1900

राहाझगड..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव)

=========

राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला गाव आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला रस्ता आहे. जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा. राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा रस्ता,तीस चालीस मिनीटांत संपला जात राहाझगड चे एकमेव राजे दारासिंह ठाकुरयांच्या न मोजता येणा-या खोल्यांच्या ,भल्यामोठ्या दू-मजली आकाराच्या सफेद रंगाच्या राझगड महाला समोर येऊन थांबतो.

दारासिंह ठाकुर हे राहाझगड गावचे एकमेव राजे आहेत. त्यांचा स्वभाव एका राजाला सोभेल असा आहे. म्हंणजेच सर्वगुनसंपन्न त्यांच्या अंगी जोपासलेले आहेत. त्यांच्या प्रेमळ,मनमिलाऊ,मदतकरु स्वभावाने राहाझगडची प्रजा त्यांचा आदर करते. रजा चांगला असल्याने एकंदरीत प्रजा सुखाने आपल जिवन जगत आहे. दारासिंह यांच्या पत्नीच म्हंणजेच राहाझगडच्या राणीसाहेब ह्यांच नाव ताराबाई आहे, त्यांचा स्वभावही महाराजांसारखाच मिळता-जुळता आहे. महाराजांच्या राजशाही परिवारात प्रथम युवराज सुरजसिंह हे पुत्र असुन त्यांच वय पंचवीस आहे.महाराजांना एक( कन्या) युवराज्ञी सुद्धा आहे, त्या युवराज्ञींच नाव रुपवती असुन त्यांच वय एकवीस आहे. रुपवती नावा प्रमाणेच त्यांच्या रुपाची शारीरीक रचनेची जोड एका स्वर्गातलया अप्सरेलाही लाजवेल अशी आहे. त्यांनी आताच आपलया तारूण्यात प्रवेश केला आहे.

(तर मित्रांनी पुरे ती परिवारिक्त माहीती , नंतर पात्र आली का भेटघडेलच तो पर्यंत पुढे पाहुयात. )

आज राहाझगड मध्ये सुर्यास्त झाल तसे भुतळावर कालोखाच साम्राज्य पसरू लागल , रात्री झाली गेली. आज आकाशा गंगेत न जाणे का च्ंद्र दिसुन येत नव्हता,परंतु लहान-लहान टीपक्यांच्या त्या टिंम,टिंमणा-या चांदण्या मात्र उगवलेल्या दिसुन येत होत्या. रातकिड्यांची किरकिर नेहमी प्रमाणे किरकिर करत आपल काम करण्यात मग्ण होती. इकडे रात्र झाली तसे राहाझगड च्या रहिवाशांनी आप्ल्या मातीच्या घरांन बाहेर दरवाज्या बाजुलाच भिंतीला ठोकलेल्या एका चूकेवर कंदील लटकवायला सुरुवात केली.झप -झप करत राहाझगडच्या प्रत्येक मातीच्या घराबाहेरजो तो कंदीलाचा तांबडा प्रकाश पहारा देऊ लागला होता.राहाझगड महालातुन आप्ल्या आराम खोलीतल्या उघड्या खिडकीत उभ राहून महाराज दारासिंह ठाकुर हा विलक्षण अद्भूत नजारा पाहत होते.सांज होताक्षणीच जसे की एका शहरातल्या हायवेवर असलेल्या खांबांवरचे एका लाइनीत असलेले

