college katta in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | कॉलेज कट्टा

Featured Books
Categories
Share

कॉलेज कट्टा

डी व्हाय कॉलेज मधली आजची संध्याकाळ काही खास होती आज कॉलेज बहरून केलं होत कारण हि तसेच होते माजी विद्यार्थी मेळावा त्या वर्षातील माजी विद्यार्थी उपस्तिथ होते त्या वर्षात एक ग्रुप फेमस होता निखळ मैत्री अतूट प्रेम आणि निस्वार्थपणा मुळे सगळ्यांना त्या ग्रुपचा हेवा वाटायचा तो ग्रुप म्हणजे दिल -ए-दोस्ती पांच जणांचा तो ग्रुप वरून .रिया .राहुल ,सुमित .आणि श्रेया कॉलेज नंतर आपल्या वाटेने विघुरलेले त्याच्या वेळी आज सारखी संप्रर्कची माध्यम खूप नव्हती त्यामुळे आज तो ग्रुप खूप वर्षांनी भेटणार होता खूप आठवणी घेऊन जगणार होता परत एकदा कॉलेज मध्ये दिल -ए-दोस्ती ग्रुप चा आवाज घुमणार होता

 


सगळेच एक एक करून आले एकमेकांना चेहऱ्यावरून ओळखतांना जरा गडबडले कारण बरेच बदल प्रत्येकात झाले होते पण ते तर मनाने जोडले होते मनाने प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख करून दिली सगळ्याच्या मनात डोळ्यात खूप काही सांगणे खूप काही गोष्टी शेयर करण्यासाठी होत्या सगळे जण हॉल मध्ये मांडलेल्या एका टेबल वर बसले कॉलेज तर्फ आयोजित केलेला कार्यक्रम सुरु झाला आणि त्यांनी कार्यक्रमाकडे नजर वळवली

 


तर ह्या ग्रुप मधील पांच जण आपली आयुष्याचे क्षण वेगवेगळ्या पद्धतीने घालवत आहेत वरून खूप हुशार पदवीधर होऊन अमेरिकेत चांगल्या पदावर नोकरी करत आहे आणि तिथेच तो स्थयिक हि झाला पण री युनियन म्हटले आणि त्याचे पाय भारतात परतले

 


रिया आपल्या संसारात रुळली होती स्वतःचा बुटीक सांभाळून संसाराचा गाडा चालवत होती

 


राहुल हि बंगलोर ला आयटी कंपनीत आणि तिथेच सेटल झाला होता

 


सुमित आपला कविता करणारा त्यांनी शेरो शायरी वाला रेडिओ जॉकी होणे पत्करले

 


श्रेया हिशोब करण्यात तरजेब होती तीही बँक मध्ये नोकरी करून संसाराचा आणि कामाचा हिशोब चोख करत होती

 


अशी हि विघुरलेली मंडळी खूप वर्षांनी एकमेकासमोर आली खरी पण त्याच्या अजून गप्पा सुरु झाल्या नव्हत्या 

कार्यक्रम सुरु होता पण सगळ्याची नजर एकमेकांवर फिरत होती आज खूप वर्षांनी सगळे एकमेकांना पाहत होते त्याच्या मधला तो कॉलेजचा बिंदास पणा हरवला होता आज जबाबदारी कर्तव्य हे सर्व त्याच्या डोळ्यात दिसत होत कार्यक्रम कधी संपतो असे त्याना झाले होते आणि एकदाचा कार्यक्रम संपला

सगळ्यांनी सुस्कारा टाकत हॉल मधून बाहेर पडले आणि कॅन्टीन कडे वळले कॅन्टीन जवळ एक झाड आहे ते झाड म्हणजे त्याचा बसण्याचा कट्टा कॅन्टीन मध्ये न बसता त्या झाडा खाली बसूनच ते नेहमी खात सगळे त्या झाडापाशी आले आणी भावुक झाले त्यांच्या मैत्रीत ते झाड पण सहभागी असायचे सगळे झाडा भोवती असलेल्या कट्ट्यावर बसले

वरूण ने सुमीत ला म्हटले " सम्या जा ना आपला फेवरेट वडापाव घेऊन ये कॅन्टीन मधुन आज खुप दिवसांनी हा वडापाव खाऊया ह्या वडा पावाची सर कुठेच नाही"

