Indraja - 3 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 3

Featured Books
  • Reborn to be Loved - 2

    Ch 2 - Psycho शीधांश पीछले भाग में आपने पढ़ा…ये है हमारे शीध...

  • बन्धन प्यार का - 27

    बहू बैठो।हिना बैठ गयी थी।सास अंदर किचन में चली गयी थी।तब नरे...

  • कुआँ

    धोखा तहुर बहुत खुश हुआ था अपने निकाह पर। उसने सुना था अपनी ब...

  • डॉक्टर ने दिया नया जीवन

    डॉक्टर ने दिया नया जीवनएक डॉक्टर बहुत ही होशियार थे ।उनके बा...

  • आई कैन सी यू - 34

    अब तक हम ने पढ़ा की लूसी और रोवन उनके पुराने घर गए थे। वहां...

Categories
Share

इंद्रजा - 3

भाग-३

जिजा तिच्या खोलीत गेली.......तिने अभिला माफ केले होते........सगळ्याच बोलन तिल पटल होते,पण तीच मन तयार होत नव्हतं........ती आत जाऊंन भाग्यश्रीच्या आणि तिच्या फोटो जवळ बसली.......ती कितीतरी वेळ फोटो पाहत होती,दोघी त्यात खुप खुश दिसत होत्या....

नकळत तिच्या डोळ्यातून अश्रु बाहेर पडले.....


जिजा.._ भाग्या,काय करू ग मी बाबा बोलत आहेत ते मला पटतय पन मी कस माफ करू तुझ्या गुन्हेगाराला..😢कदाचित बाबा बोल्त आहेत तस त्याची काही चूक ही नसावी पन कस जमेल ग मला हे☹️😢कठिन आहे ग खुप,तू पन बोलयचीस आधी की माफ करता येन,ही सर्वात मोठी ताकद असते...माफी देणारा मानुस श्रेष्ठ असतो पण कस करु ग त्याला माफ,तरी मी प्रयत्न करेंन...😢..I really miss uh भाग्या😢
(ती डोळे बंद करत म्हणाली..)


तिने म्यूजिक प्लेयर वर गाण लावल आणि त्यांचा फोटो पाहत होती......


जीवाहुन प्यारा तूच मला यारा,
तुझ्यावरचा वार दोस्ता झेलींन मी
अरे हिम्मत कोणाची वार करण्याची
धड़ाकेबाज टक्कर देउ आम्ही
ही दोस्ती तूटायची नाय...

सूटेल का रे हात दोस्तीचा?
नाय नाय नाय नाय नाय नाय
तुटेल का रे वादा यारा??
नाय नाय नाय नाय नाय.....
.
.
.
.

काही महिन्यानंतर....


जिजाचे रूटीन चालू असत......मनातून का असेना इंद्राला तिने माफ केले होते पन राग अजुन होताच.......एकाच शहरात राहत होते म्हणून इंद्रा तिला खुपदा दिसायचा पण ते दोघेही एकमेकांना ओळखत नाही अस दाखवून पुढे निघायचे.....आज जिजा टूथपेस्ट संपली म्हणून आनायला पुढच्या दुकानात गेली....


जिजा- काका कोलगेट दया ना...दोन दया..


दुकानवाला- सॉरी बाळा नाही आहे कोलगेट..स्टॉक अजुन यायचा आहै..


जिजा- काय काका,समोर एक टूथपेस्ट आहे तरी संपला स्टॉक महन्ताय..


दुकानवाला- नाही ग हा टूथपेस्ट एक मानुस घ्यायला आलाय,माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून तो शेजारी आनायला गेलाय,त्याला हवी आहे...


जिजा- अरे यार..काय हे आजच,जगातल्या सगळ्या कोलगेट संपायच्या होत्या...


ती समोर उभी होती......तोवर तिकडे इंद्रा आला....त्याला अस अचानक समोर बघून तिला जरा आश्चर्य वाटल,राग ही आला.....


