Indraza - 1 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | इंद्रजा - 1

Featured Books
Categories
Share

इंद्रजा - 1

भाग-१


मोहे रंग दो लाल
मोहे रंग दो लाल
नंद के लाल लाल
छेड़ो नहीं बस रंग दो लाल
मोहे रंग दो लाल

देखूं देखूं तुझको मैं होके निहाल
देखूं देखूं तुझको मैं होके निहाल
छू लो कोरा मोरा कांच सा तन
नैन भर क्या रहे निहार
मोहे रंग दो लाल
नंद के लाल लाल
छेड़ो नहीं बस रंग दो लाल
मोहे रंग दो लाल



दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.."
(त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या)



जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....."
(जिजा गाण बंद करत म्हणाली)


दिव्या.._ "गुड़ मॉर्निग बाळा..तुझ झाल असेल तर चल नाश्ता करायला बाबा वाट बघत आहेत तुझी"



जिजा.._ "हो आलेच दोन मिनिट.."



दिव्या.._ "बर ये.."
(दिव्या तिकड़ूंन निघुन खाली गेल्या)



शिवराज.._ "क़ाय ग दिव्या,कुठ आहे जिजा?? आज उशीर झाला"



दिव्या.._ "हो येतेय ती,तुम्हाला माहित आहे ना जिजाला सवय आहे तिचा मुड़ झाला की गाण लावून नाचते ती,तेच करत होती आता.."



शिवराज.._ "अच्छा,असुदे तिला आवडत ग नाचायला..आणि नाचते ही छान ती गाण वाजल की ही नाचलीच..."



दिव्या.._ "हो खरय..."



जिजा.._ "गुड़ मॉर्निग बाबा,गुड़ मॉर्निग तारा.."



शिवराज.._ "गुड़ मॉर्निग जिजाबाई...😊"



तारा.._ "गुड़ मॉर्निग दीदा.."



जिजा.._ "तारा चल लवकर आटोप कॉलेजला जायला उशीर होईल आपल्याला..."



तारा.._ "हो दीदा मी रेडीच आहे.."



शिवराज.._ "चांगल आहे ना ग कॉलेज,नाही सहज विचारल कारण अकरावी बारावी,फस्ट अँड लास्ट ईयर सगळ एकाच कॉलेज मध्ये आहेत म्हणून विचारल.."



जिजा.._ "डोन्ट वरि बाबा,मस्त आहे कॉलेज आणि तस पन ताराची कॉलेज बिल्डिंग वेगळी आणि माझी वेगळी आहे..मस्त आहे..फस्ट ईयर माझ मस्त गेल..."



दिव्या.._ "चला बर आहे मग.."



शिवराज.._ "बर चला,मी निघालो डयूटीवर..भेटुया रात्री ओके.."



जिजा.._ "हो बाय बाबा.."



शिवराज.._ "बाय...."



जिजा.._ "चल तारा बॅग घेऊन ये..मी पन आलेच.."



तारा.._ "हो आलेच...."


जिजा पळत तिच्या खोलीत गेली........स्वतःला थोड़ आरशात पाहिले,आणि बॅग घेतली....


**********************


कॉलेज मधला पहिला लेक्चर मराठीचा होता......जिजा आणि तिची बेस्टी निलांबरी असच गप्पा मारत होत्या.....तेवढ्यात मराठीचे शिक्षक आले.....तस सगळे उभे राहिले.....



शिक्षक.._ "बसा..बसा...विद्यार्थ्यानो,आज आपण धड़ा नाही शीकणार आहोत...आज मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे..😊"



निलांबरी.._ "अरच्या सराना क़ाय झाल आज??,थेट आपल्याशि कॉन्टेक्ट..😂 "



जिजा.._ "अग निलु हा असर वैक्सीनच्या तिसऱ्या डोसचा आहे..😂"



निलांबरी.._ "वैक्सीनला तर दोन डोस असतात तीसरा कधी निघाला..🙄"



जिजा.._ "गप्प बस तू बावळट तुला तर जोक पन नाही कळत..🤨."



