सर्व रसिक वाचकांसाठी एक नवीन कथा घेऊन आलो आहोत. आणि हि कथा सध्याच्या परिस्थिती वर आधारित आहे या कथेच्या माध्यमातून एका मुलीचा आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठीचा संघर्ष दाखवला आहे. चला तर मग कथेला सुरवात करूया.
हि कथा आहे दोन अशा मनांची जे आधीपासूनच एकमेकांच्या विरोधात होते सुहास आणि आराध्या हे दोघे एकमेकांना पहिल्यांना एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये भेटले जिथे या दोघांनी १० वि च्या उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये कॉम्प्युटर चा कोर्स करायचे ठरवले होते. सुहास १० वी च्या परीक्षा संपल्या नंतर पहिल्यांदा कॉम्प्युटरच्या क्लास साठी १४ एप्रिल ला गेला तो आधीच क्लास साठी १५ मिनिटे लेट होता क्लास चालू झाला होता त्या इन्स्टिट्यूट मधले शिक्षक कॉम्प्युटर ची बेसिक माहिती विद्यार्थ्यांना देत होते. त्या चालू क्लास मध्ये सुहास जाऊन बसला पण क्लास मध्ये सर्व मुली होत्या त्यामुळे त्याला थोड Uncomfortable वाटत होते. आणि तो क्लास ला आधीच लेट हित त्यामुळे त्याला काय चालू आहे हे पण लवकर समजल नाही. पुढील २० मिनिटामध्ये क्लास संपला आणि त्या शिक्षकांनी जे शिकवलं आहे त्याचे Practical करायला सांगितले सुहास PC समोर येऊन बसला आणि जे समजले होते त्याची प्रॅक्टिस केली आणि त्याची वेळ संपल्या नंतर तो घरी जाण्यासाठी निघाला होताच तेवढ्यात तिथल्या सेंटर कॉर्डीनेटर ने सुहास ला बोलून घेतल आणि त्याला बॅचेसच्या वेळेबद्धल सांगितले आणि होणाऱ्या लेक्चर बद्धल माहिती दिली आणि MS-CIT हा कोर्स Online पद्धतीने शिकण्याचा असल्यामुळे सुहासला त्याचा Learner ID आणि Password दिला आणि तो उद्यापासून क्लास ला जॉईन करू शकतो असे सांगिले. दुसर्या दिवशी सकाळी १०:०० वाजता लेक्चर होते त्यामुळे सुहास लवकरच लेक्चर साठी आला होता पहिल्या दिवशी लेक्चर हॉलमध्ये त्या संस्थेबाद्धाल माहिती दिली आणि लेक्चर दरम्यान होणाऱ्या अॅक्टीव्हिटी बद्धल सांगितले आणि MS-CIT शिकत असतानाचा ३ महिन्याचा प्रवास कसा होणार आहे या बद्धल माहिती दिली. लेक्चर संपल्या नंतर सर्व विद्यार्थी कॉम्प्युटर लॅबमध्ये आले आणि त्यांचा MS-CIT चा अभ्यासक्रम ऐकू लागले. कॉम्प्युटरची संख्या कमी असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यंना कॉम्प्युटर मिळाले नाही त्यामुळे काही विद्यार्थी Waiting Area मध्ये बसले होते त्यामध्ये सुहास सुद्धा होता.
