Hangover - 3 in Marathi Fiction Stories by Author Sangieta Devkar.Print Media Writer books and stories PDF | हँग ओव्हर - (भाग 3)

Featured Books
  • ભીતરમન - 58

    અમારો આખો પરિવાર પોતપોતાના રૂમમાં ઊંઘવા માટે જતો રહ્યો હતો....

  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

Categories
Share

हँग ओव्हर - (भाग 3)

अग नको इतका विचार करू आय विल टेक केयर ऑफ मि ओके. चल आता काय गाल फुगवून बसली स्माईल प्लीज. मीतू त्याच्या कड़े पाहत हसली. त्याने तिला घरी सोडले तो ही त्याच्या घरी आला. मोहित चे आजोबा आणि वडील दोघेही राजकारणातच सक्रिय होते. त्याचे वडील दिनकरराव देशमुख माजी आमदार होते त्यांचा समाजकार्याचा आवाका ,गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची वृत्ती प्रामाणिक पणा संपूर्ण शहरात चर्चे चा विषय होता . त्यांनी राजकारण केले पण त्यात प्रामाणिक पणा आणि एकनिष्ठा जास्त होती. राजकारणातून समाजकारण हे त्यांचे सूत्र होते. त्यांचे चारित्र्य ही निर्मळ होते. गावात त्यांचा खूप नावलौकिक होता. आणि हेच बाळकडू मोहित ला मिळाले होते तो ही अगदी सचोटीने आणि प्रामाणिकपणे राजकारणात सक्रिय होता. देशमुखां कडे कोणी मदतीला आला आणि रिकाम्या हाताने गेला असे कधीच घडले नाही. साहजिकच साध्या सरळ रस्त्याला जसे गती रोधक असतात तसेच काहीसे मोहित बाबत म्हणजे सरळ मार्गी व्यक्तीच्या वाट्यात विरोधक असतातच असतात. या वेळेस मोहित आमदार पदा साठी निवडणूक लढवू नये असे बऱ्याच त्याच्या विरोधकांना वाटत होते म्हणूनच त्याला असे निनावी कॉल येत होते. घरी आल्यावर मोहित आपल्या वडीलांशी या विषयावर बोलला . तेव्हा दिनकर राव म्हणाले,मोहित तुझा हा आमदार होण्यासाठीचा प्रवास इतका सोपा असणार नाही बऱ्याच अडीचणींना तुला तोंड द्यावे लागेल. विरोधकांना आपली हार झालेली पाहायचे आहे ,तुझ्या मार्गात ते आडकाठी आणणार . या अडचणी वर मात करतच तुला तुझे ध्येय प्राप्त करावे लागणार आहे. त्यात आपले हितचिंतक जरा जास्तच आहेत त्यामुळे आपला विजय नक्की आहे पण हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तू मात्र तुझ्या मता वर ठाम रहा. हो बाबा माझी पूर्ण तयारी आहे हे सगळं सोसण्याची आणि मी माघार ही घेणार नाही. कितीही अडचणी येऊ देत मी डगमगणार नाही. मग तर झालं तू तुज काम करत रहा.पण सावध ही रहा मोहित. हो बाबा तुम्ही काळजी नका करू. मोहित त्याचे आई बाबा एक लहान भाऊ आणि बहीण तिचे लग्न झाले होते . असा परिवार होता त्याचा. घरातला मोठा मुलगा म्हणून मोहित वर सगळी जबाबदारी होती आणि हे इलेक्शन होई पर्यंत त्याला मोकळा श्वास घेणं थोडं कठीण होत. मोहित ने त्याचा मित्र डीएसपी अजय ला कॉल केला आणि त्याला आलेल्या त्या धमकीच्या फोन ची माहिती दिली. अजय म्हणाला की तो नंबर मला सेंड कर मी पाहतो पुढे काय करायचं . मितू आता पूर्णपणे बरी झाली होती तिचे ऑफिस ,मोहित शी कॉल वर बोलणं सुरु होत. आज रविवार होता आठवडा झाला ते दोघ भेटले न्हवते सो मितु ने मोहित ला कॉल केला म्हणाली मोहित आज संध्याकाळी भेटूया ना. कुठेतरी फिरायला जाऊ. मोहित खर तर मितु बद्दल काळजीत होता ती याच्या सोबत असताना काही अघटित घडले तर तिला त्रास नको कारण विरोधक नक्की त्याच्या मागावर असू शकतात असा त्याला डॉऊट होता. पण तिला नाराज नको करायला म्हणून तो तयार झाला . तिला संध्याकाळी आवरून बस मी येतो असे म्हणाला. अजय ने त्या फोन नंबर चा शोध घेतला होता तो एस टि डी बूथ कदमवाडी मधला होता पण नेमका कोणी कॉल केला हे सांगणे कठीणच होते कारण शंबर लोक येत असतात एसटीडी बूथ वर! मितु पाच वाजताच छान तयार होऊन बसली होती.