Chukiche Paaul - 5 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | चुकीचे पाऊल! - ०५

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

चुकीचे पाऊल! - ०५


आता पर्यंत आपण बघीतले.

शामल आणि माझ्यात कळत नकळत शेवटी सर्व काही घडले!

आता पुढे..!

घडलेल्या प्रकारातून माझं मन काही केल्या बाहेर पडायला तयारंच नव्हते. राहून राहून मला शामलचा तो स्पर्श आठवत होता आणि मी स्वतःमध्ये हरवत चालले होते!

दारावरची घंटा वाजली आणि मी विचारातून बाहेर येत भानावर आले. आई-बाबा आले असावेत या विचाराने उड्या मारत मी दाराच्या दिशेने धाव घेतली. दार उघडले तर समोर शामल उभा होता. त्याला बघून मी खुप खुश झाले. पण, मला बघताक्षणी त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले.

काही कळण्या आतंच तो मला धक्का देत आत शिरला.

त्याच्या अशा वागण्याने मी दुखावले. तो असा का वागला हे जाब विचारण्यासाठी मी त्याच्या पाठीमागे जात खोलीत शिरले आणि समोरचं दृश्य पाहून माझी धडधड वाढली.

शामल स्वतःचे सामान बॅगेत भरताना मला दिसला. तो हे का करतोय मला काहीच सुचत नव्हते. नकळत डोळ्यांतून अश्रू गालावर ओघळले!

मी शामल जवळ जात त्याला मागून मीठी मारली. तसेच त्याने चिडून मला स्वतःपासून दूर केले. मी परत जाऊन त्याला फिरवून घेत त्याच्या मिठीत शिरले. त्याने मला दूर करत माझ्या कानशिलात भडकावली!

हे क्षणात घडले आणि मी भारावून त्याच्याकडे पाहत राहिले!

"काय हे शामल?" : मी चिडून.

"तू इथून निघ! तुझा आणि माझा काहीही संबंध नाही! समजलं? आपल्यात जे काही घडलं त्यात तुझाही आनंद होता आणि माझाही! यानंतर तू माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करु नकोस!"

शामल रागातंच सामानाची बॅग उचलून घेत घरातून निघून गेला. सर्व सामान घेऊन तो निघून गेल्याने परतणार नसल्याची खात्री मला पटली! नकळत अश्रूंनी डोळ्यांच्या कडा भरून आल्या.

त्याच्या जाण्याने मी आतून पूर्णपणे तुटून पडले! पुढे काय वाढून ठेवले आहे याचीही कल्पना करवत नव्हती!

थोड्याच वेळात आई-बाबा परतले. त्यांच्यासमोर सर्व ठीक असल्याचे दाखवत मी काहीही झाले नसल्याचे भासवत राहिले.

असेच तीन महिने उलटून गेले आणि एक दिवस…!

रात्री १२ वाजता!

पोटात असंख्य वेदना मला जाणवल्या! या वेदना मासिक पाळीहून वेदनादायी होत्या! काय करावे काहीच सुचत नव्हते! आईला आवाज दिला तर, काय? म्हणून, त्या रात्री मी सर्व काही गप राहून सहन केले.

पहील्यांदाच मासिक पाळी नसताना सुद्धा मला त्या वेदना जाणवत असल्याने मनात वेगळेच भीतीचे भाव उमटले!

कशातंच मन लागत नव्हते! काय करावे सुचत नव्हते! त्यात ओंकारचे अश्लील चाळे आणखीच वाढत होते. त्याचे अधून मधून मुद्दाम स्पर्श करत किळसवाणे हसणे मला आणखीच गोंधळात टाकणारे होते.

एक दिवस असेच बसले असता, मनाशी ठरवत मासिक पाळी व्यतिरिक्त पोटात दुखण्याची इतर कारणे काय असावीत हे शोधण्याचा प्रयत्न केला. शोध घेतल्यावर जे काही वाचनात समोर आलं ते वाचून माझ्या पायाखालून जमीन सरकली! डोळ्यांपुढे अंधारी आली! मी किती मोठी चुक केली हे मला समजले आणि मी सर्व आठवून रडायला लागले!