वीस तीस दिवे एक-एक करत प्रकाश खाली फेकत झप-झप चालू व्हावे त्याचप्रकारे राहाझगडच्या लोकवस्तीत कंदील पेटले जात होते. महाराज आपल्या महालात असलेल्या , त्यांच्या आराम खोलीतल्या खिडकीच्या चौकटीवर हात ठेवुन खाली राहाझगड गावातला हा चमत्कारीक द्रष्य पाहत होते. खिडकीतून संध्याकाळची थंड हवा येत होती, त्या हवेने महाराजांचे मुकुट न घातल्या कारणाने काळ्या रंगाचे वाढलेले केस , हवेने मागे उडत होते. महाराजांच्या मागे खोलीत एक भलामोठ्ठा पलंग होता. पलंगा बाजुलाच एक गोल आकाराचा टेबल होता.त्या टेबलावर एका गोल भांड्यात सफरच्ंद,द्राक्ष,पेरु ,केली अशी विविध फल होती. खोलीतल्या चार ही भिंतीवर देवांच्या ,अन्य काही-बाही पेटिंगस होत्या. खोलीचा दरवाजा उघडा होता. त्या दरवाज्या बाजुला एक उघड्या झापेजवळ एक चौकोनी टेबल होता.त्या टेबलावर महाराजांचा मुकूट आणि तलवार ठेवली होती.महाराज एकटक खिडकी समोर उभ राहून राहाझगड गावाच्या कच्चा रसत्याकडे चिंतीत नजरेने पाहत बसलेले. की तोच उघडया दरवाज्यातुन एक काली आकृती महाराजांच्या दिशेने चालत आली.दहा-बारा पावल चालून त्या आकृतीने महाराजांच्या जवळ पोहचताच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तसे महाराजांनी मागे वळून पाहिल

" महाराणी..!" अस म्हंणतच महाराज पुन्हा खिडकीतून मातीच्या रसत्याकडे पाहु लागले. महाराजांच्या मागे दरवाज्यातुन चालत आलेलीती ती आकृती महाराजांची धर्म पत्नी व राहाझगड गावच्या महाराणी ताराबाई यांची होती.

" होय महाराज ! आम्ही आताच काहीक्षणापुर्वी आमच्या एका सेवकामार्फत आपणास अन्नग्रहण करण्यासाठी निरोप पाठवल होत.परंतु तुम्ही आला नाहीत..! म्हणूणच मीच आले इथे ! " महाराणींच्या ह्या वाक्यावर सुद्धा महाराज एकटक खिडकीतुन समोर पाहत होते.

" चला पाहु जेवण करु घ्या" महाराणी ताराबाई पुन्हा म्हणाल्या.

ताराबाईंनी आपल वाक्यपुर्ण केल.

" महाराणी ताराबाई ! मी कालच तुम्हाला म्हणालो होतो.की आमच्या एका दुरच्या इंग्रज आधीकारी मित्राच्या मुलाच गेल्या तीन आठवडया अगोदर लग्न झालय.परंतु आम्हाला त्या लग्नात बोलावण आल असतानाही.आम्ही उपस्थित राहू शकलो नाही.त्या कारणाने ते आमच्यावर जरा रागावले गेले आहेत.म्हणुनच मैत्रीच्या खातीर मी त्यांच्या मुलास आणि सुनबाईंना आपल्याकडे जेवनाच आमंत्रन दिलंय!" महाराज पाठमोरेच खिडकीत उभे राहत म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर महाराणी म्हणााल्या.

" माफी असावी महाराज ! आम्ही जरा विसरलोच होतो." म: ताराबाई म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर महाराज म्हणाले.

" माफी मागण्यची काहीच आवश्यकता नाही महाराणी ताराबाई.कधी काली देव सुद्धा विसरभोळा होतो. मग आपण तर मनुष्य आहोत. महाराज म्हणाले.त्यांच्या ह्या वाक्यावर महारानींनी फक्त मंद स्मित हास्य करत मान हळवली व म्हणाल्या.

" महाराज तुम्ही जरा चिंतीत दिसत आहांत ! " काहीवेळ थांबुन म:ताराबाई पुढे म्हणाल्या." काही झालं आहे का..?"

म: ताराबाईंच्या ह्या वाक्यावर महाराजांनी एक हुंकार भरत गंभीरमुद्रेने होकारार्थी मान हळवली.व काहीवेळ थांबुन म्हणाले.

