Sang na re mana - 10 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सांग ना रे मना (भाग 10)

Featured Books
Categories
Share

सांग ना रे मना (भाग 10)

मितेश तिथून घरी आला. जेवण करून तो रेस्ट घेत होता. अचानक त्याला संयु ची आठवण झाली तसे त्याने एफ बी ओपन केले. रोजच्या सारखा तिचा गुड मॉर्निंग चा मेसेज आला होता.त्याने ही तिला गुड आफ्टरनून चा मेसेज सेंड केला.तो संयु चे पोस्ट बघत राहिला. तिचे खूप छान छान फोटो तिने अपलोड केले होते. संयु खरच निरागस आणि सुंदर होती दिसायला. त्याच्या मनात आले की ही आपले पोस्ट शेयर करत असते नक्की आपल्या प्रेमात पडली असणार. आज पर्यंत कित्त्येक मुली नी त्याला प्रपोज केले मागे लागल्या पण हा भाव देत नाही म्हंटल्यावर त्या मुलींनी त्याचा नाद सोडून दिला होता पण संयु अजब रसायन होत. चांदणयात आज ही रात्र हरवून गेली.आठवणीचा तुझ्या नवा साज देवून गेली.सरला हा रातीचा दाह सारा,तुझ्या प्रेमाचं लख्ख चांदने लपेटून गेलीडोळ्यातील चांदणे तुझ्या का फिके फिके आहे.तुझ्या सवे शब्द ही माझे मुके मुके आहेसंपेल ही वाट कधी अंधारलेली,शुभ्र चांदणे तुज्या प्रेमाचे मज हवे आहे.दुःखाचे धुके अजून इथे रेंगाळत आहे.नाही हरवायची मला वाट चालताना,सोबतीला तुझा हात हाती हवा आहे.चांदण्यात चालताना अजून काही नको आहे.तू माझी अन मी तुझा ,जगण्यास अजून काय हवे आहे.?..मीत.ही कविता मितेश ने पोस्ट केली. त्याला आरोहीची खूप आठवण येत होती. त्याने डोळे बंद केले पण नजरे समोर संयुच दिसू लागली. तिचं बोलणं,तीच हसणं त्याला आठवू लागले का मला तिची आठवण येते? मितेश या विचारात केव्हातरी झोपी गेला. संध्याकाळी निनाद चा कॉल आला तेव्हा तो उठला इतका वेळ तो कधी झोपत नवहता पण आता त्याला खूप रिलॅक्स वाटत होते. बोल निनाद काय काम? झोपला होता का तू मितेश ? हु पण उठलो आता बोल. ते नवीन कादंबरी साठी त्या संपादकाना तुला भेटायचे होते. आता 6pm ला जमेल का विचारत होते. कुठे भेटायचे म्हणत आहेत? हॉटेल साई गार्डन ला. ओके येतो म्हणून सांग मी निघतो आवरून तुला पीक करतो बाय. मितेश तयार व्हायला गेला. कपाटात कपडे कोणते घालायचे हे बघत होता तसे त्याची नजर ब्लु डेनिम शर्ट वर पडली. मितु तू ना ब्लू कलर जास्त वापर . का? कोणी सांगितले ?अरे ते मी पाहते ना यु ट्यूब ला न्यूमरोलॉजी श्वेता जुमानी. तिचे काय काम आपल्या मध्ये आरु? त्याने तिचे गाल ओढत विचारले. तिने सांगितले या वर्षी ब्लू कलर लकी आहे सगळ्याना. आणि तुझी बर्थडेट 2 नोव्हेंबर ना सो तू सिल्वर,ऑफ व्हाईट क्रीम असे कलर वापर. आरु हे असलं काही मला भविष्य वैगरे पटत नाही उगाच मला नको सांगू. जे लोक उद्या काय होईल ते सांगू शकत नाहीत त्यांचे मला काही पटत नाही. माहित आहे मला पण माझा आहे विश्वास पेढ्या. तू ठेव विश्वास त्याबद्दल माझं काही मत नाही.

