Hangover - 6 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | हँग ओव्हर - (भाग 6)

Featured Books
Categories
Share

हँग ओव्हर - (भाग 6)

मी ठीक आहे मला काही झालेले नाही. ओके तू नको मी लगेच येतो तुझ्या कड़े . हा म्हणत तिने फोन ठेवला. मोहित अजय सोबत जाऊन पोलिस चौकीत कंपलेंट देऊन आला. अजय म्हणाला मोहित आज तू थोडक्यात वाचला आहेस तुझ्या वर पण अटॅक होऊ शकतो मला वाटते तू तुझ्या सोबत बॉडीगार्ड कायम ठेव या निवडणुका होई पर्यंत. ओके अजय तू म्हणतो तसे आणि रिओल्वर पण आहे माज्या कडे विथ लायसन्स. हा ठीक आहे मग बट बी केयरफुल मोहित. हा अजय. मोहित तिथून लगेच मितु कडे आला. दारातच त्याला पाहून तिने मीठी मारली आणि रडू लागली. त्याने दरवाजा बंद केला . अरे जान मला काही ही झाले नाही रडू नको तू . मोहित पण विचार कर ना कार मध्ये तू असतास तर आय कान्ट इम्याजीन . मोहित ने तिचे डोळे पुसले म्हणाला,बस इथे तू हे बघ मला काही होत नाही मी इतका लेचापेचा नाही. हो माहीत आहे तू किती धाडसी आहेस ते पण मला भीती वाटते. अरे अजून भित्री भागू बाई तू पुण्याची आता हाफ कोल्हापूर ची झाली ना मग. मोहित मसकरी कशी काय सुचू शकते तुला ती रागात बोलली. अरे बर आय एम सॉरी जान म्हणत त्याने कान पकड़ले. हे बघ मीतु उदया पासून माझ्या सोबत एक बॉडीगार्ड असेल सो तू काही ही काळजी करू नकोस. खरच मोहित खर सांगतो न तू. हो ग राणी मी अजय ला भेटून च आलो आता. मोहित तू मला हवा आहेस मला खुप काळजी वाटतेय तुझी म्हणत मीतु ने पुन्हा त्याला घट्ट मीठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला म्हणाला, नको इतकी काळजी करू काही ही होणार नाही मला. अजय लवकरच त्या माणसाला शोधून काढेल मग सगळ ठीक होईल. तिचा चेहरा हातात धरून म्हणाला, तू अशी रडू लागलीस तर मग माझे काय होईल मी कसा स्ट्रॉन्ग राहणार मग सांग? यू आर माय जान मीतु . मोहित नाही रडनार मी आता . नक्की देन गिव्ह मि अ स्वीट स्माइल . मीतु हसत त्यांच्या कड़े पाहत होती. अजुन एक मीतु तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? असे का विचारतो तू मोहित मि कधी अविश्वास दाखवला आहे का तुज़या वर. तसे नाही जान कोणती परिस्थिति कशी असेल किवा येईल आपल्याला ते माहित नाही. आता या निवडणूका होई पर्यंत काय होईल काही माहित नाही . यात तुझा माझ्या वरचा विश्वास खुप महत्वाचा असणार आहे . मोहित आय ऑलवेजस् ट्रस्ट यू . आणि मि कायम तुझ्या सोबत असेंन . ओके आता रात्र खुप झाली तू झोप मी निघतो. पन मोहित तू जाणार कसा ? कार नाही तुझ्या कड़े. अजिंक्य ला बोलवतो का? मोहित विचार करू लागतो इतक्यात अजय चा कॉल येतो. हेलो मोहित कुठे आहेस तू. मोहित -- मि मैथिली च्या घरी आहे. काय झाले? अजय -- मोहित आता तसा पन लेट झाला आहे तू राहतो एक तर आउट साइड ला तुझ्या कड़े गाड़ी पन नाही मला वाटते आज ची रात्र तू मैथिली कडेच थाम्ब . तसे ही आता तू बाहेर पडून रिस्क घेणे ठीक नाही. जर ते लोक तुझ्या मागा वर असतील तर ? ओके अजय तू म्हणतो तसे करतो. तो फोन ठेवतो. काय झाल मोहित? मीतु आजची रात्र मला तुझ्या कड़े रहावे लागेल चालेल ना तुला? हे काय विचारने झाले आय एम सो मच हैप्पी मह्यु.. खूपच खुशीत मीतु असेल तेव्हा त्याला मह्यु म्हणत