" होय महाराणी!आम्हाला त्या दोन नवविवाहीत जोडप्यांची चिंता होत आहे!" महाराज चिंतेचे सुरात म्हणाले.

" परंतु का महाराज?" म: ताराबाई न समजुन म्हणाल्या.

महाराजांनी खिडकीतून एकदोन वेळा पुढे पाहत डोळे मिचकावले व मागे वळुन महाराणीं कडे गंभीरमुद्रेच्या स्वरात पाहत म्हणाले.

" महाराणी आता कस सांगू तुम्हाला! " महाराजांनी एक कटाक्ष महाराणीं वर टाकला.मग पुढच्याचक्षणाला नजर त्यांच्या चेह-यावरुन बाजुला काढुन घेतली. मग एकदोनेवेळा खाली डोळे मिचकावुन पाहत. पुन्हा समोर पाहत म्हणाले.

"आप्ल्या राहाझगड गावच्या वेशीवर काहीदिवसांपासुन सायंकाळ ते पहाटे पर्यंत काहीबाही चित्र-विचित्र प्रकार घड़त आहेत. वेशीवर पहारा देणा-या सैनिकांना ,गावातल्या वाटसरुना काही चित्र-विचित्र आकार दिसले आहेत." महाराज बोलत होते एकावर एक गोष्ट सांगत होते. आणि महाराणी ते निट लक्ष देऊन ऐकत होत्या.

" तर अर्ध्या गावक-यांच असे म्हणणे आहे. की वेशीवर अंधारात काहीतरी मानवाच्या आकाराच उभ असत " महाराज हळुच मागे वळले आणि त्यांनी महाराणींकडे पाहत एका विशिष्ट प्रकारच्या भीतीने ग्रासलेल्या चेह-यासहित डोळे मोठे करत पुढे बोलायला सुरवात केली. " ते जे काही कालोखाचा आसरा घेऊन अंधारात उभ असत. त्या आकाराची काया मानवाच्या ऊंचीपेक्षा चार पाच फुट जास्त असते. एका सैताना सारखीच जणू." सैतान हे नाव ऐकताच म:ताराबाईं यांच्या काळजात धस्स झाल.

" कधी-कधी त्या अंधारात त्या जागेवर त्या कालोख्या आकारात दोन प्राण्यांचे डोळे जसे अंधारात चमकावे, तसे ते डोळे चमकले जातात. " महाराजांच ह्या वाक्यावर श्वास फुलला होता,तो ही इतका की श्वास नाकावाटे घेण्या ऐवजी ते श्वास तोंडावाटे छाती,फुगवून फुगवून घेत होते. त्यांच्या प्रत्येक उच्चारात एक भय गुढरहस्य होत. एक भयंकर गुढरहस्य.जे महारानीं लक्ष देऊन ऐकत होत्या.काहिवेळाने महाराज पुढे म्हणाले." प्राण्यांचे डोळे च्ंदेरी रंगाने चमकळे जातात. परंतु गावकरी आणि सैनिकांच्या सांगण्यानुसार त्या काळ्या सावलीत चमकणा-या त्या दोन डोळ्यांची जोड काही वेगळीच असते. स्मशानात पेटलेल्या प्रेताच्या चितेतली लाकड जशी निखा-यां सारखी चमकावी तसे ते दोन डोळे चमकतात, लाल विस्तवा सारखे चमकतात.त्या दोन डोळ्यांत पाहताक्षणी भूक, पाश्वीहिडिसपणा, वासना, अघोर, क्रोध,लालच हे सर्व जणु ठोसुन ठोसूण भरल्याची जाणीव होऊ लागते. तो आकार दिसताक्षणी हाड मांस गोठावणारी थंडी पहूडली जाते." महाराज काहीक्षण बोलायचे थांबले मग थोड्यावेळाने पुढे म्हणाले.

