ते दोघे पु. ल. देशपांडे गार्डन ला आले. पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे.पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे. मीतेश आणि संयु गार्डन मध्ये फिरत होते . ख़ुप छान वातावरण होते. मितेश म्हणाला संयु जर तुझी हरकत नसेल तर आपण सेल्फ़ी काढूयात? ओके सर चालेल संयु म्हणाली. मग दोघांनी ख़ुप फोटोज काढले. दुपार ची वेळ होती त्यामुळे गार्डन मध्ये जास्त गर्दी नवहती. एके ठिकाणी ते दोघे बसले छान सावली होती बसायला बाक होते. सर काही बोलायचे होते बोलू का संयु ने विचारले. हो बोल आणि तू मला इतकं का घाबरतेस? मी काही खाणार नाही तुला. ते तुम्हाला राग येतो ना पटकन म्हणून . हम्मम राग येतो आता माझा स्वभावच तसा आहे त्याला मी तरी काय करू? असो बोल तू काय बोलणार होतीस. सर काल मी तुमच्या साठी एक गिफ्ट आणले होते ते आता घ्याल का? दे काय आणले आहेस मितेश म्हणाला. मग संयु ने पर्स मधून ते रिस्ट वॉच बाहेर काढले जे तिने मितेश ला आणले होते. हे घ्या सर म्हणत तिने हात पुढे केला. काय आहे यात गिफ्ट पॅक बघून मितेश म्हणाला. सर रिस्ट वॉच आहे. ओके ते पॅक ओपन कर तो बोलला. तसे संयु ने पॅकिंग काढले आणि वॉच त्याच्या समोर धरला. मितेश ने आपल्या हातातले वॉच काढले आणि तिच्या समोर आपला हात धरला बोलला तूच घाल हे वॉच माझ्या हातात. संयु ला कसे तरी झाले सर तुम्ही च घाला ना. नोप तू आणलेस ना मग तूच घालायचे. मितेश ऐकनार नाही हे तिला माहीत होते मग ती त्याच्या हातात वॉच घालू लागली पण तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर तिला जाणवत होते. ती गोंधळली होती म्हणून नीट त्याला वॉच पण घालता येईना. तो तिची धांदल बघून हसत होता. शेवटी एकदाचे तिने वॉच त्याला घातले. खूप छान आहे संयु मला आवडले तुझे गिफ्ट. थँक यु सर. त्याने तिचा हात पकडला ती गडबडली पण त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. त्याने दुसऱ्या हाताने तिचा चेहरा थोडा वर उचलला तिच्या डोळ्यात बघत म्हणाला संयु खूप प्रेम करतेस ना माझ्यावर. हो सर स्वहता पेक्षा जास्त करते. कायम साथ देशील मला. हो सर मी नेहमी तुमच्या सोबत असेन. संयु आय अल्सो लव यु सो मच. तिला क्षणभर काही समजलेच नाही. काय म्हणालात सर तुम्ही. संयु आय लव यु समजले. तिला इतका आनंद झाला की तिच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहू लागले. संयु का रडतेस ?सर मला खुप आनंद झाला आहे तो मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. संयु आता तरी मला सर नको म्हणू. ओके सर . परत सर. मी प्रयत्न करेन. नाही आता बोल मितेश आय लव यु. सर मला लाज वाटते. अरे त्या दिवशी तर बिनधास्त बोललीस ना. मग आता काय झाले ? ते मेसेज वर बोलायला काही वाटत नाही पण अस समोरा समोर नाही. बघ मग मला राग येईल मग लवकर माझा राग जात नाही बघ विचार कर. सर काय हे मला अडचणीत टाकत आहात. लवकर बोल मग. तो तिच्या नजरेत बघत बोलला. सर तुम्ही असे बघू नका ना. का काय झाले.? तुमचे डोळे तुमची नजर भान हरपून जाते मग माझे. अच्छा बोल नाही बघत म्हणत मितेश आपल्या हनुवटीवर हात ठेवून संयु कडे बघत होता. सर ... सर नाही मितेश मी परत सांगणार नाही . ओके मितेश आय रियली लव यु अस बोलून संयु ने नजर खाली घातली. मितेश ने हसतच आपल्या बोटांनी तिचा चेहरा उर उचलला तिच्या नजरेत बघत म्हणाला,कायम मला साथ देशील ना संयु ? हो मितेश मी नेहमी तुमच्या सोबत असेन. मितेश तिच्या आणखी जवळ आला तसे संयु चे हार्ट बिट्स वाढले त्याचा उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. त्याने अलगद तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले ,दोन्ही हातात तिचा चेहरा पकडून ठेवला आणि पॅशिनेटली तिला किस करू लागला. त्याचा स्पर्श तिला मोहवत होता अंगावर रोमांच फुलवत होता. तिला हा स्पर्श हवाहवासा वाटत होता. बरयाच वेळानी मितेश बाजूला झाला . संयु अजून ही थरथरत होती. त्याची नशा तिच्या सर्वांगाला व्यापून राहिली होती. मितेश म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली.
क्रमश.. ©® sangieta devkar 2017