थोड्या वेळानंतर तिथे एक कॉम्प्युटर ट्रेनर आला आणि Waiting मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना लॅबमध्ये घेऊन गेला सुहास त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बसला होता पण कॉम्प्युटर चा प्रोब्लेम होता मानून त्याने तिथल्या ट्रेनर ला सांगितले ट्रेनर ला बोलवत असताना त्याला त्याचा १० वी चा वर्गमित्र सौरभ दिसला त्याच्या गळ्यात स्टाफचे ID Card होते क्लास संपल्यानंतर तो सौरभ ला भेटला आणि त्याला विचारले तू इथ कसा जॉईन झालास त्याने उत्तर दिले मी कामाव शिका या योजनेच्या अंतर्गत जॉईन झालो आहे आणि तो तिथ काम करून कॉम्प्युटरच्या ज्ञानासोबत पैसे सुद्धा कमवत आहे. आणि त्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ सुद्धा मिळतो यावर सुहास विचार करतो आपण पण कामाव शिका अंतर्गत जॉईन केल तर आपल्याला पण सौरभ सारखा जास्त वेळ मिळेल अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि घरी मोकाल्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा काम सुद्धा करता येईल. आणि त्याचा वेळ सत्कारणी लागेल या उद्धेशाने सुहास त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांशी भेटला आणि कामाव शिका योजनेतून काम करायची इच्छा व्यक्त केली. प्राचार्यांनी त्याच्याकडून एक अर्ज लिहून घेतला आणि त्याची मुलाखत घेऊन त्याला दुसर्या दिवसापासून जॉईन होण्यासाठी सांगितले आत्ता सुहास चा दिनक्रम बदललेला होता सुहास सकाळी ७:०० ला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जात होता आणि दुपारी १२:०० ला घरी येत होता आणि त्यानंतर दुपारी ३:०० ते सायंकाळी ६:०० असा त्याचा कामाचा वेळ ठरला होता. सर्व काही व्यवस्थित चालले होते प्राचार्यांनी सुहासकडे लॅब व्यवस्थापनाचे काम दिले होते आणि सुहास त्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने पार पडत होता त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये फक्त ३ स्टाफ होते बाकीचा सर्व स्टाफ हा कामाव शिका विद्यार्थ्यांचा होता मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब होत्या आणि प्राचार्यांची सक्त मनाई होती कि मुलीच्या लॅबमध्ये कामाव्यतिरिक्त कोणताच ट्रेनर किंवा मुलगा जाणार नाही. २ दिवसानंतर प्राचार्यांनी सुहास ला साकाळीच्या लेक्चर साठी लेक्चर हॉलमध्ये थांबायला सांगितले त्या लेक्चर मध्ये ३ मिनिट अॅक्टीव्हीटीमध्ये एक कविता सदर केली होती आणि त्यानंतर त्याला समजले कि या अॅक्टीव्हीटीमध्ये सहभागी होणारा पहिला विद्यार्थी आहे त्यामुळे प्राचार्यांनी त्याचे सर्व विद्यार्थ्यांसमोर कौतुक केले आणि त्या लेक्चर मध्ये आराध्या सुद्धा बसलेली होती परंतु सुहासला अजून माहिती नवत कि आराध्यासुद्धा कामाव शिका मध्ये काम करते आहे म्हणून एक ते दोघे कधी भेटले पण नव्हते.
प्राचार्यांनी सर्वांसमोर सुहासचे कौतुक केल्यामुळे सुहास सर्व विद्यार्थ्याच्या परिचयाचा झाला होता आणि शिवाय तो लॅब व्यवस्थापनाचे काम करत होता त्यामुळे सर्व विद्यार्थी त्याच्याशी ओळख वाढवण्यामध्ये इच्छुक होते. लेक्चर मधून आल्यानंतर मुलींच्या लॅबमध्ये कीबोर्डचा प्रोब्लेम आला होता आणि सुहास शिवाय ट्रेनर मध्ये दुसर कोणीही नव्हत सगळे विद्यार्थी आणि ट्रेनर दुसर्या लेक्चर साठी गेले होते अराध्याने सुहास ला आवाज दिला आणि पहिल्यांदा सुहास आणि आराध्या एकमेकांना बोलले सुहास आधीपासूनच मुलींना बोलायाल खूप लाजत होता त्यातून तो लॅबमध्ये जाऊन झालेला प्रोब्लेम दुरुस्त करून आला आणि दुसरे लेक्चर संपल्या नंतर सर ट्रेनर आणि विद्यार्थी आल्या नंतर सुहास घरी गेला. दुपारी घरी जाऊन आल्या नंतर सर्व ट्रेनर मुलांनी ठरवले कि उद्याचा डबा सर्वांनी सोबत खायचा त्यामुळे सर्व जन डब्बा घेऊन येणार असे ठरले दुसर्या दिवशी जेवण करत असताना सर्वांची वाढदिवस या मुद्द्यावर चर्चा