The Author Author Sangieta Devkar.Print Media Writer Follow Current Read सांग ना रे मना (भाग 11) By Author Sangieta Devkar.Print Media Writer Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books Autobiography - Forgotten Memories - 8 But I cold not join.. Police verification was necessary befo... THE WAVES OF RAVI - PART 17 BABA SANTA SINGH The Sutlej River was flowing slowly.... Hate to Love - 3 Hate to love - 3 New delhi , India We read that When Aphara... King of Devas - 3 Brahma's ancient brows furrowed slightly, revealing his conc... Trembling Shadows - 20 Trembling Shadows A romantic, psychological thriller Kotra S... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Author Sangieta Devkar.Print Media Writer in Marathi Fiction Stories Total Episodes : 29 Share सांग ना रे मना (भाग 11) 3.1k 6.4k 1 मितेश ला आठवले असाच त्याचा पहिला पब्लिकेशनचा शो सेंट्रल मॉल ला होता.पाहिलं बुक त्याच पब्लिश झालं होतं. खूप लोक कार्यक्रमाला आले होते जास्त करून यंग मुलं मुली त्याचे फॅन्स होते. छान कार्यक्रम झाला हातोहात तिथे त्याच्या बुक ची विक्री सुद्धा झाली. आटोग्राफ आणि सेल्फी साठी मुलांचा घोळका त्याच्या भोवती झाला. सर्वांना सेल्फी देत होता मितेश अचानक त्याच लक्ष एका मुलीकडे गेले ती या गर्दी पासून लांब उभी होती पण लक्ष मितेश कडेच होते.गर्दी कमी झाली तसे तिने आवाज दिला एक्सक्युजमि सर प्लिज आटोग्राफ म्हणत ती मुलगी मितेश जवळ आली. दिसायला सुंदर गालावर पडणारी खळी हसरा चेहरा नाजूक अशी ती मितेश समोर नोट बुक घेऊन उभी होती. सर मी तुमच्या सगळ्या कथा वाचल्या आहेत. मी तुमची जबरदस्त फॅन आहे. मला तुमची हँग ओव्हर ही स्टोरी खूपच आवडली मी पुन्हा पुन्हा ती वाचत असते. ओके मिस ?? ओहह सॉरी सर मी आरोही मी बी एस एसी च्या लास्ट इयर ला आहे. मिस आरोही सायन्स स्टुडंट आणि कथा आवडतात ? हो सर पण फक्त तुमच्याच. ओह थँक्यू आरोही अँड नाईस नेम. थँक्स मितेश सर म्हणत आरोही निघून गेली पण जाता जाता मितेश च्या हृदयात कायम साठी घर करून गेली. इथुनच सुरू झाली होती त्यांची लव स्टोरी! . मित्या कुठे हरवलास निनाद त्याला आवाज देत होता. कुठे नाही चल झालं का तुझं शॉपिंग? माझं झालं तू काही नाही घेणार का ? मी घेतो चल तुज्यासाठी. नको निनाद चल आपण कॉफी घेऊ म्हणत दोघे फूड कोर्ट जवळ आले. अरे मितेश सर तुम्ही इथे संयु मितेश ला तिथे बघून बोलली. ओहह जस्ट शॉपिंग ला आलेलो. सर चला ना आज मी ट्रीट देते तुम्हाला प्लिज. ओके मितेश म्हणाला. मग हे दोघे आणि संयु पल्लू एकत्र बसले. पल्लवी तर निनाद ला किती बघू किती नको असं झालं होतं तिला. बाकी मिस संयुक्ता काम कस चालय? काम सुरू आहे आणि वाचन ही. ओहह ग्रेट. निनाद सर मी एफ बी ला तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केली होती. पाहिले नाही का तुम्ही पल्लू ने विचारले. मिस पल्लवी कामात होतो सो नाही बघितली. ओके आता घेतो रिक्वेस्ट म्हणत निनाद ने मोबाईल मध्ये एफ बी ओपन केले आणि तिची रिक्वेस्ट घेतली. मितेश ला संयु आवडते हे त्याने ओळखले होते मग पल्लवी ची मदत त्याला लागणारच होती. पल्लवी चला आपण खायला काय घ्यायचे ते ऑर्डर करू या दोघांना बसू दे बोलत म्हणत निनाद उठला. पल्लू तर काय नेकीं और पूछ पुछ लगेच तयार झाली.सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे संयु बोलली. मिस संयु काही पर्सनल असेल तर नका बोलू काम काही असेल तर बोला. ती काय बोलणार याची त्याला कल्पना आली होती.तो अस बोलला त्यामुळे संयु चा चेहरा उतरला. पण तिच्या भावना त्याला सांगणं भाग होत. तिला आता हे सहन होत नवहते. एक तर हा नाहीतर ना इतकच तिला ऐकायचं होत. प्रेम असच वेड असत. कितीही लपवले तरी ते लपत नसतं. कधी एकदा आपल्या मनातलं आपल्या प्रिय व्यक्तीला सांगतो अस होऊन जातं. तो प्रेमाचा भार सहन होत नसतो. मग समोरचा कसा ही रिऍक्ट होवो फरक नाही पडत फक्त आपल्या भावना त्या व्यक्ती पर्यंत पोहचवणे महत्वाचे असते. पण इथे मितेश ने तिला पुढे बोलूच दिले नाही. निनाद आणि पल्लू हसत हसत येत होते बरच काही खायला घेऊन आले होते. अरे काय झालं तुम्हाला अस गप्प का बसला आहात. निनाद ने विचारले. काही नाही मितेश बोलला. संयु काही बोलला का तुला? त्याच बोलणं मनावर घेऊ नकोस तो तसाच आहे पटकन काही ही बोलून जातो. निनाद म्हणत मितेश त्याच्या कडे रोखून बघत होता. नाही नाही सर काही नाही बोलले मला संयु म्हणाली. मग गप्पा मारत ते खात होते जास्त पल्लवी आणि निनाद च बोलत होते. मितेश तर गप्पच होता संयु फक्त हो नाही बोलत होती. आपण जास्तच रूड बोललो का अस मितेश च्या मनात येऊन गेलं. कारण संयु खुपच शान्त बसली होती. मुळात इतकी बडबड करणारी संयु तिचं बोलणं,तीच हसणं खूप छान होत ते कुठेतरी मितेश मिस करत होता. आता आपल्या मूळे ती एकदम गप्प बसली आहे. तिला अस बघणं त्याला ही नाही आवडले. नकळतपणे तो बोलून गेला मिस पल्लवी तुमची मैत्रीणने तर आज मौनव्रत धारण केलेते दिसत आहे. काय ग संयु अचानक काय झाले तुला पल्लू ने विचारले. काही नाही पल्लू आपलं बोलणं ज्यांना आवडेल तिथच आपण बोलावे हो ना? म्हणत तिने मितेश कडे पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला पाणी दिसले. कॉफी वगैरे पिऊन झाल्यावर ते निघाले. बाय नाईस टू मिट यु संयु पल्लवी निनाद बोलला. पुन्हा भेटू मग पल्लू म्हणाली. काही गरज नाही पल्लू पुन्हा भेटण्याची. अस म्हणत रागातच पल्लू ला ओढत संयु निघाली तिने एकदा मागे वळून बघावे अस मितेश च्या मनात आले पण संयु पुढे निघून गेली. संयु हात सोड ना आणि अचानक काय झालं तुला? पल्लू मी मितेश ला माझ्या मनातलं सांगणार होते ग. मग बोलली नाहीस का? मी बोलणार होते तसे तो म्हणाला पर्सनल काही असेल तर अजिबात नका बोलू काम असेल तरच बोला. असला हा रायटर इतका अँटीट्युड ? मला वाटलं होतं हा खूप इमोशनल रायटर आहे माझ्या फिलिंग्ज समजून घेईल पण नाही ही वॉज सो रूड पल्लू ऐकून पण नाही घेतले ग या माणसाला मन नावाची गोष्टच नाही ग. संयु रडू लागली. अरे इतकच बोलला ना तो त्यात काय मग नंतर ऐकून घेईल ग तो मे बी त्याचा मूड नसेल. क्रमश. ‹ Previous Chapterसांग ना रे मना (भाग 10) › Next Chapter सांग ना रे मना (भाग 12) Download Our App