ak koti rupaye in Marathi Motivational Stories by Surendra Patharkar books and stories PDF | एक कोटी रुपये

Featured Books
Categories
Share

एक कोटी रुपये

एक कोटी रुपये

लेखक:सुरेन्द्र पाथरकर:

मोबाइल: 8554836989 Email:patharkar.sp@gmail.com ( कथा पूर्ण काल्पनिक असून स्थळ, काळ,व्यक्ति, यात काही साधर्म्य आढ़ळल्यास तो केवळ योगायोग समजावा :२८०२२०२२ )

OOO

रात्री 12 वाजता मोबाईलची रिंग वाजली अन मोहनने वैतागून मोबाईल उचलला. बघतो तर ममता वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होती. मोहनला खूप बरे वाटले. मोहन मागच्याच वर्षी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पोस्टसाठी सिलेक्ट झाला होता मात्र नेमणूक चर्चगेट ब्रांच ऑफिस मध्ये झाली होती. मोहनने कल्याणला 1बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला होता व आई बरोबर रहात होता. मोहनला वडील नव्हते, मोहन 04 वर्षाचा असतांना किरकोळ आजारचे निमित्त होऊन वडिलांचे निधन झाले होते. कल्याणहून चर्चगेट ऑफिसला रोज अप डाउन करावे लागत होते. लोकलच्या रोजच्या धकाधकीच्या प्रवासा मुळे रात्री 09 वाजता घरी आल्यावर मोहन थकून जात असे. आई गरम गरम चहा देऊन अन्न गरम करून अर्ध्या तासाने जेवायला वाढत असे. मोहनचा एकुलता एक मामा आई चा लहान भाऊ, नासिक जवळ ईगतपुरीला छोटीशी शेती करत होता. बाकी जवळचे असे कोणीच नातेबाईक नव्हते.

आईला आता मोहनच्या लग्नाची घाई झाली होती. मोहन एकुलता एक मुलगा होता. आई वर सगळी जबाबदारी होती. मोहन ची नोकरी पक्की झाल्याबरोबर आईने वधू संशोधनाचं काम सुरू केलं. अन् काय आश्चर्य, सांगून आलेली पहिलीच मुलगी मोहन साठी पसंद पडली ती म्हणजे ममता होती. मोहन ची लगेच लग्नाची तयारी नव्हती. अजून दोन वर्षे थांबून, थोडे सेर्व्हिंग झाल्यावर नंतर लग्न करायचा विचार होता. पण आई च्या हट्टा पुढे त्याचे काही चालले नाही. आई चा निर्णय पक्का होता. जुजबी बघण्याचा कार्यक्रम झाला. मोहन चे इगतपुरीचे मामा रमेश पंत तातडीने मदतीला आले. जन्म कुंडली एक्सचेंज झाल्या पण जुळवून बघण्याची गरज कोणालाच वाटली नाही. ममता नाकी डोळी आकर्षक होती, फक्त रंगाने गव्हाळ होती. आई, मामाने त्यांची पसंदी सांगितल्यावर काही प्रश्न उरला नव्हता. तरी धीर धरून मोहन ने ममताला विचारले की लग्न झाल्यावर तु नोकरी करावी अशी माझी इच्छा आहे, तुझी तयारी आहे ना? तसा ममता कडून होकार आल्यावर लग्न ठरले. एक महिन्या नंतरची तारीख ठरली. बर्‍यापैकी पैसे साठल्यावर मोठा फ्लॅट घ्यायचा त्याचा विचार होता. दोन्ही बाजूच्या मोजक्या जवळच्या नातेबाईकांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात पार पडले. ममताच घरी आगमन झाल्यावर रमेश मामा आईला घेऊन काही दिवसांसाठी गावाकडे गेला. दोघांचा राजाराणीचा संसार सुरू झाला. आनंदात दोन महिने कधी संपले कळलेच नाही.

रमेश मामा आईला घेऊन गावाकडुन परत आला. मोहन,ममता, आई व मामा आल्याने आनंदात होते. मामाने गावाकडच्या शेतातल्या दशहारी झाडाच्या पोतेभरून कैर्‍या आणल्या होत्या. आईने 25 कैर्‍या लोणच बनवायला काढून घेतल्या व बाकीच्या कैर्‍याचे आंबे बवण्यासाठी दोन गोणपाटात गवत टाकून माळावर ठेऊन दिले. मामा तिसरे दिवशीच गावाकडे जायला निघाला कारण शेतीचे कामे खोळंबली होती. मोहनचा रोजचा चार तासाचा लोकलचा प्रवास, आठ तास ऑफिसचे काम म्हणजे दिवसाचे 12 तास व्यस्त असे. तास दोन तास आई व ममताशी बोलणे होई तेव्हडेच. जेवणकरून अंथरुणावर पाठ टेकवलीकी पाच मिनिटात घोरायला लागत असे. सकाळच्या पाचच्या गजराला नाईलाजने उठून रोजचे रुटीन सुरू होत असे. अपवाद फक्त महिन्याचा दूसरा शनिवार व चारी रविवार होते. सुटीच्या दिवशी मात्र मोहन पूर्ण आराम करून एंजॉय करीत असे. ममताची स्वतःची ईच्छा तर होतीच तरीपण मोहनला शब्द दिल्या प्रमाणे नोकरी शोधायला सुरवात केली होती.

ममता अर्थशात्र विषय घेऊन बी.ए. झाली होती. त्या बरोबर कॉमप्यूटरचा बेसिक कोर्स झाला होता. असे असून सुद्धा ममताला नोकरी मिळण्यात अपयश येत होते. ममता दर आठवड्याला एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर घेत होती. त्यातील यौग्य नोकरीच्या जाहिराती निवडून अर्ज करीत होती. घरकामात आईची मदत असल्याने ममताला नोकरी शोधायला वेळ मिळत होता. तसेच ऑनलाइन जॉब सर्च करायची शिवाय लोकल जॉब प्लेसमेंट एजन्सि मध्ये नाव नोंदवले होते.

