मैथिलि वेळेवर ऑफिस ला पोहचली,तीला इथे सकाळ ऑफिस जॉइन करून आता दोन् महीने होत आले होते. पुण्यातील पत्रकारिते चा तिचा अनुभव,हुशारी तिचे जबरदस्त लिखाण यामुळे तीला कोल्हापुर सकाळ मध्ये डायरेक्ट मुख़्य पत्रकार म्हणून घेतले होते. कामाबाबत एकनिष्ठ पणा,चोखपणा,आणि स्पष्ट वक्ते पणा तिच्यात कमालीचा दिसून यायचा. रोज ऑफिस ला आल्याआल्या सर्व कर्मचाऱ्यांना चहा द्यायचा हा इथल्या संपादकांचा नियमच होता. त्यामुळे सगळा स्टाफ आला की शिपाई सर्वांना चहा देत असे.ती आली तेव्हा एक एक करून इतर कर्मचारी येतच होते. तिने पर्स रोजच्या जागी ठेवली,आणि लॅपटॉप सुरु केला. इतक्यात शिपाई आला चहा घेऊन ,गुड मॉर्निंग मॅडम ,घ्या गरम गरम चहा. तिने हसून त्याला विश केले. हा,मॅडम अजून एक तुम्हाला भेटायला कोणीतरी आलेय बाहेर.कोण आहेत ते नाव काय?अहो मॅडम,चहा च्या गडबडीत नाव विचारायच राहीलच बघा.बर पाच मिनिटांनी पाठवून दे आत.हा म्हणत शिपाई बाहेर गेला.लॅपटॉप पाहत तिने चहा संपवला,तिचे लक्ष लॅपटॉप वर च होते. मॅडम,आत येऊ का? साधारण तिच्या ओळखीचा आवाज आला. आपल्याला भास झाला का असा विचार करत तिने लॅपटॉप वरून नजर हटवली,आणि केबिन च्या दारा कडे पहिले. शी वॊज शॉक ,क्षणभर तिला काय बोलावे सुचेना,समोर मोहित हसत उभा होता. तिने स्वहताला सावरत येस कम इन म्हणटले. तिच्या समोरच्या चेयर कडे तिने हात करत,बसायला सांगितले. मोहित सोबत अजून एकजण होता.मैथिली,सॉरी मॅडम तुम्ही इथे कशा ?मी इथे जॉईन होऊन आता दोन महिने होतील.ओह्ह,,काँग्रेट्स मॅडम,म्हणत मोहित ने तिला शेकहॅन्ड केला. पण आपण काही बोलला नाहीत या बद्दल,,मिस्टर मोहित देशमुख लोकांबद्दल माहिती असायला,लोकांच्या संपर्कात रहावे लागते हो ना ?हो ते ही खरच ,मोहित बोलला. पर्पल कलरचा चेक्स शर्ट,आणि ब्लॅक जीन्स मध्ये तो खूपच स्मार्ट दिसत होता. त्यात त्याचे हासू त्याच्या स्मार्टपणात जास्त भर घालत होते. येल्लो आणि व्हाईट कॉम्बिनेशन च्या चुडीदार मध्ये मैथिली ही सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर तिच्या आत्मविश्वासाचे तेज दिसून येत होते.बोला देशमुख काय काम होते तुमचे,?मॅडम आमच्या संस्थे बद्दल तुम्ही जाणता आहातच,दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही संस्थे मार्फत कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्याची जाहिरात आपल्या पेपर मध्ये द्यायची होती.मग तुम्ही आमच्या जाहिरात विभागा कडे जा,माझे ते काम नाही.हो मॅडम तिकडेच गेलो होतो,पण ते साहेब बोलले,आता पूर्ण पेपर सेट झाला आहे,आता ही जाहिरात देता येणार नाही. तरी ही तुम्ही मॅडम ना भेटा,काही अँडजस्ट होत असेल तर बघा.म्हणून तुमच्या कडे आलो.मी. देशमुख तुम्ही खूप लेट आलात जाहिरात द्यायला. आमचा पूर्ण आठवड्याचा लेआऊट तयार असतो.पण मॅडम,तुम्ही काही अँडजस्ट केले तर होईल.