Kashi in Marathi Short Stories by Vrushali Gaikwad books and stories PDF | काशी

Featured Books
Categories
Share

काशी

दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली होती. घरात गडबड सुरु होती, आई घर साफ करायचं म्हणुन मागे लागली होती. मला घर साफ करायचं म्हणजे नको वाटायचं. पुर्ण घर आवरायचं, संपुर्ण दिवस त्यामध्ये घालवायचा....चिड यायची मला. आज काही करुन घर साफ करायचंच असं आई बाबांच रात्रीच ठरलेलं. त्यांनी रात्रीच जाऊन मदतीसाठी एका बाईला सांगितलं होतं. मी उठल्यापासुन चिडचिड करत होती. नेहमी काय करायची साफसफाई?? घरी तरी कोण येतं तुझ्या?? म्हणुन आईला मी टोमणे मारत होती..
काही वेळ मी आईसोबत बोललीच नाही.. आईने मला सर्व मांडणची भांडी खाली करायला सांगितली होती आणि मी ती रागात खाली करत होती. तेवढ्यात बाहेरून आवाज आला...
ताई....ताई....
मी बाहेर गेली. समोर ती बाई उभी होती, मदतीसाठी बोलावलेली..
काय ओ.. काय झालं???
आई कुठे आहे तुझी??
आहे घरात..या तुम्हांलाच बोलावलं आहे का बाबांनी..
हो मलाच...आणि ती हसली.
खरंच भारी स्माईल होती तिची.. माझ्यावर आलेला ताण, तणाव फक्त तिच्या हसण्यामुळे कमी झालेला.
या ना.. घरात...चहा घ्या ..
हो दे थोडा.. मी पण तशीच आले..
हो घ्या...
(चहा पिऊन झाल्यानंतर)चल मग आपण सुरुवात करु..
हो चला ना...
मी खरंच शॉक होत होती.. तिच्याकडे बघुन.. किती ही उत्सुकता काम करण्याची.. मी तर साफसफाई करण्यासाठी कधीच इतकी खुश नसेल..मग मनात आलं.. ती यामधुनच कमवते आणि तिच्यासाठी हेच काम म्हणजे आनंद असावं.. आपण जे काम करतो ते पण तर आपण मनापासुनच करतो. पण खरंच हा आपण जरी मनापासुन करत असलो तरी आपण आनंदाने नाही करत, जबाबदारी किंवा करायचं म्हणुन करत असतो.
ही बाई खरंच भारी होती... तिचं नाव काशी होतं.. ती माझ्यापेक्षा बरीच मोठी होती. पण मी तिला ती न म्हणता पुर्ण मान देऊनच बोलत होती. आणि खरंच त्या दिवसात मला तिच्यामुळे फक्त साफसफाई करावी वाटली. मी नेहमी मनावरुन किंवा करायचं म्हणुन करत असते पण त्या आज मात्र मला मनापासुन करावी वाटली. मनात आलं बोलु तरी कसं हिला.. ही खरंच भारी आहे, इतकी ताकद आणि उत्साह घेऊन आले. तिच्यासोबत काम करताना कसे एक दोन तास गेले मला तर समजलं पण नाही.
रिया.. रिया...
काय ओ बाबा..
अगं तुला माहिती आहे का??
काय?? बोला तर??
हीला तिन पोरं आहेत, एकटी सांभाळते ही..
मला ऐकुन वाईइट वाटलं, मनात आलं नवरा वारला असेल कदाचित हीचा.. म्हणुन मी फक्त शिकतात का मुलं असं विचारलं??
हो मग मी शिकवते, एकानी शाळा सोडले पण बारक्याला मिशाळेत घेऊन जाते मी..
अच्छा.. शिकवा मग त्यांना, ते करतील मदत तुम्हांला..
असं बोलुन मी विषय थांबवत होती.. तेवढ्यात बाबा बोलले..
नवरा आहे ना हीचा... आहे ना गं???
आहे मग तो कुठे मरतोय??
असा तिचा रिस्पॉन्स मिळाल्यानंतर मला तर आता ऐकायचंच होतं नक्की काय गडबड आहे??
कुठे आहेत मग ते??
तो ना बाय तो आहे त्याच्या दुसर्‍या बायकोकडे...आणि तीने हे हसत सांगितलं..
आईशप्पथ मी काय बोलु.. मी गप्पच झाली.. हीचा नवरा दुसर्‍या बायकोकडे आहे, हे ही हसत आम्हांला सांगते.
मग तुमच्याकडे नाही येत का???
मीच नाय घेत घरात त्याला, माझ्या पोरांना आणि मला सोडुन गेला ना तो मग जाऊदे आता तिच्यासोबतच त्याला..
अच्छा.. मी थांबवला विषय...
पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज जर तिच्या जागी दुसली कोणी बाई असती तर हसत बोलली नसती. म्हणुनच मी त्यांची फॅन झाली होती.. नवरा सोबत नाही, मुलांची जबाबदारी आहे म्हणुन खचुन न जाता किंवा रडत न बसता ती स्वतः ठाम ऊभी आहे. शिवाय दुसर्‍या पुरुषाचा आधार न घेता..
तिच्याकडुन मी तरक खुप शिकली, हसत जगत राहायचं, समोर आलेलं हसत हसत स्विकारायचं, मग ते एखादं काम असो किंवा एखादं संकट.