love is in Marathi Love Stories by Sunita Dhotre books and stories PDF | प्रेम हे

Featured Books
  • ખજાનો - 36

    " રાજા આ નથી, પણ રાજ્યપ્રદેશ તો આ જ છે ને ? વિચારવા જેવી વાત...

  • ભાગવત રહસ્ય - 68

    ભાગવત રહસ્ય-૬૮   નારદજીના ગયા પછી-યુધિષ્ઠિર ભીમને કહે છે-કે-...

  • મુક્તિ

      "उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत। क्षुरस्य धारा निशि...

  • ખરા એ દિવસો હતા!

      હું સાતમાં ધોરણ માં હતો, તે વખત ની આ વાત છે. અમારી શાળામાં...

  • રાશિચક્ર

    આન્વી એક કારના શોરૂમમાં રિસેપ્શનિસ્ટ તરીકે નોકરી કરતી એકત્રી...

Categories
Share

प्रेम हे

स्वानंदी आणि विवेक एकमेकांवर खुप प्रेम करत होते. पाच वर्षांपूर्वी कामानिमित्त एका शहरात
त्यांची ओळख झालेली होती.आज दोघेही
एकमेकांपासुन दुर आहेत, पण मनाने तितकेच
जवळ आहेत.त्यांची आधी खुप छान मैत्री झालेली
असते.मग ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले,
दोघांनाही कळले नाही.स्वानंदी नेहमी विवेकला
म्हणत असते, " माझ तुझ्यावर खुप प्रेम आहे.मी
तुझ्याशिवाय जगु शकत नाही.तिच विवेकवर खरच
मनापासून प्रेम असत.त्याचही तिच्यावर तेवढच
प्रेम असत.ते दोघे रोजच फोनवर एकमेकांची
विचारपुस करत, तसेच कामाच्या बाबतीत बोलत
असत.रोजचा दिवस कसा गेला ते सांगत असत.
दोघेही कामात खुप बिझी असले तरी रात्री
एकमेकांना रात्री रोज फोनवर गप्पा मारत.एक
दिवस अचानक स्वानंदीचे बाबा एका
त्यांच्या मित्राच्या ओळखीतील मुलाच स्थळाची
सगळी विचारपुस करून,त्यांना ते आपल्या मुली
साठी योग्य स्थळ आणि मुलगा चांगला आहे,
म्हणुन होकार कळवतात.तेही स्वानंदीला काही न
विचारता,तिला यातल काहीच माहित नसत.तिला
सोडून सर्वच घरातील माणसांना रविवारी पाहुणे
येणार हे माहीत असत.तिला तर रविवारी सकाळी
आपल्याला पाहायला मुलगा येणार आहे हे कळत.
तिला जेव्हा हे कळल तेव्हा मनाला खुप वाईट
वाटल , पण ती काय करणार होती, वेळ तर थोडाच
असतो.आई सांगुन गेली होती, तुझी तयारी करून
ठेव. मुलाकडची मंडळी लवकरच येतील. तिला
विवेकला दोन मिनीट सुध्दा फोन करायला मिळाले
नाही.लगेच तिच्या मोठ्या ताईने तिला खुप छान
तयार केल.ती साडीमध्ये खुप सुंदर दिसत होती.
मुलाकडची मंडळी येऊन जातात. मुलाला आणि
त्याच्या घरच्यांना स्वानंदी पसंद पडते.मुलगाही
चांगला होता,दिसायलाही हँडसम, चांगली नोकरी,
शिक्षण, घरदारही चांगल होत.

