Sang na re mana - 23 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सांग ना रे मना (भाग 23)

Featured Books
Categories
Share

सांग ना रे मना (भाग 23)

मी कायम आहे तुझ्या सोबत.चल लेट होईल जाऊया आपण . मग संयु त्याच्या पासून बाजूला झाली. इकडे सुजय ने आरोही ला व्हेंटिलेटर लावले होते तिच्यावर ट्रीटमेंट तो करत होता. आता आरोही बद्दल कोणालाच काही सांगू नये असं त्याने ठरवले.दुसऱ्या दिवशी सकाळी सुजय ने निनाद ला कॉल करून सांगितले की आरोही शुद्धि वर आली आहे. निनाद हे ऐकुन शॉकच झाला सुजय असे कसे झाले पन? निनाद काल रात्री मी हॉटेल मधुन अचानक निघुन गेलो ते याच कारणा साठी. मग आता मितेश ला हे सांगणे गरजेचे आहे सुजय. हो तु ठरव कसे सांगायचे माझ्यात तेवढी हिम्मत नाही आता कुठे तो जरा संयु मुळे सुधरला आहे काल पाहिलेस ना कीती खुश होता तो. हो सुजय मला पन त्याला हे सांगणे अवघड़ आहे . निनाद मीतेश ला आरोही बद्दल समजने गरजेचे आहे तू लवकरात लवकर त्याला सांग. मग निनाद ऑफिस ला आला मीतेश ला कस सांगू याची मनात तयारी करत होता. थोड्याच वेळात मितेश ही आला. गुड़ मॉर्निंग निनाद . वेरी गुड़ मॉर्निंग मितेश . निनाद च्या चेहऱ्यावर टेंशन दिसत होते. निनाद आर यू ओके? हो मितेश. मग चेहरा का तुझा इतका टेन्स दिसत आहे काही प्रोब्लेम आहे का? नाही प्रोब्लेम काही नाही पण . निनाद बोल जे असेल ते आय विल हेल्प. मित्या आता मी जे काही सांगणार आहे ते तू निट शान्त पणे ऐकुन घेशील का? व्हाट काही झाल आहे का संयु बरी आहे ना वेट मी तिला कॉल लावतो. त्याने फोन हातात घेतला सुद्धा तसे निनाद ने त्याचा हात पकडला मित्या संयु एकदम ठीक आहे पण काल रात्री आरोही शुद्धिवर आली आहे. व्हाट निनाद परत बोल आरु आरु माझी आरु शुद्धिवर आली ओह गॉड थैंक यू सो मच निनाद कीती गुड़ न्यूज दिलीस तू . अरे या दिवसाची मी कीती वाट पाहिली. मितेश ख़ुप खुश झाला. त्याने लगेचच सुजय ला कॉल केला आणि आरु ला भेटायला तो येत आहे असे सांगितले. निनाद तू थांब इथे मी सुजय कड़े जावून येतो म्हणत मितेश बाहेर पडला. निनाद ला आनंद व्यक्त करू का दुख तेच समजेंना कारण आता संयु चे काय होणार हा प्रश्न त्याला पडला. आपण तिला आरु बद्दल सांगावे की नको काही समजेना त्याला . त्याने पल्लू ला कॉल लावला. आरु शुद्धिवर आली आहे पन आताच संयु ला काही ही सांगू नकोस अस म्हणाला. पल्लू ठीक आहे म्हणाली जे काही सांगायचे ते मितेश सांगेल बोलली. मीतेश हॉस्पिटल मध्ये आला. आरु ला ऑक्सीजन सुरु होता. ती बोलू शकत नव्हती. मीतेश तिच्या जवळ तिचा हात हातात घेवून बसला मुकपने नुसता डोळयांनी बोलत राहिला. आरु ही त्याच्या कड़े बघत राहिली. न बोलता ही ख़ुप काही ते बोलत होते. सुजय बाजुलाच होता. सुजय आरु आता पूर्ण बरी होईल ना? मितेश आता लगेचच काही नाही सांगता येत. बघू मी ट्रीटमेंट सुरु करतो होप फ़ॉर बेस्ट. ओके सुजय. शेवटी माझ प्रेम मला पुन्हा मिळाले थैंक गॉड मितेश म्हणाला.

