Sang na re mana - 13 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सांग ना रे मना (भाग 13)

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

सांग ना रे मना (भाग 13)

त्याला असेल ही कोणी गर्लफ्रेंड. इतका हँडसम फेमस रायटर आहे तो नक्की कोणीतरी असणारच त्याच्या आयुष्यात. पल्लू मी करते मितेश वर आणि माझा माझ्या प्रेमावर विश्वास आहे. मीतेश होकार देवो अगर नकार मी मात्र प्रेम करत राहीन. संयू मला समजतात ग तुझ्या फिलिंगज पण त्याला ही जाणवले पाहिजे ना. हम्म इतकेच संयू बोलली. मितेश ला वाटत होते की आपण रुडली सयुंक्ता शी बोललो ती प्रेम करते माझ्यावर यात तीची चूक काय? एखाद्याच्या भावना मी समजून घेतल्या नाहीत तर रायटर असन्याचा काय उपयोग? तो आपल्याच विचारात मग्न होता. कादम्बरी चे लिखान अर्धवट राहिले होते. त्याने बाकी विचार बाजूला केले आणि लिहायला सुरवात केली. ख़ुप वेळ तो लिहित होता. निनाद ने त्याला कॉफी आणून दिली. मितेश थोड़ा ब्रेक घे ही कॉफ़ी घे निनाद बोलला. हो म्हणत मितेश लिहायचे थांबला. एक सिगरेट ही त्याने घेतली. मित्या हल्ली तू पुन्हा सिगरेट जास्त ओढु लागला आहेस अस नाही वाटत तुला? हम्म आय नो . मग कशा साठी? भूतकाळ आणि आठवणी विसरण्या साठी. आर यू मैड मीतेश? अस सिगरेट फुकून तू सगळ विसरनार आहेस? अरे चांगल्या आठवणी आहेत तुझ्या आरु सोबत त्यांची अशी किंमत करतो का? निनाद मला त्रास होतो या सगळ्याचा. माझी अरु माझ्या समोरा असून सुद्धा माझ्या सोबत नाही हे दुख मला जगु देत नाही. मीतेश बाहेर पड़ रे मित्रा यातून काहीच शिल्लक नाही राहिले आता. का सव्हताची अशी फसवनुक करतोस? ती सयुंक्ता इतका जीव लावते तुला तिच्या प्रेमाची कदर कर. बघ सगळ दुख विसरून जाशील ख़ुप गोड मूलगी आहे रे ती. संयु चे नाव निघताच मीतेश ने आपला फोन चेक केला. तिचा काही मेसेज आला का पाहण्यासाठी. का आता ती तुला मेसेज करेल मीतेश? तुला काही घेण देण नाही ना तिच्या शी मग? निनाद बोलला. हम्म जस्ट चेक बाकीचे कोणाचे मेसेज आलेत का बघत होतो. मित्या मी ओळखतो तुला. तू संयु चा मेसेज आला का हेच चेक करत होतास. ओके येस झाल समाधान मितेश म्हणाला. मग का खोटे बोलतोस की तुला संयु आवडत नाही. ती कोणाला ही आवडेल अशी आहे निनाद त्यात माझा काय संबंध? मितेश यू आल्सो लव हर बट डोन्ट एक्सेप्ट. मितेश यावर काहीच बोलला नाही. दोन दिवस झाले संयु ने त्याला एक ही मेसेज केला नव्हता ना एफ़ बी वर ना व्हाट्सएप वर. हे मितेश ला कुठेतरी खटकले. निनाद त्याच काम करत होता. त्याला अचानक पल्लवी ची आठवण झाली. त्याने तिला हैल्लो असा मेसेज केला. पाच मिनिटात पल्लू चा हाय असा मेसेज आला. निनाद ने तिला संयू बद्दल विचारले. पल्लू बोलली की ती फार अपसेट आहे. मग थोड़ा वेळ बोलून त्याने पल्लवी चा निरोप घेतला. मितेश संयु चा विचार करत होता रोज मला आठवणीने मेसेज करणारी आता एक ही मेसेज नाही तिचा. मी तिला हर्ट केले का? मग त्याने संयु ला मेसेज केला दुपारी शार्प 1 वाजता लंच ला ये आणि हॉटेल चे नाव सेंड केले. संयु ला मेसेज चे नोटिफिकेशन आले सो तिने पाहिले आणि मेसेज बघून खुश झाली.ठरलेल्या वेळेत संयु हॉटेलमध्ये पोहचली.

