ALIBI - 6 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | ॲ लि बी. (प्रकरण ६)

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

ॲ लि बी. (प्रकरण ६)

ॲलिबी भाग ६

प्रकरण ६

पाणिनी पटवर्धन ऑफिस मधे आला तेव्हा ओजस दारातच त्याची वाट बघत होता. काहीतरी महत्वाचे असणार हे ओळखून पाणिनी ने हाताला धरून त्याला आत घेऊन मानेनेच काय ते पटकन सांग असे सुचवले.

“ पळशीकर गायब आहे, ना पोलीस त्याला शोधू शकले, ना मी. हॉस्पिटल च्या व्यवहारात टोपे बरोबर त्याच्याही चेक वर सह्या होत्या त्यामुळे त्यांना तो हवाय.” – ओजस

“ त्याच्या मैत्रिणी बद्दल काय कळले का?” -पाणिनी

“ काहीच नाही.”

“ बर, तुला अजून एक काम देतो.माझ्या पेपरातल्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी कोणीतरी पेपर च्या ऑफिस ला येईल. तिथे एक तुझा हेर पेरून ठेव.आणि जो येईल त्याचा पाठलाग करायला त्याला सांग.”

आणखी एक काम. आपली ती टेंबे बाई, त्या अनाथाश्रमाच्या मागे हात धुवून लागली आहे ,त्या आश्रमाच्या हिशेबनीसा शी ती संपर्कात असते. मी अशी व्यवस्था करीन की ती आजच साडे दहाच्या सुमाराला त्याला भेटेल कुठेतरी.तू तिच्या मागे रहा, हॉटेल,क्लब बगैरे, तिचे फोन कोणाला होतात ते बघ., सौम्या, तू एक काम कर, साडे दहाच्या आधी तिला फोन करून सांग की पटवर्धन म्हणताहेत की असा दावा केला जातोय की अनाथाश्रमाला देलेल्या चेक च्या मागील सह्या मधे काहीतरी घोटाळा आहे. अनाथाश्रमाला त्या रकमा कधीच जमा झाल्या नाहीत.,ज्याने चेक दिले त्याचा अनाथाश्रमाशी काहीच संबंध नव्हता.”

“ सौम्या तू जरा मोघम आणि संदिग्ध असंच बोल, ती फार घाबरता कामा नये , पण काळजीत पडली पाहिजे ती.”

“ ती टेंबे बाई सांगत असलेल्या त्या फुटलेल्या जहाजाची आणि तिने रशिया मधून सोडवून आणलेल्या आणि अनाथाश्रमात ठेवलेल्या गेयता बाब्रस नावाच्या मुलीची हकीगत धादांत खोटी वाटते. आपल्याला आणि गेयता ला दोघांनाही तिने ते सांगून गंडवले आहे. गेयता मार्फत तिला ट्रस्ट च्या फंडावर डोळा ठेवायचा आहे असा माझा कयास आहे. कनक तू त्या गेयता ची पण माहिती काढ., आणि एक शेवटचं, तो टोपे चा सेक्रेटरी, मंदार, त्याची पण काढ माहिती, त्याची कोणी मैत्रीण आहे का?, सट्टा खेळतो का,घोड्याची रेस लावतो का वगैरे.

“ जशी आज्ञा सरकार ! “ ओजस नाटकी पणे म्हणाला. “ लागतो मी कामाला पेरी.”

तो गेल्यावर पाणिनीच्या ब्रोकर चा फोन आला वेस्टर्न माईन कंपनीची माहिती दे असे पाणिनीने त्याला सांगितले होते. त्याने दिलेल्या माहिती नुसार ती काही फार मोठी कंपनी नव्हती.याच शहरात त्यांचे ऑफिस होते. एक लेखनिक, टायपिस्ट अशी जेमतेम चार पाच लोक होती. त्याला मिळालेल्या बातमी नुसार टोपे च्या बरोबर जो व्यवहार झाला तो कंपनीचा अध्यक्ष अमरीश बोरगीकर च्या खाजगी मालकीच्या शेअर्स चा झाला. बुटाला अॅण्ड काळे या ब्रोकर कंपनी तर्फे झाला.

