Namune - 1 in Marathi Short Stories by Hiramani Kirloskar books and stories PDF | नमुने - 1

Featured Books
Categories
Share

नमुने - 1



रोजच्या जगण्यात असे खुप लोक येतात त्यांना ऐकत असतो आपण. बघत असतो. कुणाच्या नजरत आपण नमुने असतो. तर आपल्या नजरेत दुसरे. पण यांना बघताना हसायच की थांबवायच यात गोंधळ होतो.

दुनिया गोल आहे. कागदपत्र नाहीत त्याची. पण लोक म्हणतात म्हणुन मी हि म्हणतोय. तशी दुनिया चौकोनी असली तरी काही फरक पडला नसता. सकाळी उठुन कोण विचार करत बसत का? यार आज पृथ्वी थोडी षटकोनी दिसतेय. आता या गोष्टी चारचौघात बोलायच्या नसतात. हे त्याला सांगणार कोण होत? समोरच सायंन्सचा स्टुडंट बसलेला. सायंन्सला चालेंज करतोय म्हणत सरळ मोबाईलवर वर डिस्कव्हरी चॅनल वरचे कार्यक्रम बघायला लावले. बघाणारा विचार करतोय
भाई साब, दुनिया गोल चौकोनी त्रिकोणी कशी पण असली तरी चालतेय ना रोज सारखी त्यात येवढ काय भडकायच?
तु डोक्यावर पडलेलास का रे?
आता हा समोरचा येवढा साधा माणुस त्याला माहितीच नाही की डोक्यावर पडण्याचा अर्थ काय? तो म्हणाला
हा रे रात्री पोरांसोबत टेरेसवर पित होतो. साला लोखंडी दरवाजा लागला.
विचारनारा हैराण परेशान. दोन्ही हात कमरेवर घेऊन बघतोय. आता सायन्सवाल्याला समजेना लाॅजिकली याला कस सायन्स समजवायच? आणि त्या डोक्यावर पडलेल्याला लाॅजिक घेऊन चढणार नसती. तो म्हणाला
ऐक ना भाई, मानल दुनिया गोल आहे. मग पुढे?
सायन्सवाला आता संमभ्रमात विषय संपला. काऊंटर कस करायच? तेवढ्यात तो म्हणाला बघ सायन्स वगैरे ना झुट है सगळ! बस याच एका वाक्याची वाट बघत उभा असलेला सायन्सवाला भडकला. दारु पिऊन इथे सायन्सला तु नाव ठेवतोस? पितो पावशेर म्हणे मी जंगलाचा शेर. आता समोरच्याला वाटल हा चेंडू आपल्या गोटात टाकलाय याने. तो तिकडुन चालू झाला. दारु पिके खलबली मची खोपडे में सायन्स जाये.... मे।
सायन्स वाला चक्रावला अबे हे काय होत? म्हणत भडकला
समोरचा तेवढाच निरागस म्हणाला सुरुवात कोणी केली?
एकाला समजवायच होत दुसर्याला समजून घेणून काही फायदा नव्हता.
विषय बदलायला सायन्सवाला म्हणाला. टेरेसवर कोण कोण दारु पित होता रे?
होते बरेच जण. पक्याचा बर्थ डे होता. तुला नाही बोलवल पक्याने?
नाही म्हणताना सायन्सवाल्याला समजल की हा खेचतोय माझी... मला आवडत नाही हे प्रकार. बाबा कधी पिऊन आले तर मला राग येतो?
अबे पागल है काय रे तु?
पागल म्हटल्यावर त्याला राग आला. म्हणाला
पागल पागल काय म्हणतोस रे?
अरे काका एक नंबर ज्वोली माणुस आहे. बापाला काय रागवतोस?
हा तुला माहिती ना माझे बाबा काय आहेत ते? मला ऐकायचच नाही. बाबांचा विषय काढू नकोस. मला आवडत नाही.
बर बस रे...