व्हाईट आणि पर्पल कॉम्बिनेशन चा चुडीदार तिने घातला होता कानात मोत्याचे ड्रेसवर मॅचिंग घातले होते. हलकी पिंक लिपस्टिक,आणि आय लायनर लावले होते. थोड्याच वेळात मोहित आला त्याने डेनिम चा शर्ट घातला होता आणि ब्लु जीन्स ,रेबँन चा गॉगल खूपच हॅन्डसम दिसत होता.ती म्हणाली वा मोहित काय दिसतोस तू मस्त . हो का मग काय विचार आहे मॅडम. काही ही नाही फिरायला जायचे ना आपल्याला. हो पण आता माझा मूड वेगळा आहे तिच्या डोळ्यात पाहत मोहीत म्हणाला. तू इतकी सुंदर दिसतेस मितु जान .हो का मिस्टर देशमुख .उफ इतकं मूर्तीमंत सौंदर्य समोर असताना बाहेर कोण जाईल असे म्हणत मोहित ने तिला आपल्या कवेत ओढले. ती लाजत म्हणाली,चल ना मोहित जाऊ आपण. त्या आधी तुला पाहू तर दे मनसोक्त त्याने आपल्या हातात तिचा चेहरा धरला तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "यु नजरोंसे वार करते हो,करते हो जुल्म हम पे पर कमाल करते हो"" आणि तिच्या ओठाचे चुंबन घेतले. तिला घट्ट मिठी मारत मोहित म्हणाला,मितु माय जान लव यु सो मच.. मोहित इथेच रात्र होईल आता चल. बर चल जाऊ म्हणत दोघे घरातून निघतात. रंकाळा वर ते फिरायला येतात. ऐके ठिकाणी बेंच वर बसतात मस्त संध्याकाळ चा निवांतपणा सूर्य अस्ताला निघालेला थंड हवा खूप छान वातावरण होते तिथे. संथ ,सुस्त असा रंकाळा तलाव त्यात पडलेले सूर्याचे सोनेरी किरन आणि हळूहळू तो सूर्याचा केशरी गोळा तलावा मध्ये उतरतो कि काय असा नजारा होता. दोघांनी खुप फ़ोटो काढले आणि गप्पा मारत बसले. मीतू ने मोहित चा हात आपल्या हातात घेतला म्हणाली,मोहित तुझ्या घरी तू आपल्या बद्दल सांगणार होतास ना ? मग बोलला का? नाही ग अजुन वेळ मिळाला नाही निवांत असे बोलायला पन या वीक मध्ये नक्की बोलेन. तू सांगितलेस का तुझ्या घरी. नाही आधी तुझ्या घरून परवानगी तर मिळू दे मग सांगेन. डोन्ट वरी जान माझ्या घरी काही अड़चन नाही आणि इतकी सुंदर सुन घरच्याना नको आहे का? हा काही ही बोलू नकोस उगाच.अरे मला माहित आहे ना माझ्या घरी काय आवडेल काय नाही आणि बाबा तर जाम खुश होतील हे ऐकून की त्यांची होणारी सुन पत्रकार आहे. खरच मोहित ? हो ग नक्की पन तुझ्या घरी चालेल का असा पॉलीटीकल जावई ? मोहित आई बाबांचा माझ्यावर विश्वास आहे मी जे करेन ते योग्यच असेल सो काळजी नाही. तुला बघून आनंद होईल त्यांना. मग ठीक आहे. मोहित ला कॉल आला पुन्हा लैंड लाईन वरुन कॉल तो खुप चिडला त्याच्या तोंडात शिव्या येत होत्या पन मैथिली होती म्हणून गप्प बसला . पुन्हा समोरचा मानुस मोहितला धमकी देत होता. मोहित म्हणाला,अरे दम असेल तर समोर ये असा लपून छपुन काय फोन करतोस? तुझ्या धमक्याना मी भिक घालत नाही . जा कर काय करायचे ते कर असे बोलून मोहितने फोन कट केला. मोहित परत तसा कॉल आला ना? तू पोलीस कम्प्लेंट कर . हो ग मीतू बोललो आहे मि माझ्या डीएसपी मित्राला. तो करेल सगळ हैण्डल यू डोन्ट वरी. पन मैथिली च्या चेहर्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिचा मुड़ ठीक करायला मोहित म्हणाला,मीतू चल आपण बोटिंग करू उठ. नाही मोहित नको मला भीती वाटते पाण्याची. तसा मोहित मोठयाने हासु लागला म्हणाला,तरीच पुणेकर आहेस भित्री.हो असु दे ती रागाने म्हणाली. तसा तो अजुन चिडवू लागला भिवू नकोस मला स्विमींग येते तू काय पडणार नाहीस पाण्यात मीतू. नको मी नाही येणार. अरे तू देशमुखां ची सुन होणार आहेस बी ब्रेव्ह आणि वाघाला वाघिनच शोभते चल काही होत नाही मी आहे अस म्हणत मोहित मीतू ला बोटिंग साठी घेवून आला. दोघांनी सेफ्टी जैकेट् घातले आणि मोहित सव्हता बोट चालवू लागला. मैथिली मोहित च्या दंडाला घट्ट पकडून बसली होती. तिला बघून मोहित हसत होता. पूर्ण रॉउण्ड होई पर्यंत मीतू त्याला पकडून बसली होती. रात्री ते घरी परत आले . मोहित तिला सोडुन गेला. घरी पोहचल्यावर कॉल करतो म्हणाला. मितुला त्याची काळजी वाटत होती.

क्रमश ..कसा वाटला हा भाग नक्की कमेंट करा. पुढील भाग लवकरच....👍