त्या नंतर पाणिनीने सौम्या ला बुटाला ला फोन लावायला सांगितला.,तो फोन वर आल्यावर पेरीने कामाचं स्वरूप सांगितलं. पण बुटाला चा पलीकडून मिळत असलेला प्रतिसाद अत्यंत नकारात्मक, होता आणि त्याची पाणिनीशी बोलताना वापरलेली भाषा अत्यंत मस्ती असल्यासारखी होती. पेरीच्या ऑफिस मधे चर्चे ला येण्या साठी सुध्दा तो तयार नव्हता. शेवटी पाणिनी म्हणाला, ” ठीक आहे, तुम्ही येत नसाल तर पुढच्या पंधरा मिनिटात मी तिथे तुमच्या ऑफिसात पोचतोय.आणि लक्षात ठेवा तिथे आल्यावर मी रिसेप्शन ला थांबणार नाही, तडक आत येईन. तुमच्या हिताचे सांगतोय, की आपली भेट होणे ही माझ्या अशीलाची गरज नाहीये तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे याची जाणीव ठेवा. तुमचा कोणी वकील असेल तर त्याला बोलून घ्या. मुख्य म्हणजे त्या वेस्टर्न माईन च्या अध्यक्षाला, म्हणजे बोरगीकर ना ही यायला सांगा.” एवढे बोलून पेरीने बुटाला च्या प्रतिक्रियेची वाट न बघता फोन ठेऊन दिला.

बरोब्बर पंधरा मिनिटांनी तो बुटाला अॅण्ड काळे या ब्रोकर कंपनी च्या ऑफिस मधे स्वागातिके समोर उभा होता.” मी पाणिनी पटवर्धन, मला बुटाला ना भेटायचंय, भेट ठरल्ये आमची फोन वरून आणि मी.......”पाणिनीने आल्या आल्याच तिला ठणकावून सांगितलं

“ ते वाटच बघताहेत तुमची, सरळ आत जा, डावीकडची केबिन” तिने सांगितले

फोन वरून बोलताना वाटला तसाच मस्ती असलेला बुटाला केबिन मधे बसला होता.” बस पटवर्धन, माझे वकील येतीलच एवढ्यात, निघालेत ते, वाटेत आहेत.” कोरडे पणाने तो म्हणाला.

“ त्यांना वेळ लागणार होता तर मला तस सांगायचं होत तुम्ही, मी त्यांच्या वेळे नुसार आलो असतो.” -पाणिनी

“ मला क्रिमिनल लॉयर्स आवडत नाहीत” –बुटाला

“ मला पण नाही आवडत.” -पाणिनी

“ तुम्ही स्वतः तर लॉयर आहात” –बुटाला

“ मी लॉयर आहे , क्रिमिनल नाही.”

“ पण तुम्ही गुन्हेगारांचा बचाव करता.”

“ तुमची गुन्हेगार या शब्दाची व्याख्या काय आहे?” -पाणिनी

“ ज्याने गुन्हा केलाय तो.”

“ कोण ठरवणार की त्यानेच गुन्हा केलाय?” -पाणिनी

“ न्यायाधीश , अर्थातच.”

“ आता कसं बोललात ! “ पाणिनी हसत म्हणाला.” मी हाताळलेल्या सर्व प्रकरणात , निदान अत्ता पर्यंतच्या तरी, न्यायाधीशांना माझ्या मताशी सहमत होण्यात मी यशस्वी झालोय” -पाणिनी

“ तुम्हाला काय हवंय सांगा मला.”

“ तुमचे वकील आल्यावरच बोलेन मी.” -पाणिनी

“ तुम्ही तर अगदी दम दिला होता की अजिबात थांबणार नाही म्हणून”

“ मी बाहेर स्वागत कक्षात थांबत नसतो.” पाणिनी म्हणाला.” आणि ज्याला कायद्यातले काही कळत नाही त्याच्या चर्चा करण्यापेक्षा आपण तुमचे वकील येई पर्यंत क्रिकेट विषयी बोलू.” -पाणिनी

“ मिस्टर पटवर्धन, तोंड सांभाळून बोला ! असा अपमान सहन करायची माझी पद्धत नाही. तुमच्या बुद्धीच्या तुताऱ्या कोर्टात वाजवा, तिथे ज्यांच्या विरुध्द तुम्ही प्रौढी मिरवता ते टीचभर पगारावर काम करणारे बिनडोक सरकारी वकील असतात.इथे तुमची गाठ, शहरातील अत्यंत हुशार आणि महागड्या वकिलाशी आहे.”

