मितेश ला नोटिफिकेशन गेले. त्याने मग बघितले एकटाच हसत राहिला वेडी आहे ही संयु मनातच बोलला. त्याच्या च त्या पोस्ट वर त्याने कमेंट केली. वा सुंदर अशी. मग संयु ने ही रिप्लाय दिला.. सर तुमचीच तर आहे कविता. त्याने फक्त स्माईली टाकली. संयु चा त्याला मेसेज आला, हॅलो मी इथे एफ बी वर तुम्हाला सर च म्हणेन. तसे त्याने ओके असा रिप्लाय दिला.मग थोडा वेळ बोलून दोघे ऑनलाइन गेले. निनाद ने सुजय ला कॉल करून सांगितले की मितेश ने संयु ला होकार दिला तसा सुजय ही खुश झाला. सकाळीच मितेश ने संयु ला सांगितले की आज आपण डिनर ला जात आहोत. पल्लवी ला पन सांग म्हणाला. इकडे निनाद ने आधीच पल्लू ला सांगितले होते. मितेश चे आज कामात लक्ष लागत नव्हते. नवीन कादम्बरी अजुन बाकी होती. लिहायला घेतले तर संयु चा चेहरा त्याला समोर दिसू लागला. तीच बोलण आठवु लागले . मग मीतेश ला राहवले नाही त्याने एफ़ बी वर तिला मेसेज केला हैल्लो संयु काय करत आहेस? लगेचच तिचा रिप्लाय आला ऑफिस मध्ये आहे काम करतेय. मीतेश -- इट्स नॉट गुड़ संयू. संयु-- काय झाले मीतेश माझे काही चुकले का? मीतेश--- हो तू मला त्रास देत आहेस. संयु -- मी काय त्रास दिला ? मितेश--- तू मला काम करू देत नाहीयेस. संयु--- ओह्ह असे कसे मी तर माझ्या ऑफिस मध्ये आहे. मितेश--- हो पण मला त्रास देतेस ना. तुझी आठवण येते मला मग सांग मी काम कसे करू? संयु इकडे ब्लश करत होती काय बोलावे तिला समजेना. तसा परत मितेश चा मेसेज आला बोल ना डियरु . संयु -- मितेश मला काम आहे आपण नन्तर बोलुया. मितेश-- नाही आताच बोल बघ नाहीतर मला राग येईल. संयु -- हम्म दुसर येते तरी काय तुम्हाला. बोक्या☺️☺️. मितेश-- ये काय म्हणालिस बोक्या मी बोका आहे? संयु -- हो बोक्या सारखे नुसते गुरगुरता नेहमी. मितेश-- ओह्ह बट आय लाईक बोक्या नाइस नेम. संयु तू मला बोक्या च म्हणत जा. संयु-- बर म्हनेन आता मी काम करू का प्लीज. आणि रात्री भेटनार आहोतच ना डिनरला. मितेश-- ओके कर माय लव. संयु -- बाय बोक्या. म्हणत संयु ऑफलाइन गेली. इकडे मितेश गालातल्या गालात हसत होता. आणि मस्त गान ही एन्जॉय करत होता..भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग नाझाले अनोळखी माझी मलाच मीवाटे मला का व्यर्थ सारे ... सांग नातुझ्याविना, तुझ्याविनाउमजून सारे जरी खेळ हा मांडलातरीही कसा सांग ना जीव हा गुंतलाझाले आता जरी होते जसे मनीका हे बदलले अर्थ सारे ... सांग नातुझ्याविना, तुझ्याविनावाट होते माझी तुझी जरी वेगळीसोबतीची तरी आस सांग का लागलीफिरुनी पुन्हा नवे नाते मला हवेजीव तुटतो का हा असा रे ... सांग नातुझ्याविना, तुझ्याविना...
कधी ऑफिस सुटते आणि घरी जाते अस संयु ला वाटत होते. आज खास रात्री च्या डिनर साठी तिला तयार व्हायचे होते. मितेश ला भेटनयाची ओढ़ लागली होती. इकडे निनाद आज दुपारी काम आहे अस सांगून ऑफिस मधून बाहेर पडला होता. तो पल्लू ला भेटायला जाणार होता.
