संत एकनाथ महाराज १५ श्रीकृष्ण उद्धव श्रीभगवानुवाच -
गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् । तन्मे पुरुषवर्येदमुपधारय शंसतः ॥१॥
ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती ।
ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महापापें ॥३९॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम ।
उच्चारितां निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥४०॥ सत्व रज तम
तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न । पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका
॥४१॥ निःसंदेह सावधान । निर्विकल्प करुनि मन । ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण
होइजे स्वयें ॥४२॥ माझे स्वरुपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था । माझे वचनीं
विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥४३॥ ऐशी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी
निरुपम । तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥४४॥
भक्तिभावार्थें परम श्रेष्ठा । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ । यालागीं उद्धवासी
पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥४५॥ संसारीं योनि अनेग । त्यामाजीं
मनुष्यत्व अतिचांग । तेंही अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥४६॥ सकळ
देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य । त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ
मुमुक्षू ॥४७॥ वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन । भजत्यांमाजीं
अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥४८॥ सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा
परिपूर्ण । माझे कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥४९॥ येंहीं गुणीं
विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक । त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें
करी ॥५०॥ ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी । सांगतां प्रथम सत्वासी
। हृषीकेशी उपपादी ॥५१॥ उदंड सत्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा
बोलिलीं
श्रीकृष्णें । तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरुपणें हरि सांगे
शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः ।
तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा र्ही र्दयादिः स्वनिर्वृतिः ॥२॥
आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती । अखंड
राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं त्या नांव ॥५३॥ बाह्य इंद्रियांची चरफड ।
शमेंसीं करावा गलजोड । निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥५४॥ जेणें हरिखें
साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख । तितिक्षा या नांव देख ।
शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥५५॥ मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक ।
करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥५६॥ जागृतिस्वप्नसुषुप्तीआंत ।
भगवत्प्राप्तीलागीं चित्त । झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥५७॥ आवडीं
जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक । साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य
देख सात्विका ॥५८॥ भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण । भूतदया ते संपूर्ण
। उद्धवा जाण निश्चित ॥५९॥ माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण ।
ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥६०॥ न करितां अतिआटाटी । यथालाभें
सुखी पोटीं । या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥६१॥ जे मिळाले
जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग । विषयममता सांडणें सांग । त्या नांव
त्याग उद्धवा ॥६२॥ अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे । ते इच्छा
सांडणें निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥६३॥ जेथ निस्पृहता समूळ सांग ।
त्याचि नांव दृढ वैराग्य । हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥६४॥
जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं । तोचि भावार्थ द्विजदेवांसी ।
श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥६५॥ नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करुनि सत्कर्म
। विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥६६॥ जेणें दुःखी होईजे आपणें
। तें पुढिलासी नाहीं करणें । दुःख नेदूनि सुख देणें । हे दया म्यां श्रीकृष्णें
वंदिजे ॥६७॥ पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख । हेचि दया
पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥६८॥ खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें
गौण देखोनि विषयांसी । जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥६९॥
रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी । तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो
ब्रह्मसुखासी पकडला ॥७०॥ कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं । तो कण यावया
हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥७१॥ तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा
पांगडा पडे । तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥७२॥ तेवीं
सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती । याचि नांव स्वनिवृत्ती ।
जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥ या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्वमूर्ती
। शोधितसत्वाची सत्ववृत्ती । ’आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥७४॥ सर्व भूतीं
अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां । या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक
॥७५॥ ऐशियापरी सत्वगुण । सात्विकापासीं वर्ते पूर्ण । आतां रजाचें लक्षण । स्वयें
श्रीकृष्ण सांगत