लग्नात मोहनने हुंडा घ्यायला नकार दिला होता, कारण तसे करणे बेकायदेशीर तर होतेच पण मोहन पण याविरोधातच होता. ममताला आई नव्हती, एक छोटा भाऊ माधव होता जो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता व वडील नानासाहेब निवृत्त बँक मॅनेजर होते. लग्नाला होकार देण्याआधी त्यांनी मोहनची पूर्ण कौटुंबिक माहिती तपासली होती. मोहन, चांगला सुसंस्कारी,होतकरू , मेहनती मुलगा होता. चांगली नोकरी होती. ममताने पण नोकरी करून कुटुंबाला मदत केली तर त्यांचा संसार सुखाचा होईल अशी त्यांची खात्री होती. त्यांचे एक मित्र श्री विजय वामन हे एलआयसी डोंबिवली येथे ब्रांच मॅनेजर होते. कुठल्याही निर्णय घेण्या आधी दोघांनी सल्ला मसलत करण्याची प्रथा त्यांनी जोपासली होती. मोहन व ममताच्या लग्नाच्या आधी श्री वामन साहेबांनी नानासाहेबांना एलआयसी ऑफिसला बोलावले होते. मोहनने हुंडा किंवा त्या बदल्यात फ्लॅट,कार, सोनेंनाणे काहीही घेण्यास नकार दिला होता. पण नानासाहेबांना आपल्या लाडक्या ममताला कुठल्या तरी स्वरुपात तिला , संसारला भविष्यात उपयोगी पडेल असे किंवा अत्यंत संकटकाळी उपयोगी पडेल असे काहीतरी द्यायची जबरदस्त ईछा होती. साखरपुडा झाल्यानंतर नानासाहेब विजय साहेबांना भेटायला डोंबिवलीच्या एलआयसी ब्रांच मध्ये आले. विजय साहेबांनी नानासाहेबांना मोहनची 01 कोटीची एलआयसी ची टर्म पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला. नानासाहेबांना निवृत्तीचे प्रोव्हीडंड फंडाचे पैसे नुकतेच मिळाले होते. त्यामुळे नानासाहेब तयार होतेच. विजय साहेबांनी सर्व योग्य कागदपत्रची पूर्तता करून घेतली. नानासाहेबांनी वार्षिक प्रीमियम निवडले व पुढच्या पाच वर्षाचे प्रीमियम चा चेक विजय साहेबांच्या हवाली केला. मोहन, ममतासाठी ही पॉलिसी त्यांच्याकडून लग्नाची भेट होती. पाच वर्षांनंरचे विम्याचे हफ्ते मात्र त्यांनीच भरावयाचे होते. फर्स्ट प्रीमियम रिसिट व आरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट विजय साहेब एक महिन्या नंतर नानासाहेबांच्या घरी आणून देणार होते. काहीदिवस तरी ही गोष्ट ममता व मोहनला कळू न देण्याचे नानासाहेबांनी ठरवले. एखादा चांगला मुहूर्त किंवा नातवंडाच्या बारशाला टर्म विमा पॉलिसीचे डॉक्युमेंट सर्प्राइज भेट म्हणून ममताला द्यायचे त्यांनी ठरवले.

एका प्राथमिक शाळेत ममताला टीचर ची टेंपररी नोकरी मिळाली. अगोदरच्या टीचरने तीन महिन्यासाठी बाळंतपणाची रजा काढली होती ती जागा ममताला मिळाली. पगार कमी होता पण ममता त्यामुळे व्यस्त राहील, तीचे मानसिक समाधान होणे जरूरी होते त्यासाठी आई व मोहनने तीला ही नोकरी करायला हो सांगून तीला प्रोत्त्साहन दिले. बोलता बोलता तीन महीने पूर्ण झाले. या तीन महिन्यात ममता खूप आनंदात होती. सकाळी पाचच्या गजराला उठून आंघोळ, पुजा व गरम गरम नास्टा व दोघांसाठी टिफिन बनवत असे. घरची कामे आटपून ती सकाळी सात वाजता शाळेत पोहचत असे. दुपारी 4 वाजता घरी आल्यावर आईनसाठी चहा करणे, रात्रीसाठी व सकाळसाठी भाजी निवडून चिरून ठेवणे ईत्यादी कामे करत असे.

बोलता बोलता लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले होते. एकंदरीत दोघेही संसारात सुखी होते. आईला आजकाल आजी होण्याची घाई झाली होती. रोजची धावपळ वाचवण्यासाठी मोहनने सेल्स टॅक्सच्या चर्चगेट ब्रांच मधून कल्याण ब्रांच मधे बदलीसाठी हेड ऑफिसला विनंती अर्ज सहा महिन्या पूर्वीच केला होता. आज सोमवारचा दिवस होता सकाळी 10.30 वाजता मोहन चर्चगेटच्या ऑफिस मधे पोहचला. मस्टर वर सही करून जाणार्‍या येणार्‍या सहकार्‍यांना गुड मॉर्निंग म्हणत त्याच्या टेबलाकडे वळणार तोच समोरून ऑफिसचा शिपाई घाईघाईने त्याच्याकडेच येत असलेला त्याला दिसला. साहेब, साहेब एक मिनिट थांबा. साहेबांनी तुम्हाला त्यांच्या केबिन मधे लगोलग बोलावलं आहे. काहीतर अर्जंट काम असणार, मी घाईत आहे, साहेबांसाठी कॉफीची ऑर्डर द्यायची आहे सांगून तो निघून गेला. मोहनने टिफीन व पाण्याच्या बाटलीची बॅग टेबलावर ठेवली व तातडीने साहेबांच्या केबिनकडे निघाला. गुड मॉर्निंग सर, मे आय कमइन ? म्हणत केबिनमध्ये प्रवेश केला. कुलकर्णी साहेब त्यांच्या रिवोळ्वींग चेयर मधे रीलॅक्स बसले होते. अभिनंदन मिस्टर मोहन. आताच हेड ऑफिस मधून ईमेल आला आहे. तुमची कल्याण ब्रांचला बदलीची विनंती मान्य झाल्याची ऑर्डर आली आहे. तुमच्या कडून आता पार्टी मिळायला पाहिजे. असो. तुम्हाला पाहिजे तेव्हा रेलीविंग ऑर्डर द्यायला मी तयार आहे. आधी ही गोड बातमी तुमच्या पत्नीला मोबाईलवरून लगेच कळवून टाका. यस सर म्हणत मोहनने साहेबांचे मनापासून आभार मानले.

त्या दिवशी मोहन रात्री नऊ वाजता घरी मिठाई बॉक्स घेऊनच आला. कल्याण ब्रांचला झालेली बदलीची न्यूज आई व ममताला आधीच कळली होती. आईने लगेच देवापुढे साखर ठेवली होती. ममताने मोहनाची आवडती भरल्या वांग्याची भाजी केली होती. सगळेच आनंदात होते. रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरूच होत्या. आई मात्र नेहमीप्रमाणे दमून झोपी गेल्या होत्या. ममताने एका वाटीत साखर घेऊन आली व मोहनच्या लाजत लाजत मोहनच्या हातावर साखर ठेवत म्हणाली हा घ्या अजून एक आनंदाच्या बातमीचा डबल धमाका. ओळखा बर काय गोड बातमी असेल? तुला चांगल्या पगारची नोकरी मिळाली असेल ? नाही. आमच्या सासरेबुवांनी काहीतरी खाऊ पाठवला असेल? नाही. चला हरलो बुवा आता तूच सांगून टाक, खूप उत्सुकता ताणून ठेऊ नकोस. अहो देवाने आईचे गार्‍हाणे ऐकले व त्या आता लौकरच आजी होणार आहेत. तरी मोहनच्या लक्षात काही आले नाही. अहो बुदधू आता तुम्ही लौकरच बाबा होणार आहात. आहे की नाही गोड बातमी? अभिनंदन. पुढे मोहनला काही बोलूदेण्या अगोदरच ममता किचन मधे पळून गेली. आनंदाला आता पारावार राहिला नव्हता. पहाटे 4.30 वाजेपर्यंत तीन कप कॉफी व सोबत भविष्यातील स्वप्नाच्या गप्पा चालूच होत्या.