सुरु होती तेवढ्यात एक सिनीअर ट्रेनर म्हणाला या इन्स्टिट्यूट मध्ये स्टाफ चा वाढदिवस साजरा केला जातो आणि सर्वांनी एकमेकांच्या Birth Date एकमेकांसोबत शेअर केल्या पण सुहास ने त्याची जन्मतारीख सांगितली नाही आणि तेवढ्यात प्राचार्यांनी त्याला बोलून घेतले त्यामुळे त्याला जावे लागले बाकीच्या ट्रेनर ने सुहासच्या Resume मधून त्याची जन्मतारीख काढली आणि सुहास चा Birthday २ दिवसावर आलेला होता त्यामुळे सर्वांनी ठरावले कि आपण सुहास ला सरप्राईज द्यायचे २ दिवसानंतर रविवार होता आणि रविवारी सर्वांना हाफ डे होता त्यामुळे दुपारी २:०० वाजता सर्व स्टाफ घरी जाण्यासाठी निघाला होताच तेवढ्यात एका सिनीअर ने कॉन्फरन्स हॉलमध्ये यायला सांगितले तिथे सुहासचा वाढदिवस साजरा करण्याची सर्व तयारी केलेली होती हे बघून सुहास सुद्धा खूप खुश होता त्या दिवशी सुहास आणि आराध्या हे दोघे एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि आपली ओळख करून दिली त्याच्या दुसर्या दिवशी दुपारी विद्यार्थ्यांची एवढी गर्दी सुद्धा नव्हती आणि निम्मा स्टाफ मीटिंग साठी गेलेला होता लॅबमध्ये फक्त ४ ट्रेनर होते सुहास, आराध्या, विशाखा, आणि सुरज सुहासला फोन आला होता म्हणून तो बोलण्यासाठी बाहेर गेला होता माघारी आल्यावर त्याला सार्वजन मिळून गप्पा मारत बसले आहेत असे दिसले तो त्यांच्याजवळ गेला आणि आणि प्राचार्यांनी तुम्हाला अस एकत्र बसून गप्पा मारताना बघितल तर खूप रागावतील अस सांगितल पण त्या तिघांनी सुहास ऐकल नाही ते गप्पा मारत बसले होते सुहास त्यांच्यापासून लांब जाऊन बसला सुरजने अराध्याला सांगितले कि तू सुहास ला बोलून आन आपण त्याला पण आपल्यामध्ये सामील करून घेऊया एकटाच बसला आहे.
सुरजचे बोलणे ऐकून आराध्या सुहासला बोलवायला गेली आणि जबरदस्ती त्याला घेऊन आली सुरज आणि विशाखा बोलत बसले होते आराध्या मानली आपण त्यांच्यापासून लांब बसू त्यांना आपल्यामुळे त्रास नको त्यानंतर अराध्याने सुहासला त्याच्याबद्धल विचारल त्याच कुटुंबाबद्धल किती लोक आहेत घरात, पुढे काय ठरवल आहे कशात करियर करायचे आहे वगेरे – वगेरे पहिले १० मिनिट तर सुहासला बोलायलाच नाही मिळाल फक्त अराध्याचीच बडबड चालू होती. सुहासने तिच्या बडबडीला कंटाळून तिला थांबायला सांगितल आणि म्हणाला मी बोलू का आत्ता मागशीपासून तूच बोलतेस मला पण बोलू दे त्या नंतर अराध्याने हसर्या चेहर्यासोबत मानेने होकार दिला त्या नंतर सुहास ने त्याच्या घरच्या परिस्थिती बद्धल सर्व काही सांगून टाकले आणि अराध्यानेसुद्धा मनामध्ये काहीच न ठेवता सर्व काही सांगून टाकेल यांच्या बोलण्यातून ते दोघ एकमेकांच्या जवळ येत होते हे त्यांना सोडून बाकी सर्वांना काळात होते सुरज आणि विशाखाचे अचानक सुहास आणि अराध्याकडे लक्ष गेले आणि त्यांना समजल कि याच बॉंडिंग हळू हळू वाढत आहे आणि सुहास ला चिडवण्यासाठी सुरज त्या दोघांच्या जवळ गेला आणि म्हणाला प्राचार्यांनी जर तुम्हाला एकत्र बोलताना बघितल तर तर खूप रागावतील अस कोण तरी म्हणत होत मला वाटत आहे तेच वाक्य विसरल आहे तुझ..! “हो ना विशाखा” विशाखा त्यावर उत्तर देते हो ना विसरल्या सारखाच वाटत आहे जरा जास्तच मन लागल ना गप्पांमध्ये म्हणून कदाचित विसरल असेल त्यावर थोडस चिडून आराध्या म्हणाली हो ना अगदी तुमच्या सारखच आणि आम्ही तुमच्यासारख हळू आवाजात बोलत नव्हतो आम्ही फक्त एकमेकांच्या Family बद्धल बोलत होतो. एवढ ऐकून सुरज आणि विशाखा तिथून निघून जातात आणि त्यानंतर आराध्यासुद्धा तिथून जाणारच असते तेवढ्यात सुहासला म्हणते मी तुला एवढ्या विश्वासाने माझ्याबद्धल सांगितल आहे माझा विश्वास तोडू नकोस आणि एवढ बोलून ती मैत्रीसाठी हात पुढे करते त्यावर सुहास तिच्या हातात हात देऊन तिला Promise करतो कि तो अराध्याचा विश्वास नाही तोडणार त्या दिवसापासून आराध्या आणि सुहास हे एकमेकांसोबत बोलायला लागतात.