सायन्सवाल्याला राग अनावर होता. दारु पिऊन येणारा बाप याला कुल वाटतोय? साले अडाणी लोक? मनात शिवी दिल्याने त्याच त्यालाच आश्चर्य वाटल. पण ते बाहेर समजल नाही म्हणून वाचलो म्हणत पुढे म्हणाला.
बघ तु तोच विषय घेऊन बसलास. तर मला बोलायचच नाही. बात करु नकोस.
अबे सायन्सवाल्यांना काय प्रोब्लेम आहे रे दारुचा?
हा म्हणजे दारु पिणारा माणुस लैय सभ्य असतो ना?
बर मानल पण न पिणारे तरी कुठे सभ्य आहेत?
तुला सगळ माहित आणि मी येडा ना इथला?
अरे भडकतो कशाला? ऐक काल काका आले म्हणाले, पारधे काका आले का बर्थ डे ला? मी नाही म्हणालो. म्हणाले बर झाल चकणा जास्त खातो तो माणुस! म्हटलं काका काय बोलताय काय? ऐकत काय उभा राहिलास जा ग्लास आण.
बघ ये मला तुमच दारू पुरान ऐकायच नाहीये!!! दारु पिवून उसन प्रेम दाखवायची काम करतात. काय कमी आहे घरात? सगळ ठिक आहे तरी दारु पितात!
अबे ऐक तर... तस काकांसोबत बसायची पहिली वेळ. काका येवढा रसिक माणुस होता वाटल नव्हत. ना कोणाच्या अध्यात ना मध्यात असणारा हा माणुस. मस्त इन्जोय करत होता रे. म्हणाले आमचा पोरगा पिऊन गेलो की बेडरुम बंद करुन घेतो. मी म्हणालो पिता कशाला ना मग नाहि आवडत त्याला तर?
काका म्हणाले कामच तस असत! सकाळी जातो ते रात्री येतो. रोज तेच चेहरे. पोराला वेळ देता येत नाही कि घरात बायको डब्ब्यात काय भाजी कोणती आहे सांगते. बस संवाद संपला. तुम्हा पोरांना बघतो आणि माझ्या पोराला बघतो. अभ्यासात येवढा राहतो कि आयूष्य जगायला दुनिया बघायला विसरला रे तो! कधी उशीरा कामच्या ताणाला हलका करत दोन पेग घेतले. घरी गेलो तर बेडरुमचा दरवाजा बंद. सकाळी बोलायला गेलो पुर्ण शुध्दीत तर क्लासला उशीर होतो. कारण सांगत निघतो. बाप त्याला राक्षस वाटायला लागला रे! तुमची जनरेशन येवढी टोका टोकाची आहे. एक तुम्ही पोर प्रत्येक गोष्ट ऐन्जोय करता. हे एक टोक. तिकडे माझा पोरगा. काय माहित बंद खोलीत कोंडुन घेत कोणत्या दुनियेला बदलवायला बघतोय?
तर मित्रा दुनिया गोल आहे. चौकोनी आहे. त्रिकोणी आहे. याने फरक नाही पडत. ती चालतेय ना तशी चालत राहणार आहे. बस एक गोष्ट आहे की दुनिया चालवणारे तिला थांबवतात.
तुझ्या बाबांच काय ते पण पितात?
हा पितात ना. कधी कधी बडवतात पण. घर बाप चालवतोय मी नाही. आणि मी घर चालवायला सुरु केले तरी त्याला काय करायच मी सांगणार नाही. बाप आहे रे तो. घरात वाद बापात आणि पोरात नाय होणार तर कोणात होणार? काका म्हणाले ना जनरेशन गॅप! दोन वेगळी जनरेशन एकमेकांन समोर नेहमीच उभी असतात. माझ्या आजोबाच आणि बापाच पटल नाही. पण नाव लावण सोडल का त्यानी. हा वेळेचा फेरबदल आहे. क्लेश नाही. सगळ्याच गोष्टी एकाच चष्म्यातून बघायच कस?

माझ्या कडे बघत तो म्हणाला. मी चष्मा सरळ करत विचार करत बसलो. या दोघातला नमुना कोण?