दोन दिवसांनी चर्चगेट ब्रांच मधून रेलीव्ह व्हायचे ठरले. कारण त्या नंतर शनिवार, रविवार चा घरी आराम करून सोमवारी कल्याण ब्रांचला जॉइन करण्याचा विचार पक्का झाला. चर्चगेट ब्रांच मधील सर्वांनी आज मोहन साठी निरोप समारंभाची जोरदार तयारी केली होती. चार वाजता वाजता कार्यक्र्म सुरू होणार होता. हॉल मधे स्टाफ साठी खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती. डायसवर चार खुर्चा ठेवल्या होत्या. टेबलावर सुंदर टेबलक्लॉथ त्यावर तीन ताज्या फुलांनी सजलेले फ्लॉवरपॉट ठेवले होते. उजव्या बाजूला कॉर्नरला एल आकारात दोन टेबल ठेऊन त्यावर सुंदर बुके, हार शिवाय भेटवस्तूचे भरपूर पॅकेट ठेवण्यात आले होते. ही सर्व तयारी बघून मोहनच्या ऑफिस मधील स्टेटस व लोकप्रियतेचा अंदाज लागत होता. मोहनला 5.40 ची कल्याण फास्ट लोकलने जायचे असल्याने निरोप समारंभाचा कार्यक्रम लौकर आटोपण्यात आला. मोहनचा ऑफिस मधील त्याचा जवळचा मित्र म्हणजे बंडू जोशी नव्यानेच इंस्पेक्टर म्हणून जॉइन झाला होता व कल्याणला मोहन राहतो त्याच्या जवळच्याच बिल्डिंग मधे तिसर्‍या मजल्यावर फ्लॅट मधे राहत होता. मोहन व बंडू व्हीटी ( आताचे CST ) स्टेशन कडे चर्चगेटच्या ऑफिस मधून टॅक्सीने निघाले. बंडूने मोहनला मिळालेले फुलांचे बुके हार ऑफिस शिपाई हरीला देऊन टाकले व मिळालेल्या गिफ्ट वस्तूंच्या दोन बॅग बरोबर घेतल्या.

धावत पळत दोघांनी कशीतरी प्लॅटफॉर्म 01 वरुन निघणारी कल्याण फास्ट लोकल मिळवली. बंडू लोकांना ढकलत थोडासा आत घुसण्यात यशस्वी झाला, पण मोहनला लोकल ट्रेन च्या दरवाज्याच्या मध्यभागी असलेल्या स्टील रॉड पक्के धरून कसेबसे उभा होता. मुंगी शिरायला जागा नव्हती असे म्हटले तरी ती अतिषोक्ती नव्हती. मोहनच्या उजव्या बाजूस एक वयस्कर व्यक्ति आडव्या स्टील रॉड ला पक्के धरून उभी होती. मोहनच्या डाव्या बाजूस एक तरुणी कड्यावर साधारण दोन वर्षाच्या मुलीला घेऊन दुसर्‍या हाताने वरचे हॅंडल पकडण्याचा अयसस्वी प्रयत्न करीत होती. लोकांची येवढी गर्दी होती की अनेकांच्या घामाच्या उग्र वासामुळे मळमळ होऊन उलटी होईल असे वाटत होते. कधी कधी आजूबाजूच्या लोकांच्या डोक्याचे केस नका तोंडात गेल्यामुळे अस्वस्थ होत होते. फास्ट लोकल ट्रेन असल्याने मध्ये लागत असलेल्या छोट्या स्टेशन वर थांबत नव्हती. मागे कुठले स्टेशन गेले व पुढे कुठले स्टेशन येणार याचा अंदाज येणे अवघड होते. अचानक लोकल ट्रेनचा स्पीड थोडा कमी झाल्यासारखे वाटले. कदाचित एखादे स्टेशन येत असावे किंवा औटर सिग्नल रेड असावा. कारण कळत नव्हते. क्षणात स्पीड वाढला पण काही सेकंदात लोकल परत स्लो झाली. सगळेच वैतागले होते. अचानक मोहनच्या पाठीमागून वेगाने मुसंडी मारून एक व्यक्ति वेगाने आली व मोहनच्या जवळ उभ्या असलेल्या जिच्या कडेवर दोन वर्षाची लहान मुलगी होती तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून लोकलच्या बाहेर उडी मारली. या प्र्सांगामुळे बरीच चेंगरचेगरी झाली. कोणीतरी प्रसंग ओळखून लोकल ट्रेनची साखळी ओढली. ट्रेन तत्काल थांबली. त्या कंपार्ट्मेंट मधे खूपच गर्दी असल्याने काही लोक बाहेर फेकले गेले होते. सगळीकडे ब्रीफकेस, लेडीज पर्स, पाण्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसत होता. बंडू जोशीच्या अंगावर तीन लोक आपटले होते त्यामुळे डोक्याला बाकाचा कोपरा लागल्याने शुद्ध हरपली होती.

ममताने आई ला आजी होण्याची बातमी दिल्या पासून त्या खूपच आनंदात होत्या. म्हणून त्यांनी फोन करून नानासाहेबांना बोलाऊन घेतले होते. मोहन आता सोमवार पासून कल्याण ऑफिसला जाणार होता. नानासाहेबांना आजोबा होणार असल्याची बातमी पण द्यायची होती. त्यासाठी त्यांनी आईस्क्रीम चे दोन फॅमिली पॅकची ऑर्डर दिली होती. सगळे उत्सुकतेने मोहन कधी एकदा घरी येतो याची वाट पहात होते. रात्रीचे आठ वाजून गेल्यावर शेजारचे जमलेले हळू हळू घरी निघून गेले. ममताने एकदा आई व नानासाहेबांना कॉफी करून आणली. टीव्ही वरील त्याच त्या बातम्या बघुन सर्वच कंटाळले होते. तेव्हड्यात ममताच्या मोबाईलची रिंग वाजली. ममताने बघितले नुसता येणारा मोबाईल नंबर डिसप्ले होत होता, नाव सेव्ह नव्हते म्हणजे अनोळखी व्यक्ति असणार. परत रिंग वाजली तर बघु असा ममताने विचार केला व कॉफी चे रिकामे मग ठेवायला किचन मधे गेली. परत मोबाईलची रिंग वाजु लागली, म्हणून नानासाहेबांनी मोबाईल उचलला, समोरून विचारले गेले मोहन साहेबांच घर का ? कोण बोलत आहे? मी त्यांचा सासरा बोलत आहे. मोहनसाहेब असून घरी आलेले नाहीत. आपल काही काम त्यांच्याकडे आहे का ? तेव्हा समोरच्या व्यक्तीने जे सांगितले ते ऐकून नानासाहेबांच्या डोळ्यापुढे अंधेरी आली, चेहरा घामाने डबडबला, ते धाडकन बाजूच्या सोफ्यावर कोसळले. मोबाईल बाजूला फेकला गेला. ममता व आई धावत आल्या व नानासाहेबांना सावरण्याचा प्रयत्न करू लागल्या. बाजूला पडलेला मोबाईल ममताने उचलला व बोलू लागली. समोरून परत सांगितले, “ नमस्कार, मी सखाराम पवार, हेड कॉंस्टेबल, भायखळा पोलिस स्टेशन वरून बोलत आहे. तुम्ही मोहन साहेबांच्या घरूनच बोलत आहात ना? कृपया घाबरू नका. मोहन साहेबांचा लोकल ट्रेन मधून येत असतांना भायखळा जवळ अपघात झाला आहे त्यांना केईएम हॉस्पिटल मधे अॅम्ब्युलेन्स मधून नेलेले आहे. तेव्हा तुम्ही त्वरित तुमच्या नातेबाईकांना घेऊन केईएम हॉस्पिटल मधे ताबडतोब या. मोबाईल बंद झाला. तेव्हड्यात डोरबेल सारखी वाजत होती म्हणून आईंनी धावत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर अनोळखी तरुण उभा होता. ईकडे मोबाईल वरचे बोलणे ऐकून ममता मोठ्याने रडत ओरडत होती. आलेल्या तरुणाने तिघांना शांत करून धीर देण्याचा प्रयत्न केला. हे बघा माझे नाव सुनील जोशी. माझे वडील बंडू जोशी, एक बिल्डिंग सोडून शेजारच्या बिल्डिंग मधे राहतो. माझे पप्पा मोहन काकांच्या ऑफिस मधेच काम करतात. आज माझे पप्पा व काका बरोबरच फास्ट लोकल ने कल्याणला येत होते. मला आता भायखळा पोलिस स्टेशन मधून फोन आला होता. माझ्या पप्पाना व मोहन काकांना केईएम मधे अॅम्ब्युलेन्स मधून नेले आहे. खरी परिस्थिति प्र्त्यक्ष गेल्यावरच कळेल. मी येतांना बरोबर टॅक्सी घेऊन आलो आहे. नानासाहेबांनी तोपर्यंत बरेसचे सामभाळले होते. ममताची आक्रोश करून करून शुद्ध हरपली होतो. डोळे उघडत नव्हती. सुनीलने नानासाहेबांना सर्व परिस्थिति समजाऊन सांगितली. आईंना घरी ठेऊन सुनील, ममता व नानासाहेब केईएम हॉस्पिटल कडे निघाले. सोबत सोसायटीचे चेअरमन श्री.रोहम पण निघाले.