इंद्रा- अरेचा ही हाहाकारी इकडे कशी??.......(मनात)


जिजा- अरे देवा गब्बर इकडे कसा आला..?..अरे हो हा तर पुढच्या चौकातील बंगल्यात राहतो,पण कधी दिसला नाही आजच कसा दिसला?.........(मनात)


इंद्रा- अम्म्म काका टूथपेस्ट माझी?


दुकानवाला- हो ही घे..


जिजा- एक मिनिट टूथपेस्ट मला हवी आहे,कारण मी आले होते दुकानात..सो लेडीज फस्ट..


इंद्रा- पन तुझ्या आधी मी आलोय ना सो माझी आहे टूथपेस्ट..आणि हो ही लेडिजवाली फॉरमैलिटी टॉयलेटच्या लाइनवर इकडे नाही...सो दे आता..


जिजा- नाही🤬
(ती टूथपेस्ट हातात पकडूंन बोलते)


इंद्रा- अरे काय ही जबरदस्ती? दे टूथपेस्ट..
(तो टूथपेस्ट ओढ़त म्हणाला)


दोघे ही टूथपेस्ट ओढ़त होते.....दुकानवाला तर त्यांना बघटच बसला😧......त्यांच्या ओढाताना मधे टूथपेस्ट मागून आणि पुढून पटकन निघाली आणि दोघांच्या कपडयावर लागली......🤣😂


जिजा- झाल भरल तुझ मन? तुला नाही मला घाल कुत्र्याला झाल ना?


इंद्रा- आता तर तू खुश हविस,जा आता कपडयावर लागलेली टूथपेस्ट वापर..त्यानेच दांत घास..


जिजा- तू मला सांगू नकोस समजल..तू जा आधी आणि घास दांत वास किती येतोय😫


इंद्रा- अरे काय..काय बोली... ssss


जिजा तशीच निघुन गेली......जिजाचा राग, तोरा बघून तो जरा हसायला लागला......ती मात्र रागात तनतन करत गेली.......


तारा- आलीस तू दे टूथपेस्ट..


जिजा- टूथपेस्ट पाहिजे..घे ही काढून
(कपडयावर हात दाखवत म्हणाली)


तारा- ई काय ग हे टूथपेस्ट अशी आनलीस😫😂दाताला लावतात कपडयावर नाही...


जिजा- तारा😠हसू नकोस जा मीठ घे आणि दांत घास एका दिवसाने काही फरक नाही पड़त😠दांत पडणार नाहीत तुझे..
(वरती जाताना म्हणाली)


दिव्या- अरे आता हिला काय झाल..


तारा- काय माहिती..🙄दीदा म्हणजे नेटवर्क आहे जे कधी ही बिघडू शकते😂


दिव्या- गप्प बस,एकल तर मारेल तुला येऊन..


तारा- 😅😂


***********************


निलांबरी- हेल्लो अभि,सेंट्रल मॉलला या,मी आणि जिजा तिकडे भेटु तुम्हाला..आज्या ला आन.............📲


अभिजीत- ओके चालेल,येतो आम्ही.............📲


निलांबरी- हु,खुप मुश्किल ने तयार झाले जिजा यासाठी सो लवकर या ह्म्म्म..............📲


अभिजीत- हो येतोच.............📲
(कॉल कट करत)


जिजा- चला मॅडम निघूया जायला...?
(ती मागुन येताना म्हणाली)


निलांबरी- हो...अरे वा वा..जिजा काय भारी दिसत आहेस तू😍
(मागे वळत)


जिजा- गप्प बस हु😂नाटकी,चल की..


निलांबरी- हो चल..


दोघीही मॉल मध्ये जातात.......मग तिकड़ूंन अभि,अजिंक्य,निलु आणि जिजा शॉपिंग करतात.....मित्रांसोबत राहून तिचाही मुड़ नीट होतो.....


जिजा- मित्रानो ऐका मी आलेच जरा हु,मला बाबांसाठी शर्ट घ्यायचा आहे..निलु तू येते का?


निलांबरी- मी दमले तू ये आम्ही आहोत..


जिजा- बर..मी आलेच..