वरूण च्या ह्या बोलण्यावर सगळेच हो म्हणाले सुमीत पहिली सारखा पळत कॅन्टीन मध्ये गेला आणि सगळ्यांनसाठी वडा पाव घेऊन आला रिया वडा पाव घेत म्हणाली "काय ते दिवस होते ना "ह्यावर सगळेच जण म्हणाले "हो यार ते दिवस म्हणजे पण गेले दिवस राहिल्या फक्त आठवणी 

श्रेया हि हसत म्हणाली "आठवणी पण काय कमी नाही आहेत मी तर कधी मूड ऑफ असला कि ते आपले दिवस आठवते मग काय अलगद मूड ठीक होतो 

वरुण हि त्यावर म्हणाला" हे मात्र तू बरोबर म्हणालीस अगं कित्येकदा मी एकटाच ती आपली मजा मस्ती आठवून हसतो एकदा तर मला बायको ने पकडले मग काय वाह्त्सप्प जोक वाचला म्हणून सांगून दिले "

राहुल हि भावुक होत म्हणाला "हो रे आपली ती मजा मस्ती आणि एकमेकांची काळजी हीच तर आपल्या मैत्रीची ताकद होती म्हणूंन आपला ग्रुप कधीच तुटला नाही "

सुमित ने हि आपले मन मोकळे करत म्हण्टले "हो ना तो सुरेश माहित आहे ना तो आपल्या ग्रुपवर जळायचा नेहमी आपल्या बदल काही बाही बोलायचं "

त्यावर रिया उतरली "हो रे एकदा तर मला म्हणाला कि तुम्ही दोघे मुली आणि ते सगळे मुलगे हा कसला ग्रुप पण मग मी जे उत्तर त्याला दिले ना तेव्हा पासून तो मला पाहून दुसरी कडे तोंड फिरवायचा "

"पण खरं तर आम्ही दोघे मुली म्हणूंन आम्हला कधीच अन कंफोर्टब्ले नाही वाटेल आणि मला आता हि सांगताना अभिमान वाटतो कि तुमच्यासारखे मुलगे मित्र होते म्हणूंन मला आई तुमच्याबरोबर बिंदास फिरायला जाऊ द्याची कारण दिला तुमच्यावर आणि आपल्या मैत्रीवर विश्वास होता "

"अरे हो हो आम्ही पण तुच्या आईच्या हातचे खायला कधीही घरी यायचो ते आणि काकू न कंटाळता आम्हला प्रेमाने खाऊ घाल्याची आणि श्रेया तूंचि आई सुद्धा "

"आणि हो तुमच्या सर्वांच्या आई पण आम्हला मुली प्रमाणेच करायच्या "

"खूप आठवणी आहेत ते दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातले अनमोल क्षण ""

"हो रे खरंच कधी कधी वाटत कि परत त्या दिवसात जावे आणि परत एकदा ते क्षण तुम्हा सर्वाबरोबर जगावे "

"आपल्या ग्रुप च नाव पण आपण एकदम हटके ठेवले होते दिल ए दोस्ती "

"हो ना आणि सुमित ने आपल्या कवितेच्या चार ओळी रचून आपल्या ग्रुपचं थीम सोंग पण केलं होत "

सगळ्यांनी सुमितला पाहून म्हण्टले "सुमित एक बार होऊन जाऊ दे "

"हो यार "

कॉम ऑन सुमित म्हणत सगळ्यांनी त्याला साथ दिली 

"नाते आपुले नाही रक्ताचे 

पण आहे मनाचे 

मनातून घट्ट हे नाते आहे विणले 

जे कधी न तुटणारे 

दिल से दोस्ती बनी है 

हो हमेशा रहेगी 

हमारी दिल ए दोस्ती 

हमारी दिल ए दोस्ती "

सगळ्यांनी आनंदाने हिप हुरे फॉर दिल ए दोस्ती चा आवाज चढवला 

दिल ए दोस्ती च्या थीम सोंग ने कॉलेज खूप वर्षांनी परत एकदा सुखावले सगळे आनंदाने गात उभे राहिलेले खाली बसले सगळयांच्या डोळ्यात अश्रू होते कारण ते दिवसच त्याच्या साठी वेगळे होते सुमितने नि सगळ्यांना पाहत म्हटले "खरचं यार आज परत ते सोंग गाताना पूर्वीचा आभास होत होता काय ते दिवस होते ना "

