Memories in Marathi Short Stories by Akash books and stories PDF | आठवण

The Author
Featured Books
Categories
Share

आठवण

आठवण ही एक अशी जादुई गोष्ट आहे माणसाच्या जीवना मधील जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक सुंदर असा एक भाग बनवते किंवा असते प्रत्येक व्यक्तीच्या जीवना मध्ये त्याच्या वेगवेगळ्या आठवणी असतात कोणाच्या चांगल्या तर कोणाचे वाईट पण असतात नक्की तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो कोणी आपल्या प्रिय व्यक्ती ची आठवण काढत असतो तर कोणी आपल्या पासून दूर गेलेल्या आपल्या परीजनांची कोणी आपण सुंदर असे घालवल्या क्षणांची तर कोणी खूप दूर गेलेल्या त्या कधी न परत येणाऱ्या अपल्याची
किती सुंदर अशी ही आठवण विसरावे मानून बोले तरी आपल्या सोबत आयुषयभर राहणारी ती आठवण मानुस त्या आठवणीच्या सहाय्याने तो काळ पुन्हा जगतो
कोनी बोलता मेल्या नंतर कोणी काहीच घेऊन जात नाही त्या त्याच्या आठवणी त्याच्या सोबत जातात तो कोणाच्या तरी आठवणीत राहतो. अजून या जीवना मध्ये काय हवे असते आपल्या चांगल्या जीवना सोबत चांगले आठवणी जेणे करून आपण ते आठवू त्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाला आपल्याला यमराज विचारेल "काय आहे तुझा कडे?" तेव्हा आपण मोठ्या अभिमानाने सांगेल "गोड अशा आठवणींचा खजाना"
असाच एका समौद्रा किनारी मध्ये रेतिवर बसलो होतो तेव्हा एक लहान मुलगा फुगे विकणारा माजा कडे आला आणि मला बोल "ओ बाबा, फुगा घ्या ना तुमच्या मुला साठी " मी त्याच्या कडे पाहिले आणि हसून त्याच्या कडून तो फुगा घेतला तो गोड मुलगा तिथून निघून गेला माझे मुले तर माजा पाशी न्हवते पण त्या गोड मुलगा येवढं प्रेमाने बोल तो त्याचा गोड चेकरा बघून मी काही ना विचार करता तो फुगा घेतला पण याचे आता करायचे काय ?
त्या हात मध्ये असलेल्या फुग्याला बघून मला माजा बाबाच्या आठवणीने घेरले मी लहान असताना ते दर रविवारी आम्हाला अशाच समुद्र किनारी फिरायला घेऊन याचे असेच ते रेटिवर बसून आम्हाला खेळताना बघून खुश व्हायचे आणि तिथे मी फुगा घेण्या साठी त्याचा पाय धरून बसत आणि खूप विनवणी केले की ते मला ते फुगा घेऊन देत आणि त्या फुगा घेऊन माजा माझ्या चेहऱ्यावर येणारा तो आनंद पाहून ते किती तरी खुश व्हायचे तो दोन रूपे वाला फुगा किती आनंद द्यायचा आज खिशामध्ये खूप पैसे आहेत आणि एकसाथ १०० फुगे घेऊ शकतो पण तो बाबांनी घेऊन देलेल्या एका फुग्य मधला आनंद यात नाही तो आनंद परत मिळू शकतो तो फक्त या आठवणीच्या जोरावर लाख पैसा कमवु आपण पण आठवणी बदलण्या इतका किंवा पुसण्या इतका कधीच नाही
तो फुगा तसाच माजा हाता मध्ये होता माझे मुले होती नातू होते पण ते ही आठवणीतच मुलाला चांगली जॉब ची संधी आली मानून तो निघून गेला आणि तिथेच स्थायी झाला
ज्यांच्या सोबत संसाराचा गाढा ओढला त्याचे रुसवे फुगवे प्रेम .भांडण प्रेमाने घालविलेला आयुष्यातील प्रत्येक क्षण तेही आठवणीतच राहिला आहे.किती सुंदर असे ही आठवण तिची आणि माजी पहिली भेट त्या भेटी नंतर वाढत गेलेले आमच्यातील एकमेका बद्दलचे स्नेहा ते गोड लपून छापून होणारे भेटी एक मेकाच्या हातात हात घालून तासनतास होणारे गप्पा
या आठवणींच्या अथांग समुद्राच्या लाठा माजा मनाच्या किनाऱ्याला येऊन धडकत होत्या त्या समुद्राच्या तळाशी असणारे काही गोष्टी माजा मनाच्या किनाऱ्याला येऊन स्थिरावत होत्या किनाऱ्यावर रेतीने बनवलेल्या महलला ते लाटा हळू हळू कापात होत्या महलला स्वतःमध्ये सामील करून घेण्याचा परत्ना करीत होत्या त्या लाटांना काय माहिती की हा त्याचाच एक भाग आहे आणि शेवटी त्याच्यातच तो विलीन होणार आहे
आठवणींचा आज फक्त भास आहे
एक किनारा आज समुद्रा पासून दूर होत आहे. ज्याच्या पासून बनला त्याच्यातच तो आज विलीन होत आहे
रेतीचामहल कापला सर्व लाटांनी किनारा पण आज शांत आहे
निघाला प्रवासी नवीन किनारी
नवीन महल बांधायची ही तर खरी सुरुवात आहे