केईएम हॉस्पिटलच्या आवारात बरीच गर्दी होती. डोक्टर, सिस्टर्स, वॉर्डबॉइज, पेशंट्स त्यांचे नातेबाईक यांची धावपळ दिसत होती . अॅम्ब्युलेन्स येत/जात होत्या. स्ट्रेचेर्स वरून पेशंटची ने/आण केली जात होती. चौकशी असा मोठा बोर्ड लावलेल्या काऊंटर वर नानासाहेब, सुनील, ममता व रोहम पोहचले. नुकताच भायखळा स्टेशन जवळ झालेल्या अपघातातील जखमी कुठे आहेत असे विचारल्यावर त्यांनी आयसीयू बोर्ड कडे बोट दाखवले काही बोलण्याचीही तसदी घेतली नाही व आपल्या कामात परत गर्क झाले. ममताच्या डोक्यात अनेक अशुभ विचार येत होते. तिथले वेदनेने तळमळत असलेले असंख्य जखमी बघून ममताला चक्कर येत होती. आयसीयू मधे कोणालाच तत्काळ प्रवेश मिळत नव्हता. सुनीलने पुढाकार घेऊन तिथल्या काऊंटर वर जाऊन त्याचे वडील बंडू जोशी व मोहन काकांची चौकशी तीथे उभ्या असलेल्या सिस्टर कडे केली. त्यांना दोन मिनिटे तिथल्या बाकावर बसायला सांगून काचेच्या दरवाजा लोटून आत गेल्या आत गेलेली सिस्टर बाहेर आली व सुनीलला आत बोलावले असल्याचे सांगितले . थोड्याच वेळात नानासाहेब, व रोहम पण आत गेले. ममता बाहेर एकटीच बाकावर बसली होती. जिवाची घालमेल होतहोती. काहीतरी अशुभ घडणार असल्याची पाल मनात चुकचुकत होती. तेव्हड्यात आतून सुनील व रोहम नानासाहेबांना दोन्ही बगलेत धरून उचलून आणत होते. एका वार्ड्बोयने त्यांना कमरेतून आधार दिला होता. काय झाले आहे म्हणत ममता आक्रोश करूलागली व नानासाहेबांना मिठी मारली. त्यांनी ममताला जवळ घेतले व रडत रडत पुटपुटले बेटा संपलं सगळ. आपला मोहन नाही राहिला जगात. तुझ कुंकू पुसल गेल बाळा. ते ऐकून ममता बेशुद्ध होऊन फरशीवर कोसळली. बाहेरच्या जनरल वॉर्ड मधे ममताला व नानासाहेबांना तातपूर्त दोन बेडवर झोपवले गेले. एक सिस्टर येऊन दोघांना इंजेक्शन व गोळ्या देऊन गेली.

सुनील रोहम यांना घेऊन परत आयसीयू मधे गेला. बेड क्रमांक 12 वर बंडू जोशी त्याचे वडील अॅडमिट होते. त्यांच्या जीवाला घोका नव्हता फक्त डोक्याला मार बसल्याने ते बेशुद्ध झाले होते. त्यांचा सीटी स्कॅन रीपोर्टची डॉक्टर वाट बघत होते. अॅडमिट केल्यापासून सलाईन चालू होते. सुनील आतापर्यंतची विशेषकरून बाबांची परिस्थिति पाहून हेलाउन गेला होता. रोहम यांच्या गळ्यात पडून तो धायमोकळून रडायला लागला. रोहम यांनी त्याला मिठीत घेऊन धीर दिला. आता रोहम यांनी सर्व परिस्थितिचे कंट्रोल आपल्या हातात घेतले. सुनीलला घेऊन ते ड्यूटि वरील आरएमओ डॉक्टर यांच्या केबिनमध्ये परवानगी घेऊन गेले. डॉक्टर श्रीनिवास यांनी त्यांना शांत केले. डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला आता रेल्वे पोलिसांनी व प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलेली अपघाताची माहिती सांगतो. ती कल्याण फास्ट लोकल होती. ते कंपार्ट्मेंट लेडीज स्पेशल कंपार्ट्मेंट च्या मागेच होते. त्यात लोकांची प्रचंड गर्दी होती. भाईखळा स्टेशन पासून औटर सिग्नल न मिळाल्याने लोकल थोडी स्लो झाली होती. पण काही क्षणा साठी फक्त कारण लगेच लोकल ने परत स्पीड पकडला होता. पण हाच तो दुर्दैवी क्षण होता. कारण लोकल स्लो होत असल्याचे पाहून त्या कंपार्ट्मेंट मधील एका चोरट्याने दरवाज्या जवळ अवघड परिस्थितीत एका लेकरला कड्यावर घेऊन उभ्या असलेल्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून लोकलच्या बाहेर उडी मारली. तेव्हड्यात लोकलने परत स्पीड पकडल्याने दरवाज्या जवळ उभे असलेल्या लोकांचे तोल गेले व लोकलच्या डब्यातून बाहेर फेकले गेले. त्यात जिचे मंगलसूत्र खेचलेगेले होते ती महिला, मोहन आणि एक वयस्कर गृहस्थ होते. सुदैवाने ती महिला गंभीर जखमी असली तरी वाचली आहे. तिच्या कडेवरील मुलीला मोहनने जोरात मागे डकलल्याने व लोकांनी लगेच पकडून ठेवल्याने ती पण वाचली आहे. दुर्दैवाने मोहन व त्याच्या जवळ उभे असलेले वयस्कर गृहस्थ यांचे डोके वेगाने जवळ येणार्‍या एका पोलवर आपटले व दोघेही जागीच गतप्राण झाले. ज्या चोराने हे कृत्य केले तो जीवंत आहे पण त्याचे दोन्ही पाय गुढग्यापासून कापावे लागले. असो. सुनील तुझे बाबा त्या लोकल डब्यात मधोमध उभे होते. झालेल्या घटनेत त्यांचे डोके जवळच्या बाकाच्या कोपर्‍याला जोरात आपटले. सध्या ते बेशुद्ध आहेत पण काळजी नसावी. लौकरच ते बरे होतील व त्यांना डिस्चार्ज दिला देऊ. डॉक्टर पुढे म्हणाले, मोहन ची बॉडी आता पोस्ट्मॉर्टेम म्हणजे मरणोत्तर तपासणी साठी पाठवली आहे. ती तुम्ही त्वरित ताब्यात घ्या. वेळ वाया घालउन चालणार नाही.