वरून ला हि भरून आले "हो रे त्या दिवसात आणि आता खूप फरक आहे तेव्हा फक्त मैत्री हेच आपलं आयुष्य होत पण आता कर्तव्य जबाबदाऱ्यांनी आपलं आयुष्य वेढले आहे आज आपण सोबत आहोत पण ती फील येत नाही जी तेव्हा यायची "

राहुल ने सगळ्यांना पाहत "हो रे काय आठवणी आहेत त्या तुम्हला आठवत आपण केलेली एकांकिका "

"हो तर अरे आपल्या सुमितला तर उत्कुष्ट लेखक पुरस्कार मिळाला होता "

सुमित आनंदित होत म्हणाला "हो अजून हि मी तो पुरस्कार जपून ठेवला आहे आणि आपला सगळ्याच्या ग्रुप फोटो "

"हो ना तालिमीत तर मज्जाच यायची आपण एकमेकांवर चुकले तर ओरडायचो पण नंतर मात्र सॉरी म्हूणन हात मिळवायचो "

"हो ना आणि आपण फर्स्ट डे फर्स्ट शो ला अनंत थिएटर कसे गाठायचो ते हि बंक करून "

"बंक केले तरी आपण आपल्या अभ्यासावर कधी परिणाम होऊ दिला नाही मिळून अभ्यास करायचो आणि चांगले मार्क्स मिळवायचो "

"हो ना टीचर्स सर पण आपल्या मैत्री बद्दल कौतुक करायचे ""

"करणारच ना कारण कोणीही सुटी वर केला तर दुसऱ्या दिवशी त्याच्या होम वर्क रेडी असायचा "

"हो ना आणि आपल्या ग्रुप ला फ्रेंडशिप डे ला कॉलेज तर्फ ठेवण्यात आलेल्या स्पर्धे मध्ये मिळालेले बक्षीस "

त्यावर रिया पटकन म्हणाली "आणि आम्ही तुमच्या बरोबर हुबेहूब वेशभूषा करून फन वीक मध्ये उतरायचो तेव्हा तर सगळेच अवाक वाहायचे "

"आणि आपण सगळयांच्या घरी सणाना भेट दयाचो ते तर म्हणजे पोट फुटे पर्यंत खाणे

"हो ना किती आठवणी आहे त्या पण ती मज्जा काही औरच होती "

आठवणी परत एकदा सगळयांच्या डोळ्यात जाग्या झाल्या अजूनही खूप साऱ्या आठवणी येणार आहेत 

सगळेच जण आठवणीत हरपून गेले ते हि एवढे कि थोड्या वेळा साठी सगळे निशब्द झाले रिया त्या आठवणीतून बाहेर येत म्हणाली आणि सगळे रिया कडे पाहू लागले "आपण मित्र जरी असलो तरी आपला ग्रुप हा एका कुटूंबाप्रमाणे होता आज हि आठवते मला आणि अभिमान आहे तुम्हा सर्वाचा फायनल एअरला असताताना बाबाचा असिडेन्ट झाला तेव्हा तुम्ही जी मदत केली ती मी कधीच विसरू शकणार नाही मी आणि आई तर हतबल झाले होतो रवीश तर लहान होता पण तुम्ही ची धावपळ केलीत हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यापासून बाबाचे पायाचे ऑपेरेशन होई पर्यंत तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी होता आपली माणसे जेव्हडी नाही करू शकत एव्हडं तुम्ही केलंत रात्री बाबा बरोबर राहणे डब्बे औषध आणण्यापासून बाकी इतर काम तुम्ही सर्वजण कॉलेज मध्ये न जाता माझ्याबरोबर दिवसभर बसून रहात होतात त्या वेळी तुम्ही नसतात तर काय झालं असत हे विचार हि करू शकत नाही नातलग काय येऊन फक्त विचारून जात होते"

 रिया चे डोळे डबडबले हे पाहून वरुण म्हणाला "वा रे वा म्हणजे माझे बाबा रडूबाई आमचे हि ते बाबाच होते म्हणून तर आम्ही सर्व केलं आणि आपली माणसच आपल्या कामी येतात लोक नाही आणि डोळे पूस बघू पहिली 