पण मला काही करायला सांगू नकोस. खडूस अरे फक्त ब्लु कलर वापर म्हणते ना बघ मग तुला कसे सक्सेस मिळत जाते.आरु तू आहेस ना सोबत मग सक्सेस आहेच. माझ्या साठी घाल ना ब्लु कलरचे कपडे. मला आवडतो येल्लो कलर पण ब्लु पण आहेत खूप. नको घालू जा मी काही ही सांगत नाही असे बोलून आरु रुसून बसली. बाप रे कोणाला तरी माझा प्रचंड राग आला आहे. आता काय माझे खरे नाही म्हणत मितेशने आरु चे नाक ओढले. तीने रागाने मान दुसरीकडे वळवली. तू है तो जिंदगी से कोई शिकवा नही हमदम।तू रुठा जो हमसे तो एक पल मे टूटकर बिखर जाऐंगे हम।मित्या असलं काही बोलू नकोस म्हणत आरु ने तिचा हात त्याच्या तोंडावर ठेवला. मग का चिडतेस लगेच? तू ऐकत नाहीस म्हणून. मी आहे असा आहे चालेलं की नाही सांग? पेढ्या तू जसा आहेस तसा मला आवडतोस. आरु ने त्याला मीठी मारली. आरु खर होत तुझं बोलणं जेव्हा पासून ब्लु वापरू लागलो ना तस मला सक्सेक मिळत गेले हा श्रद्धा की अंधश्रद्धा हा भाग वेगळा पण तुझ्या साठी वापरतो ग हा कलर हे पाहायला तरी डोळे उघड स्वीटु मितेशच्या मनात हा विचार येऊन गेला. निनाद वाट बघत असेल म्हणून पटकन आवरून निघाला.डेनिम शर्ट ब्लू जीन्स शर्ट च्या आत येल्लो टी शर्ट एकदम हँडसम दिसत होता मितेश. निनाद बाहेर आलाच होता. ओहह काय किलर दिसतोस मित्या हाय हाय काश मै लडकी होती. गप ये नौटंकी चल म्हणत मितेश कार मध्ये बसला. हॉटेल शिवसागर ला आले. पाचच मिनिटात संपादक माने पण आले. हॅलो मितेश हाऊ आर यु? एम फाइन. बोल मितेश स्टोरी कशी आहे आणि तुझे मानधन कसे असेल ? सर माझी ही न्यू स्टोरी एकदम इमोशनल आणि हार्ट टचिंग आहे. ही स्टोरी भरपूर चालणार इव्हन या कथे वर वेब सिरीज ही होऊ शकेल. आजच्या युथ ला डोळ्यासमोर ठेवून ही स्टोरी मी लिहीत आहे. मला 75% तरी मानधन हवे आणि माझ्या कथेत कोणताच बदल होणार नाही हे सगळं मान्य असेल तर मी काम करेन तुमच्या सोबत. मितेश तुम्ही इतक्या विश्वासाने कसे काय सांगू शकता की तुमची स्टोरी हीटच होणार. सर लेखकाला आपल्या कलाकृती बद्दल आत्मविश्वास असतो. तो जे लिहितो ते त्याच्या आतून मनातुन लिहिलं गेलेलं असत. जे लिहिणार ते वाचकांना कस आवडेल याचा विचार केलेला असतो. कथेतील पात्राना लिहिताना स्वहता लेखक आधी ते पात्र जगतो मग लिहितो,त्या अनुभूती तुन तो जात असतो. मला माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे. बाकी तुमची इच्छा. ओके मितेश आफ्टर ऑल यु आर द बेस्ट सेलर ऑथर.तुझ्यावर शंका घेणं चुकीचे ठरेल. ओक डन आय विल अग्री विथ यु. मग थोडे बोलणे करून संपादक निघून गेले. मित्या चल ना वेस्ट एन्ड ला जाऊ अस पण बरेच दिवस शॉपिंग नाही केली. नको निनाद मला नाही मूड. अरे पाच मिनिटांवर आहे मॉल चल तिथे गेल्यावर आपोआप तुझा मूड छान होईल. बळेबळेच निनाद मितेश ला घेऊन वेस्टएन्ड मॉल ला आला. दोघे मॉल मधये फिरत होते. निनाद ने स्वहताला काही शर्टस घेतले. तिथे कोणत्या तरी कार्यक्रमाची अर्रेंजमेंट सुरू होती. मितेश ला आठवले असाच त्याचा पहिला पब्लिकेशनचा शो सेंट्रल मॉल ला होता.


क्रमश..