निलांबरी.._ "जोक होता तो..मग जाऊदे😂"



शिक्षक.._"बर मला सांगा शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही क़ाय करणार आहात..?"



अभिजीत.._"सर,मला माझ्या भावा सारख उद्योगपति व्हयाच आहे.."



शिक्षक.._ "अरे वा!! उत्तम..आणखी पुढे..?"



अभिजीत.._ "सर अजिंक्यला क़ाय तरी बोलायचय.."



शिक्षक.._ "हु बोला अजिंक्य साहेब.."



अजिंक्य.._ " आ आ आ त..मना मोठ होऊन मासमार बनावच आहे..त्यात कवर पैस मिळतान तुम्हाला माहिते का सर🤩"



शिक्षक.._ "क़ाय,शीई शीई शीई क़ाय तुझी ही भाषा रे,मना नाही मला, मासमार नाही मासेमारी..कवर नाही केवढे..अस असते"



अजिंक्य..._ "हा क़ाय,आपल्याला इतका डोका नाय ना सर..नाही तर आपन आज डॉक्टर असताव.."



शिक्षक.._ "शीई शीई शीई क़ाय तू वेगवेगळ्या भाषा बोलतोयस..अजून ऐकली तर मी बेशुद्ध होइन..बस तू बस.."



अजिंक्य.._ "अस म्हणताव क़ाय सर..बर.."



सराना वैतागलेला बघून सगळे हसायला लागतात...😂



शिक्षक.._ "शांतता,शांतता..हसायला क़ाय झाल तुम्हाला...बर आता पुढे...नीलांबरी तुम्ही बोला.."



निलांबरी.._ "आ आ ब मला मला ते सर..मी अजुन ठरवलेच नाही😅"



शिक्षक.._ " हम्म वाटलेच मला,तू कधी काही करायचा ठरवतेस का?..गृहपाठ पूर्ण करायचा कधी ठरवत नाहीस,शांत बसायच कधी ठरवत नाही..नेहमी आपला दंगा करायचा नुसता..बस खाली.."



निलांबरी.._ "😏खड़ूस म्हतारा😏"
(तोंड वाकड करत)



शिक्षक.._ " जिजा आता तुम्ही सांगा.."



जिजा.._ " आ सर मला तस खुप काही करायची इच्छा आहे,मला स्वतःच डान्स क्लास खोलायच आहे..लहान मुलांना मोफत शिकवायच आहे...चांगल्या पदावर काम मिळवायच आहे,माझ्या घरच्यांसाठी सुद्धा खुप काही करायचय.."



शिक्षक.._ "अरे वा उत्तम! चांगलच आहे खुप मस्त विचार आहेत हो.."



तास संपला तस बेल वाजली....🔔



अजिंक्य.._ " आरर वा वाजला घण्टा..."
(तो पटकन बोलून गेला)



शिक्षक.._ "अजिंक्य$$ तुझी भाषा बदल रे किती तो अशुद्धपना,घण्टा क़ाय बेल तरी म्हण निदान..जाऊदे,रेड्याच्या कानात वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता...शीई शीई"



जिजा.._ "😂😂😂😂😂"



अजिंक्य.._ "क़ाय? रेड्याच्या कानामदी गीता वाचता यती..?"



निलांबरी.._ "गप रे आज्या..क़ाय तरी बोलतो.."



जिजा.._ "क़ाय रे आज्या,का तू त्रास देतोस सराना तुला माहिते ना सराना इतकी अशुद्ध भाषा नाही चालत नॉर्मल तरी ठीके..पन तू तर एब्नॉर्मल बोलतोस😂"



निलांबरी.._ "हा सराना खरच एक दिवस बेशुद्ध पाड़नार आहे.."



अभिजीत.._ "यार जिजा,निलू त्याची यात क़ाय चूक आहे तो तशा इन्वरमेन्ट मधे वाढला आहे तर क़ाय करणार..त्याची भाषा आहे तशीच..तो जाणून बुजुन नाही करत"



जिजा.._ "हो माहित आहे अभि पन एक सांगते रे तुला.."