"खरं बोलास आपली माणसं म्हणून तर आई बाबा दोघे हि म्हणतात कि तुझी मैत्री लाख आहे "

वातावरण रडकं होत हे पाहून राहुल म्हणाला अरे यार खूप रडकं वातावरण झालं यार आपण कित्येक दिवसांनी काय रडण्यासाठी भेटलो काय जो तो रडतच आहे "

"अच्छा आम्ही रडतो आणि तुच्या डोळ्यात काय आहे "

"ते ना "

वरुण ने वातावरण हलकं फुलकं करत म्हणाला "ते जाऊ द्या तुम्ही लोकांनी नोटीस केलं का रिया ला "

सगळे रिया कडे पाहू लागले नक्की वरुण कशाबद्दल बोलत होता ?

सगळे जण रिया कडे पाहू लागले तसे वरुण म्हणाला "अरे यार रिया ने चक्क काठपदराची साडी नेसली आहे हे बोलल्यावर श्रेया म्हणाली "अरे हो यार मी नोटीसच नाही केलं काय रिया नेहमी जीन्स मध्ये भिडणारी आज एकदम साडीत एव्हडा बदल "

"हो मला ठाऊक होत तुम्ही हे म्हणणार म्हणून पण काय ना मी एकत्र कुटूंबात रहाते त्यामुळे जीन्स वैगेरे लग्नाच्या नंतर आमच्या घरात चालत नाही म्हणून मग साडी "

"काय तू एकत्र कुटूंबात रहाते "

"हो माहित होते मला मी तुम्हला सांगायची ना कि मी बिंदास आणि नेहमी बिंदासच राहणार पण आपण विचार करतो तसे नाही होत मला पण एकत्र कुटुंब आवडत नव्हतं "

"तेच म्हणतो आम्ही कि तू एकत्र कुटुंबात कसे लग्न केले "

"अरे यार आमचे हे"" 

"हो हो आमचे हे वाह काय नाव काय त्याच"? सगळ्यांनी एकदम सूर लावला 

"रिषभ "

"अरे वाह रिया चा रिषभ सगळेच मिश्कीलपणे हसू लागले" 

"हो बरोबर तर जेव्हा हे पाहायला आले ह्याच्या तो मनमिळाऊ पणा बोलण्यात दिसू लागला मग ठरवले यार हिरा कसा सोडून दयाच्या मग केलं लग्न एकत्र कुटुंबात 

"हिरा कि प्रेमात पडलीस त्याच्या "ह्यावर सगळेच हसू लागले 

राहुल ने मग विचारले "कोण कोण असत घरी "?

"आम्ही दोघे ह्याचे आई बाबा माझी मुलगी ह्याचे काका आणि त्याचे कुटुंबीय "

"वाह म्हणजे खूप लोक तर "

"हो "

"मुलगी आहे तुला "?"

"हो ५ वर्षाची "

"वाह तिला का नाही घेऊन आलीस "

"नाही बाबा तिला आई जवळ ठेऊन आली तिला इथे आणलं असत ना तर आपल्याला बोलायला दिले नसते मी तर तिला माझ्या बुटीक मध्ये पण सहसा नेत नाही दंगा मस्ती खूप असते तिची "

"असणारच आईच एव्हडी दंगा मस्ती करणारी मग "

"म्हणजे मी दंगा मस्ती करते "

"वरुण सावरत म्हणाला "करते नाही ग करायची पण खरंच तू केव्हडी बदलीस बिंदास रिया तुन टिपिकल घरंदाज रिया झालीस "

"हो यार हे खरं आहे मी खूप वेगळी होती पण काय परिस्थिती आपल्याला बदलते आणि आपल्याला तो बदल स्वीकारावा लागतो माझं जाऊ दे वरुण तूच काय "?

रियाने वरुण च्या वर्तमानविषयी विचारताच सगळे जण वरुण कडे पाहू लागले वरुण ने सगळ्यानवर एक नजर टाकली आणि बोलू लागला "काय सांगू मी माझ्याबद्दल मी अमेरिकेत कंपनी मध्ये काम करतो आणि तिथेच मी सेटल झालो आहे आणि माझ्या कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या प्रेमात मी पडलो आणि मी तिच्या शी लग्न केलं ती भारतात जन्मलेली पण काही वर्ष तिचे आई बाबा आणि तिचा भाऊ अमेरिकेत राहतात म्हणून लग्न पण तिथेच केलं लग्नाला ६ वर्ष झाली तिथे आम्ही दोघेच राहतो "

"दोघेच आणि तिसरं कोणी नाही "?