जिजा लिफ्ट ने वरती जाते........तिच्या बाबाना शर्ट घेते आणि मोबाइलमध्ये निलुचा नंबर डायल करत लिफ्ट मधे येते.......तीच लक्ष नसत,तिच्या मागे इंद्रा उभा होता......अचानक लिफ्ट ची लाइट गेली......लिफ्ट हलायला लागली तस जिजा घाबरली आणि इंद्राच्या कुशीत शिरली.......लिफ्ट थांबली......


पण जिजा अजुन घाबरलीच होती,इंद्रा तिला पहिल्यांदा इतक जवळून पाहत होता.......त्याची तर नजरच हटत नव्हती तिच्यावरुन......ती जवळ आल्यामुळे त्याच हृदय जोरजोरात धड़धड़त होता......त्याच्यासोबत अस पहिल्यांदाच झाल........त्याच्या धड़धड़ आवाजाने जिजाने वरती पाहिले.....


जिजा- तूsssss😦
(ती लांब होत म्हणाली)


इंद्रा- हो,मगापासुन मीच होतो लाइट गेल्यावर चेंज नाही झालोय मी...😑


जिजा- अरे यार,ही लिफ्ट पन आताच का बंद पडली😫


इंद्रा- मला पण हाच प्रश्न पडतोय..


जिजा- तुला नाही विचारल मी..
(ती खाली बसत म्हणाली)


इंद्रा- बर ठीके,डोन्ट वरि कोणीतरी येईल आपल्या हेल्प ला...


जिजा- महिते मला...😏


इंद्रा- बर..सगळच माहित आहे तुला..


बराच वेळ दोघेही शांत होते......


इंद्रा- ओ हम तुम एक लिफ्ट में बंद हो,और वायर टूट जाये..डावss डावsss..एक लिफ्ट में बंद होंगे मगर दिल,आ दिल...दिल खो जाए🙄असच होते वाटत...
(गाण म्हणत)


जिजा- एवढं बेसुर आणि चुकीचा गायला हिम्मत कुठून येते तुला??


इंद्रा-ते आपला टैलेंट आहे😎


जिजा- हे ऐकून मला एकच शब्द सूचत आहे..


इंद्रा- कोणता ग?


जिजा- भंगार..निव्वळ भंगार...😏


इंद्रा- बैठे बैठे कचरा केला राव हिने.😞...(मनात)


जिजा-😏


इंद्रा-देखा है पहली बार साजन के आंखों में प्यार..टाव टावsss


जिजा- तू शांत बसायचे काय घेशील??😫


इंद्रा- दहा करोड़😎


जिजा- काय😧
देवा का काss मला इकडे फसवलस ते पण या माणसासोबत ज्याच्यासोबत मला श्वास घ्यायला पन अड़चन होते...😫


इंद्रा- मग तू अजुन जीवंत कशी??🙄


जिजा- अअअअअअअ😫😫 I will kill uh..😠😢
(ती उठून त्याच्याकडे गेली,आणि त्याच्या गळा हळूवार दाबत म्हणाली)


इंद्रा- अरे अरे..मार डालेगी क्या😫😂
(त्याला मज्जाच येत होती)...

हे बग अस करन तुला शोभा नाही देत..😂😅


जिजा- गप्प बस ना रे😫


तेवढ्यात लिफ्टचा दरवाजा उघड़ला........बाहेर जिजाची गैंग उभी होती.........समोरची पोजिशन बघून सगळ्यांचे डोळे फिरले........अभि तर बेशुद्ध व्हायच बाकी होता😂.....जिजा तशीच पटकन उठली आणि बाहेर आली....सगळ्या बैगस घेऊन इंद्रा ही बाहेर आला.....


जिजा- अभि तुझ्या भाऊला सांग हु😠😫 मला खुप इरिटेट करतो😫मी मारेल याला😫


इंद्रा- अरे कमाल आहे मारत ही होती मला,आणि रड़ते पन हीच...टू इन वन...


जिजा- आ मी नाही रडत आहे...अभि$$$$😫


निलांबरी- 😂😂


अजिंक्य-😂


अभिजीत- काय भाऊ? कशाला त्रास देतोयस तिला?