स्वानंदीच्या घरच्यांना आणि तिच्या बाबांनाही
तो मुलगा आवडला होता.मुलाकडची मंडळीही
खुप छान , सुसंस्कृत घराण होत. माणस प्रेमळ
होती.ती सोडून सर्व घरच्यांना खुप आनंद झाला
होता.तिला काय कराव तेच समजेना.तिचे बाबा
हार्टपेशंट होते.आता कुठे बाबांची तब्येत ठीक
झाली होती.तिच बाबांवर खुप प्रेम होत.तसेच
घरचे सगळे खुप आनंदात होते.तिने नकार
कळवला असता, तर सर्वच होत्याच नव्हत झाल
असत.तेच तिला नको होत, पण दुसरीकडे तिच
विवेकवर खुप प्रेम होत. ती त्याला फोन करते,
त्याला सांगते, माझ लग्न घरच्यांनी एका ठिकाणी
ठरवल आहे आणि त्यांच्या शब्दांपुढे मी जाऊ शकत
नाही आणि बाबांनाही दुखावु शकत नाही,बाकी
तुला तर त्यांच्याबद्दल सगळ माहीतच आहे.मी ते
म्हणतील तिथेच लग्न करणार आहे.यापुढे मला
काॅल करू नको आणि कधीच भेटु नकोस.ती हे
सगळ एका दमात बोलून गेली.तिच हे बोलण
ऐकुन विवेकला काय वाटल असेल याची कल्पना
आपण करू शकतो.हे बोलल्यानंतर तिलाही खुप
वाईट वाटल.जी मुलगी नेहमीच म्हणायची, माझ
तुझ्यावर खुप प्रेम आहे आणि तुझ्याशिवाय मी जगुच
शकत नाही.तीच हे नेहमीच वाक्य आठवून तिलाच
खुप रडायला आल.स्वानंदीचा फोन संपल्यानंतर
विवेकच्या मनाला खुप वाईट वाटल. त्याने स्वतःला
सावरल.कारण स्वानंदीच्या आनंदातच त्याचा खरा
आनंद होता.आज ना उद्या विवेक त्याच्या घरी
स्वानंदी विषयी सांगणार होता.पण त्याच्या आधीच
स्वानंदीच लग्न जमुन गेल.त्याने या गोष्टीचा स्वीकार
केला.खरच, प्रेम केलय त्याने म्हणुन त्याला तीच लग्न
चांगल्या मुलाशी जमतय, तिला चांगली माणस भेटली.
याचा त्याला खुप आनंद झाला.त्याने स्वानंदीला फक्त
एकदा भेटायच ठरवल होत, पण तिने फोन उचललाच
नाही.त्याने तिला शेवटचा मेसेज केला.त्यात अस
लिहल की...

प्रिय स्वानंदी, मी तुझ्यावर खर प्रेम केलय.आधी
आपण खुप चांगले मित्र- मैत्रिण होतो.तुला तर
माहीतच आहे की तुझ्या या मित्राला तुझ्या आनंदा
तच त्याचा खरा आनंद आहे.तुझ लग्न जमलय,
खुप अभिनंदन. मला खुप आनंद झाला.तुला चांगला
जीवनसाथी व परिवार मिळाला.तु सर्वांशी चांगल वाग.
तु कायम सुखात, आनंदात राहावीस हेच मला वाटत.
यापुढे मी तुला कधीही काॅल, मेसेज करणार नाही.
प्रेम केल म्हणजे लग्न झालच पाहीजे अस नसत.
मैत्रीच नात तर शेवटपर्यंत असत.हे तु समजुन घे.
आयुष्यात तुला कधीही काही मदत लागली, काही
प्रोब्लेम आला तर तुझ्या या मित्राला नक्की सांगशील.
पुन्हा एकदा तुला लग्नासाठी खुप शुभेच्छा...

स्वानंदीने तो मेसेज वाचला.तिच्या डोळ्यांतुन
अश्रु आले.कारण तिला वाटल होत की विवेक तिला
त्रास देईल. म्हणुन ती त्याला रागात बोलली होती.
तिने त्याला शेवटचा फोन केला.तेव्हाही त्याने तिला
खुप छान समजावल.त्याने सांगितले...
" ते राधाकृष्ण देव असून सुध्दा त्यांचे प्रेम अपूर्ण
राहीले होते...मग आपण तर माणस आहोत...
आपले देखील प्रेम अपूर्ण राहू शकते ना...तिने
मैत्रीच नात कायम राहील अस आश्वासन देऊन
फोन ठेवला.तिला खर्‍या प्रेमाचा अर्थ समजला.

कथा समाप्त....खर प्रेम अस असत.सगळेच
प्रेम करणारे वाईट असतात अस नाही.पण ज्यांना
प्रेमाचा अर्थ समजलेला नसतो,ते त्रास देणे,बदला
घेणे,असे कृत्य करतात.हे तर आपण आजुबाजुला
घडताना बघत असतो.प्रेम करणारी व्यक्ती नाही
मिळाली तर तिच्या आनंदातच आपला आनंद
मानणे हेच खरे प्रेम. प्रेमाच्या बाबतीत प्रत्येकाचे
विचार वेगवेगळे असतात.काही चुकल्यास माफी
असावी.