सुहास आणि अराध्याच्या मैत्रीच्या नात्यामध्ये आपुलकी, विश्वास, आणि एकमेकांबद्दलची काळजी वाढत होती पण दुसर्या ट्रेनर्स ला त्यांच्या नात्यामध्ये वेगळेच काही तरी दिसत होते अराध्याला चिडवण्यासाठी दुसरे ट्रेनर्स मुद्दाम अराध्यासमोर सुहासचा विषय काढायचे आणि तिला सारख म्हणायचे सुहास किती हुशार आहे कामाबद्धल पण प्रामाणिक आहे आणि एका मुलीला आणखी काय हव असत तो तुला समजून पण घेतो आणि हे सगळ ऐकून आराध्या चिडत होती आणि खर तर आराध्या किंवा सुहास या दोघांच्याही मनामध्ये अस काही नव्हत एकदा तर आराध्य एवढी चिडली कि तिने सुहासकडे जाऊन त्याला माझ्यासोबत इथून पुढे बोलू नको अस सांगितल तेव्हा सुहास आणि विशाखा लेक्चर चा प्लान करत बसले होते अराध्याचा असा व्यवहार बघून विशाखा तिला चिडून म्हणाली तू अस कस सुहास ला बोलू शकतेस त्याने काय केल आहे तुला तू एवढी चिडलीस त्याच्यावर त्यानंतर आराध्या विशाखाला बाजूला नेजून सगळ सांगते आणि त्यानंतर विशाखा तिला समजावते कि या सगळ्यात सुहासची काय चूक आहे त्याने काय केल आहे त्याला तू सगळ्यांसमोर बोललीस त्याला किती वाईट वाटल असेल हे ऐकून अराध्याला सुद्धा स्वताच्या चुकीच्या वागण्यावर वाईट वाटत आणि आराध्या सुहासला Sorry म्हणण्यासाठी त्याला सगळीकडे शोधते पण सुहास तिला कुठेच सापडत नाही सुहास लेक्चरचा सेटप करण्यासाठी लेक्चर हॉल मध्ये गेलेला असतो आणि हे अराध्याला माहिती नसते त्यामुळे तीला वाटत कि तिच्या बोल्यामुळे सुहास घरी निघून तर नसेल गेला ना याच विचारात ती असते विशाखा तिच्याजवळ येते आणि तिला विचारते एवढी शांत का बसली आहेस कसला विचार करतेय हे ऐकून आराध्या विशाखाचा हात पकडून रडायला लागते आराध्या विशाखाला म्हणते माझ्यामुळे सुहास इथून निघून गेला मी या सगळ्यांचा राग सुहास वर काढला त्याला हे सगळ माहिती पण नवत तरी पण त्याने माझ गपचूप ऐकून घेतल मला काहीच नाही बोलला त्याला किती वाईट वाटल असेल माझ्या बोल्याच यावर विशाखा सांगते कि तो लेक्चर हॉल मध्ये आहे. तिथून आल्यानंतर तू त्याला Sorry मन आणि नंतर न विचार करता काहीपण नको बोलत जाऊ हे ऐकून आराध्या मानेने होकार देते. थोड्या वेळातच सुहास लॅबमध्ये येतो आणि कॉम्प्युटर समोर जाऊन बसतो आराध्या सुहासकडे येते आणि त्याला सोर्र्य बोलणार असतेच तेवढ्यात सुहास तिला न बघता उठून निघून जातो आणि त्यांनतर अर्ध्या तासानंतर माघारी येतो अराध्याला वाटते कि सुहासला खूप जास्त वाईट वाटल आहे आणि तो तिला Ignore करत आहे पण सुहासने अराध्याला त्याच्याकडे येताना बघितलेलच नव्हत सुहास माघारी आल्यावर आराध्या सुहास ला विचारते खूप राग आला असेल ना माझा मी तुला तुझी चूक नसतानाही तुझ्यावर ओरडले सुहासने हसत हसत उत्तर दिल राग तर नाही आला पण थोडस वाईट वाटल त्यावर आराध्या कान पकडून sorry म्हणते आणि इथून पुढे अस नाही करणार बोलते.
