ONJALIT MAZHYA...TU KHUP KAHI DEUN GELAS.... in Marathi Poems by archana d books and stories PDF | ओंजळीत माझ्या... तू खूप काही देऊन गेलास...

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

ओंजळीत माझ्या... तू खूप काही देऊन गेलास...

कविता --- ओंजळीत माझ्या... तू खूप काही देऊन गेलास...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
आठवते का तुला की, विसरलास...
आठवत नसेल तर आठवण करून देऊ का
मी...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
आठवते का ती आपली पहिली भेट ....
मी नाही विसरले त्या भेटी गाठी.....
मी नाही विसरले ते मोहक क्षण....
ज्यात फक्त होतो तू आणि मी...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
आठवते का ती कातरवेळ..
ज्यात तू तुझ्या मनातील भावना...
मला जाहीर केल्या होत्या..
विसरला असशील ना..

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
आठवते मला आजही तू पाहिलेली....
माझ्या होकाराची वाट...
होकार दिल्यानंतर तुझा तो...
गगनात न मावणारा आनंद...

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
सतत तुझा भास आभास होतो रे....
माझ्या समोर तुझ मन मोकळं हसण....
मी रुसल्यावर मला मनवण...
ते अनमोल मोहक क्षण...

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
आठवते मला तुझं त्या
आनामिष नेत्रांनी मला पाहणे...
तुझ्या मिठीत विसवताना ...त्या क्षणी..
पोटात माझ्या असंख्य गुदगुल्या व्हायच्या...

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
आठवतात का तू मला दिलेली वचन...
माझा स्पर्श ,मला मारलेली ती मिठी....
मला दाखवलेली तुझ्यासोबत ची स्वप्न
विसरला असशील ना...

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
आपल्या झालेल्या त्या कातरवेळ च्या भेटी....
तो तुझा हवाहवासा स्पर्श...
तुझी उबदार मिठी..
मी नाही विसरले बाबा..

ओंजळीत माझ्या ...तू खूप काही देऊन गेलास...
आठवतात मला ते तुझ्या सोबतचे क्षण....
तू मला दाखवलेली स्वप्न...
जी प्रत्यक्षात फक्त स्वप्न च राहिली...
जे क्षण आता येणे नाही..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
तू पहिल्यांदा आणलेली मोगऱ्याची फुलं....
त्या मोगऱ्याचा तो मोहक सुगंध...
त्या मोगऱ्याच वेड लावलास मला..
वेड लावून सोडून गेला मला..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
अजूनही त्या कातरवेळी आठवतो तु मला..
तुझ्या त्या माझासाठी केलेल्या कविता...
माझ्यासाठी स्टेशन वर पाहिलेली वाट..
प्रेमाची परिभाषा शिकवलीस मला....

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
आठवतो तू मला केलेला तो पहिला स्पर्श....
तू मला दिलेल्या प्रेमळ खुणा...
तू मला शिकवलेली स्पर्शाची भाषा...
अगतिक करून निघून का गेलास..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
प्रेमाचा अर्थ शिकवून मला ....
प्रेमाची वचन देऊन ....
प्रेमाची परिसीमा गाठून...
असा गायब कुठे झालास...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
तुझ्या वचनांना भुलले....
तुला समर्पित झाली रे...
आयुष्यात केलेली चूक की बरोबर..
याच देणं घेणं नाही आता मला..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
तू मला दिलेले ते मोहक क्षण....
नाही विसरू शकले अजूनही...
तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण..
ते क्षणच मला संजीवनी देतात...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
असा मला सोडून जाताना...
तुला माझ्यावर दया नाही का येत..
येशील ना परत...
माझ्यावर मोरपीस फिरवायला....

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
हृदयात कळ येत नाही का ....
असा माझ्या हृदयाशी खेळून ....
काय मिळालं तुला...
मनाचं समाधान की तृप्ती...

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
तुझ्याकडून मिळालेले प्रेम....
या जन्मी विसरणे अशक्य...
तुला तरी मला विसरणे कसा झालं शक्य...
कधी कोणत्या आडवळणावर भेटशील का?..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
तुला तू मला सुपूर्द केलेले...
तू मला दिलेले सर्वोत्तम गिफ्ट दाखवायचे...
कधी येशील ...त्या कातरवेळ लाच भेट..
तुझी निशाणी जपून ठेवली आहे..

ओंजळीत माझ्या...तू खूप काही देऊन गेलास...
येशील परत तेव्हा परत करेन....
आपल्या प्रेमाची निशाणी...
तुझी अमानत तुला परत केली की...
पुढच्या प्रवासाला मी मोकळी..

Archana D