रोहम यांनी आधी सोसायटी मधील विलास गुजराथी डेप्युटी चेअरमन यांना फोन करून अपघाताची सविस्तर माहिती दिली. मोहनची डेड बॉडी पोस्ट्मॉर्टेम नंतर ताब्यात मिळायला वेळ लागू शकणार होता. ममता अजून शुद्धीत आली नव्हतो. हॉस्पिटलच्या डोक्टोरांनी सांगितले की मी एक अॅम्ब्युलेन्स, दोन सिस्टर्स व दोन वॉर्डबॉय देतो. नानासाहेबांना पण त्यांच्याबरोबर पुढे जाऊ द्या. सुनील व रोहम तुम्ही दोघे शववाहिकेबरोबर जा. रोहम यांनी लगेच विलास गुजराथी यांना ही माहिती दिली व लगेच पुढच्या तयारीला लागले. ठरल्याप्रमाणे अॅम्ब्युलेन्स मधून नानासाहेब, ममता दोन सिस्टर्स व दोन वॉर्डबॉय घरी पोहचले. सोसायटीच्या आवारात प्रचंड गर्दी जमली होती. त्यांच्या विभागाचे नगरसेवक दादा कुलकर्णी पण जातीने हजर होते. सोसायटीमधील लोकांनी रिंगण करून सर्व स्त्रियांना व मोहनच्या आईला बाजूला उभे केले होते. मोहनची आई या अपघातच्या बातमीने व मोहन मृत झाल्याचे कळल्यावर मोठयाने रडतील, आक्रोश करतील असे सगळ्यांना वाटले होते पण तसे न होता त्या अचानक अबोल झाल्या होत्या. समवयस्क बायकांनी त्यांनी मोकळ रडाव यासाठी बरेच प्रयत्न करीत होत्या. जाणकार लोकांनी सर्व तिरडीचे सामान तत्काल आणले होते. तीन विटांवर पाणी गरम करायला ठेवले होते. एका मडक्यात भात शिजायला ठेवला होता.

तेव्हड्यात ममता शुद्धीत आली होती. आपण घरी आहोत, बाजूला दोन सिस्टर्स, दोन वॉर्डबॉय पाहून ती घाबरून परत रडायला लागली. ममताला घेऊन कसेबसे सर्व सोसायटीच्या आवारात आले. आईना बघून ममता त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. पण आई निर्विकार होत्या. त्यांना मानसिक धक्का बसला होता. जमलेल्या सोसायटी मधील महिलांनी ममताला व आईला सावरण्याचा प्र्यत्न करीत होत्या. सोसायटी मधील सर्व कुटुंब मोहनच्या अपघाती निधनाने प्रचंड दू:खात होते. तेव्हड्यात मोठयाने सायरन वाजवत शववाहिका सोसायटी कंपाऊंड मधे आली. पुढील सर्व घटना वेगाने घडत गेल्या. तिरडी बांधून तयार होती. रोहम, नानासाहेब, दादा कुलकर्णी पुढे आले. स्ट्रेचरवरुन मोहनची डेड बॉडी काढून तिरडीवर बांधण्याचे काम सुरू झाले. बॉडी पुर्णपणे पांढर्‍या प्लॅस्टिक कव्हर मधे लपेटलेली होती. मोहनचे डोके जोरात पोलवर आपटल्यामुळे जागीच त्याचा मृत्यू झाला होता. पांढर्‍या प्लॅस्टिक कव्हर मधील बॉडी मधे बघण्यासारखे काहीच नव्हते, कारण बॉडीला चेहरा नव्हता. मृत शरीराला आंघोळ घालण्याची प्रथा पण पूर्ण करता आली नाही. ममता ओक्स्साबोक्सी रडत होतीच पण आता आई पण मानसिक धक्क्यातून सावरून केविलवाणे रडत होत्या. दोघींनी मोहनचा कमीतकमी चेहरा दाखवावा म्हणून खूप दंगा केला. पण रोहम यांनी सर्वांना आधीच कल्पना दिली असल्याने महिलांनी त्या दोघींना बॉडी जवळ येऊ दिले नाही. सगळ्यांचा बॉडीला नमस्कार झाल्यावर लगेच त्याच शववाहिके मधून बॉडी अंतिम संस्कारासाठी स्मशानाकडे नेण्यात आली. सुनील त्याच्या आईला बरोबर घेऊन परत केईएम हॉस्पिटल कडे त्याच्या बाबांना भेटायला निघाला.

मोहनच्या चर्चगेट तसेच कल्याण ब्रांच मधील अनेक अधिकारी दारावर येऊन गेले. नानासाहेब अजून ममताच्या घरीच रहात होते ममताच्या लहान भाऊ माधव पण तिथेच होता. त्यांची मानसिक स्थिति अजून अस्थिर होती. जावयाचा अचानक अपघाती झालेला मृत्यूमुळे ते हादरले होते. त्यांचे मित्र विजय वामन पण भेटायला येऊन गेले. गंधमुक्तिचा विधी झाल्यावर मात्र नानासाहेब व त्यांचा मुलगा माधव घरी जायला निघाले. आम्ही दोघे अधून मधून येत राहू. काही मदत लागल्यास लगेच कळवावे. मला वाटते तुम्ही दोघांनी आमच्या घरीच राहावयास यावे. यावर मोहनच्या आईने स्पष्ट नकार दिला व सांगितले की मी इगतपुरीच्या भावाकडे जाणार आहे. तुम्हाला विनंती आहे की कृपया आपण ममताला तुमच्या घरी घेऊन जावे. ती आता अवघड परिस्थित आहे. माझा मोहन त्याची आठवण ठेऊन गेला आहे. ती तुमच्या घरी असली तर मला काळजी वाटणार नाही. पण ममताने आईचे बोलणे ऐकले नाही. तिने बाबांना सांगितले की मी आईनं बरोबर इगतपुरीला जाणार आहे. तुमच्याबरोबर आपल्या घरी येणार नाही. मोहनच आईनवर खूप प्रेम होत. त्यांची सेवा करण्याबद्दल तो नेहमी बोलत असायचा. त्याच्या नंतर त्याची ईच्छा मी पुरी करणार आहे. नानासाहेबांचा नाईलाज झाला. माधवला घेऊन ते घरी निघून गेले.