कधी आहेत या स्पर्धा,?२८डिसेंबर ला मॅडम.उद्याच्या किंवा परवाच्या पेपरमध्ये जरी आली ही जाहिरात तरी चालेल.२८ म्हणजे आज आहे २५ फक्त तीन दिवस,,नाही देशमुख असे अचानक काही नाही करता येणार.तुम्ही फार लेट केलात.मॅडम प्लिज,तुमच्या हातात आहे हे काम,वाटले तर याचे एक्स्ट्रा चार्जेस ही मी देईन.देशमुख ,पैशाचा प्रश्न नाही ऑलरेडी पूर्ण आठवड्याचा पेपर आमचा पुरवणी सह तयार असतो.बघा मॅडम होत असेल तर करा.तिने इंटरकॉम उचलला,आणि दोन चहा मागवला. ती म्हणाली,तुम्ही मला संध्याकाळी ६,/६,३० दरम्यान फोन करा बघू काय होत असेल तर.ओके मॅडम थँक्यू यु सो मच. मोहित म्हणाला.शिपाई चहा घेऊन आला,तिने मोहितला आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीला चहा घ्या असा निर्देश केलामोहित म्हणाला,मॅडम तुम्ही पण घ्या चहा.नको,माझा झाला आहे तुम्ही येण्यापूर्वीच .चहा घेऊन झाल्यावर मोहित उठला,परत त्याने तिचे आभार मानले,तिने त्याला आपले कार्ड दिले.ओके मॅडम, करतो कॉल.असे म्हणत त्याने जाहिरात मैथिली ला दिली आणि केबिन च्या बाहेर पडला. मैथिली डोळे मिटून खुर्चीवर मागे मान टाकून बसली. मोहित ला समोर पाहून खूप अस्वस्थ झाली होती,पण ती बैचनी तिने जरा सुद्धा दाखवून नाही दिली. गेली तीन वर्षे ते दोघ रिलेशनशीप मध्ये होते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे फक्त एकच इश्यू होता ते दोघ लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप मध्ये होते. ती पुण्यात तर तो कोल्हापूर ला,त्यात मोहित सतत कामात बिझी ,भरीसभर तो पॉलिटीशन ही होता सो खूप कमी वेळ तो मैथिली ला देत होता,हा सुरवातीला खूप वेळ ते एकमेकांना द्यायचे पण अलीकडे तो खूपच बिझी झाला होता म्हणूनच त्याच्या बद्दल चा तीचा पझेसिव्हनेस जास्तच वाढला होता. ती खूप चिडायची,वैतागायची, हा आठ पंधरा दिवस बोलत नसायचा. असे लांब राहून फक्त बोलून प्रेम करणं खरच अवघड होत. पण तिच्या पझेसिव्हनेस मुळे मोहित इरिटेट होत होता. तो म्हणायचा ,तू असे का वागतेस मितु,बोललो नाही म्हणजे आपल्यात प्रेम नाही असे होत का? तू मला समजून का घेत नाहीस या उलट मैथिली ही हेच म्हणायची की तू मला समजून घे. तू कामात तुझ्या व्यापात इतका बिझी असतोस की मला साधा एक कॉल करावा इतकं ही तुझ्या मनात येत नाही. पण यात खरं तर मोहित ची चूक नव्हतीच,तो खरच बिझी होता. पण त्याच्या मीतू वर तो पहिल्या इतकंच प्रेम ही करत होता पण तिला ते समजत नव्हते इतकच..तशी मैथिली खूप शांत आणि समंजस होती ,पण मोहित बाबत का कोण जाणे जास्त हळवी होती. सो तिच्याही नकळत ती अशी वागत होती. जो तो आपआपल्या जागी बरोबर होता. हळूहळू मैथिली नेच मोहित शी बोलणे कमी केले आणि मोहितला ही थोडा स्पेस हवा होता. तिला वाचन,लिखाणाची खूप आवड होती. बऱ्याच ठिकानी तिचे लेख,कविता प्रसिद्ध होत असत. म्हणून तिने पत्रकारिते चा अभ्यासक्रम पूर्ण करायचे ठरवले. ती अभ्यासाला लागली. मधून केव्हा तरी मोहित चा कॉल मेसेज यायचा नॉर्मल बोलणे व्हायचे पण ती खूप हर्ट झाली होती. पत्रकारिते मध्ये ती फर्स्ट क्लास मध्ये पास झाली मोहितला तिने मेसेज केला. पण त्याने चार दिवसांनी तिचे अभिनंदन केले. ती अजूनच आतून तूटत गेली. तिला पुणे सकाळ मध्ये जॉब मिळाला. मोहित त्याच्या कामात,राजकारणात दंग होता. आज मोहित ला पाहून ती खूप अस्वस्थ झाली,तो ही त्रयस्था सारखा वागला हे तिला जास्त खटकले ,कदाचित् ती कोल्हापूर ला येतेय हे त्याला न सांगितल्या मुळे तो नाराज झाला असेल अशी शंका तिला आली. तिने सगळे विचार बाजूला केले आणि कामाला लागली. मोहित ने दिलेली जाहिरात कुठे टाकता येईल याचा विचार करू लागली. एके ठिकाणी ती टाकता येईल इतकी जागा तिने अँडजस्ट केली. ज्या जाहिराती रिपीट होत्या त्या काडून टाकल्या. मोहितला नाराज करणं तिला जमणार नव्हत.शेवटी किती झाले तरी तिचे प्रेम होते त्याच्यावर बस्स थोडासा दुरावा आला होता त्यांच्या नात्यात आणि २८ तारखेला मोहितला कशी ती नाराज करू शकेल,ज्या दिवशी त्याचा वाढदिवस. तिला त्याला आनंदी पाहायचं होत. ६.३० ला मोहितने तिला कॉल केला,हॅलो मितु,,मितु नाव ऐकताच तिचा आवाज भरून आला,पुन्हा त्याने विचारले,मितु काय झाले?काही नाही बोल मोहित,माझ्या कामाचे काही जमते का?हो,मी दिली आहे जाहिरात परवाच्या पेपरला येईल.ओह थॅंक यू सो मच मितु.अँड आय वॉन्ट टू मीट यू प्लिज.तिच्या डोळ्यातून केव्हाच अश्रू वाहत होते.बघू मी सांगते बाय,,म्हणत तिने फोन ठेवला. मितु अशीच गप्प राहणार आहेस का बोल काहीतरी मोहित मैथिली ला म्हणत होता. ते दोघे त्याच्या कार मध्ये बसले होते,शहरा पासून दूर एका शांत ठिकाणी ते आले होते.काय बोलू मोहित ,? तुला माझ्या बोलण्याचाच तर त्रास होत होता ना.!अरे मी असे कधी म्हंटले होते का? का स्वहताच सगळा समज गैरसमज करून घेतलास.मग का असा वागलास मोहित? माझे फोन कॉल्स ,मेसेजेस तू कितीवेळा इग्नोर केलेस.त्याने तिचा हात हातात घेतला,अग मितु,इग्नोर नाही केलं,कामाचा व्याप इतका होता की काय सांगू तुला,माझे प्रॉब्लेम्स,बाहेरगावची काम,यात मला माझ्या साठी पण वेळ मिळत नव्हता,मी टेन्शन मध्ये असायचो तेव्हा तुझा फोन वर फोन ,मेसेज मला तुझ्याशी अश्या परिस्थितीत बोलणे जमणार नव्हत ,म्हणून मी इग्नोर करत होतो. टेन्शन मध्ये मी तुला वेडंवाकडं बोलू नये म्हणून बोलणे ही टाळायचो इतकच!!अरे पण माझ्या मनाचा विचार तू कधी केलास का?मी किती हर्ट होत होते.ती रडू लागली होती.त्याने हलकेच तिचे अश्रू पुसले,म्हणाला हो मितु मला माहित होत,पण मुद्दाम असे नाही वागलो ग.मला थोडा स्पेस हवा होता, तुझा पझेसिव्हनेस वाढत होता म्हणून आणि तुला ही स्पेस ची गरज होतीच.