प्रियाच लक्ष तिकडेच असत.तितक्यात सर येतात ,सरांना बघून प्रिया ला खूप आनंद होतो.तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार ने घातलेला सूट ही आठवतो,सेम सूट सरांन घातलेला बघून ती बुचकळ्यात पडते.हॅप्पी बर्थडे प्रिया आणि सकाळ साठी सॉरी पण सर बोलतात. आणि ती एकदम भानावेर येते.नाही नाही सर उलट काल साठी मी सॉरी सांगते आणि थँक्यु तुम्ही आलात खूप बरं वाटलं.सांगून हळूच गालात हसते .सरांनी सकाळ साठी ही सॉरी सांगितलं ,सर किती चांगले आहेत ,मीच मूर्ख काहीही विचार करते , प्रिया मनातल्या मनात बोलली.सर ही प्रिया सगळ्यांसमोर सॉरी बोलली म्हणून कालचं सगळ विसरायचं ठरवतात. दोघांची चांगली मैत्री जमते.वाढदिवस मस्त साजरा होतो .सगळे घरी जातात प्रिया सरांबद्दल च सगळ तिच्या आईला सांगते तिच्या आईला ही समाधान होत..नंतर ती झोपायला जाते.आज तिच्या मनात कोणतीच चलबिचल नसते.सर तिच्या वाढदिवसाला आल्यामुळे चांगलं बोलल्या मुळे तिला समाधान ही असत आणि आनंद ही.तशीच तिला झोप लागते.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयारी ला लागते .आई टिफीन भरला गेला का? प्रिया विचारते.नाही ग बाकी आहे अजुन ,आई सांगते.थांब मी भरते, प्रिया सांगते आणि रोज पेक्षा आज जरा जास्तच भरते.तेवढ्यात केतकी येते. प्रिया आणि केतकी ऑफिस ला जातात.बाहेर अविनाश सरांचा ड्रायव्हर उभा दिसतो.प्रिया त्याला तब्येत बद्दल विचारते .तो हसतो आणि बोलतो मला काय होणार मी तर बराच आहे .प्रिया आश्चर्यात पडते आणि विचारते मग आमची गाडी बिघडली त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही का नव्हते आले ? त्या दिवशी तर सरांनी च मला सुट्टी दिली होती.प्रियाला काय समजायचं ते समजते.या वेळेस तिला सरांचा राग नाही येत पण उलट कुठेतरी सुखद वाटत. तेवढ्यात केतकी गाडी लावून येते.मग दोघी ऑफिस मधे जातात.सगळे त्यांच्या त्यांच्या डेस्क वर जातात.सगळे कामाला लागतात.प्रियाला कामात काही प्रॉब्लेम येतात ती त्या बद्दल केतकी ला विचारते पण तिलाही त्याबद्दल काही माहिती नसते म्हणून ती लगेच सरांना विचारायला जाते.मे आय कम इन सर? प्रिया विचारते. ओह प्रिया , येना .काय झालं काही काम आहे का?सर विचारतात.हो सर म्हणून ती तिचे प्रॉब्लेम्स बद्दल विचारते.सर तीला सगळ व्यवस्थित समजवून सांगतात.थँक्यु सर.सर अजुन काही तरी विचारायचं होत विचारू का ? प्रिया विचारते.अग विचार ना, सर सांगतात.तर कामाबद्दल नाही. ओह अस का चालेल चालेल विचार, सर सांगतात.तुमच्या ड्रायव्हर ला आता बर आहे का ? प्रिया विचारते.ड्रायव्हर ला ? हो हो बर आहे आता.सर थोडस नजर चुकवत आणि अडखळत बोलतात.काय झालं होत पण त्यांना? प्रिया विचारते.सर विचारात पडतात.पडून गेले होते ना ते वाटत जिन्यावरून ,प्रिया सांगते.हो हो बघ विसरलोच मी,सर सांगतात.प्रिया ने इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता तीच्याने कंट्रोल होत नाही आणि ती जोरात हसायला लागते. इकडे सरांना कळत नाही की हिला काय झालं अचानक.तितक्यात प्रिया सांगते, सर मी आधीच तुमच्या ड्रायव्हर ला त्यांच्या तब्येती बद्दल विचारून आली.त्यांनी मला सांगितलं की ते तर एकदम बरे आहेत अस.केव्हा पडले होते ते ? प्रिया मिश्किल पने सरांना प्रश्न करते.मग दोघेही खळखळून हसतात.तेवढयात लंच ब्रेक होतो.सर त्यांच्या साठी लंच ऑर्डर करायला फोन हातात घेतात तितक्यात प्रिया बोलते सर आज ऑर्डर नका करू.का ? आज मला उपाशी राहावे लागेल का ? सर हसतात.नाही आज मी आणला आहे तुमच्या साठी जास्तीचा टिफीन.प्रिया थोडस हळू आवाजात बोलते.सर तिच्या कडे आश्चर्यात बघतात आणि लगेच थँक्यु सांगतात.त्यांना कारण जाणून घ्यायचे नसते .तिने त्यांचा येवढं विचार केला तेच त्यांच्या साठी फार सुखद असत.अशीच दोघांची चांगली मैत्री जमत जाते.हळू हळू वीस दिवस निघून जातात.ते वीस दिवस त्यांना जणू काही वर्षांसारखे वाटायला लागतात.प्रोजेक्ट आता पूर्ण होण्यावर असतो.प्रोजेक्ट संपला की सर जाणार या विचारानेच प्रियाला घाबरायला होते.सर गेल्यावर मी कसकाय राहू शकणार वाटायला लागते.इकडे सरांचा ही तो च हाल असतो.दोघांच्या मनातलं एकमेकांना कळत असतं पण कोणी कोणाला तसे काही सांगत नाही.कारण तसे काही सांगितले तर आपण चांगला मित्र गमावून बसू अशी त्यांना भीती असते.असच दोन दिवसातच त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होतो.एक दिवसाचं फक्त कागदोपत्री कामे बाकी असतात.म्हणून सर केबिन मधला त्यांचा सगळा सामान भरत असतात तेवढयात प्रिया काही फॉर्म घेऊन येते तिला त्यावर सरांची सही हवी असते. सरांना त्यांचा सामान भरताना पाहून प्रियाला मात्र फार अस्वस्थ वाटायला लागत. सर ही तिच्या मनातले तिच्या नजरेतून लगेच ओळखतात.प्रियाला तसे पाहून सरांना ही तिच्यापासून लांब जाणार या विचाराने कसतरी व्हायला लागते तितक्यात ते स्वतःला सावरतात. काय प्रिया काही काम होते का तिला विचारतात.ती ही भानावर येते आणि हो सर यावर तुमची सही हवी होते सांगते.ती सही घेते आणि जायला निघते.तितक्यात सर तीला अडवतात ,प्रिया तुला काही सांगायचं होत.तिच्या मनाची धडधड वाढते तिला आधीपासूनच त्या गोष्टीची कुठे ना कुठे कल्पना असते .काय सर ? बोलाना थोडस लाजत थोडस घाबरत ती विचारते............क्रमशः