मोहनला जाऊन आता 15 दिवस झाले होते. एक दिवस अचानक मोहनचा रमेश मामा आला. तो स्वतः दवाखान्यांत अॅडमिट असल्याने मोहनची अपघाताने निधन झाल्याची बातमी कळून सुद्धा येऊ शकला नव्हता. ताईची अवस्था व ममताचे पांढरे कपाळ पाहून ओक्साबोक्सी रडू लागला. दोन दिवस तो ताईच्या घरी रहात होता. तिसर्‍या दिवशी त्याने विषय काठला, ताई तुम्ही दोघी आता माझ्या बरोबर इये इगतपुरीला कायमच चला. ही जागा सोडून देऊ. इथले घरभाडे पण वाचेल. इथली आवरासावर करून ठेवा मी या महिना अखेरीस तुम्हाला घ्यावयास परत येतो. आम्ही नक्कीच आपल्या घरी इगतपुरीला येणार पण तू आता परत येऊ नकोस. मोहनच्या साहेबांनी काहीदिवस तरी मला विचारल्या शिवाय कुठे बाहेरगावी जाऊ नका असे सांगितले आहे. तेव्हा येण्याआधी आम्ही तुला फोन करून येऊ. शिवाय तुझ्या बायकोला आम्ही कायमचे येणार असल्याचे सांगून ठेव नाहीतर तिची नेहमीसारखी नाराजी असायची. असो.

रमेशमामा इगतपुरीला निघून जायला आठच दिवस झाले होते तोच नानासाहेबांना अर्धांगवायुचा अटॅक आल्याचा निरोप आला. आईंनी तिला धीर दिला व अश्या अडचणीच्या वेळेस नानासाहेबांच्या सेवा करण्यासाठी घरी जाण्यास सांगितले. नानासाहेब सद्गुरू हॉस्पिटल मधे अॅडमिट होते. छोटा भाऊ माधव घाबरून गेला होता. ममताताई आल्यावर त्याला खूप आधार वाटला. सोळा दिवसांनातर नानासाहेबांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. त्यांना इतर औषध डॉक्टरांनी लिहून दिली होतीच पण महत्वाची दिवसातून एकदा सर्व शरीराला मालीश व व्यायाम करणे साठी संबंधित डॉक्टरला घरी जाऊन नानासाहेबांची ट्रीटमेंट करावयास सांगितले. रोज घरी येण्याची त्यांची 500/- रुपये रोज होती. सद्गुरू हॉस्पिटलचे सोळा दिवसांचे बिल रुपये 1,50,000/- आले होते. पण नानासाहेबांची मेडिक्लेम पॉलिसी पाच लाखाची होती त्यामुळे काही अडचण आले नाही. रेग्युलर मालीश व व्यायामामुळे आठ दिवसात नानासाहेब घरातल्या घरात काठी घेऊन फिरू लागले, स्वतःची वैयक्तिक कामे स्वतः करीत होते. त्यांची सुधारात असलेली प्र्कृती पाहून ममताचा जीव भांड्यात पडला होता. माधवचे एका आयटी कंपनीत सिलेक्शन झाले होते, येणार्‍या एक तारखे पासून ड्यूटि जॉइन करायची होती. ही पण ममतासाठी आनंदाची बातमी होती. एक महिना ममता बाबांच्या घरी राहिली. आता तिने कल्याणला आईकडे जाण्याचे ठरवले. त्यांची काळजी घेणे पण जरूरी होते. त्यांचा तर एकुलता एक मुलगा गेला होता. बाबा व माधव यांच्या साठी दोन्ही वेळेचे जेवणाची डब्याची सोय ममताने करून दिली. योग्य मुलगी पाहून माधवचे लग्न लौकरात लौकर करून देण्याची तिने मनोमन ठरवले. माधव कल्याण पर्यन्त तिला पोहचवायला आला.

आई ममताची वाटच पहात होत्या. ममताच्या नावाचे एक स्पीड पोस्ट, मोहनच्या ऑफिस कडून आलेले होते. ते आईने तिला दिले. तिला मोहनने वारस केल्यामुळे ऑफिस कडून फायनल सेटलमेंटचा पाच लाखाचा चेक आला होता. दोघींना त्या चेकचा मोठा आधार मिळाला. फ्लॅटचा मालक दोनदा येऊन गेला होता. त्याने सांगितले मोहन अपघातांत गेला हे फार वाईट झाले. असे दू:ख देवाने कोणालाच देऊ नये. तुम्ही इगतपुरीला भावाकडे जाण्याचे विचार करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. चार महिन्याचे फ्लॅटचे भाडे थकले आहे. ममताला कधी नोकरी लागेल, किती पगार मिळेल याचा काही अंदाज नाही. तेव्हा तुम्ही आता लौकरात लौकर हा फ्लॅट सोडवा ही विनंती. ममताला हे सर्व कळल्यावर खूप वाईट वाटले. त्यांनी फ्लॅट सोडायचे ठरवले, सामानाची आवरासावर सुरुकेली. फ्लॅटचे थकीत भाडे दिले व फ्लॅट सोडणार असल्याचे मालकाला सांगितले.

रमेशमामाला इगतपुरीला फोन करून कधी येणार ते सांगितले. ट्रक मधे घरसामान भरले, इगतपुरीचा पत्ता दिला व ममता व आई टॅक्सीने निघाल्या. निघतांना सोसायटी मधील सर्व महिलामंडळ त्या दोघींना भेटायला निरोप द्यायला आले होते. साधारण तीन तासात टॅक्सी इगतपुरीला पोहचली. मामाच्या घरी पोहचले. घरसामानाचा ट्रक पण लगेच पोहचला होता. मामा, मामी त्यांचा मुलगा सुभाष व मुलगी सुनीता या घरात रहात होते. हे घर म्हणजे शेतात विटां व चुन्याचे चार खोल्या मधे 15 फूट रिकामी जागा व समोर परत चार खोल्या होत्या. बाजूला गोठा होता व त्यात एक गाय बांधलेली होती. मामाने ट्रक ड्रायव्हरला एका रिकाम्या खोलीत घरसामान खाली करण्यास सांगितले. आई व ममताला वाटले होते मामाच्या कुटुंबाकडून दोघींचे खूप आनंदाने स्वागत होईल. पण तसे काहीच झाले नाही. सुभाष व सुनीता समोर आलेच नाही. मामा, मामी एका खाटेवर बसले होते. त्यांनी आई व ममताला जवळच्या दुसर्‍या खाटेवर बसायला सांगितले. रात्री जेवायला मामीने उसळ भात केला होता. जेवायला सुभाष व सुनीता सहित सर्वच होते.

दोघींना इगतपुरीला येऊन आठ दिवस झाले होते. एका सकाळी मामा व मामी मधे जोरदार भांडण झाले. मामीच म्हणण होत तुमची बहीण व तिची विधवा सून आल्याने घरखर्च वाढला आहे. त्यातून ती विधवा सून गरोदर पण आहे. बँकेतून घेतलेल्या कर्जाचा हप्ता पण खूप थकला आहे, त्यामुळे बँकेचा ससेमिरा चालूच आहे. घरच झाला थोड अन व्याहयाने धाडल घोडं अशी आपली स्थिति झाली आहे. ममता व आई हे सर्व बोलणे ऐकत होत्या. तुम्ही अस करा तुमच्या बहीणीकडून पन्नासहजार रुपये घेऊन बँकेत भरून टाका व दर महिन्याला कमीतकमी दोन हजार रुपये तरी घर खर्चाला घेत जा. सुभाष शिकला नाही, शेतीवरच अवलंबून आहे, त्यात सुनीतच्या लग्नाचे पण आता बघायला लागले पाहिजे. मामाचा बोलायचा काहीच आवाज येत नव्हता. पहाटे ममताला कधीतरी झोप लागली. रात्री आईना झोप लागली होती त्यामुळे मामा व मामीचे भांडण फक्त ममताने ऐकले होते. आईला काहीच माहीत नव्हते.