मितेश अगोदरच आला होता. हॅलो संयु कशी आहेस मी ठीक आहे मग त्याने जेवणाची ऑर्डर दिली. संयु मी तुझा आणि तुझ्या फिलिंग्ज चा खूप रिस्पेक्ट करतो. पण मी तुझे प्रेम नाही स्वीकारू शकत. माझे प्रेम आरोही वर आहे ती माझ्या सोबत आहे पण आणि नाही पण. खूप दूर आहे ग ती माझ्या पासून. म्हणजे काय सर कुठे आहे आरोही? संयु तुला भेटायचे आहे का तिला ? आपण जेवून जाऊ तिला भेटू ओके मितेश बोलला. संयु ला काहीच समजेना . मग जेवण करून ते दोघे हॉस्पिटलमध्ये सुजय कडे आले.

सुजय हे हाय मितेश हॉऊ आर यु? एम फाईन. मला आरुला भेटायचे आहे. चल म्हणत सुजय च्या मागे मितेश आणि संयु निघाले. आरोही नेहमी सारखी शान्त झोपली होती. संयु ला काहीच समजत नवहते. संयु ही माझी आरोही गेली सात /आठ महिने अशीच झोपून आहे. काय झाले आहे यांना मितेश सर? संयु ने विचारले. एक अपघात झाला आरोहीचा आणि ती कोमात गेली पण माझा विश्वास आहे ती एकदिवस नक्की शुद्धीवर येणार. माझ्यावर खूप प्रेम करते ती. माझ्या शिवाय नाहीच राहू शकणार ती . सर खूपच वाईट झाले. मितेश आरु कधीच शुद्धीवर येणार नाही . कारण तीच शरीर फक्त आहे पण त्यात जीव नाही आहे मितेश आणि हे तू लवकरात लवकर अकॅसेपट कर. तुझ्या हट्टा पायी आरु ला इथे ठेवले आहे. सुजय तू तरी अस बोलू नकोस यार. मितेश मी एक डॉक्टर आहे मी खोटं बोलणार नाही आरु आता जिवंतच नाही आहे. प्लिज सुजय अस नको बोलूस आय रियली लव माय आरु. आरु आरु प्लिज एकदा डोळे उघड ग मी नाही जगू शकनार तुझ्या शिवाय अस म्हणत मितेश आरु ला जोर जोरात हलवू लागला. आरु उठ ना म्हणत मितेश रडू लागला त्याच हे रूप संयुला अनोळखी होते. इतका मोठा रायटर तिच्या समोर रडत होता. संयु त्याच्या जवळ गेली सर प्लिज शान्त व्हा. कसा शान्त होवू संयु आय लव हर आणि ती खुशाल झोपलेली आहे माझा त्रास तिला दिसत नाही का? नाही दिसत मितेश बिकौज शी वॉज डेड. नो म्हणत मितेश ने आपले डोके घट्ट पकडले. सुजय ने त्याला पटकन तिथल्या चेयरवर बसवले. मितेश शान्त हो तुला टेंशन आले की डोके दुखते तुझे. सर म्हणत संयु ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा लहान मुला सारखा मितेश संयु च्या मिठीत शिरून रडू लागला. संयु ने ही त्याला रडू दिले कारण ही त्या वेळची गरज होती. मितेश ला आधार हवा होता. तो खूप इमोशनल झाला होता. मितेश ला संयु च्या मिठीत खूप आश्वासक आणि निर्धास्त अशी फीलिंग येत होती. थोड्या वेळाने तो शान्त झाला. संयु पासून बाजूला होत म्हणाला आय एम सॉरी संयु . इट्स ओके सर. संयु हा असा जास्त टेन्स झाला की त्याच डोकं जोरात दुखू लागत. कारण हा अति विचार करतो. आरोही चा अपघात झाला तेव्हा पासून जास्तच इमोशनल झाला आहे सो तुझ्या आधाराची त्याला गरज भासली. नो प्रॉब्लेम सुजय सर. आय एम ओके. मितेश चल माझ्या केबिन मध्ये बसू म्हणत त्याने मितेश आणि संयु ला आपल्या केबिन कडे आणले. वॉर्ड बॉय ला कॉफी आणायला सांगितली. मितेश मी आता काय सांगतो ते नीट ऐक. बोल सुजय. सगळ्याच डॉक्टरांनी आपल्याला हेच सांगितले आहे की आरु आता बरी होणार नाही सो मी फक्त एकच महिना वाट बघणार त्यानंतर तुझं काही एक ऐकणार नाही. म्हणजे काय करणार तू सुजय? मितेश एका महिन्यात जर आरु ची हालचाल नाही झाली तर मला तिला डेड ठरवावे लागणार. तिला मुक्त करावे लागणार समजलं. तसे पण ती बेनडेड झालीच आहे. ओके सुजय अँज यु विश मितेश बोलला. त्याचा हात हातात घेत सुजय म्हणाला,मित्या तुझ्या भावना मी समजू शकतो पण मी एक डॉक्टर सुद्धा आहे हे विसरू नकोस. मला हे सगळं बोलताना आनंद नाही होत आहे. तुझ्या साठी इतके दिवस आपण वाट पाहिली . हो सुजय आय कॅन अंडरस्टँड. तू तुझ्या मनाची तयारी कर मितेश. कॉफी घेऊन मितेश आणि संयु निघाले. संयु तर एकदम फ्रीज झाली होती. मितेश शी काय बोलावे हे तिला समजत नवहते. कार मधये दोघे बसले. सर तुम्ही ठीक आहात ना ? हो संयु आणि तू पाहिलेस ना आता म्हणून मी तुला बोललो की तुझं प्रेम मी नाही स्वीकारू शकणार. संयु या वर काहीच बोलली नाही. त्याने कार सुरू केली रेडिओ चालूच होता. तेरे बिन सांस ना ले मेरे दिन रात खाली खाली लगते हैं लकीरों वाले हाथ साथ मेरे चलते चलते.. हाय साथ मेरे चलते चलते रस्ते ना मोड़ीं नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं।

ना किसी अपने ना पराये की तरह
मेरे साथ रेहेना मेरे साये की तरह
लाज़मी मैं तेरे लिए
तू ज़रूरी मेरे लिए
आंसूं ये बिछोरे वाले
पलकों पे ना छोड़ीं
नैन ना जोड़ीं किथे, नैन ना जोडी। कित्ते नैन ना जोड़ीं।
बिरहो दे रंग जिसनु लग जावां अखियां विचों बरसे सावन लाँघ के जिस दी टूट गयी यारी राह तकदे रह गए साजन।
जिस नु इश्क़ दे गम लगदे रह जांदी जिंदड़ी थोड़ी नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं नैन ना जोड़ी कित्ते नैन ना जोड़ीं। हे गाणं ऐकत मितेश शान्त पणे कार चालवत होता पण गहिऱ्या डोळ्यात पाणी साचलं होतं. हे बघून संयु चा जीव कासावीस होत होता.सर तुमहि ठीक आहात ना? तिने न राहुन विचारले. हु आय एम ओके.

क्रमश..