असे. मोहितने घरी आई ला कॉल करून सांगितले की तो अजय सोबत पार्टी ला गेला आहे आणि अजय कडेच थांबनार आहे . फक्त त्याच्या बाबा ना माहित होते की खरे कारण काय. आई ला आता काही नका सांगू असे मोहितने सांगितले होते. तो मितुला म्हणाला,तू बेडरूम मध्ये झोपी मि इथे हॉल मध्ये सोफ्या वर झोपेन. नाही काय तू इथे असताना मि एकटी आत नाही झोपनार. मि ही हॉल मध्ये आतली गादी घेवून झोपेन. मोहितने तिला आपल्या जवळ ओढले म्हणाला,काय पत्रकार मैडम काय विचार काय आहे डोक्यात तुमच्या. आय वान रेप यू हाहाहाःहाहा ,,मीतु म्हणाली. अच्छा उद्याच्या पेपर ला ही ठळक बातमी काय मग . हो ..म्हणत मीतु आत गेली. तिने ही आपला बिछाना टाकला. मोहित म्हणाला,बघ मीतु इथे झोपन्यात रिस्क आहे माझ्या जवळ . असु दे म्हणत मीतु त्याच्या मिठित शिरली. दोघे एकमेकांच्यां कुशीत झोपले. सकाळी मितुला न्यायला प्रेस ची कार येत असे. तेव्हा मितुला सोडून त्याच कार ने मोहित घरी आला. सकाळीच टी व्ही वर मोहित ची बातमी दाखवली तेव्हा आई ला समजले होते. मोहित घरी आला,मोहित तू ठीक आहेस ना,तुला काही झाले नाही ना आणि कोन होती ती लोक? आई मला काही ही झाले नाही फक्त कार चे नुकसान केले त्यांनी कोन लोक ते अजय शोधेल. तू काळजी करू नकोस. अरे पन आज गाड़ी फोड़ली उदया तुला काही केले तर आई ने आपली काळजी बोलून दाखवली. आई आज पासून एक बॉडी गार्ड कायम माझ्या सोबत असेल काळजी नको करू आणि तुला काय नवीन आहे का हे सगळ आई. पन तुझ्या बाबांच्या काळात इतके काळजी चे कारण नव्हते रे. हो आई आता लोकांना बघवत नाही त्यातल्या त्यात पुन्हा आमदारकी साठी देशमुख घरातला मानुस मग काय कुठेतरी खुन्नस काढायची. मि काळजी घेइन आई . बर आवरून ये तू नाष्टा करायला. अजय ने तपास जोरात सुरु केला होता . पन म्हणावे तसे यश त्याला येत नव्हते. फक्त कॉल कुठल्या भागातुन येतो हे समजत होते पन त्या मानसा पर्यंत पोहचता येत नव्हते. कार चा पंचनामा झाला त्यात काही हाती लागले नाही . पन जो कोणी होता तो मोहितचा कट्टर दुश्मन होता हे नक्की होत. मितुला ऑफिस मध्ये सगळे कालच्यां घटने बद्दल विचारत होती . सर्वाना त्यांची एंगेजमेंट झाली आहे हे माहित होत. पन राजकारण म्हंटले की या गोष्टी होणारच हे गृहीत धरून चालायचे . मीतु ने विक्रांत ला या बद्दल कळवले होते. तिला तो कायम धीर देत असे. विक्रांत म्हणाला,ज्या भागातुन मोहित ला कॉल येतो तो एस टी डी बूथ कोणाचा नेमका कोणत्या भागात आहे हे नम्बर डिटेलस वरुन समजते. सायबर क्राइम मध्ये या गोष्टि बघीतल्या जातात. वेळ आली तर मि नक्की मद्त करेन .मोहित त्याच्या कामात पूर्ण बिझी होता मितुशी फक्त फोन वर बोलने होत असे. निवडणुका आता महिन्या वर येऊन ठेपल्या होत्या. मोहित चे पारडे सगळ्या बाजूनी भारी होते. त्याचे काम,लोकांप्रति असणारी जबाबदारी ,त्याची धावपळ,मदत करण्याची वृति सगळ लोकांच्या नजरेत होत यात काही ही बनावटपना किवा खोटे पना नव्हता. अगदी प्रामाणिकपने मोहित काम करत होता त्यामुळे आता विजय त्याचा च हे नक्की होते. आज सर्व नेत्यांची आजी माजी आमदारांची ,पक्ष प्रमुखांची मीटिंग एका मोठ्या हॉटेल मध्ये होती. संध्याकाळी मीटिंग सुरु झाली. मीटिंग नन्तर जेवण ही तिथे होते. मीटिंग झाली. मोहित आणि त्याचे सहकारी जेवनाच्या तिथे आले. तिथे ड्रिंक ची सोय पन होती पन मोहित ड्रिंक घेत नव्हता. हैल्लो मोहित . त्याने मागे पाहिले अरे सोनल तू इथे कशी काय? मी आणि माझे फ्रेंड पार्टी ला आलो आहोत इथे पन तू काय करतो इथे? माझी मीटिंग होती आता च्यां इलेकशन ला मि उभा आहे सो. मोहित म्हणाला.सोनल त्याची कॉलेज मेट आणि त्याच्या वर जीव लावून बसली होती पन मोहित ने तिला कधी भाव नाही दिला कारण ती श्रीमंत घरातील लाडावलेली मुलगी होती तिला आपल्या श्रीमन्ती चा गर्व ही होता. मोहित कॉलेजमध्ये कोणत्याच मुलीला भाव देत नव्हता कारण त्याला कोणत्याच मुली मध्ये अड़कुन राहायचे नव्हते त्याचा सगळा फोकस करियर वर होता. सोनल ने खुप वेळा मोहित साठी ट्राय केला पन तो नाही हाती लागला. हा सोनल ला अपमान वाटत होता तिचा ईगो हर्ट झाला होता. मोहित इफ यू डोन्ट माइंड कैन वी टेक डिनर टूगेदर ? सोनल ने त्याला विचारले. मोहितने थोड़ा विचार केला मग ओके म्हणाला. दोघ एकत्र जेवत होते. सोनल ने ड्रिंक घेतली तिने मोहितला ऑफर केली. नो सोनल आय डोन्ट ड्रिंक . ओके मग तिने ही ड्रिंक बाजूला ठेवली. दोघ गप्पा मारत जेवत होते . अचानक मोहितच्यां चेहऱ्यावर कैमेरा चा फ़्लैश पडला त्याने आजुबाजूला पाहिले पण हॉटेल मध्ये खुप लोक होती त्यामुळे काही समजेना. मोहित पुन्हा जेवना कड़े लक्ष देवू लागला परत फलैश झाला. तसा मोहित उठला. काय झाले मोहित? सोनल आय थिंक कोणी तरी आपले फ़ोटो काढ़त आहे. अरे मोहित कोन कशाला आपले फ़ोटो काढेल? वेट म्हणत मोहित आजु बाजूला पहात राहिला.त्याने आपल्या बॉडीगार्ड ला कॉल लावला पन तो लागतच नव्हता. सोनल ने मोहितला आवाज दिला सो तो परत आपल्या टेबल पाशी आला. अरे तुला भास झाला असेल मोहित जेव तू . दोघांचे जेवन झाले. सोनल म्हणाली,मोहित कॉफी घेवूया का ? ओके मोहित म्हणाला. कॉफी आली . रात्रीचे दहा वाजले होते . मोहित म्हणाला सोनल आता मला निघायला हवे आणि तो हॉटेल मधून बाहेर जावू लागला तसे त्याला डोळ्यावर गूंगी आल्या सारखे झाले. त्याला समोरचे अंधुक दिसू लागले इतक्यात सोनल आली तिने त्याला सावरले आणि सव्हता सोबत घेऊन गेली. तिने त्याच्या गळ्यात एक हात टाकला होता दूसरा हात त्याच्या कमरे वर होता अशा रीतीं ने सोनल मोहित ला हॉटेल च्यां एका रूम कड़े घेवून निघाली आणि या अवस्थेतिल त्यांचे फ़ोटो उमेश ने काढले अशा पद्धतीने मोहित आणि सोनल चे फ़ोटो काढले की पहाणाऱ्याला वाटले पाहिजे की ते दोघ एकत्र आहेत. मोहितच्या विरोधकांनी त्यांचे काम चोख पार पाडले. साधारण दोन तासांनी मोहितला जाग आली. त्याने पाहिले की तो हॉटेल च्या रूम मध्ये बेडवर आहे त्याच्या अंगात शर्ट नाही फ़क्त बनियन आहे. आणि बाजूला सोनल . सोनल तू काय करतेस इथे आणि मी कसा आलो इथे. मोहित चील तूच मला रूम मध्ये घेवून आलास. यू आर सो ऑसम मोहित म्हणत तिने त्याच्या गाला वरुन बोट फिरवले. त्याने तिला बाजूला हटकले वेड लागले आहे का तुला मलाच आठवत नाही मि इथे कसा आलो आणि आप दोघे एकत्र ईट्स नॉट पॉसिबल. ऐवरी थिंग इज पॉसिबल मोहित बिकॉज आय लव यू . कॉलेज मध्ये मला झिड़कारलेस ना पन आता सव्हता हुन मला जवळ घेतलेस. हे शक्य नाही सोनल असे कधी होणारच नाही. म्हणत तो उठून कपड़े घालु लागला. मोहित तू जगाला