Sang na re mana - 5 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | सांग ना रे मना (भाग 5)

Featured Books
Categories
Share

सांग ना रे मना (भाग 5)

मितेश ने आल्या आल्या आपल्या भारदस्त आवाजात हा शेर ऐकवला. या वर धडाधड कमेंटसचा मारा होऊ लागला. संयु तर एकदम फिदा झाली होती त्याच्या वर. काय यार कसला हॉट आहे हा पल्लू उफ्फ ये आंखे ये आवाज हम तो दिवाने हो गये आप के. संयु पल्लवी कडे आली होती हा शो पाहायला कारण घरी आज सगळे असणार म्हणून. संयु अग उगाच त्याच्या प्रेमा बिमात पडू नकोस खूप मोठा लेखक आहे तो तुला भाव देणार नाही. पल्लू तो भाव देवो अथवा ना देवो मी तर पडले आहे त्याच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले आहे आता माघार नाही. वेडी आहेस संयु उगाच त्याची स्वप्न बघू नकोस . काहीच हाती लागणार नाही . पल्लू मी मितेश वर प्रेम करत राहणार तो हो बोलो अगर ना बोलो. हम्मम पल्लू इतकंच बोलली. संयु मितेश चा प्रोग्राम बघत राहिली. तुम्ही कोणाला आयडॉल मानता आणि कोण तुमची इन्स्पिरेशन आहे असा प्रश्न संयु ने चाट वर टाकला. लोक प्रश्न विचारत होते आणि जमेल तसे मितेश उत्तर देत होता . जे प्रश्न उरतील त्यांची उत्तरे नंतर इनबॉक्स ला मिळतील असे सुरवातीलाच अँकर ने सांगितले होते. संयु चे नाव बघून मितेश ला समजले की ती हा प्रोग्राम बघत आहे. त्याने तिच्या प्रश्नांच उत्तर मी स्वहतालाच माझा आयडॉल मानतो इतकंच दिले . पण इन्स्पिरेशन कोण त्याची हे नाही सांगितले. खडूस आहे असणार कोणीतरी याची गर्लफ्रेंड संयु म्हणून अशा सॅड आणि रोमँटिक शायरी करत असतो पल्लू बोलली. मला नाही वाटत ती सोडून गेली असेल याचा ब्रेकअप झालाय अस वाटतय. मूर्ख असेल का ती जी कोणी असेल संयु मितेश ला सोडून जाईल. का नाही काहितरी भांडण वैगेरे झाले असेल ना. उगाच का हा इमोशनल कविता कथा लिहितो. संयु तो एक स्टंट असतो फेमस होण्या साठीचा. नाही हा पल्लू मितेश तसा नाही वाटत. अरे वा किती वेळा भेटलात त्याला तुम्ही मॅडम? पल्लू माणसाला बघून थोडा तरी अंदाज येतो आपल्या कडे म्हणजे फिमेल ला सिक्स सेंथ असतो ना ! ओहह बर नसेल तसा तो मितेश. चूप ना ऐकू दे मला त्याला पल्लू. ओके यु एन्जॉय मी खायला बनवते आपल्या साठी म्हणत पल्लवी किचन कडे गेली.