दुसर्‍या दिवशी ममताने आईंना रात्री ऐकू आलेले सर्व बोलणे सांगितले. दुपारी चार वाजता ममताने मामा व मामींना बोलाऊन घेतले. चहा बनवला. चहा पितापिता आईंनी मामाच्या हातात पन्नास हजाराचा चेक ठेवला. मामाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला अग हे एवढे पैसे कशासाठी. अरे राहुदे रेमेश. आम्ही अचानक राहायला आलो. आमच्या दोघींमुळे घरखर्च वाढला असेल. शिवाय ममता पोटूशी आहे. मोहनची आठवण आहे. तिच्या बाळंतपणाचा पण खर्च आहेच की. नको नको करीत मामाने चेक खिच्यात ठेऊन घेतला. मामी बोलली अहो ताई हे मात्र बरे केले हो. पण तुम्ही जाणतात आता महागाई किती वाढली आहे. दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपये मिळाले असते तर बरे झाले असते. ममताने त्यांची ही मागणी पण मान्य केली व महिन्याला दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले. सगळे मनासारखे झाल्यावर मामा मामी निघून गेल्या. आई व ममताला खात्री वाटू लागली की आता सर्वकाही ठीक होईल. पण नशिबात पुढे काय लिहून ठेवले आहे हे कोणालाच माहीत नसते.

मामाकडे राहायला येऊन आता तीन महीने झाले होते. नियमितपणे रोज ममता व आई घरातील सर्व लोकांचे धुणे, भांडे, झाडलोट, नंतर शेतात कामाला जायच्या. ममता गरोदर असल्याने इतके काम रोज करायला तिला आता अवघड होत होते. आज सकाळी आई घरात पाणी भरत होत्या. पाण्याने भरलेली एक कळशी डोक्यावर दुसरी कमरेवर घेऊन घरातील रांजणामधे ओतायचे होते, पण अचानक आईंचा पाय सटकला व दोन्ही कळश्या रांजणावर आपटल्या, रांजण फुटला व घरात पाणीच पाणी झाले. हे निमित्त मिळताच मामीने घर डोक्यावर घेतले. नको नको तसे बोलून आईला व ममताला आमच्या घरातून निघूनजा असे सांगितले. त्याच वेळी अचानक मामाच्या शेतीत काम करणारा शंकर नावाचा गडी मदतीला आला. त्याने आई व ममताला जरूरीपुरते सामान घेण्यास सांगितले व बैलगाडीत बसऊन जवळच असलेल्या घोटी या गावात घेऊन आला. घोटी गावात भगत नावाचे मारवाडी सेठ होते. त्यांचे एक किराणा मालाचे दुकान, एक कपड्याचे दुकान व शेती होती. ममताला व आईला शंकर भगत शेठ कडे घेऊन आला. शंकरने सर्व परिस्थिति शेठला समजाऊन सांगितली व दोघींना मदत करण्याची विनंती केली. शेठला गरोदर मामता व आईंकडे पाहून कीव आली. त्यांनी तातपूर्ती घोटी गावातील त्यांच्या मालकीच्या वाड्यातील एक खोली त्यांना राहण्यासाठी दिली. शंकरला पण सांगितले तू इगतपुरीची नोकरी सोडून इथेच काम कर, तुला चांगला पगार देईन. दुकानातून थोडे किराणा सामान घेऊन ये. उद्यापासून तुम्हाला सगळ्यांना काय काम करायचे ते सांगीन.

दुसर्‍या दिवसापासून त्यांचे रोजचे काम सुरू होणार होते. त्या आधी ममता आईंना विचारून शेठला भेटायला गेली व बरोबर चेकबूक घेऊन गेली. शेठला विनंती केली की हे माझे बँकेचे चेकबूक आहे. त्यातून आम्हाला दहाहजार रुपये कॅश काढायचे आहेत. इथे आमची कोणाची ओळख नाही म्हणून तुम्हाला विनंती करीत आहे. शेठने ममताला बसायला सांगितले व बँक मॅनेजरला फोन केला. बँकने नाव व अकाऊंट नंबर विचारला. एक तासाने शेठला बँक मॅनेजरचा फोन आला व त्यांचे बोलणे झाल्यावर शेठने फोन ठेऊन दिला. चेहर्‍यावर आश्चर्य, राग, व संशयाचे भाव दिसत होते. त्यांनी ममताला विचारले तुमच्या अकाऊंट मधे किती पैसे आहेत? त्यावर विचारकरून ममताने सांगितले की अंदाजे चाळीसहजार रुपये असतील. बँकेच्या पासबूक मधे नियमित एन्ट्री करू शकले नाही. शेठने जे सांगितले ते ऐकून ममताला चक्करच आली. बँक अकाऊंट मधे काहीच रक्कम बॅलेन्स नव्हती. चेकबूक नीट बघितल्यावर लक्षात आले की त्यात एक चेक गायब आहे. मामाच्या घरी चेकबूक एका सुटकेस मधे ठेवले होते. कोणीतरी त्यातील एक कोरा चेक काढला, बँकेत त्या अकाऊंट मधे किती रक्कम बाकी आहे ही माहिती काढली व ममताची खोटी सही करून बाकी सर्व रक्कम काढून घेतली. सत्य समजल्यावर सेठला खूप वाईट वाटले. ममताला त्यांनी धीर दिला व आपल्या कारमधे बसऊन पोलिस स्टेशनला जाऊन चेक चोरीची व पैशाची अफरातफर केल्याची तक्रार नोंदवली.

मुंबईला नानासाहेबांनी मुलगा माधव याला एलआयसी चे त्यांचे मित्र विजय वामन साहेबांना फोन करून बोलाऊन घेतले. माधवची नोकरी व्यवस्थित चालू होती. त्याच्यासाठी मुलगी बघण्याचे काम चालू होते. नानासाहेब आता थकलेले दिसत होते. माधवने चहा बनवला. चहा पितापिता नानासाहेबांनी बोलण्यास सुरवात केली. विजय तुला आठवत असेल मोहन व ममताच्या लग्नाची भेट म्हणून आपण मोहनच्या नावाची एक कोटीची टर्म पॉलिसी काढली होती. हे सर्प्राइज द्यायचे म्हणून कोणालाच सांगितले नव्हते. नंतर दुर्दैवाने मोहनचा अपघातात मृत्यू झाला, कालांतराने मला लकवा झाला व मीच कपाटात सुरक्षित ठेवलेले टर्म पॉलिसीचे आरिजिनल डॉक्युमेंट व आरिजिनल फर्स्ट प्रीमियम रीसीप्ट परवा कपाट साफ करतांना माधवला सापडले ते मी तुला देत आहे. या पॉलिसीचे आपण पाच वर्षाचे वार्षिक हफ्ते एकरकमी भरले आहेत. त्या घटनेला आता सहा वर्ष उलटून गेले असले तरी मोहनचा अपघातात मृत्यू टर्म पॉलिसी काढल्या पासून दोन वर्षात झालेला आहे. तेव्हा कृपया त्याचा क्लेम करून पैसे ममताला मिळतील यासाठी मदत करावी ही विनंती.