“ ते ठीक आहे मला नेहेमी.........” पाणिनी बोलत असतानाच केबिन चा दरवाजा जोराने ढकलून त्याचा वकील आत आला. “ मी येई पर्यंत यांना आत सुध्दा घेऊ नका म्हणून तुम्हाला मी सांगितलं होत बुटाला.” तो म्हणाला.

“ मला वाटत तुम्ही बुटाला यांच्या कायदे विभागात काम करणारे आहात ना?’’ पेरीने त्याला अगदी किरकोळीत काढत विचारले.

“ मी मिस्टर गटणे. गटणे, किल्लेदार अॅण्ड शहा या फर्म चा वरिष्ठ भागीदार.”

‘’ तुम्ही पटवर्धन ना? मी बघितलंय तुम्हाला कोर्टात. काय हवं होत तुम्हाला?”

“ मी माझी भूमिका स्पष्ट करतो आधी, टोपे ट्रस्टी असलेल्या ट्रस्ट ची लाभार्थी मुलगी, गेयता बाब्रस चा मी वकील आहे.मंगळवारी वेस्टर्न माईन कंपनीने पन्नास लाखाचे जे शेअर टोपे ला ट्रस्टी या नात्याने विकले, त्या व्यवहाराची माहिती हवी आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की टोपे मेलाय.”

“ तुम्ही आणि तुमची अशील काय ते बघून घ्या “-बुटाला

“ गटणे म्हणाला, “ तुम्ही बोलू नका बुटाला, हा माणूस तुम्हाला बोलण्यातून गंडवून काही तरी कबूल करून घेईल. मी बोलतो काय ते, बोला तुम्ही पटवर्धन.”

“ टोपे नेमका कधी मेला या बद्दल मत भेद आहेत.तो जो व्यवहार होता तो टोपे च्या सेक्रेटरी ने पूर्ण केला.त्या आधीच टोपे ऑफिसातून निघून गेला होता.

आमच्या अशीलाचा त्याच्याशी काय संबंध?” –गटणे

“ एवढाच संबंध आहे की तपासणी करणारे डॉक्टर म्हणतात की टोपे मंगळवारी सकाळी दहा नंतर जीवंत नव्हता.”

“ मूर्ख लेकाचे ! त्याच्या सेक्रेटरी ने त्याला त्या नंतर पाहिलंय की ! त्याच्याशी बोललाय सुध्दा तो व्यवहार पूर्ण झाल्यावर.”

“तुम्हाला अस नाही का वाटत की डॉक्टर चुकीचा निष्कर्ष काढू शकतो?” -गटणे

“ वाटत ना. त्या शक्यतेचा फायदा मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण सेक्रेटरी सुध्दा खोटे बोलू शकतो या शक्यतेचा विचार तुम्ही करत नाही ! “ पाणिनी

“ तुमचे असे म्हणणे आहे का , की सेक्रेटरी ने व्यवहार पूर्ण केला तेव्हा टोपे जीवंत नसेल तर माझ्या अशीलावर आर्थिक जबाबदारी येते ?” –गटणे

“ पन्नास लाखाची.” पाणिनी उत्साहाने म्हणाला.

“ बुटाला काही काळजी करू नका. त्याच्या म्हणण्याला कायदेशीर आधार नाही , तो आपले काहीही वाकडे करू शकत नाही.” गटणे म्हणाला.” जो व्यवहार झाला तो टोपे शी वैयक्तिक पातळीवर नाही तर ट्रस्टी म्हणून झाला.एक ट्रस्टी मेला तर योग्य ते कोर्ट दुसऱ्या ट्रस्टी ची नेमणूक करते.तो पर्यंत च्या काळात, मेलेल्या ट्रस्टी चा प्रशासक सर्व गोष्टींचा ताबा घेतो.”

बुटाला समाधानाने हसून म्हणाला,” पटवर्धन, मी म्हणालो नव्हतो तुम्हाला, तुमची गाठ हुशार कायदे पंडिता शी आहे म्हणून? करारनामा या विषयातील ते तज्ज्ञ आहेत.”

“एजन्सी, म्हणजे प्रतिनिधित्व या विषयीच्या कायद्या बद्दल कसे आहे त्यांचे ज्ञान?” पाणिनी ने खवट पणे विचारले

“ मी त्यात विशेष प्राविण्य संपादन केलंय” –गटणे म्हणाला, “ पण तो कायदा इथे लागूच होत नाही कारण आम्ही यात एजंट नाहीच आहोत. आम्ही ब्रोकर आहोत.”

“ तुमचे सोडा हो ! मी, मंदार बद्दल, , म्हणजे सेक्रेटरी बद्दल बोलतोय.” -पाणिनी

“ त्याचा या कायद्याशी संबंधच काय येतो?”

पाणिनी हसून म्हणाला,” तुम्ही मंदार बरोबर व्यवहाराचा अंतीम भाग पूर्ण केलात म्हणजे टोपे चा तो प्रतिनिधी , एजंट आहे या गोष्टीला तुम्ही मूक संमतीच दिलीत. पण ज्या क्षणी टोपे मेला त्याचं क्षणी कायद्या नुसार त्या दोघातील मालक-पतिनिधी हा संबंध संपुष्टात आला.”

गटणे च्या चेहेऱ्या वरील बदललेले भाव बुटाला च्या नजरेतून सुटले नाहीत.” काय आहे ही भानगड, गटणे ? “

तेवढ्यात केबिन चे दार उघडून एक जाडसर,बुटका माणूस आत आला.त्याने आणि बुटाला ने हस्तांदोलन केले, “ हे अॅडव्होकेट गटणे, आणि हे वेस्टर्न माईन कंपनीचे अध्यक्ष बोरगीकर.,

मिस्टर बोरगीकर, आणि हे पाणिनी पटवर्धन, आपला पन्नास लाखाचा व्यवहार उधळून लावायला टपलेले वकील.”- बुटाला ने ओळख करून दिली.

“ व्यवहार तर झालेला आहे, आता उधळून लावायचा प्रश्न कुठे येतो?” –बोरगीकर

“ शेअर्स विक्रीची नोंद रीतसर पणे, संबंधित कायदेशीर रजिस्टर मधे केली गेली आहे?” -पाणिनी

थोडं थांबून बोरगीकर उत्तरला, “ हो. “

“ बोरगीकर तुम्ही उत्तरे देऊ नका, पटवर्धन ना. मी दोघांच्या वतीने बोलतो कारण तुम्ही आणि माझे अशील यात समान हित संबंध आहेत” –गटणे.

“करारनामा आणि एजन्सी, म्हणजे प्रतिनिधित्व या विषयातील जे तज्ज्ञ आहेत, असा त्यांचा दावा आहे, अशा वकिलाने म्हणजे गटणे यांनी बुटाला आणि बोरगीकर यांचे हित सामाईक आहे असे विधान करणे म्हणजे निंदनीय बाब आहे.” पाणिनी म्हणाला. “ अर्थात तुम्ही तुमची वकीली कशी करावी आणि तुमचे ऑफिस कसे चालवावे हां तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण, टोपे च्या मृत्यू च्या वेळे बद्दल माझा अंदाज जर खरा ठरला तर ते पन्नास लाख रुपये जप्त करण्यासाठी मला मदत करणे हे तुमच्या अशीलासाठी म्हणजे बुटाला साठी फायद्याचे आहे,अन्यथा, तुम्हाला बोरगीकर च्या दारात त्या पन्नास लाखाच्या वसुली साठी भीक मागत बसायची वेळ येईल.” एवढे बोलून पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला.

“ कम ऑन, काय म्हणतोय पटवर्धन नेमकं?” –बोरगीकर

“ तो म्हणतोय शेअर्स चा व्यवहार आपण पूर्ण केला तेव्हा टोपे हयात नव्हता.” –बुटाला

थोडा वेळ केबिन मधे शांतता पसरली. “ गटणे, तुम्ही जरी तुमच्या अशीलाचे वकील असलात तरी आमच्या कंपनीलाही काही समस्या निर्माण होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या., तसा मला कायदेशीर तांत्रिक बाबीत रस नाही.” –बोरगीकर

बुटाला एकदम घाईघाईत म्हणाला, “ तुम्ही पटवर्धन काय म्हणाला ते ऐकलंय ना, गटणे?, आपण आपल्या पुरते बघायचे का?”