संयु शब्द आणि शब्द मितेश चा मनात साठवत होती. खूप छान पद्धतीने त्याने माहिती सांगितली. बरयाच जनांना रिप्लाय ही दिले. कथा कशी असावी. विषय कसा निवडावा.सवांद लेखन कसे असावे सगळं व्यवस्थित त्याने एक्सप्लेन केले. जवळ जवळ तास दिड तास कार्यक्रम सुरू होता. ब्लू बलेझर आणि व्हाईट लाईनिग शर्ट मधये मितेश क्युट दिसत होता. तिने त्याचा तसा फोटो ही काढून घेतला. संयु खरच त्याच्या प्रेमात पडली होती. कार्यक्रम संपला. पण संयु मितेश च्या विचारात हरवून गेली. इकडे मितेश संयु ची कमेंट बघत होता. त्याची इन्स्पिरेशन फक्त त्याची आरु होती. मितु किती छान लिहितो तू . हे बघ तू लिखाण कधीच बंद नाही करायचेस . तू एक दिवस मोठा फेमस रायटर होशील . इतका विश्वास आहे माझ्यावर तुझा आरु? हो रे तू लोकांच्या मनाचा भावनांचा तू जसा काही ठाव घेऊनच लिहितोस अस वाटते. तुझा लिहिलेला शब्द अन शब्द आत अगदी मनाच्या गाभाऱ्यात पोहचतो. बस्स आरु तू उगाच मला हरबरयाच्या झाडावर नको चढवू . मित्या तुला पटत नाही तर दे सोडून. आरु चिडली की त्याला रागात मित्या बोलायची. आता ही तिला राग आला. आरु तस नवहते मला म्हणायचे . नको बोलू तू जा नको लिहू काही . मितेश तिच्या जवळ गेला तिचा चेहरा हातात धरून म्हणाला,आरु तूच तर माझी लिखाणाची प्रेरणा आहेस ग तूच अस रागवलीस तर मी कुठे जाऊ सांग. हो ना मग मी खोटे बोलते का? कोणालाही दाखव तुझे लिखाण मग बघ काय प्रतिक्रिया येते. अरे जान माहीत आहे मला पण त्या लिखाणाला योग्य फ्लॅटफॉर्म मिळायला नको का? माझं लेखन लोकां पर्यंत पोहचायला हवे ना? सगळं काही होईल मितु तू पॉझिटिव्ह रहा सगळीकडे तुझे लिखाण देत जा मग बघ एक दिवस तू नक्की बेस्ट सेलर ऑथर म्हणून नावलौकिक मिळवशील . माझी मनापासून इच्छा आहे मितु तुला खूप मोठा रायटर झालेल बघायचे आहे. हो आरु नक्की होईल तसेच. पण तू मला सोडून कुठेही जायचे नाहीस नाहीतर माझे शब्द ही तिथेच थांबतील. नो मितेश अस काही ही तू करणार नाही आहेस माझी शपथ आहे तुला . आरु तू आहेस तर मी आहे नाहीतर काहीच नाही. मितु एक लक्षात ठेव मी सोबत असेन किंवा नसेन तू कधी ही लिखाण बंद करणार नाहीस. तुझे शब्द कधीच थांबणार नाहीत असे म्हणत तिने मितेश चा हात आपल्या डोक्यावर ठेवला. प्रॉमिस मी मितेश. आता त्याचा नाईलाज झाला हो आरु मी कधी ही माझे लिखाण बंद करणार नाही. तुझ्या साठी तुझ्या स्वप्ना साठी माझी लेखणी चालतच राहील. मितेश चे डोळे भरून आले होते. आरु ची आठवण आता त्याला बैचेन करत होती. सगळं आता डोळ्यासमोर घडत आहे असंच फील होत होत. सिगरेट च्या धुरात त्या वलयात एकच चेहरा दिसत होता आरोही........" मेरी राहे तेरे तक है। तुझं पे ही तो मेरा हक है। ईश्क मेरा तू बेशक है।तुझपे ही तो मेरा हक है। साथ छोडूगा ना तेरे पिछे आऊगा,छिंन लुंगा या खुदा से मांग लाऊगा। तेरे नाल तकदिरा लिखवाऊगा। मै तेरा बन जाऊगा।मै तेरा बन जाऊगा। सोह 'तेरी मै कसम यही खाऊगा।किते वादेया नू मै निभाऊगा। तुझे हरवारी अपना बनाऊगा। मै तेरा बन जाऊगा। मै तेरा बन जाऊगा। लखा तो जुदा हु ' मै तेरी खातीर, तू ही मंजिल मै तेरा मुसफिर। रब नू भुला बैठा 'तेरे करके मै हो गया काफिर। मै तेरे लिय जहा से टकराऊगा।सब कुछ खोके तुझको ही पाऊगा। दिल बनके दिल धडकाऊगा। मै तेरा बन जाऊगा,मै तेरा बन जाऊगा। मितेश गाणं ऐकत त्याची नवीन कथा लिहीत होता . काम करताना त्याला गाणं ऐकायला लागायचे ही त्याची सवय होती. त्याच कॉन्सनस्ट्रेशन मग चांगले होत असे.

क्रमश