त्यानंतर सुहास अराध्याला विचारतो तू माझ्यावर एवढी कोणत्या कारणावरून चिडली होतीस आराध्य म्हणते ते जाऊदे आत्ता तुला नंतर सांगते यावाढ बोलून ती म्हणते तुला sorry बोलण्यासाठी थांबले होते मला घरी जायचं आहे घरी जायला उशीर झाला तर आई ओरडेल हे ऐकून सुहास हसत हसत तिला जायला सांगतो दुसर्या दिवशी लेक्चर झाल्यानंतर सुहास आणि आराध्या त्यांच्या परीक्षेची तयारी करत बसले होते तेव्हा अराध्याला काही प्रश्न सुटत नव्हते ते प्रश्न सुहासला विचारते त्यावरून सुरज म्हणतो जे सुहासला जमत ते आम्हाला पण जमत आमची पण कधी तरी हेल्प घ्या त्यावरून आराध्या म्हणते पण मला सुहासने सांगितलेलं लवकर समजत तो खूप छान समजावून सांगतो एवढ बोलून ती सुहासला परत एकदा आवाज देते प्रश्न सोडून झाल्यावर सुहास आणि आराध्या दोघ बोलत बसतात त्या दोघांना माहिती नसत पण त्याचं नात मात्रीच्या ट्रॅक वरून उतरून दुसर्याच नवीन रस्त्यावर चालत होत सुहास आणि आराध्य एकमेकांना खूप चांगल समजून घेत असतात तेवढ्यात सुरज येतो आणि सगळ्यांना एक Good News देतो कि आपल्या सर्वांच्या MS-CIT च्या परीक्षा आलेल्या आहेत आणि ३ दिवसानंतर परीक्षा आहेत आणि आपण ३ दिवसानंतर एकमेकांपासून लांब जाणार आहोत परत कधी भेटू का नाही ते नाही माहिती हे ऐकताच आराध्या थोडी इमोशनल होते आणि तिच्या डोळ्यात नकळत पाणी येत आणि ती सुहास ला विचारते तू परीक्षा झाल्यानंतर खर इथ नसणार का सुहास त्यावर “हो” अस उत्तर देतो त्यावर आराध्या विचारते तुला माझी आठवण नाही का येणार आपण एवढ्या दिवस एकत्र होतो यातल काहीच नाही का आठवणार सुहास तिला म्हणतो आठवेल पण काय करणार आपण थोडीच अस life time राहू शकतो त्यावर आराध्या सुहासला विचारते तू ११ वी ला कुठ आणि कोणत्या साईट ला अॅडमिशन घेणार आहेस सुहास त्यावर उत्तर देतो कि तो जवळच्या कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणार आहे आणि आराध्या म्हणते मी आमच्या घराच्या शेजारी एक कॉलेज आहे तिथ विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे एवढ बोलून दोघ पण शांत एकमेकांना बघत बसतात दोघांच्याही मनात असत कि एकमेकांना सोडून जायचं नाही आणि त्या ३ महिन्यांमध्ये एकमेकांचा खूप जास्त जीव लागलेला असतो तेवढ्यात त्यांना त्यांच्या सेंटर कॉर्डीनेटर मॅडम बोलावतात आणि सुहास आणि अराध्याला सांगतात कि तुमच्या दोघांची परीक्षा आली आहे आणि परीक्षेची वेळ सांगतात अराध्याची परीक्षा २:०० ते ३:०० या वेळात असते आणि सुहास ची परीक्षा ४:०० ते ५:०० या वेळेत मॅडम त्यांना म्हणतात तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल परीक्षेसाठी आणि परीक्षेची Practice करायला सांगतात.
