संध्याकाळची वेळ होती माझं लक्ष सारखं घडयाळाकडे होतं. आज मी खुप खुश होते. मी आज सुहास ची आवडती साडी नेसली त्यावर मॅचिंग बांगड्या घातल्या .... त्याही हातभर आणि हलकासा मेकअप ... सुहास ला आवडतो अगदी तसाच. त्याला कारण ही तसंच होत. आज आमच्या लग्नाची पहिली एनिवर्सरी होती. पण तरी सकाळी सुहास ने मला एनिवर्सरी विष केलच नाही. आज तो लवकरच ऑफिसला निघून गेला. ...असो आता येतीलच राजे ७ वाजले आणि दरवाजावर बेल वाजली. मी पळतच जाऊन दार उघडले. सुहासच होता...मला वाटलं विश करून मिठी मारेल मला... पण चुटकी वाजवून त्याने मला स्वप्नातून जागे केले आणि फक्त एक स्माईल देऊन घरात निघून गेला मी मात्र काहीशी हताश होऊन त्याला पाणी आणायला किचनमध्ये गेली.
सुहास : "जरा चहा देतेस का ?... आज खुप थकलोय "
मी : (थोडी रागातच) हो! आणते...(मी पाय आपटतच निघून गेली)
मी : काय रे सुहास..!! तुला आपला लग्नाचा पहिला वाढदिवस लक्षात राहू नये...
असे कसे विसरू शकतोस तू... आपल्या आयुष्याचा एवढा महत्वाचा दिवस आणि तू...विसरलास. मी जरा रागातच चहा घेऊन गेली. त्याने चहा घेतला ...पण एक नजर वर करून माझ्याकडे पहिले सुद्धा नाही.
सुहास : मी बेडरूम मध्ये जाऊन आराम करतो ...खुप थकलोय आज (आणि चक्क निघून गेला )
मी : काय रे हे सुहास... आज आपल्या लग्नाची पहिली एनिवर्सरी म्हणून मी किती छान तयार झाले तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले आणि तू तर माझ्याकडे पहिले सुद्धा नाही. खरंच एवढं काम होत का आज ऑफिस मध्ये...?
मी जेवणाची तयारी करून त्याला बोलवायला जाणार तोच त्याचा आवाज माझ्या कानी पडला... तो जोर जोरात माझे नाव घेऊन ओरडत होता मी धावतच गेले. जाऊन बघते तर हा शांत उभा !! ... मला असे घाबरलेले बघून तो खूप हसायला लागला मला काही कळलेच नाही मी खूप रागावले आणि तिथून जायला लागली तेवढ्यात त्याने माझा हात धरला... आणि प्रेमाने माझ्याकडे बघत मला सॉरी म्हणाला ....
त्याने बॅगेतून काहीतरी वस्तू काढली आणि मला दिली. मी ते उघडून पहिले तर त्या कागदाच्या पुडीत मोगऱ्याचा गजरा होता... मला हसू आले आणि मी सुहास ला म्हणाले हे काय... लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कोणी गजरा देत का...!
सुहास : तू खरच वेडी आहेस...
मी : (जरा लटक्या रागात ) का ? मी काय केले ?
सुहास : अग हे बघ ह्या गजऱ्यात किती छोटया छोटया मोगऱ्याच्या कळ्या आहेत... आणि ह्या छोटया कळ्यांचा मिळून एक छान गजरा तयार झाला आहे... ह्याचा सुगंध किती मोहून टाकणारा आहे... ह्या गजऱ्या मधील फुले कोमेजली तरी ह्याचा सुगंध कधी कमी होत नाही तो कायम दरवळत असतो... तसेच तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण हा मला आनंदात आणि प्रेमात जगायचा आहे... आणि आपल्या प्रेमाचा सुगंध आयुष्यभर असाच दरवळत राहील... म्हणून हा गजरा खास माझ्या राणी सरकार साठी आणलाय...
मी : उफ्फ...! किती सुंदर आणि छान समजावून सांगितलं होत सुहासने... आज खरंच मला तो गजरा एखाद्या दागिन्यापेक्षा ही अनमोल वाटत होता...माझ्या डोळ्यात पाणी आले...
मी : सुहास थँक यू सो मच... आज मला एक अनमोल गिफ्ट दिल्याबद्दल
सुहास :(हसून) थँक्स टु यू ... माझ्या आयुष्यात येण्यासाठी...
त्याने तो गजरा माझ्या केसात माळला... मला आरश्यासमोर उभे केले.
सुहास : आता जरा नीट बघ स्वतःकडे ..... आता पूर्ण रेडी झालेली दिसतेयस तू...
ह्या गजऱ्यामुळे तुझे रूप सुद्धा मोहक झाले ...
... (मी लाजून माझा चेहरा हाताने झाकला)
मी : इश्य !! काहीही सुहास... (त्याने माझे दोन्ही हात चेहऱ्यावरून काढत म्हणाला)
सुहास : नुसतीच लाजणार आहेस कि जेवायला पण देणार ह्या गरिबाला...
मी : (हसून) हो! हो! आता वाढते जेवायला सगळं तुझ्या आवडीचे आहे.
आज आमच्या लग्नाला २५ वर्षे झालीत आजही सुहास कडून त्या अनमोल गिफ्ट म्हणजेच गजऱ्याची दरवर्षी प्रमाणे वाट बघते. आणि हो सुहास म्हणाला तसे दरवर्षी तो गजरा आमच्या आयुष्यात प्रेमाचा सुगंध घेऊन येतो आणि आमचं आयुष्य आनंदाने दरवळून टाकतो.
- कादंबरी