" काल परवाचीच घटना आहे.आपल्या राहाझगड वेशीवर पाहारा देणा-या काही एकदोन पाहारा देणा-या सैनिकांना रात्री तो अवाढव्य कालोखी आकार त्या अंधारात वेशीबाहेर उभ असलेला दिसला. त्या आकाराला पाहताच त्या दोघांनी ते पाहण्याच ठरवल.कसली ही शहानिशा न करता.काही सैनिकांनी त्यांना आडवल सुद्धा" हे काहीतरी भलतच आहे ! जवळ जाऊ नका " अस सुचीत केल.परंतु ते दोघे ही धीट होते.त्यांनी त्या आकारात जे काही आहे ते पाहण्याच ठरवल.आणि त्या दोघांनीही रात्रीच्या अंधारात गावची लक्ष्मणरेखा ओलांडली. त्यासरशी दुस-या दिवशी त्या दोघांच प्रे....!" महाराज हे वाक्य उच्चारुन थांबले , खिडकीतून थंड हवा येत असताना ही त्यांच्या वटारलेल्या डोळ्यांनी आ वासलेल्या मुखाच्या वर कपाळावरुन एक घामाच द्रव बिंदू हलकेश्या गतीने खाली -खाली येताना दिसुन येत होता.भीतीने श्वास फुलले गेलेले ,घसा कोरडा पडला होता.त्याला सुखावण्यासाठी पाण्याची गरज होती. म: ताराबाईंनीं ती खूण ओळखुन हळूच बाजुला असलेल्या टेबलावरच्या चांदीच्या जगमधुन थर थरत्या हातांनी चांदीच्या ग्लासामार्फत महाराजांना पाणि पिण्यास दिल.हातात ग्लास असलेला त्यांचा तो हात भीतीनेच थर थरत होता. पाणि पिऊन त्यांनी तो चांदिचा ग्लास पुन्हा महाराणी कडे दिला.तसे ग्लास हाती घेत महाराणी भीतच म्हणाल्या.

" पुढे त्या दोन सैनिकांच काय झाल..?" महाराणी म्हणाल्या. त्यांच्या ह्या वाक्यावर

महाराजांनी हलुच एक आवंढा गिळला व बोलण्यासाठी ते सत्य सांगण्या ऐकवण्यास तोंड उघडणार की तोच खिडकीतल्या चौकटीबाहेरुन आत खोलीत येणा-या हवेमार्फत घोड्यांच्या खिंखालण्याचा आवाज आला. महाराजांना वाटलं की ते नवविवाहीत जोडपे आले की काय? त्यांनी लागलीच खिडकीच्या दिशेने पावले उचलली, खिडकीजवळ पोहचताच खिडकीच्या चौकटीतुन खाली बाहेर पाहील. त्यांच्या नजरेस चार चाकी घोडा गाडीच्या दरवाज्यातुन स्व्त:चे कपडे हातांनी सावरत उतरताना युवराज दिसले.

" आले का ते नवविवाहीत जोडपे?" महाराणी उत्सुक होत महाराजांच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत म्हणाल्या. महारानींच्या वाक्यानंतर महाराज पाठमोरे वळले.त्यासरशी महाराणींनी त्यांच्या चेह-यावरची चिंतेची छटा दिसुन आली. ह्याचा अर्थ ते नवविवाहीत जोडपे अद्याप सुद्धा आले नव्हते, हे म:ताराबाई समजुन गेल्या. वेशीवर काहीतरी अमानवी अमंगळ भटकत आहे? आणी त्या अमानवी शक्तिचा त्या नवविवाहीत जोडप्यांवर काही संकट न ओढावो ह्याची महाराजांना खुपच चिंता होत आहे. आणी आपल्याला महाराजांना जे काही विचारायचं आहे ते उद्याच विचारु,उगाच त्यांच्या जिवास घोर नको.ह्या हेतुने म:ताराबाई ह्यांनी महाराजांशी परवानगी घेत माघारी वळून दरवाज्यातुन बाहेर जाऊ लागल्या. महाराणीबाईंची तीन चार पावलुन चालुन झाली असतील की महाराजांचा मागुन आवाज आला " " महाराणी ताराबाई ? " आवाज ऐकुन महाराणी दारातच थांबल्या व त्यांनी हळूच मागे वळून पाहिल.नी महाराज पुढे म्हणाले.