इंद्रा- मी काहीच नाही केलाय..तीच तीच रड़ते...बर हे घे ही तिची कपडयांची बैग आहे,मी पन आलो होतो इकड़े कपड़े घ्यायला सगळ्यासाठी...चल मी निघतो..


अभिजीत- हम्म बर..


अजिंक्य- शांत हो जिजा रडतस ख़य्य?


निलांबरी- शांत हो अग..


अभिजीत- जिजा तुझे बैग..आणि माझ्या भाऊ तर्फे मी माफी मागतो...


जिजा- नाही त्यानी काही नाही केला माझी मीच इरिटेट झाल...😞


अजिंक्य- तुला कधी पासुन तेच सांगालव आम्ही..


जिजा- होय..😞


अभिजीत- बर चला आता काहीतरी खाऊया..ठीके..


जिजा- हो..मला भूक लागले..


अभिजीत- माहित आहे आम्हाला तू रडलीस किवा टेंशनमधे असलीस की जास्त भूक लागते..😂


अजिंक्य-😂😂


जिजा- हम्म😂


**************************


(भोसले निवास)


मल्हार- माई..माई...
(तो आवाज देत म्हणाला)


ममता- काय रे मल्हार?


मल्हार- इंद्रा भाऊ आले..


ममता- आला का इंद्रा..बर..


मल्हार- हु..


इंद्रजीत- माई...माई..आलोय मी..


ममता- आले बाळा..
घे पाणी...


इंद्रजीत- थैंक्यू माई..
घ्या तुमच्या सगळ्यांच्या वस्तु मी आनल्यात ठीके..


ममता- बर चांगल केलास हो..


इंद्रजीत- बर बाकीचे कुठे आहेत?


ममता- अरे हे उषा मावशी आणि अभि गेले आहेत अर्चनाच्या सासरी त्यांच्याकडे आज पूजा नाही का..


इंद्रजीत- अरे हो अरचू ताई कड़े ना...तू नाही गेलीस मग


ममता- जेवण बनवून ठेवत होते तुझ्यासाठी तू तर येणार नाहीस,मग आम्हाला वेळ होणार म्हणून म्हंटल जेवण बनवून मग जाव....


इंद्रजीत- बर ते कपड़े बग तेवढे...


माई पिशवी मधल सामान काढून पाहू लागतात......सामान बघून त्यांचे डोळे फिरतात....


ममता- अरे वा साड़ी मस्त आनलीस मला आणि अरचू ला आवडली बग मला...फ्रॉक पन मस्त आहे ओवी गोड़ दिसेल यात...अंकुरसाठी शर्ट पण मस्त आहे...
बघू आणि काय आहे....
अरे इंद्रा? हे काय काय आनल आहेस तू?


इंद्रा- आंममम्म आबासाहेबांसाठी सदरा...तुझ्यासाठी अरचू साठी साड़ी,अभि अंकुरसाठी टी शर्ट....आणि उषा मावशी साठी नऊवारी,ओवी साठी फ्रॉक का ग?


ममता- एकदा जरा चेक कर...


इंद्रजीत- का? काय झाल?
थांब....


इंद्रा एक एक करून पाहू लागतो.....


इंद्रजीत- हायला..आबासाहेबांसाठी आनलेला सदरा,मावशी ची साडी अभिचा शर्ट? याच हे अस कस झाल?
(तो कपड़े पाहत म्हणाला)


इंद्रा कपड़े पाहुन चकितच झाला.....


ममता- काय रे आता हे घालायला लावतोस का मावशीला ह्या वयात आणि आबासाहेबांसाठी शॉर्ट्स आनल्यास वाटत आणि अभिसाठी काय मुलींची हुडी का😂


इंद्रजीत- नाही माई ते मी..अग मी..
अरे हो आठावले..


ममता- काय??


इंद्रजीत- अग मॉलमधे लिफ्ट बंद झाली होती तेव्हा माझ्यासोबत एक मुलगी होती ना तिच्या बैग सोबत बहुतेक आपल्या बैग चेंज झाल्यात...