"कळे मला तुम्हला काय म्हण्याच ते तुमच्या पासून काय लपवू माझी बायको काही वर्ष अमेरिकेत वाढलेली त्यामुळे तिचे विचार जरा वेगळे आहेत मुलं त्याची जबाबदारी हे सर्व तिला तिचे स्वातंत्र्य हिसकावून घेणार कसे वाटते आणि ती आरोग्यविषयी खूप सजक आहे त्यामुळे तिला हि जबादारी नको "

"पण वरुण मग आयुष्याला अर्थ काय आहे 

" ते तुम्हला कळत श्रेया तिला हे सगळं गरजेचं नाही वाटत 

"मग आई बाबा ते हि काही नाही बोलले "

"त्यांनी तिला समजवले पण ती आपला हट्ट सोडण्यास तयार नाही आणि मी हि थकलो तिला सांगून आणि तीच मन हि मला आणि दुखवायचं नाही त्यामुळे विषयच बंद केला प्रेम करतो ना तिच्यावर त्यामुळे तिला असे दुखवू नाही शकत तशी ती स्वभावाने खूप चांगली प्रेमळ आहे पण तिचे विचार जरा वेगळे आहेत पाहूया कधी तिला माझे बरोबर वाटेल 

वरुण चा हसरा चेहरा गंभीर झालेला पाहून सगळ्यांनी धीर देत वरुण ला समजावत म्हण्टले "तू टेन्शन घेऊ नकोस यार तिला कळेल आणि नक्की कळेल "

वरुण ने मान डोलावत स्वतःला सावरले आणि म्हणाला "तर श्रेया तुझी लाईफ काय म्हणते "

श्रेया चे आयुष्य काय असेल श्रेया ने सगळ्यांना पाहत सुरवात केली "आम्ही चार जण घरात राहतो मी माझे पती मुलगा आणि सासू माझे पती एका कंपनीत काम करतात तर मी बँक मध्ये मुलगा १० वर्षाचा आहे सासू बाई असतात घरी पण त्या आजारी असतात त्यामुळे त्यांना पटापट काम जमत नाही त्यामुळे त्यांना मदतीची गरज पडते ह्यांना म्हंटले मी कि असा कार्यक्रम आहे तर म्हणाले जा तू मी आईची काळजी घेईन म्हूणन आले एकटीच "

"एकटीच आणि मुलगा "?

"नाही त्याला नाही आणले तो घरी च आहे मीच आली एकटी तो आजीचा लाडका त्यामुळे त्याचा सोबतीत त्याला ठेवले 

"म्हणजे तू सर्वकाम करून जात अशील ना बँक मध्ये "

"हो रिया वेळच कसा निघून जातो ते कळतच नाही सकाळी सगळं आटोपून बँक मध्ये जाणे संध्यकाळी येऊन मुलाचा अभ्यास आणि परत रात्री चे जेवण आवराआवर मध्ये कधी रात्र संपते कळताच नाही "

"हो ना ग श्रेया संसारात पडले कि स्वता साठी वेळ नसतो माझं पण असच होत ग सकाळी उरकून बुटीक मध्ये जाणे मग घरी आल्यावर परत घरकाम वेळच नाही"

"हो ना गं पहिली कसे आपण टीव्ही वर चालत असलेल्या कार्यक्रम पाहून खूप बोलायचो पण आता कुठे रिया आता तर वेळच नाही "

सगळे जण त्या दोघांना पाहतात ते पाहून रिया विचारते "तुम्ही सर्व कसे का पाहतात "

"नाही तर काय करू आम्ही खरं म्हणतात दोन बायका समोर आले कि पुरुषाची बोलती बंद होते "