" युवराजांसमोर त्यांच्या विवाहाचा विषय काढा? वयात आले आहेत ते.?" महाराज खिडकीतुन बाहेर पाहतच म्हणाले. तसे महाराणींच्या चेह-यावर एक स्मितहास्य पसरल व त्या म्हणाल्या. " जी..!"

अस म्हंणतच महाराणी निघुन गेल्या. महाराज एकटक खिडकीबाहेर पाहत होते. हवेने त्यांचे केस मागे उडत होते. त्यांच्या डोळ्यांसमोर महालापासुन तीस मिनीटांच्या अंतरावर असलेली राहाझगडची कंदीलाच्या प्रकाशात टीम-टीमनारी घर दिसुन येत होती,आणि तो सरळमार्गी गावातुन वेशीबाहेर घेऊन जाणारा अंधारातला मातीचा रस्ता दिसत होता.जो की काजळी फासल्या सारखा अंधारात बुडाला होता.

महाराजांनी हळुच वर आकाशात पाहिल,त्यांच्या नजरेला काहीतरी बदल दिसुन आला.काहिक्षणापुर्वी आकाशात दिसणा-या लहान-लहान टिंब -टिंबणा-या चांदण्या आता नाहीश्या झाल्या होत्या. काहीक्षणापुर्वी दिसणारा निळा आकाश आता काळ्या ढगांनी भरुन निघाला होता. मंद वेगाने वाहणारा वारा आता वा-याच्या वावटळी सारखा वाहत होता. इतके वेळ खिडकीत उभे राहून अंगाला स्पर्शून जाणारी जी हवा काहीक्षणापुर्वी मनाला सुखावत होती मनाला एक वेगळच सुख देत होती.ती हवा आता ह्याक्षणी शरीराला झोंबु लागली होती, त्वचेवर आदळून मांसात रुतली जात,हाड मांस एकत्रितरित्या गोठवायला सुरुवात करु लागली होती. क्षणार्धात बदल घडून आलेला? की बदल घडवला गेला होता ?मित्रांनो अस म्हंटल जात ! की काही विपरीत घडण्या अगोदर वातावरणात काही बाही विचित्र बदल घडण्यास सुरुवात होते.आणि काही मानवांची इंद्रिय ते बदल ओळखतात. तसेच काही महाराजां समवेत होत नसेल ना? त्यांनी तो अघटिताची चाहूल लागणारा काही बदल मनातल्या अंधारातल्या कोयण्या कोप-यात पाहिला नसेल ना? महाराजांच्या शरीरास लागणारी ती हवा आता त्यांना नकोशी वाटू लागलेली, कारण त्या हवेने शरीरात भीतीच्या लहरी उत्पन्न होऊन काफर भरु लागल होत. म्हणुनच त्यांनी लागलीच खिडकीच्या दोन्ही झापा आपल्या मागे बंद ओढुन घेतल्या.मग दोन-चार पावल चालून हळूच पलंगावर बसले.आणि क्षणात पुन्हा आप्ल्या गुढ गहाण विचारात बुडून गेले

□□□□□□□□□□□□□□□□□□□□

(18+ फक्त प्रौढांकरीता)

राहाझगड वेशीपासुन ठिक तीस मिनीटांच्या अंतरावर एक जंगल होत.रात्र असल्याने त्या जंगलातल्या झाडांची आकृती ,काहीतरी वेगळच रुप घेऊन जागेवर ऊभी आहे की काय असं दिसुन येत होत.म्हंणजेच त्या कालोखात काजल फासलेल्या त्या झाडांच्या फांद्या , एका चेटकीनीच्या धार-धार नखांसारख्या भासत होत्या.जणु सावज येताच त्या फांद्या जशा काही जिवंतच होणार होत्या. आणि जिवंत होऊन आपल्या सावजाच्या शरीरात ,मार्ग क्रमण करुन त्याच गरम-रक्त लुचणार होत्या.