वामन साहेबांनी नानासाहेबांना खात्री दिली की तुम्ही काळजी करू नका. लगेच त्यांनी एलआयसी ऑफिस च्या अक्कौंट्स सेक्शन मधील क्लेम सेक्शनला फोनेवरूनच सगळी माहिती विचारली व लगेच पॉलिसीचे प्रेझेंट स्टेटस कळवायला सांगितले. नानासाहेब व वामन साहेबांच्या जुन्या आठवणींवर गप्पा चालू होत्या. साधारण आर्ध्या तासात एलआयसी ऑफिस मधून वामन साहेबांना फोन आला. ते 20मिनिट फोनवर बोलत होते. नंतर प्रसन्न चेहर्‍याने खुर्चीत येऊन बसत म्हणाले. नानासाहेब अभिनंदन. सहा महिन्यापूर्वी चौकशी अंती एलआयसी ऑफिसला मोहनच्या चर्चगेट ऑफिस कडून कळले होते की त्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा कल्याणचा पत्ता रेकॉर्ड वर होता. तेथे कोणीच रहात नसल्याचे कळले होते त्यामुळे तेथेच चौकशी थांबली होती. नोमिनी असल्याने डेथ क्लेम केल्यावर एक कोटी रुपये ममताच्या अकाऊंट मधे अॅड होतील.

वामन साहेबांनी परत ऑफिसला फोन करून सांगितले की आज मी ऑफिसला येत नाही. त्यांनी माधवला कार मधे बरोबर घेतले. कल्याणच्या मोहन रहात होता त्या सोसायटी मधे गेल्यावर त्यांना एव्हडेच कळले की मामता व आई इथला फ्लॅट खाली करून इगतपुरीच्या मामाकडे गेलया होत्या. पुढच्या काही तासात वामनसाहेब व माधव इगतपुरीला पोहचले. मामाच घर शोधायला वेळ लागला नाही. घरी मामी एकटीच होती. तिने सांगितले की त्या दोघी आता इथे रहात नाही. जवळच घोटी गाव आहे, तेथील कुठल्यातरी मारवाडी सेठकडे त्या काम करीत आहे. थोड्याच वेळात माधव व वामन साहेब घोटीला भगत शेठकडे पोहचले.

भगत शेठ वामन साहेबांना बरोबर घेऊन आई व ममता रहात होती त्या खोली पर्यन्त आले. माधवने दरवाजा वाजवला, आतून ममता आली व अचानक माधवला समोर पाहून तिला अत्यानंदाने रडू कोसळले. आई पण कोण आले बघायला बाहेर आल्या. बहीण भावाचे आनंदांचे रडणे पाहून त्यांचाही डोळ्यात पाणी आले. बाहेर असलेल्या खाटेवर सर्व बसले. ममता व आई खाली चटई वर बसल्या. वामन साहेबांनी सगळ्यांना नानासाहेबांच्या दूरदृष्टीची माहिती दिली. मोहनला लग्नात हुंडा, बंगला,गाडी ,सोन,नाणे काहीच नको होते. तो त्या विरोधातच होता. पण रिकाम्या हाताने कन्यादान कसे करणार? तसे पाहिले तर कायद्याने मुलगा व मुलगी यांचा समान अधिकार वडीलोपार्जित इस्टेटीवर असतो. तरीपण लग्नानंतर आपली मुलगी ममताला संसारात किंवा अडचणीच्या वेळी उपयोगात पडेल असे काहीतरी गिफ्ट म्हणून द्यायचे होते. म्हणून नानासाहेबांनी माझा सल्याप्रमाणे एक कोटी रुपयाची टर्म पॉलिसी मोहनच्या नावाची काढून ममताला नोमिनी ठेवले होते. मानवी जीवन हे नेहमीच अषास्वत, अनआकलनिय राहिले आहे. दुर्दैवाने जावई मोहन याचा अपघातात मृत्यू झाला. पुढे ममताला किती संकटांना तोंड द्यावे लागले हे सर्वांना माहीत आहे. पण आता काळजी नाही. लौकरच ममताच्या बँक अकाऊंट मधे एक कोटी रुपये आठ दिवसात जमा होतील.

नानासाहेबांनी माधवला सांगितले होते की मामता बरोबर मोहनच्या आईला पण आपल्या घरी घेऊन ये. त्या आपल्या घरीच राहतील कारण मोहन त्यांचा एकुलताएक मुलगा होता. आता त्यांना सांभाळणे हे ममताचे कर्तव्य आहे. आपल घर मोठ आहे. तुझ लग्न झालं तरी आपण एकत्र राहू शकतो. सगळेच आनंदात होते. ममता व आईकडे जास्त सामान नव्हतेच. निघतांना ममता भगत शेठच्या पाया पडली. त्यांनी अडचणीच्या वेळी आधार दिला होता. बाजूलाच शंकर उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्याने पण खूप मदत केली होती. ममताने माधवच्या कानात काहीतरी संगितले. तसे माधवने खिच्यातील पाकीट काडून दोन हजार रुपयाची नोट काढून शंकरच्या हातात दिली, माझ्या ताईची काळजी घेतल्या बद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मुलांच्या खाऊ साठी हे पैसे दिले आहेत. भगत शेठने दुकानावर फोन करून सर्वांसाठी कोल्डड्रिंक बोलावले सोबत दोन ड्रायफ्रूट मिठाईचे बॉक्स पण बोलावले.

भगत शेठ म्हणाले ममता व आईना बघून माझी खात्री झाली होती की या खूप चांगल्या घरातील स्त्रिया आहेत. स्वार्थी नातेबाईकांनी त्यांना फसवले होते. ममताच्या वडिलांनी आपल्या जावयाच्या नावाने एक कोटीची टर्म पॉलिसी काढली होती हे उदाहरण सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. सगळ्यांनी कोल्डड्रिंक घेतले. भगत शेठने एक ड्रायफ्रूट मिठाईचा बॉक्स आईंचा हातात दिला व नमस्कार केला. दूसरा ड्रायफ्रूट मिठाईचा बॉक्स वामन साहेबांना दिला व म्हणाले साहेब हा खाऊ घरातील लहान मुलांसाठी घोटीच्या समस्त गावकर्‍यांकडून. आपण जो अमूल्य सल्ला नानासाहेबांना दिला होता तो ज्यांच्या ज्यांच्या मुली लग्नाच्या आहेत त्यांच्या साठी खूप महत्वाचा व मार्गदर्शक आहे. मी आसपासच्या गावातील लोकांची मीटिंग बोलाऊन ममताच्या आऊष्यात घडलेली सत्य उदाहरण सांगून टर्म पॉलिसी काढण्याचे महत्व पटऊन देईन.

तोपर्यंत घोटी गावातील अनेक लोक जमले होते. वामन साहेबांच्या कारमधे मागे ममता व आई बसल्या व पुढे माधव बसला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. कार मुंबईच्या दिशेने वेगाने निघाली.

०००००००