ममता- अरे देवा..कधी पासून तू मुलींसोबत लिफ्ट मधे अड़कायला लागलास...😂काय गड़बड़? आवडली की काय मुलगी?


इंद्रा- नाही माई,गड़बड़ काही नाही...आणि अस काही नाही ग...


ममता- का रे?चांगली नाही का दिसायला?


इंद्रा- खुप सुंदर होती😍..
(तो हरवल्यासारख बोलला)


ममता- आणि बोलायला कशी होती?


इंद्रा- बोलायला...🙄
"भंगार निव्वळ भंगार........आआआ I will kill uh.........ही टूथपेस्ट तूच घे आणि लाव तोंडाला वास बग किती येतोय............ए जास्त शानपना नको करू हु...........तुझा चेहरा मी कधीच नाही बघनार...........गप्प बसतोस का?..........भंगार.........तू सुख,समाधान,हसू,प्रेम यासाठी नेहमी तड़पशील.............निघ रे चल चल............."
(तो तिचे शब्द आठवत)😂


ममता- काय रे?


इंद्रजीत- आ हु काही नाही...नको नको..आ ब म्हणजे तू काळजी नको करू मी बघतो कपडयांच हु...आलोच...
(वरती निघुन गेला)


ममता- अरे काय म्हणाव आता याला या वयात असे कपड़े दाखवतोय...😂


इंद्रजीत- अरे यार काय केला मी? त्या हाहाकारीची बैग घेऊन आलो...आता तिला पण हा घोळ समजेल ती तर मारेलच मला येऊन..😞नको अभि आला की लगेचच उद्या तिच्या घरी जातो आणि तिला तीच समान देतो..


***********************



जिजा- आई...आई...


तारा- हेय आलीस दीदा,माझ्यासाठी काय आनल आहेस....?


जिजा- आनल आहे सगळ्यांसाठी...


दिव्या- एवढं काय आनल आहेस ग??


जिजा- देते....बाबा हे घ्या तुमच्यासाठी शर्ट आनलाय..


शिवराज-अरे वा थैंक्यू...


जिजा- आई तुझ्यासाठी न्यू पैर्टन चा ड्रेस आनला...


दिव्या- थैंक्यू..


जिजा- आणि तारा तुझ्यासाठी हुडी...


तारा- वाव थैंक्यू दीदा....


जिजा- बघा ना ओपन करून कसे आहेत ते कपड़े..मी आलेच पाणी पिउन...
(ती कीचनमध्ये गेली)


दिव्या- अरे हे काय आनल आहे हिनी...?


तारा- आई हे काय ग??दीदा$$$$


जिजा- काय ग...काय झाल


तारा- हे काय आनल आहेस तू..?


जिजा- आय्या,हे हे ककक काय झाल😫😦


शिवराज- अग तू तर शर्ट आनलेला ना मग हा सदरा??


दिव्या- आणि मला तू नऊवारी साड़ी आनली आहेस का??


तारा- आणि माझी हुडी टी शर्ट मधे कन्वर्ट झालीच कशी?


जिजा- अरे देवा पन मी तर बरोबर घेतलेला सगळ🙄😫😦अस कस......अरे हो......आई बाबा मॉल मधे तो तो इंद्रजीत ही आलेला....
ते लिफ्ट काही वेळ बंद झालेली तेव्हा माझ्यासोबत तो इंद्रजीत होता,तेव्हाच कदाचित आमचे बैग्स बदले असावे...


दिव्या- काय ?


शिवराज- इंद्रजीत तुला भेटला?


जिजा- हो...


तारा- अरे बापरे दोघ एकाच लिफ्ट मधे😂भूकंप तर नाही न आला...


जिजा- गप्प बस तारा...मी आताच त्याच्या घरी जातेय आणि कपड़े चेंज करून आनते...


दिव्या- अग पण अस अचानक जायचे योग्य नाही..