थंडीचा महिना सुरु असल्याने जंगलात कडाक्याची थंडी पहूडलेली,

इतकी की साक्षात खालून जमिनीवरुन गुढघ्यांइतकी धुक्याची नदी वाहत होती. आणि त्या गुढघ्यांनइतक्या धुक्यामधुन एक घोडागाडी छम-छम आवाज करत पुढे -पुढे येत होती. घोडागाडीला दोन घोडे बांधलेले, घोड्यांमागे मधोमध घोडागाडी चालवणारा एक अनोलखी वृद्ध माणुस बसलेला. त्याच्या अंगावर थंडीपासुन वाचण्यासाठी एक स्वेटर होता,खाली एक सफेद पेंट होती दोन्ही हातांत दोन घोड्यांच्या

गळ्याभोवती गुंडाळलेल्या काळ्या दो-या आणि घोडे हाकलण्यासाठी एक छडी होती. ती छडी लागतीच घोडे खिंखाळत वेगाने पळत होते. त्या घोडागाडी चालकाच्या डाव्या-उजव्या बाजुला दोन तांबड़या रंगाचे कंदिल जळत होते. त्या वृद्ध इसमाच्या मागे.ज्याप्रकारे माथेरानच्या मिनीट्रेनला जस छोठासा डब्बा असतो, त्या पेक्षा छोठा एक विशिष्ट प्रकारचा लाकडा पासून बनवलेला एक डब्बा होता.त्या लाकडी डब्ब्यात सुद्धा एक कंदिल पेटला होता. ज्याने आतल दृष्य दिसुन येत होत.त्या डब्ब्यात एक कंदील,आणि बसण्यासाठी दोन गादीचे मुलायम सीट होते. त्या सीटवर एक तरुण स्त्रीची आणि एका तरुण पुरूषाची आकृती बसलेली दिसुन येत होती. त्या स्त्रीच्या गो-यापान शरीरावर एक ट्रिमिंग विंटेज क्लासिक ब्लॅक ड्रेस होता. त्या ड्रेसमधुन त्या गो-यापान स्त्रीच्या दोन मध्यमआकाराच्या वक्षस्थळांची वरची बाजू थोडीफार दिसुन येत होती. त्या स्त्रीचा चेहरा गोल होता,लाल लिपस्टिक लावलेले ते ओठ स्ट्रॉबेरी सारखे रसरशीत, रसपान करावासा वाटण्या सारखे लाल दिसत होते.दोन पातळ आकाराच्या भुवया आणि लहान-लहान शृंगार रसाच्या नशेने न्हाऊन निघालेले ते डोळे.(शृंगार-संभोग केल्यावर मानवाच्या डोळ्यांत दिसणारी चमक) अक्षरक्ष एका कामुक अप्ससरेप्रमाणे भासत होते. तिच्या दोन गो-यापान मुलायम पायांत ड्रेसला शोभूनच दोन काळे सेंडल होते. त्या स्त्रीच्या बाजुलाच एक तरुण पुरषाची आकृती बसलेली होती.त्या पुरूषाच्या अंगावर एक काळा कोट-काळी पेंट, आणि पायांत काळे शूज होते.त्या तरुन पुरुष आणि स्त्रीच्या हातात एक अंगठी होती, ह्याचा अर्थ ते दोघे नवरा बायको होते.

आणि मित्रांनो हे तेच जोडपे आहेत ज्यांची वाट महाराज दारासिंह पाहत आहेत! परंतु राहाझगडच्या वेशीवर अंधारात काहीतरी भटकत आहे ना! मग ते जे काही आहे सैतान-भुत की पिशाच्च त्या ह्या दोघांना

राहाझगड मध्ये सुखरुप पोहचु देइल का? या पाहुयात पुढे...

 

क्रमश: