रडुन रडून तिचे डोळे सुजले होते. सगळ अंग ठनकत होते. शरीरावर जगोजागी अखिल च्या दाताचे व्रण दिसत होते. हे स्वप्न की सत्य हेच तिला समजेना. सुंदर संसाराची तिने स्वप्न पाहिली होती. पति पत्नी च प्रेम त्यांच् नात ख़ुप मोहक नाजुक असत हेच तिला माहित होत. पण प्रत्यक्षात चित्र उलटेच होते. तिने अखिल कड़े पाहिले तो निवांत झोपला होता त्याला तिच्या त्रासाच काहीच पड़ल नव्हते. अवंतिका आणि अखिल चे लग्न एका ओळखीच्या नातेवाईका द्वारे झाले होते. एकमेकांना बघुन पसंती ठरवूनच लग्न झाले होते. लग्ना आधी दोघे भेटायचे ख़ुप गप्पा मारायचे. अखिल ख़ुप प्रेम करायचा अवंतिका वर आणि काळजी ही ख़ुप घ्यायचा तीची. ती ख़ुप खुश होती तिला इतका प्रेमळ नवरा मिळाला होता. स्वर्गसुख या हुन वेगळे काय असते पन अवंतिका अखिल ची बायको म्हणुन त्याच्या घरी आली तसे त्याच् खर रूप तिला समजून चुकले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच अखिल चे किळसवाने रूप तिच्या समोर आले. अखिल ला प्रेम काय असत हे माहितच नव्हते. प्रेम म्हणजे फ़क्त शारिरिक भूक भागवण्याचे माध्यम अस तो समजत होता. आपली वासना शमवन्या साठी सदैव उपलब्ध असणारी व्यक्ति म्हणजे बायको इतकेच त्याचे लग्ना बद्दल मत होते. पहिल्या रात्रीच त्याने अवंतिकाला त्याला पाहिजे तसे उपभोगले . त्यात प्रेम हळूवार पणा,नाज़ुकपना काही ही नव्हते. त्याला पॉर्न वीडियो बघण्याची भयानक सवय होती. व्यसनच होते त्यांच् त्याला. ते फिल्मस बघुन तसच तो अवंतिका ला करायला भाग पाडत असे. सुरुवातीला तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण केली . त्यानन्तर तो तिच्या मना विरुद्ध जबरदस्ती करत असे. अवंतिका ने पाहिलेले सुंदर स्वप्न क्षणात विरुन गेले होते. अखिल आणि अवंतिका दोघेच राहत होते त्यामुळे घरात अखिल च च राज्य होते. अवंतिका ला तो क्वचित माहेरी सोडत असे. आई ला उगाच आपली काळजी नको म्हणुन ती सगळा त्रास मुक़ाटयाने सहन करत होती. आई ला ती मी मजेत आहे असच सांगायची. तिच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली होती. एक दिवस ती अखिल ला बोलली की आता आपल्याला मूल व्हायला हवे मी घरी एकटी असते माझ मन ही रमुन जाईल. हे बघ जेव्हा माझ्या मनात येईल तेव्हा आपण मुलाचा विचार करू आता मला इतक्यात मूल नको आहे अखिल म्हणाला. त्याला ख़रतर सेक्स ची चटक लागली होती . सेक्स त्याच्या साठी व्यसन बनले होते तो अवंतिका ला इतक्या लवकर मूल होऊ देणार नव्हता. त्यामुळे तो तिला गर्भ निरोधक गोळ्या घ्यायला भाग पाड़त होता.अवंतिका ला मात्र त्याच्या या रोजच्या वासने ची किळस येऊ लागली होती. प्रेम या शब्दाची तिला घृणा झाली होती. एक दिवस ती दुपारी काम आवरून टी व्ही बघत बसली होती तितक्यात बेल वाजली तिला धड़कीच भरली अखिल आला का म्हणुन. तिने दरवाजा उघड़ला तर दारात तीची मैत्रीण परिणीता होती. अग परी तू आणि अचानक कशी आली? का माझ्या मैत्रीणि च्यां घरी यायला बंदी आहे का मला? तसे नाही ग ये बस मी पाणी आणते म्हणत अवंतिका किचन कड़े गेली. परिणीता तीच घर बघत बसली. घर छानच सजवले होते. अवंतिका पाणी घेवून आली. परी समोर बसली. परी चे लक्ष अवंतिका च्या मानेवर गेल तिथे काळा नीळा डाग पडला होता. अवि तिला कॉलेज मध्ये सगळ्या जनी अवि म्हणायच्या. हे तुझ्या मानेवर काय झाले आहे. कुठे काय काही नाही म्हणत अवंतिका नजर चोरू लागली. अवि ख़र बोल तुला आपल्या मैत्री ची शपथ आहे. तसे अवंतिका ला राहवले नाही इतके दिवस मनात साचलेले बाहेर पडायला मार्ग आज मिळाला होता. तिने रडत रडत परी ला सगळ काही सांगितले. अखिल कसा रोज तिच्या वर बलात्कार करतो हे तिने सांगितले. तिच्या मनाचा तो अजिबात विचार करत नाही. तिच्या नाजुक भावनांची कशी चिरफाड़ करतो हे सांगितले. अवि अग तू का सहन केलेस पण इतकी शिकलेली तु गप्प का बसलीस . कोणाला सांगणार होते मी. आई ला बोलले असते तर तिनेच मला गप्प राहायला सांगितले असते कारण आज ही पुरुष म्हनेल ती पूर्व दिशा , त्याच्या कलाने नाही घेतले तर मला उलट बदनाम करेल ही भीती आणि लग्न मोडले तर बाई ची कीमत काय आपल्या समाजात तर शून्य! म्हणून तू सहन करणार त्या नालायक नव ऱ्याला? बघू परी एक मूल झाल की अखिल सुधरेल ग. अवि असे सायको पुरूष कधीच सुधरत नसतात. तू तुझा विचार कर आणि मी तुला मदत करेन तशी वेळ आली तर आपण पोलिसात जावू . पण गप्प राहु नकोस. परिणीता निघुन गेली. अवंतिकाला तिचे बोलने आठवत राहिले. रात्री अखिल ने कहरच केला तो तिच्या सोबत त्या फिल्मस मध्ये दाखवतात तसे अनैसर्गिक प्रकार तो तिला करायला भाग पाडत होता. तिने नकार दिला तेव्हा त्याने तिला ख़ुप मारले आणि त्याच अवस्थेत तिच्याशी संभोग केला. रात्र भर अवंतिका रडत राहिली राहुन राहुन तिला परिणीता चे शब्द आठवत होते मग तिने मनोमन एक निश्चय केला. सकाळी उठून आपले सामान घेवून तिने ते घर सोडले. अखिल साठी चिट्ठी लिहून ठेवली की मी तुझ्या त्रासाला कंटाळून घर सोडून जात आहे माझा शोध घेवू नकोस. अवंतिका तड़क परिणीता कड़े आली. तिच्या गळ्यात पडून रडु लागली. बास अवि आता तु रडायचे नाही तर सव्हता साठी जगायचे . हो म्हणत अवंतिका ने परिणीता चा हात हातात घेतला .
समाप्त ..©® sangieta devkar 2017