जिजा- त्यात काय तस ही ते घर माझ्या फ्रेंड अभिच ही आहेच...सो मी जातेय...बाय...
(ती निघुन गेली)


दिव्या- अग जि$$


शिवराज- दिव्या...अम्म्म राहुदे अडवू नकोस तिला जाऊदे..


दिव्या- अहो एकतर ती त्याचा राग राग करते उगाच जाऊंन त्या बिचारयाला नको ते बोलेल..


शिवराज- हो,भांडणाच्या बहाने का असेना निदान त्याच्याशी बोलते तरी,तिच्या मनात जी कटुता आहे निघुन जाईल हळूहळू पण त्यासाठी तिने व्यक्त होण गरजेचे आहे,तुझ्या लक्षात नाही येत आहे पन ती फक्त इंद्रजीतकड़ेच व्यक्त होते,मला ही अस नकोय की तिने इंद्रजीत सारख्या चांगल्या मुलाला वाइट समजाव...इंद्रजीत चांगला आहे हे अपल्यालाच माहित आहे तिला समजेल तेव्हा ती शांत होईल...


दिव्या- ह्म्म्म ठीके तुम्हाला योग्य वाटत आहे तर...


शिवराज- ह्म्म्म😊


*************************


जिजा बाइक घेऊन भोसले निवास मध्ये आली......मल्हार आणि जीवा बाहेर उभे होते........जिजाने बाइक बाजूला लावली आणि ती आत जाऊ लागली......


जीवा- मॅडम कोन तुम्ही? कोणाला भेटायच आहे...


जिजा- माझ नाव जिजा प्रधान आहे,मी अभिजीत ची कॉलेज फ्रेंड आहे...पन आ माझ काम इंद्रजीत भोसले कड़े आहे...आहे का तो???


मल्हार- भाऊना तो म्हणाली😦बापरे...ही फ्यूचर वहिनी होते वाटत आमची.....(मनात)


जीवा- हो भाऊ आहेत घरी,


मल्हार- जीवा जाऊदे यांना भाऊ ओळखतात यांना..


जीवा- अस होय,बर जा मग तुम्ही..


जिजा- थैंक्यू☺️


जिजा आत जाते......घर खुप मोठ होता......ती तर घराकड़े पाहतच बसली,कारण तिने घर आजवर बाहेरुनच पाहिले होते आतून पहिल्यांदा पाहत होती......तिला त्यांच घर खुप आवडले होते......ती सगळ निरखून पाहत होती......घर बघायच्या नादात ती इथे का आली हेच विसरली.....


जिजा घर बघत बघत.......एका रूमपर्यंत पोहोचली.....रूम खुप मोठी आणि नीट नेटकी होती.....बघताच क्षणी आवडेल अशी......तिकडे रेडियो वर मस्त गाणी चालू होते........जिजा त्या रूममध्ये गेली.......


जिजा रूम बघत होती.......ती रूम इंद्राची होती.......तो बाथरूममध्ये फ्रेश होत होता,त्या बिचारयाला माहित ही नव्हतं की बाहेर हाहाकारी उभी आहे😅.........इंद्रा शॉवर खाली उभ राहून फक्त तिचाच विचार करत होता.......तिचा तो मासूम चेहरा त्याच्या नजरेसमोरून जातच नव्हता......


इंद्रजीत- अरे काय झाल आहे मला,तीच मुलगी का आठवते मला? आधी तर अस झाल नव्हतं कधी..ती आज आपल्या जवळ आली तेव्हा माझ हृदय कसल धड़धड़ करत होता? का पण?एवढं ओळख असून ही तीच तर नाव पन नाही माहित मला,तिला आता पुन्हा भेटावस वाटत आहे मला😍...यार...मला काय समजत नाही आहे..पागल होईल मी आता..नाही इंद्रा नाही..
(तो स्वतःला समजवत बोलला)


इंद्रा टॉवेल कमरेला बांधूंन बाहेर आला.......आणि समोर गैलरीमधे जिजा ला पाहुन त्याला वाटल की तो स्वप्न बघत आहे......म्हणून त्याने तिकडे दुर्लक्ष केले आणि कपाट मधून कपड़े काढले.......त्याने टॉवेल बाजूला फेकले,जिजाने मागे वळून पाहिले आणि जोरात कींचाळली.......