किती ही ओऱडून सांग कोणी विश्वास नाही ठेवनार तुझ्यावर. मला माहित आहे आपण एकत्र होतो . माझा सव्हता वर विश्वास आहे सोनल मी झोपेत सुद्धा गैर वर्तन नाही करू शकणार . अच्छा पण आता झाले ते झाल. मोहित ने तिचा डाव ओळखला तिला दंडाला धरून तो म्हणाला,चल आता लगेच डॉक्टर कड़े जावू आणि वी विल चेक इफ आय डन सेक्स विथ यू चल उठ. मोहित अरे त्याला आता 2 तास होऊन गेले आता रिझल्ट नेगेटिवच येणार. तरी पन चल म्हणून तो तिला ओढून घेऊन चालला. तसे तिने आरडा ओरडा केला 12 वाजत आले होते हॉटेल अजुन चालू होते तिच्या आवाजा ने सगळे लोक त्यांच्या कड़े पाहू लागले. तिथे काही प्रेस वाले ही होते त्यांनी लगेच मोहित ला घेरले साहेब हा काय प्रकार आहे या मैडम ना का तुम्ही घेऊन चालला आहात . स्टॉप इट हा माझा पर्सनल इश्यू आहे आय डोन्ट अनसर टू यू . मग प्रेस वाले सोनल ला म्हणाले,मैडम काय झाले साहेबांनी काही त्रास दिला का तुम्हाला? ते तुम्हाला कुठे घेवून जात आहेत. काही नाही मोहित आणि मि एकत्रच आहोत ओके . मोहित तिला बाहेर घेवून आला आणि एका हाताने तिला घट्ट पकड़ले होते आणि दुसऱ्या हाताने त्याने आपल्या ड्राइवर ला फोन लावला कारण कार पार्किंग जरा लांब होते. तो कॉल वर बोलतो आहे इतक्यात एक कार त्याच्या जवळ आली आणि कार मधील व्यक्ति ने सोनल ला हिसका देवुन आपल्या गाडीत घेतले. हे इतके अचानक झाले की मोहित ला काही समजेलच नाही सोनल ला घेवून ती कार निघुन पन गेली. तोपर्यंत मोहितचा ड्राइवर कार घेऊन आला पन आता लेट झाला होता सोनल तर पळून गेली पन नक्की हे प्रिप्लान होते हे मोहित ला समजले त्याला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव होता हे नक्की. मोहितने त्याच्या बॉडीगार्ड ला परत कॉल केला पन तो लागतच नव्हता . तो ही कुठे तिथे नव्हता. मोहितने अजयला कॉल करून जे घडले ते सगळे सांगितले. पन मोहितला हे आठवत होते की त्याने आणि सोनल ने कॉफ़ी घेतली त्यानन्तर त्याला गूंगी येवू लागली मग पुढे काय झाले हे त्याला माहित नहवते पन सोनल सोबत तो गैर वर्तन इवन कूठल्याच मुलाशी तो असे वागनार नाही हे नक्की . तो 2 तास शुद्धितच नसनार सोनल ने हा नुसता खोटा बनाव केला होता याची त्याला खात्री पटली कारण जेव्हा सोनल ला त्याने डॉक्टर कड़े जावूयात बोलला तेव्हा तिने विषय बदलला जर मी खरच गैर वर्तन केले असते तर ती गप्प बसली नसती प्रेस वाल्याना तसे बोलली असती. खुप कांगवा केला असता पन आपला डाव आपल्यावरच उलटू नये म्हणून तर ती गप्प बसली आणि तिच्या मानसांनी तिला बरोबर उचलले. असा विचार मोहितने केला. आता खुप लेट झाला होता म्हणून अजय म्हणाला उदया सकाळी घरीच येतो मी. मोहित घरी आला. सकाळी ही बातमी सगळ्या न्यूज पेपरला आणि टी व्ही वर येणार हे नक्की म्हणूनच त्या आधी घरी या बाबत बोलावे असे त्याने ठरवले. आई बाबा जागेच होते तो घरी येई पर्यंत ते झोपत नसत आता तर जास्त काळजी त्यांना वाटत होती कारण निवडणुका जवळ आल्या होत्या .पन बॉडीगार्ड आहे म्हणून थोड़े ते निश्चित असत. आई बाबा बाहेर या जरा बोलायचे आहे मोहित ने त्यांना आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून अजिंक्य पन आला.
क्रमश... कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करा..