माहिती अभावी पडलेले चुकीचे पाऊल या प्रकारे माझ्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित करतील याची कल्पना नसल्याने किंबहुना त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात यावर कधीच बोललं न गेल्याने आज मी या समस्येत अडकले होते!

पण, एक प्रश्न अजुन मनात होताच! तो म्हणजे, मी जो विचार करतेय त्याच कारणाने पोटात होणाऱ्या वेदना होत असतील हे कशावरून? कदाचित मी जास्तच विचार करत आहे, जे मी वाचलं ते खोटं ही असू शकतं या माझ्या मनातील सहानुभूती देणाऱ्या विचारांतच मी त्या दिवशी झोपी गेले.

दुसरा दिवस उजाडला आणि नेहमीची दिनचर्या सुरू झाली. मी आवरून शाळेत आले. आज त्रास नाही म्हणून मी मोकळा श्वास घेतला. पण, अचानक त्रास व्हायला सुरुवात झाली आणि मी डोकं टेकवत बसून राहिले.

काही वेळाने वर्गात एक सूचना कानावर पडली आणि मी डोकं वर काढत समोर बघितले. शाळेकडून एका अशासकीय संस्थेमार्फत "लैंगिकता शिक्षण गट" येणार असल्याची ती सूचना होती. सर्वांनी त्यांच्या सेमिनारला हजर राहणे बंधनकारक असल्याने कोणतेही कारण सांगायला जमणार नव्हते. शेवटी मला जाणे भाग पडले.

सर्व विद्यार्थ्यांमध्ये मी जाऊन बसले! मात्र, आता माझ्या मनात वेगळीच भीती होती. थोड्याच वेळात तिथे "लैंगिकता शिक्षण गट" दाखल झाले. त्यांनी मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या गटाकडे सुपूर्द केले. जेणेकरून, मुलं-मुली मोकळेपणाने संवाद साधू शकतील. स्वतःच्या वैयक्तिक समस्या त्यांना न घाबरता सांगू शकतील.

सुरूवातीला अशासकीय संस्था म्हणून काम करण्यासोबतंच त्यांच्या द्वारे शासनाच्या योजना राबवण्यात कसा हातभार लावला जातो हे सांगण्यात आले. त्यानंतर, लैंगिकता शिक्षण म्हणजे काय? त्याची गरज काय? माहिती अभावी काय विपरीत घडू शकते? या व अशा कितीतरी महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी विद्यार्थिनिंशी संवाद साधला. नंतर त्यांनी आपला मोर्चा प्रश्नांकडे वळवला.

प्रत्येकच मुलीला आजवर त्यांच्या बाबतीत घडलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांबद्दल आणि त्या प्रसंगाला त्यांनी कशा प्रकारे हाताळले असे सर्व अनुभव सामायिक करायला सांगण्यात आले. प्रत्येकाने आजवर त्यांना दिवसातून कमीत - कमी एकदा तरी अशा घाण कृत्याला सामोरे जावे लागत असल्याचे घाबरतंच सांगितले. मात्र, त्या कृत्याविरोधात स्वतःच्या संरक्षण कौशल्या अभावी योग्य रीतीने प्रतिकार करू न शकल्याचं सुद्धा त्यांनी स्वीकारलं.

संवाद सुरू असताना मात्र, माझ्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव गटातील एका स्त्री सदस्यांनी हेरले. त्यांनी मला बोलावून घेत काळजीने विचारणा केली आणि एका खोलीत नेले. तिथे त्यांनी माझ्याशी संवाद साधायला सुरूवात केली.

"बेटा, माझं नाव प्रियांका गावडे. मी आमच्या गटाची प्रमुख. हे बघ, आमच्यावर विश्वास ठेऊन तुझ्या समस्या सांग. तुझ्या सोबत काही चुकीचे घडले का? बाकीच्या मुलींपेक्षा तू जरा जास्तच घाबरलेली दिसलीस, म्हणून मी तुला इकडे घेऊन आले. बोल बाळा, बिनधास्त बोल." : प्रियांका गावडे.

त्यांच्या इतक्या आपुलकीच्या बोलण्यावर मात्र, मी हंबरडाच फोडला. मला जवळ घेत माझं रडणं थांबे पर्यंत डोक्यावरून त्या मायेने हात फिरवत राहिल्या.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.