पल्लू ने संयु ला या बद्दल काही सांगितले नव्हते निनाद बोलला होता की कोणाला काही सांगू नकोस. म्हणून पल्लवी ने आज संयु ला कॉन्टैक्ट केलाच नव्हता तसे ही संयु मितेश च्या स्वप्नात दंग होती तिला पल्लू ची आठवण ही नव्हती. निनाद ने पल्लवी ला एके ठिकाणी बोलवले होते. मग तिला आपल्या सोबत घेवून तो तळजाई टेकड़ी वर आला होता. पब्लिक प्लेस ला भेटने म्हणजे निवांत बोलता येणार नव्हते. दुपारी टेकड़ी वर सावली सुद्धा असते . एका झाड़ा खाली ते दोघे बसले. पल्लू तुला कल्पना आली असेलच की मी तुला का भेटायला बोलवले आहे याची. पल्लू ने ओळखले होते म्हणुन ती लाजुन मान खाली घालून बसली होती. तसच खाली बघत हो म्हणाली. पल्लवी तू अशीच माझ्या कड़े न बघता बोलणार असशील तर मी जातो इथून. नाही निनाद म्हणत पल्लू ने मान वर केली. पिंक कुर्ता आणि ब्लू लेगिंग्स मध्ये पल्लवी छान दिसत होती. निनाद ने ही व्हाइट टी शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. फ्रेंच कट बियर्ड आणि मस्त बायसेप्स होते त्याचे एकसम स्मार्ट लुक. त्याने पल्लू चा हात आपल्या हातात घेतला. तशी ती शाहरून गेली अंगभर रोमांच फुलले तिच्या. निनाद चा हात एकदम राकट,जिम करून कड़क झालेला. पल्लू चा हात एकदम नाजुक. ती आपला हात त्याच्या हातातून काढून घ्यायला बघत होती. तसा निनाद ने अजुन तिचा हात घट्ट पकडला पल्लू मला जे सांगायचे आहे ते तुझ्या ही मनात आहे ना? पल्लू जाम घाबरली होती . तिचा श्वास अडकतो की काय अस झालं होतं. प्रेम ती ही करत होती निनाद वर पण असा तो अचानक तिला विचारेल हे माहीत न्हवतं तिला. पल्लू बोल ना जे मनात आहे ते बोल. हा ते पल्लू अडखळत बोलत होती. तसा निनाद म्हणाला, ओके म्हणजे तुझे माझ्यावर प्रेम नाही मी तुला आवडत ही नाही हो ना. नाही नाही तसे नाही काही निनाद आय लव यु. ती पटकन बोलून गेली. तसा निनाद जोर जोरात हसू लागला. पल्लू ने दोन्ही हातांनी आपला चेहरा लपवला. निनाद तिच्या जवळ आला त्याने तिचे हात बाजूला केले. पल्लू ला त्याच्या स्पर्शाने पोटात कसतरी व्हायला लागले. पल्लू आय रियली लव यु. आणि त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हलकेच तिच्या काना मागे नेली. तिच्या अंगावर काटा फुलला होता. तो खूप जवळ होता तिच्या . निनाद ने पटकन तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला किस केले. पल्लू लाजून त्याच्या कुशीत शिरली. तो तिच्या केसां वरून हात फिरवत राहिला. पल्लू हे आपलं गुपित आता नको कोणाला सांगूस. आज रात्री आपण डिनर ला जातोय. मितेश आणि संयु चे रिलेशनशिप सेलिब्रेट करायला मितेश ने पार्टी ठेवली आहे तेव्हा आपण सांगू. ओके निनाद चालेल. चल जाऊ आपण उशीर होईल. मग निनाद पल्लू ला सोडून ऑफिस ला आला. आज निनाद ही खूप खुश होता. मितेश काम करत होता. निनाद पल्लवी ला सांगितले का पार्टी चे. हो मित्या सांगितले. मग काय विशेष ? कुठे काय विशेष ,विशेष तर तुज्या कडे भावा. हो का म्हणत मितेश गालातल्या गालात हसत होता कारण निनाद चा चेहराच खुलून गेला होता त्यामुळे काही तरी स्पेशल झाले आहे हे मितेश ने ओळखले होते.