जिजा- ईईईईईईईईईईईईईईईई😫😫😫🙈
(ती डोळे बंद करत म्हणाली)


इंद्रजीत- आआआआ😖

(तिला पाहुन तो ही ओरडला)


इंद्राने पटकन कपड़े घातले.......त्याला आता समजल होता कि समोर खरच जिजा उभी आहे........स्वतःची त्याला आता लाज वाटत होती..........जिजा डोळ्यावर हात ठेवून उभी होती.........तो तिच्या जवळ गेला हळूच डोळ्यावरुन तिचा हात काढला..........तिने अलगद डोळे उघडले,तिच्या डोळ्यामधे तर तो हरवलाच......👀
तेव्हाच रेडियो वर गाण सुद्धा प्ले झाल.....📻


📻🎶

मै शायर नही
दिवाना नही
मै आशिक नही
परवाना नही,

मिली जब से नजर
तब से जान जिगर
मै हो गया दिवाना
मै हो गया दिवाना
अब जाने क्या होगा जान जाना....


जिजा शुद्धित आली तस तिने त्याला दूर लोटल......तस तो पन शुद्धित आला......


जिजा- आआआ काय करत होतास तू हे?

इं

द्रजीत- फुगड़ी खेळत होतो,😏दिसला नाही का तुला तुझ्या डोळ्यात पाहत होतो....


जिजा- काय ?


इंद्रजीत- आ ब क काही नाही...


जिजा- काय बोलतो काय माहित...एकतर खोलीचा दरवाजा लावता नाही येत...😏


इंद्रजीत- ओय एक मिनिट तू माझ्या खोलीत काय करत आहेस???आणि तू मला बोलनारी कोन? माझी खोली आणि बोलते ही...काय यार बाहेर पन हाहाकारी आणि माझ्या घरी पण....


जिजा- आआआ ते मी...कशाला आलेली मी🙄


इंद्रजीत- घ्या आता तर बोलयचीच खोटी...🙄😠


जिजा- हो आठवले...ते माझे कपड़े तुझ्याकडे आलेत आणि तुझे माझ्याकडे...तेच बदलायला आले....


इंद्रजीत- नशीब लवकर दिसला तुला? मला वाटल ठेवून घेतलेस कपड़े...बर माझ्या वडिलांचा सदरा स्वतःचे शॉर्ट्स समजून घातले नाहीस ना?🙄


जिजा-ए गब्बर अस कस करेल मी..सदरा आणि शॉर्ट्स मधे किती फरक आहे...


इंद्रजीत- ए हाहाकारी तुझा काही भरोसा नाही,तू काहीही करू शकतेस...


जिजा- कककक कोन हाहाकारी? मी माझ नाव हाहाकारी नाही,जि.........


इंद्रजीत- असुदे काहीही तुझ नाव माझ्यासाठी तू हाहाकारीच आहेस..आणि मला गब्बर बोलतेस ते काय?


जिजा- तू आहेसच गब्बर...😠


इंद्रजीत- मग तू पण आहेसच हाहाकारी..😏


जिजा- आआआ😫तुझ्याशी बोलनच चुकीचा आहे..घे तुझे कपड़े...


इंद्रजीत- हे घे तुझे कपड़े😏


जिजा-😏😏



जिजा तोंड वाकड़े करत निघुन गेली.......इंद्रजीत तिला बाल्कनीमधून जाताना पाहत होता......



क्रमशः
मग कसा वाटला आजचा भाग? हाहाकारी आणि गब्बर ला भेटून आनंद झाला का?😂कमेंट नक्की करा जास्त स्पोर्ट नाही मिळत आहें या कथेला.. ती आणि तो या कथेला सगळ्यांनी खुप स्पोर्ट केला मग आता काय झालं फ्रेंडज...? प्लिज..स्पोर्ट कायम असुदे👍



©Pratiikshaa. W✍️🧚