"काय तुम्ही पण ना "आणि सगळेच हसू पडले 

राहुल तर मोठ्या मोठ्या ने हसतो ते पाहून श्रेया म्हणाली बरं हसतोस ना रे राहुल्या तुझं कसं चाललंय ?राहुल ने आपल्या वतर्मानाबद्दल सांगण्यास सुरवात केली "काय सांगू मित्रानो मी आयटी कंपनीत बंगलोर ला आहे तिथे स्थायिक झालो माझ्या बरोबर काम करत असलेल्या बंगलोर मुलीच्या प्रेमात मी पडलो "

 


"वाह एकाने अमेरिका गाठले आणि एकाने बंगलोर वाह""

 


हो श्रेया काय करू पडलो आम्ही प्रेमात "

 


"तर मी तिच्याशी लग्न केलं झाले तीन वर्ष आम्ही तिथेच राहतो

 


"आणि आई बाबा "

 


"ते इथेच असतात "

 


"मग त्याची काळजी राहुल तू त्याचा एकुलता एक मुलगा ना "

 


"हो रे मी त्याना सांगितलं कि तिथे या आपण एकत्र राहूया पण ते नाही म्हणतात आणि माझ्या बायकोला हि आपल्या सारखे जेवण नाही बनवता येत त्यामुळे मी हि त्यांना बोलावणे टाळतो पण आम्ही दोन महिन्यातून एकदा येऊन भेटून जातो "

 


"पण माझी बायको दररोज त्यांना फोन करते आणि आई बाबा नि सांगितले कि गरज पडल्यास येऊ आता आम्ही खंबीर आहोत आणि हो मी सगळी कडे कॅमेरे लावून घेतले घरात जेणे करून आमचे लक्ष त्या दोंघांवर राहो आणि चांगला जॉब सोडून येणे हे हि परवडणारे नाही ""

 


"ते हि बरोबर आहे पण तू काका काकू वर लक्ष ठेवतोस ते महत्वाचे कारण तूच एकच त्याचा सहारा रे आमच्या सारखी तुला आणि भावंडे नाही "

 


"हो रे म्हणून काळजी असते त्याची आता जाताना बघ आई काय काय डब्बे देईल """

 


"हो रे काकूंच्या हातच्या नारळाच्या वड्या हो हो अजूनही वास येतो "

 


"मग चला या उद्या घरी ""

 


"नाही रे नको तेव्हा बरं होत आता त्याच वय झालं "

 


"राहुल ने सुमित कडे पहिले तो जरा उदास वाटला त्याला पाहून राहुल ने म्हण्टले "बरं तर आता आपण वळूया आमच्या शायरी वाल्याकडे काय सुमित तुझे आयुष्य शेरो शायरीने बहरत असेल ना "

 


"अरे असेल म्हणजे दररोज एक कविता एक शायरी असेल बायको साठी हो ना रे सुमित "

 


"पण सुमित मात्र गप्पच होता काय कारण असेल ?" 

"काय रे आम्ही काही तरी विचारतो आणि तू मात्र गप्प लग्न वैगरे केलंस ना की अभी तक मैं कुंवारा हू " 

"नाही झालं माझं लग्न "

"मग गप्प का कि तुला आम्हला सांगायच नाही तुच्या प्रिय व्यक्ती विषयी "

"तसं काही नाही रिया "

"मग कस सम्या "

"मित्रानो काय सांगू जो विषय मी सोडून दिला तो परत परत उगळण्यात अर्थ नाही "असे सुमितने बोलल्यावर सगळेच गंभीर होऊन त्याला पाहू लागले 

"काय झालं सुमित बोल यार असे कडव्यात आम्हला नाही कळत "

"आम्ही सोबत नाही राहत आमचा डिवोर्स झाला "

"काय पण का कसा "?

"कांदे पोहे खाऊनच नाते जोडले पण २ वर्षात तुटून केले "

"पण कारण "?

"आमचा स्वभाव माहित नाही पहिली पहिली सगळं सुरळीत होत आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करायचो मग अचानक छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांच्या हटकू लागल्या मग वाद विवाद आणि एक दिवस मोठा वाद फुटला आणि ती सरळ निघून गेली कायमची त्यानंतर आमच्यात काहीच संवाद झाला नाही २ महिन्यांनी भेटलो ते हि कोर्ट मध्ये 

"मग घरातल्यानी मद्यस्थी "?

"केली खूप करण्याचा पर्यंत केला पण आम्हा दोघाना सोबत रहावस वाटत नव्हतं मग ते काय करणार "

"मग आता ती "?