“ सद्य स्थितीत मला तसच वाटतंय, बोरगीकर ना दुसऱ्या वकिलाचा सल्ला घेऊ देत” गटणे म्हणाला.

“ बुटाला पटवर्धन च्या मूर्ख कल्पनांमुळे आपल्यातील मैत्रीला बाधा येत कामा नये.” –बोरगीकर.

“ ते पन्नास लाख कुठायत?” बुटाला कडाडला.

“ आता थांबा, याचे उत्तर देण्या पूर्वी मला माझी भूमिका नेमकी काय याचा विचार करायला हवा.तुम्ही लोक त्या पन्नास लाखासाठी माझ्या मागे लागणार आहात का?” –बोरगीकर

“ नक्कीच मागे लागणार तुमच्या.” दुसऱ्या कोणी उत्तर देण्यापूर्वी पाणिनी पटवर्धन म्हणाला.

गटणे सांभाळून घेण्याच्या इराद्याने म्हणाला ” काहीतरी गडबड आहे, व्यवहार पूर्ण करते वेळी टोपे केवळ जिवंतच नाही तर अगदी व्यवस्थित होता याचे पुरावे आहेत.”

“ माझ्या प्रश्नाचे उत्तर नाहीये हे गटणे.” - बोरगीकर

“ आपल्याला वस्तुस्थितीची पूर्ण कल्पना येई पर्यंत आपण जैसे थे स्थिती ठेवायची कल्पना वाईट नाही, त्यातून सगळ्यांचाच फायदा होईल.”” –गटणे

“ मला मिळालेले पन्नास लाख वापरायला काढणे यातच मला फायदा आहे आणि त्यातच मला रस आहे.” -बोरगीकर

“ ते बरोबर नाही होणार.” -बुटाला

“ तुम्ही काय करणार आहात?” –बोरगीकर

“ आम्ही चौकशी करणार, सर्व वस्तुस्थिती शोधून काढणार” -गटणे

“ काय करायचयं ते करा, माझ्या पैशावर कोणत्याही मर्यादा आणू नका. तुम्हाला शेअर्स मिळालेत, मला पैसे.” तुम्ही त्या शेअर्स चे काय करणार मला घेणे नाही, पैशाचे मी काय करायचे ते तुम्ही ठरवू नका.” -बोरगीकर

“ तपासणी पूर्ण व्हायला तीन चार दिवस लागतील, तेवढी कळ सोसा.आम्हाला सहकार्य करा.”

“ आज तुम्हाला या शेअर्स चे महत्व समजणार नाही, भविष्यात फार मोठी किंमत वाढणार आहे त्याची.” -बोरगीकर

“ तस होत तर तुम्ही विकलेच का ते शेअर्स.?” -पाणिनी

“ मी काही सगळे शेअर्स विकले नाहीयेत माझे.”

“ किती आहेत अजून तुमच्या नावावर कंपनीचे शेअर्स? आणि जे पन्नास लाख जे मिळाले ते तुम्ही कंपनीच्या खात्यात जमा केले का?” -पाणिनी

“ तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. गटणे, तुम्ही माझ्या बाजूने आहात की नाही हे स्पष्ट पणे आणि मुळमुळीत पणा न करता सांगा. आणि हे ही सांगा की व्यवहाराचे अंतिम टप्प्यावर टोपे जीवंत नव्हता असे सिध्द झाले तर तुम्ही माझ्या मागे लागणार ना? ”

“ नक्कीच ! जर व्यवहार बेकायदेशीर ठरला तर तुम्हाला तुमचे शेअर्स परत देऊ आणि तुम्ही आम्हाला पन्नास लाख परत करायचे.”

बोरगीकर ने न बोलता त्याला विरोध दर्शवला. एकंदर सर्व प्रकरण पाहता, पाणिनीने तिथून काढता पाय घेण्याचे ठरवले, तेवढ्यात बुटाला ने विचारले “ तुम्ही काय करायचं ठरवलंय पटवर्धन”

“ माझ्या अशीलाचे संरक्षण आणि तुमच्या वकिलाची शिकवणी” पाणिनी पटवर्धन उत्तरला आणि शांतपणे बाहेर पडला.

( प्रकरण ६ समाप्त)