बघता बघता परीक्षेचा दिवस येतो सुहास आणि आराध्य सकाळी पासून परीक्षेची तयारी करत बसलेले असतात. अराध्याचा परीक्षा स्लॉट येतो आणि अराध्याला परीक्षेसाठी बोलावतात. सुहास तिला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो तिची परीक्षा झाल्यानंतर आराध्य सर्वांना बोलते पण सुहासला नाही बोलत कारण ती परीक्षा हॉल मधून बाहेर आल्यावर सगळ्या मैत्रिणी आणि मॅडम तिला विचारात असतात किती मार्क पडले किंवा परीक्षा जास्त अवघड तर नव्हती ना हे सगळ बोल्यात तिला सुहासला बोलताच येत नाही आणि तेवढ्यात सुहासचा स्लॉट येतो सुहास परीक्षा हॉल मध्ये जातो अराध्याला खूप वाईट वाट कि यानंतर ती सुहासला कधीच भेटणार नव्हती आणि सुहास ला बोलण्याचा तिच्याकडे शेवटचा चान्स होता. ती सुहासला बोलण्यासाठी कॉन्फरन्स रूम मध्ये थांबलेली असते पण हे सुहासला माहिती नव्हत त्याची परीक्षा झाल्या नंतर तो बाहेर येतो आणि सगळीकडे अराध्याला शोधतो पण त्याला आराध्या कुठेच सापडत नाही आणि तो निराश होऊन घरीई जायला निघतो आणि तो त्यादिवशी घरी दुसर्या रस्त्याने चाललेला असतो ज्या रस्त्याजे आराध्या जाते आराध्या सुहासची वाट बघून कॉन्फरन्स रूम मधून बाहेर येते आणि घरी जायला निघते तेवढ्यात तिला रस्त्यावर सुहास दैसतो पण ती सुहासला रस्त्यात हक मारून थांबउ शकत नव्हती आणि तिला याच खूप वाईट वाटत असत आणि त्या दिवसापासून सुहास आणि आराध्या २ महिने एकमेकांना भेटत नाहीत इकडे सुहास कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेत व्यस्त असतो त्यामुळे त्याला अराध्याची आठवण नाही येत आणि त्याने हे मान्य केलेल असत कि या नंतर आराध्या त्याला कधीच नाही भेटणार या सगळ्यानंतर त्यांच्या कॉलेजचा पहिला दिवस येतो तेव्हा सुहास खूप खुश होतो कारण त्याला कॉलेजमध्ये आराध्या दिसते कॉलेज सुटल्यावर तो अराध्याला विचारतो तू या कॉलेजमध्ये कशी आणि तू तर वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेणार नव्हती ना मग कस काय तू इकडे आलीस त्यावर आराध्या म्हणते काही तरी मिळवण्यासाठी काही तरी गमवाव लागत तर मी माझ ठरवलेलं करियर गमावलं आणि त्यावर सुहास विचारतो आणि हे गमावून याच्या बदल्यात काय मिळवलस ती हसून म्हणते विचार कर नाही समजल तर सांगेन नंतर एवढ बोलून ती कॉलेजमधून बाहेर जाते. सुहास त्या दिवशी खूप खुश असतो कारण त्याने ज्या गोष्टीची आशा सोडली होती ती गोष्ट त्याला आज मिळाली होती. एक दिवशी अचानक त्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून सुहासला फोन येतो आणि प्राचार्यांना भेटायचं आहे असा निरोप सुहासला मिळतो.
या पुढे काय झाल ? सुहास आणि आराध्याच काय होणार पुढे ? ते दोघे एकत्र येतील ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर वाट बघ पुढच्या अध्यायाची
धन्यवाद...!