मी दोन वाजता बस स्टॉपला ऊभी होती. दहा पंधरा मिनीटे होत आली तरी बस काही येत नव्हती मग मी एका मुलीच्या शेजारी जाऊन बसली. बसल्या बसल्या मी मोबाईलवर टाईमपास करत होती. तेवढ्यात समोर एक लहान मुलगा मळकट कपडे घालुन, माती संपुर्ण अंगाला लागलेला आला आणि माझ्या ड्रेसला हात लावुन एक हात पुढे करु लागला. मी त्याच्याकडे एक दोन सेकंद बघितलं, इकडे तिकडे नजर फिरवली तर पलीकडे त्याचा भाऊ पण हेच करत होता. मला खरंच राग आला, मला चिड आली. मी त्याला नाही म्हणुन मान हालवली. तो पुढे गेला त्याने परत पुढच्या मुलीच्या अंगाला हात लावला.. मला आता मात्र रहावलं नाही.. मी डायरेक्ट बोलली. हात न लावता नाही का मागता येत?? असे हात का लावतो तु सर्वांना???
खरं सांगु का... नाही आवडत मला ही लोकं अशी जिथे तिथे ऊभी राहुन पैसे मागतात तर.. शनिवारीच आम्ही पुण्याला छात असताना एक मोठा मुलगा अक्षरशः पंधरा ते सोळा वर्षांचा किंवा त्याहूनही मोठा असेल. तो येऊन समोर हात करतोय. मी नाही म्हणाली तो द्या हेच बोलत होता, तो आमच्याचसोबत ऊभा राहीलेला आणि माझ्या नवर्याला वाईट वाटलं त्यानी पैसे काढुन दिले.. पण मला नाही आवडलं.. आणि तो मुलगा मला काहीतरी बोलुन गेला...का द्यावं पण त्यांना आपण पैसे??? मला तर व्यवस्थित दिसतात ते, असं नाही की काही प्रोब्लेम आहे.. सध्या माझ्या रोजच्या दिवसात तरी पाच ते सहा असे भिकारी येऊन पैसे मागत असतात.. आणि सॉरी मला त्यांना भिकारी बोलायला ही वाईट वाटतं.. पण विचार करा ना ???? ही लोकं आज काहीच नाही का करु शकत?? फक्त कुठेतरी ऊभे राहुन, कोणाच्या तरी मागे फिरुन, सतत त्रास देऊन पैसे काढुन घेणे हेच करु शकतात का हे?? माहित नाही मला तुम्हांला माझं म्हणणं पटतं की नाही .. पण असे आणखे बरेच कुटुंब आहेत ज्यांना दिवसातुन एकदा जेवायला मिळतं. हातात पैसे नसतात त्यांच्या.. पण ते स्वतः कमवतात, मग ते एखाद्याच्या घरी काम असो किंवा विटभट्टीवर उन्हात केलंलं काम असो.. मला त्यांच वाईट वाटत.. मग ते तर त्यांची मुलं कशी सांभाळतात, एखाद्या झाडाखाली किंवा कुठे तरी शेताच्या बांधावर झोपवुन ठेवतात ती मुलांना इतकंच नाही तर मुलांना शाळेत ही पाठवतात ती .. मग ही लोकं अशी का नाही करत ?? ह्यांना कोणी काम देत नसेल का??
तुम्हांला जाणवतं की नाही ठाऊक नाही पण आजच्या स्थितीत महागाई इतकी वाढली आहे, लोकांना त्यांच्या पगारात महिना जात नाही. ती त्यांच्या कुटुंबासाठीच इतके दिवसभर कुठेतरी काम करुन येत असतात ना?? अशी ही मुलं, त्यांची आई आपल्याला इमोशनल करण्यासाठी असे एक एक रुप दाखवतात ना आणि आपण त्यांना दया येते म्हणुन काहीतरी काढुन देतो.. पण माझ्या असं मनात आलं दिवसभरात इतकी माणसं ह्यांना दिसतात, सर्वच पैसे देतील असं ही नाही पण निदान त्यांना एक एकाला विस तीस माणसांनी तरी पाच, दहा रुपये दिले ना तरी त्यांना दिवसाला आरामात चौघांचे किंवा पाच जणांचे मिळुन ८०० किंवा १००० च्या वर मिळत असतील.. पण त्यांना हे नाही माहित ना?? समोर पैसे देणारा व्यक्ती कोणत्या ठिकाणी काम करतो ?? आणि महिन्याला किती कमवतो ते?? समजा आज जर रोज प्रवास करणाऱ्या एका खाजगी शाळेतील शिक्षकेला रोज कोणितरी अशी मुलं रस्त्यावर भेटतात आणि पैश्यांसाठी विनवणी करतात आणि ती देते रोज दोघांना, तिघांना ५,१० रुपये. म्हणजे ती महिन्याला स्वतःने कमवलेले ३०० ते ४०० रुपये ह्यांना देते. पण तिला किती पगार आहे हे ह्यांना माहिती आहे का?? ती तिचं घरं कसं चालवते हे शेजारी असलेल्या माणसांना माहित आहे का??? तर नाही... त्या शिक्षिकेला महिन्याला रोज १५० रुपयेच्या हिशोबाने जर ४५०० तर ती कमवते आणि तिच्या घरात ही तिला ते वापरायचे आहेत मग तीची कंडीशन चांगली आहे का,?? ४५०० म्हणजे तिच्या पगारात तरी काय येतं??? काय भागणार आहे तिचं तरी ?? मग तिने का ह्यांना पैसे द्यावे?? आणि ह्यांच्यासाठी महिन्याचे ३०० का ४०० घालवावेत...