नीलांबरी.._ "बर चला असुदे,आपन नाश्ता करुंन घेऊ.."



जिजा.._ "हु तुम्ही व्हा पुढे मी आले,मला मनु कडून माझ्या नोट्स घ्यायच्या आहेत घेऊन आलेच.."



अभिजीत.._ "बर ये आम्ही आहोत कैन्टीन मधे"



अभिजितचा तोवर फोन वाजला.....त्याने मागे वळून जिजाला पाहिले ती तिकडे उभी होती.......मग त्याने फोन उचला.......


अभिजीत.._ "आ ब हेलो भाऊ,बोल ना.."📲



समोरील व्यक्ती.._ "हेल्लो,अभि किती वेळ लागेल घरी यायला.."📲



अभिजित.._ "हो भाऊ,एक तासात येईन"📲



व्यक्ती.._ "ओके,जरा आपल्याला बाहेर जायचय हम्म ये मग लवकर.."📲



अभिजीत.._"हो ठेवतो.."📲
(तो फोन ठेवतो...)



निलांबरी.._ "अभि किती दिवस जिजा पासून अस लपवून ठेवनार आहेस..?"



अभिजीत.._ "नाही निलु,जिजाला हे समजला तर ती मैत्री तोड़ेल माझ्याशी,तेच नकोय मला..अग तू,जिजा,आज्या माझे बेस्ट फ्रेंड आहात तुम्हाला गमवायाचा नाही मला सो.."



अजिंक्य.._" खरा बोला तू,जर ह्यो झोल जिजाला समजला तर वाटोळा होईल..मना तर लय टेंशन आला"



अभिजीत.._" मना पन..."



नमन.._ "हेय हाय अभि!"



अभिजीत.._ "हाय ब्रो बोल ना...कसा आहेस??."



नमन.._ "मस्त...तुझ्या इंद्रा भाऊला खुप खुप थैंक्यू सांग..त्याच्यामुळे आज मी निश्चिंत आहे,त्यानी खुप मद्त केली,देवमानुस आहे तो...आणि चांगलाच धड़ा शिकवला त्या प्रिंसिपलला..😂आता तो बग एडमिट आहे हॉस्पिटलला.."



अभिजीत.._ " हा ना भाई😂🤘"



नमन.._ "चल मग नंतर भेटू..निवांत.."



अभिजीत.._ "हा बाय.."



जिजा.._ "एक मिनिट$$..अभि हे क़ाय होता, इंद्रा भाऊ? तो गुंड तुझा भाऊ आहे? तू कधी बोलाच नाहीस मला? आणि त्याने सराना क़ाय केल आहे? अच्छा म्हणजे म्हणून प्रिंसिपल सर किती दिवस झाले दिसत नाही आहेत..नक्की क़ाय गड़बड़ आहे अभि?तू खोट बोलास का पण??"
(मागून येत,जिजा रागात आणि प्रश्नार्थी नजरेने वीचारु लागली..)



अभि आणि बाकीच्याना काहीच कळत नव्हतं यावर क़ाय बोलाव.........अभि तर पुरता बिथरला होता,जिजाच्या अचानक प्रश्न विचारल्याने तो ही सुन्न झाला होता.......



क्रमशः

नमस्कार मंडळी पुन्हा नवीन कथा घेऊन आलेय मी........तर ही माझी कथा इंद्रजा...नावावरून समजल असेलच की कथा त्या दोघांच्या प्रेमाची आहे,त्यांच्या प्रवासाची आहे.....तर कोन असेल इंद्रा भाऊ?? आणि त्यांच् नाव ऐकून जिजा इतकी का रागवली?? त्याला गुंड का म्हणाली?? अभि का तिच्यापासुन सगळ लपवत आहे?? सगळ समजेल पुढच्या भागात,तर फ्रेंडज पहिला भाग कसा वाटला नक्की सांगा......कमेंट्स लिहून करा प्लीज मला पन समजू दे की कथा नक्की कशी आहे.....आणि खुप स्पोर्ट द्या.....😊



✍️©Pratiii💞
{Keep supporting!!}