पण तू मला इकडे येतेस हे का नाही सांगितलेस का मी इतका परका झालो होतो का तुझ्यासाठी? तुला तुझ्या ऑफिस मध्ये पाहून क्षणभर डोळ्यावर माझा विश्वास बसेना की ही माझी मितु ,मुख्य पत्रकार ! आय फील सो प्राउड मितु. पण तुझा तितका राग पण आला होता म्हणून मी त्रयस्था सारखा बोललो,आय एम सॉरी.मोहित मला तुझा खूप राग आला होता,म्हणून इकडे आल्याचे मी नाही सांगितले.ओके अजून राग आहे माझ्यावर का गेला,तो म्हणाला.तिने हसून त्याच्या कडे पहिले,त्याने तिला आपल्या मिठीत घेतले.मोहितशी भेटूनही मैथिलीला अजून कुठेतरी खटखतच होते की मोहित आता वागतो ते खरं की हा पुन्हा पहिल्यासारखा वागेल. परत तेचतेच त्याच रुड वागणं मग आपलं हर्ट होणं,हे सगळं तिला नको होत.सो ती खूप विचार करत होती.२७ डिसेंबर रात्री १२ वाजता मितु ने मोहित ला कॉल केला,मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे स्वीटहार्ट,,,थँक यू जान,,आय मिस यू,,,,तो म्हणाला.तू झोपला नाहीस अजून,?,तू कॉल करनार हे माहित होत म्हणून जागा होतो.मग उद्या तुला काय गिफ्ट हवे सांग..मला काही ही नको मितु सगळं आहे माझ्याकडे फक्त तू नाहीयेस.हम्म्म,,ती हे ऐकून खूप खुश झाली.ओके झोप आता,मितु गुड नाईट.दुसऱ्या दिवशी सकाळीच मोहित तिच्या ऑफिस मध्ये आला. तिनेच त्याला बोलावले होते परत दुपार नंतर तो बिझी असणार कुस्ती स्पर्धेच्या तयारीत म्हणून आताच तो तिला भेटायला आला. मितु ने त्याला शेकहॅन्ड करत पुन्हा एकदा बर्थ डे विश केले.दोघांनी कॉफी घेतली,रात्री डिनरला भेटायचे ठरवून मोहित निघाला. हॉटेल सयाजी ला ते रात्री नऊ ला आले. छान कॅडल लाईट डिनर केले ,तिने त्याला मस्त शर्ट गिफ्ट म्हणून दिला,केक कापून दोघांनी त्याचा वाढदिवस साजरा केला,दोघे ही खूप आनंदात होते. मध्यतरी मोहित कामासाठी बाहेरगावी गेला तो चांगला १५/२० दिवस तिकडेच होता. फोन ला रेंज असेल तेव्हा त्यांचं बोलणं व्हायचं. मैथिली अजून ही त्याला पारखतच होती.तिचे मन हे मानायलाच तयार नव्हते की मोहित तिचाच आहे. मोहित कोल्हापूर ला आला होता.मितूने त्याला कॉल केला,,हॅलो मोहितबोल मैथिली काय म्हणतेस,?मोहित,तू उद्या मराठा क्रांती मोर्चा मध्ये जाणार आहेस का?काही नक्की नाही माझे,पण तू का विचारतेस?मी जाणार आहे उद्या,आम्हाला मोर्चाची बातमी कव्हर करायची आहे.मितु तू जाऊ नकोस, तिथे जाणे रिस्की होऊ शकत.अरे मोहित मी एकटी नाही,सगळा आमचा युनिट आहे.अग तुला समजत कसे नाही,मोर्चा मध्ये अचानक दंगल ,होईल,तोडफोड होईल सो आय वरीड अबाउट यू डियर.मोहित पण माझे ते काम आहे ,मला जावे तर लागणारच ,यू डोन्ट वरी,ओके.बर काळजी घे,म्हणत त्याने फोन ठेवला.दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता सगळे रिपोर्टर, कॅमेरामन पूर्ण तयारीनिशी बाहेर पडले. मैथिली पूर्ण युनिट ची लीडर होती. चांगली बातमी त्यांना कव्हर करायची होती. मोर्चाला सुरवात भवानी मंडपातून झाली. संपूर्ण कोल्हापूर शहर बंद होते. जागोजागी पोलीस तैनात होते. खूप शांततेत मोर्चा सुरु होता. हजारोंच्या संख्येने लोक भगवे झेंडे हातात घेऊन होते. काहीजण बाईक वर,तर काही कार घेऊन पण होते. पण पूर्ण शांतता! बऱ्याच जणांनी मैथिली ला हवी तशी माहिती दिली. सहकार्य केले. गावातला भाग कव्हर करत करत त्यांची टीम गंगावेश गोल सर्कल ला आली. तिथे एक स्टेज उभा केला होता आणि काही लोकांचे भाषण सुरु होते. तिथे ही मैथिली लोकांकडुन माहिती घेत होती.कॅमेरामन फोटो काढत होता. अचानक एक मोठा जमाव तिथे आला आणि भाषणबाजी बंद करा,या प्रेस वाल्याना सहकार्य करू नका,असा गलका करू लागले. आणि त्यांनी दगड फेक सुरु केली. काही जण काठ्या घेऊन धावू लागले. पोलीस होते पण त्यांना ही ते लोक ऐकत नव्हते.खूप गोंधळ सुरु होता. अचानक एकाने मैथिलीच्या हातातील माईक हिसकावून घेतला,एकाने कॅमेरा घ्यायचा प्रयत्न केला. तशातच कुठून एक दगड मैथिलीच्या कपाळावर जोरात येऊन लागला. त्यात लोकांची धक्काबुक्की चालूच होती. ते मुद्दाम गोंधळ घालत होते. मैथिली खाली पडली,तिच्या हाताला ही थोडे लागले. कपाळावरून रक्त ओघळू लागले,थोडक्यात तिचा डोळा वाचला होता. ती उठायचा प्रयत्न करत होती. अचानक तिचा हात कोणीतरी पकडला,तिने पहिले तो मोहित होता. तिला त्याने वर उठवले आणि तिच्या इतर सहकार्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या गाडी मधून जा,मी मॅडम ना दवाखान्यात घेऊन जातो. त्याची कार बाजूलाच होती,पटकन त्याने मैथिली ला कार मध्ये बसवले. स्व: ताचा रुमाल काडून तिच्या कपाळावर बांधला.तिला पाणी प्यायला दिले. तो म्हणाला,बघितलेस मितु यासाठीच मी तुला जाऊ नको म्हणत होतो.पण मोहित तू इथे अचानक कसा आलास.?का,तुला काय वाटले मला तुझी अजिबात काळजी नाही का ?तसे नाही मोहित,तिला हातानेच थांबवत तो म्हणाला,तुझे इथे मोर्चात येणे रिस्की होऊ शकत सो मी तुझ्या कार च्या मागेमागेच होतो मितु.मोहित थँक यू डियर फॉर केयरिंग .चल आता डॉ कडे जायला हवे,तुला खूप लागले आहे. तो म्हणाला.तिने मोहित चा हात हातात घेतला म्हणाली,मोहित मी तुझ्या बाबतीत काय विचार करत होते आणि तू असा .. आय एम रियली सॉरी.तो हसला आणि म्हणाला,मॅडम कधी कधी नातं हँग होत तेव्हा त्याला रिसेट करायला थोडा वेळ द्यावा लागतो समजले. असे म्हणत त्याने तिचा गाल ओढला. ती म्हणाली,म्हणजे,?मोहित म्हणाला,वाघाचे पंजे....गाणं ऐक आता मस्तपैकी आणि त्याने एफ. एम. सुरु केलं. तिच्या आवडीचेच गाणे लागले होते..."" गुणगुणावे गीत वाटे,शब्द मिळू दे थांब ना, हूल की चाहूल तू,इतके कळू दे थांब ना. गुंतलेला श्वास हा,सोडवू दे थांब ना, तोल माझा सावरू दे थांब ना. सर सुखाची श्रावणी नाचरा वळीव हा, गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा.....
क्रमश...कथा कशी वाटली नक्की कमेंट करा.