हो मितेश पन आता तु बाहेर चल आरु ला इंफेक्शन होईल आपण जास्त तिच्या जवळ जायला नाही पाहिजे थोड़े दिवस. हो म्हणत मितेश सुजय सोबत बाहेर आला. आरु च्या विचारात मितेश संयु ला पूर्णपणे विसरून गेला. तिला कॉल नाही मेसेज नाही . संयु ला वाटले तो कामात बिझी असेल पण तिने पाहिले मितेश ने एफ बी किंवा इंस्टा वर सुद्धा काही ही पोस्ट केले नवहते. चार दिवस झाले आता संयु ला मितेश ची काळजी वाटू लागली. मितेश तर हॉस्पिटलमध्ये सतत होता. संयु ने शेवटी त्याला कॉल लावला पण तो हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याचा फोन बंद होता. मग संयु ने निनाद ला कॉल लावला. मीतेश कुठे आहे असे तिने विचारले. निनाद ला काय उत्तर द्यावे समजेना. संयु मितेश ठीक आहे तू मला भेट आपण भेटून बोलू. निनाद सगळं ठीक आहे ना? हो संयु काळजी नको करू तू भेट संध्याकाळी ओके म्हणत त्याने फोन ठेवला. संयु ने पल्लवी ला फोन केला तिला काही माहिती आहे का विचारले . पण पल्लू बोलली तिला ही काही माहीत नाही आपण भेटू निनाद ला ती म्हणाली.निनाद मग मितेश ला भेटायला गेला. मितेश आरु कशी आहे? ठीक आहे ती तुला माहीत आहे का मला बघून तीने स्माइल केले म्हणजे मला विसरली नाही ती . आरु आता लवकर बरी होऊ दे. गुड मितेश मग संयु चे काय? तो टोटली संयु ला विसरला होता. ओह नो माज्या डोक्यातुनच गेली ही गोष्ट निनाद . संयु माझ्या काळजीत असेल मी तिला कॉल ही नाही केला. मला आला होता फोन तिचा. मग तू सांगितलेस का संयु ला आरु बद्दल? नाही तेच विचारायला मी आलो आहे . आज संध्याकाळी मी तिला भेटणार आहे. निनाद मी पण येतो मी स्वहता तिला सांगेन . पण मितेश हा संयु चा तिच्या प्रेमाचा विश्वासघात नाही का? नो नो निनाद संयु मला समजून घेईल खूप चांगली आहे रे ती. बघ तीच म्हणेल मीतेश तू फक्त आरोही चा होतास आणि आहेस . किती गृहीत धरले आहेस तू संयु ला मितेश. अरे तुला प्रेमाची ,तुला समजून घेण्याची जेव्हा गरज होती तेव्हा तू संयु ला जवळ केलेस आणि आता आरु आहे तर संयु नको हा स्वार्थी पणा नाही का मित्या? निनाद मग तूच सांग मी काय करू? मला कुठे माहीत होतं की आरु शुद्धी वर येणार? आता मी आरु ला दूर केलं तर हा तिच्या वर अन्याय नाही का? आता माझी माझ्या प्रेमाची जास्त गरज आरु ला आहे संयु समजून घेईल रे आय नो. हम्म मित्या मला तुझं म्हणणं पटत नाही. नाहीच पटणार ना का मग माझ्या मागे लागला होतास तू आणि सुजय की पास्ट मधून बाहेर पड स्वहताला का बांधून ठेवले आहेस? संयुच खर प्रेम आहे तुज्यावर तिच्या फिलिंग्ज ची कदर कर . मी संयु चा विचार करत नव्हतो पण तुम्ही मला तिचा विचार करायला भाग पाडले. काय बोलतोस तू मित्या अरे तू काय लहान बाळ आहेस का आम्ही तुला फोर्स करायला तुला जरा सुद्धा काही संयु बद्दल वाटल नवहते का? तू तिच्यात अजिबात गुंतला नव्हतास का? मित्या प्रेम अस जबरदस्ती ने कोणावर लादता येत नसते ती भावना आतून मनातून यावी लागते आणि हे मी तुला सांगायची गरज नाही. तुला काय सांगायचे ते तू ठरव मित्या मी काही संयु शी बोलणार नाही. निनाद मी ही येईन मी बोलेन तिच्याशी. मग निनाद ऑफिसमध्ये आला.

क्रमश.