"माहित नाही मी त्या दिवसापासून ना तिला कधी पहिले ना कधी भेट झाली "

"मग तू दुसरं लग्न "?

"नाही मला दुसरं लग्न नाही करायचं एकदा पायावर घाव घेतला परत नको "

"अरे सम्या असंच थोडंच असत तुला चांगली साथ मिळू शकते "

"नाही यार मला आता त्या गोष्टीत नाही पडायचं मस्त एकटं जीवन जगायचं"

"अरे असं एकटं जगणं सोपं नाही "

"माहित नाही आहे कि नाही पण मला नाही पडायचं ह्यात मी आई बाबा ना सांगितलं मी तुमची सेवा करेन माझ्या भविष्याची चिंता नका करू "

"कसं करू नको म्हणतोस खरंच तू दुसऱ्या लग्नाचा विचार करायला हवा "

"नाही रिया नको मला मी मनाला समजावलं कि मी एकटा आहे आणि राहणार आणि सुमित चे डोळे डबडबले सगळ्यांनी त्याच्या हातावर हात ठेवत आधार दिला सगळेच एका सुरात म्हणाले हे वेड्या तू एकटा नाही आम्ही आहोत तुच्या बरोबर "

"हो तुम्ही आहात म्हणून तर मी आलो कारण त्या दिवसापासून मी कुठल्याच कार्यक्रमाला जात नव्हतो मन च होत नव्हतं पण हा कार्यक्रम आणि तुम्ही सगळे मिळणार ह्या विचारणाने मन आपसुकीच इथे वळले "

"हो ना मग आता तू हि आमचं ऐकायचं तू हि सगळं विसरून नव्याने सुरवात कर"

"हो सुमित आम्ही शोधू तुझी नवी साथ "

सुमित काही न बोलता निशब्द पाहत राहिला

 सगळेच सुमितच्या आयुष्यची व्यथा ऐकून बेचेन झाले वरूण ने सगळ्याकडे नजर मारली आणि त्याने बोलण्यास सुरवात केली "मित्रानो आज आपण खूप वर्षांनी भेटलो पहिली फक्त आपलं आयुष्य आपली मैत्री हेच आपलं जीवन होत पण आज तसं नाही आपण पांच हि जण वेगवेगळ्या पद्धीतेने आयुष्य जगत आहोत आपली रिया मॉडर्न विचारांची मला तर वाटायची ती परदेशी स्थायिक होईल पण ती रिया आणि आताच्या रिया मध्ये खूप फरक आहे 

मी स्वतः हि अमेरिकत स्थायिक होणार असे वाटले नव्हते पण झाल विचार हि केला नव्हता कि माझे आयुष्य असे असेल श्रेया हि आपली पहिली पासून समजुदार पण तिचा समजुदारपणामुळे तिला स्वताः साठी वेळ नाही 

राहुल जरी कॅमेरे लावले म्हणून सांगत असला तरी आई बाबा पासून दूर राहण्याची तळमळ आणि काळजी त्याला सतावत असेल 

आणि ह्या मित्राची कविता ऐकून तर हा प्रेम विवाह करणार आणि ह्याचे एक सुखी कुटुंब असेल असे मला वाटले होते पण आयुष्यानी आपल्याला वेगवेगळ्या परिस्थती अडकवले आहे तरी पण आपण हार नाही मानायची एवढे दिवस आपण एकमेकांच्या संपर्कांत नव्हतो पण आजपासून आपण एकमेकांचे सुख दुःख वाटून घेणार एकमेकांच्या संपर्कात राहणार आणि महिन्यातून एकदा तरी वेळ कडून आपण विडिओ कॉल करू आपली मैत्री ची ताकद च आपल्याला जगण्याची एक नवी उमीद देईल 

सो मित्रानो आज पासून आपला नवा व्हाटसप्प ग्रुप "दिल ए दोस्ती फोर्व्हर "चालू केला आहे तो हसत हसत आपण त्याचे स्वागत करू हिप हुरे फॉर "दिल ए दोस्ती "

दिल ए दोस्ती चा नारा करत आयुष्याच्या पुढील वाटचाली कडे वळण्यासाठी सगळे एक चहेऱ्यावर नवीन तेज घेऊन बाहेर पडले