Touch of rain? - 10 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा ?️ - 10

The Author
Featured Books
Categories
Share

स्पर्श पावसाचा ?️ - 10

तेजी तर आत निघून गेली पण मी तसाच पाहत बाहेर उभा होतो. किती time झाला मला काय कळलेच नाही एक हात माजा खांद्यावर पडला मी एकदम दचकलो तो बंट्या होता " चहा थंड झाला आहे पी " असे बोलून तोही तिकडे निघून गेला मी विचारा मध्ये पडलो खरंच ते movie मध्ये दाखवतात तसे real life मध्ये पण होते का ? आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिले की time slow झाल्या सारखे होते.त्या व्यक्ती सोबत बोलणे ना का होईना पण ती समोर आहे याचाच खूप समाधान असते.
मस्त गाणे वगैरे लाऊन हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता आम्ही पण लवकर अवरून आलो होतो.तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता खूप सुंदर दिसत होती .काना मध्ये रिंग वाले कानातले माथ्यावर छोटीशी बिंदी आणि मोकळे सोडलेले केस बॉबकट असणारे केेस आता चांगलेच कमरेपर्यंत वाढवले होते.
मी थोडा लांब बसलो होतो.मन किती वेडे असते ना ? तिथे बसूनच जणू आमचीच हळद चालू आहे असे इमॅजिन करत माजा माजा दूनियात हरवलो होतो तेवढ्या मध्ये कोणी तरी हळदीचा हात माजा गालावर लावला मला वाटले तेजीच आहे काय की पण तो बंट्या होता कडू आमचा गॅंग मधल्या सर्वांना माहिती होता त्या मुळे माजी चांगलीच माजा घेत होते मला हळद लावल्या मुळे मी पण त्याच्या मागे पळालो त्याला हळद लावायला. तेजी अचानक समोर आली तिच्या हातामधे पण हळद होती मला वाटले की ती मला हळद लावेल आणि तिला वाटले की मी तिला हळद लावेल पण तिला क्रॉस करून मी पुढे निघून गेलो.
हळदीचा कार्यक्रम उरकला होता आमी सर्व जण जेवण करून मस्त गप्पा मारत बसण्याचा प्लॅन होता त्या मंडपा मध्येच मी तर विचार केला होता की या time ला तिला बोलून टाकायचे काय असेल ते पण बोलणार कसे खूप भीती वाटत होती मला तिला जर मी असे बोलो तर तिला काय वाटेल आणि मी बोलणार काय होतो हेच समजत न्हवते मला आणि कुठे कसे बोलू की नको हाच मोठा प्रश्न होता ?
खरं सांगायचं झालं तर या जागा मध्ये ना 70% लोकाचे प्रेम या साठीच अधुरे राहते की ते त्या व्यक्तीला सांगू शकत नाहीत या मुळे हीच ती भीती असते त्याच्या मना मधे आप हेच सारे प्रश्न असतात त्याच्या मना मध्ये पण ते योग्य आहे का आपण समोरचा व्यक्तीला आपले प्रेम त्याच्या बद्दल असणारे भावनाच आपण व्यक्त नाही केल्या तर त्याला कळणार कसे ? तो अंतर यामी तर नाही त्याला आपोआप कळायला मला तर वाटे की आपल्याला कोणी आवडत असेल तर लवकरात लवकर त्याला सांगावे
आमच्या गप्पा सुरू झाले होतो. कोण कोण काय काय करतो सांगू लागला. लहान पणीच्या आठवणी आमच्या गमतीजमती आम्ही एक मेकला सागायला सुरुवात केली.माजा दोक्या मध्ये एकच विचार चालला होता कसे बोलू आणि कुठे मी थोडा मला विचार करायला एकांत हवा मानून टेरेस वर निघून आलो आणि एका भिंतीवर आकाशात त्या अंधार मध्ये टीम टीम नाऱ्या ताऱ्यांकडे पाहत विचार करू लागलो त्या तऱ्याना बघून अजून एक लहान पणीची आठवण ताजी झाली उन्हाळ्या मध्ये आम्ही टेरेस वरच झोपायचो खूप भारी वाटायचे निरागस या ताऱ्याना बघत ते काय असेल? तिकी लांब असेल? किती जवळ असेल? याचा विचार करत झोपणे लहान असताना वाटायचे की आपण मोठे झालो की एस्ट्रोनॉट होऊन एकदा का होईना यांना भेट द्यावी ते येवढ्या का टीम टीम चमकतात याचा शोध घ्यावा पण आपण जसा विचार करतो तसे जीवन हे कधीच चालत नाही.जीवन हे जलेबी सारखा आहे गोड तर खूप आहे पण सरळ नाही
असाच विचार करत टेरेस वर तारे बघत होतो पाठीमागून कोणी तरी आवाज दिला मला "akya एकटा इथे काय करतोय ?" तेजी होती माजा जवळ येत येत तिने विचारले
"काय नाही असेच तऱ्याणा बघत होतो, किती काय सगुण जातात ना हे आपल्याला ?" मी बोलो
"काय सांगतात मला पण सांग ना "
"ते तारे एकमेका पासून किती लांब आहेत लाखो करोडो किलो मीटर तरी आपल्याला ते किती जवळ वाटत, माणसाचे पण तसेच आहे ना ते किती जरी लांब असले तरी मनाने खूप जवळ असतात"
"वा akya खूपच हुशार झाला आहे बे तू " असे बोलून माजा जवळ येऊन त्या काळया आकाशात ते टीम टीम करणाऱ्या ताऱ्यांना बघू लागली.
चंद्रा सारखा तिचा चेहरा त्या तार्‍या सारखे टीम टीम नारे तिचे डोळे तिला पाहून असे वाटत होते लहान असताना ऐकलेल्या कहाणी मधली एक परीच जणू आपल्या सोबत आहे.
लगेच माजा मना मध्ये विचार आला अताच बोलू का? हाच तर तो क्षण नाही ना ? बोलून टाकू का ? की हे तारे जसे एकमेका पासून लांब असून देखील कसे मनाने जवळ आहेत तसेच तू पण माजा मनाच्या खूप जवळ आहे.माजा मनाच्या जवळच नाही तर माझे मनच तू आहे.
माजा मनाच्या मातीवर पडणारा पहिल्या पावसाचा स्पर्श आहे तू


To be continued......😊