"
बहीण - भाऊ
हे नातच वेगळ
कधी न तुटणार
कधी न कोमेजनार
हे नात बांधलय
रेशमाच्या धाग्यांनी
जपायला हवं सगळ्यांनी "
बहीण भाऊ या नात्याबद्दल गोडवा सांगणारा हा एक छोटासा लेख आहे . या पृथ्वीवर खूप नाती आहे . त्यातील एक प्रेमळ नात महणजे बहीण भाऊ हे. या नात्यामध्ये खूपदा भांडण होतात. तरीसुद्धा या नात्यामध्ये जो गोडवा आहे तो गोडवा आपल्याला दुसऱ्या कोणत्याही नात्यांमध्ये पहायला भेटणार नाही .
कवितेबद्दल थोडंसं -:
बहीण भाऊ हे एक अशाप्रकारचे
नात आहे की जे बाकीच्या सर्व नात्यापेक्षा एक वेगळंच आहे. असे नाते की ज्या नात्यामध्ये खूप काही होईल भांडण होईल ,रुसवा होईल पण या नात्यापेक्षा पवित्र नाते कोणते नसेल. हे एक असे आहे की जे कधी तुटणार नाही, कधी कोमेजणार नाही या नात्यामध्ये कितीही दुरावे आले कितीही भांडणे झाली तरी सुद्धा हे नात कधीच तुटणार नाही कारण हे एक आपुलकी चे नाते आहे .या नात्यामध्ये रुसवा भूगवा येईल पण तुटणे कधीच शक्यच नाही कारण हे नात एक वैशिषट्यपूर्ण आहे .
बहीण भाऊ हे नात रेशमाच्या धाग्याने बांधलेले आहे महनजे रक्षाबंधनाच्य| दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते ती राखी महन्जे बहीण आणि भाऊ यांच्यातील एक प्रेम असते .
असे प्रेम की जे पैसे देऊन सुद्धा आपण विकत घेऊ शकत नाही कारण त्या दिवशी आपली बहीण ती राखी आपल्या हातात बांधते त्या राखिमध्ये बहिणीचे आपल्या भवाबद्दल असलेले प्रेम लपलेले असते की जे प्रेम तुम्ही आम्ही कोणीच व्यक्त करू शकत नाही .हे नात आपण सगळ्यांनी जपायला हवं
कारण हे नात कधीच संपत नाही सतत फुलत राहत .
बहिणीच्या लग्नाआधी भाऊ बहिणीला खूप बोलत असतो की मी तुझ्या लग्नात तुला जाताना बघून खूप हसणार मला तू जाताना खूप आनंद होणार . असे सर्व तो फक्त वर दाखवत असतो पण त्याच्या जीवाची होणारी घालमेल त्याला माहित असते जेव्हा बहीण सासरी जात ना तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू कोसळत असतात ना ते अश्रू खूप लाखमोलाचे असतात. भाऊ किती पण मोठा असला ना तरी सुद्धा जेव्हा बहीण सासरी जाते ना तेव्हा तो खूप रडत असतो. आतून त्याला खूप दुःख होत असते. तो आपले दुःख लपवण्याच खूप प्रयत्न करत असतो पण आपली बहीण आता आपल्याला सोडून जाणार त्याचे त्याला खूप दुःख होत असते आणि तो ते दुःख कधीच लपवू शकत नाही. बहीण जेव्हा त्याला सोडून जात असते ना तेव्हा तो त्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू कधीच थांबवू शकत नाही आणि त्या अश्रूंना जेवढे मोल असते ना ते मोल कोठेही मिळू शकत नाही .
खूबसूरत एक रिश्ता तेरा मेरा,
है जिस पे बस खुशियों का पहरा,
नजर न लगे कभी इस रिश्ते को,
क्योंकि दुनिया की सबसे प्यारी है मेरी बहना ।
बहीण - भाऊ या नात्याबद्दल थोडंसं पण मनापासून लिहिण्याचा प्रयत्न मी या लेखाद्वारे केला आहे तरी यामध्ये माझ्याकडून काही लिहायचे राहिले असेल किंवा काही चूक झाल्या असतील तर मला माफ करा.
सर्वात वरील छोटीशी कविता आहे ती मी स्वतः केली आहे . यातील सर्व लेख मी माझ्या मनापासून लिहिला आहे . पण सर्वात शेवटचं जो quote आहे तो माझा नाही मला तो इंटरनेट वर मिळाला मला खूप आवडला महणून मी तो या लेखामध्ये घेतला आहे .
आपला मौलवान वेळ काढून आपण हा लेख वाचला मी आपला मनापासून आभारी आहे .
धन्यवाद आभारी आहे . .....