Arthik Saksharata Shrimantichi Suruvat in Marathi Business by Paay Trade books and stories PDF | आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात

Featured Books
  • ફરે તે ફરફરે - 37

    "ડેડી  તમે મુંબઇમા ચાલવાનુ બિલકુલ બંધ કરી દીધેલુ છે.ઘરથ...

  • પ્રેમ સમાધિ - પ્રકરણ-122

    પ્રેમ સમાધિ પ્રકરણ-122 બધાં જમી પરવાર્યા.... પછી વિજયે કહ્યુ...

  • સિંઘમ અગેન

    સિંઘમ અગેન- રાકેશ ઠક્કર       જો ‘સિંઘમ અગેન’ 2024 ની દિવાળી...

  • સરખામણી

    સરખામણી એટલે તુલના , મુકાબલો..માનવી નો સ્વભાવ જ છે સરખામણી ક...

  • ભાગવત રહસ્ય - 109

    ભાગવત રહસ્ય-૧૦૯   જીવ હાય-હાય કરતો એકલો જ જાય છે. અંતકાળે યમ...

Categories
Share

आर्थिक साक्षरता : श्रीमंतीची सुरुवात

Contents

परिचय

गुंतवणूक म्हणजे काय ?

गुंतवणूक करणे का गरजेचे आहे ?

गुंतवणूकीचे प्रकार

विविध आर्थिक संकल्पना

आर्थिक नियोजन

विविध सरकारी गुंतवणूक योजना

बँक अकाऊंटचे विविध प्रकार

कर्जाचे विविध प्रकार

विमा व त्याचे प्रकार

फसव्या योजना

इनकम टॅक्स

कुटुंबातील आर्थिक पारदर्शकता


परिचय

आजच्या जगात आर्थिक साक्षरतेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पैसा हा मानवी जीवनाचा केंद्रबिंदू बनला आहे. यामुळे आर्थिक शिक्षण हे एक जीवन कौशल्य म्हणून प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनासाठी दिले गेले पाहिजे हे खरे असले तरी, आपल्याला कोणी धनवान व्यक्ती त्याच्याकडील आर्थिक ज्ञान देईल असे कदापी होणार नाही. आपण स्वतःच आवश्यक असे आर्थिक ज्ञान मिळवले पाहिजे व आपल्या कुटुंबीयांना आर्थिक साक्षर बनवले पाहिजे. आपल्याला आर्थिक उत्पादनांची गुंतागुंत, फसव्या आणि पॉन्झी योजनांचा प्रसार, सेवानिवृत्तीनंतर चांगल्या दर्जाचे जीवनमान मिळविण्यासाठी पैशाची जमावा-जमाव इत्यादीसारख्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमुळे उत्पन्न आणि खर्चाच्या योग्य व्यवस्थापनासह वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच हे छोटेसे माहितीपर पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

आर्थिक शिक्षण आपल्याला आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्यास मदत करते आणि आपले उत्पन्न, खर्च, मालमत्ता आणि दायित्वे योग्यरित्या व्यवस्थापित करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते, फसव्या योजनांपासून सावध करते, ज्यामुळे आपले चांगले आर्थिक कल्याण होऊ शकते.

आर्थिक नियोजन प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यकच आहे. आर्थिक नियोजन हे बचतीच्या पलीकडे जाऊन बर्‍याच गोष्टीबाबत लागू पडते, आणि हेच आपण लक्षात घेतेले पाहिजे. आर्थिक नियोजन म्हणजे एक उद्देश असलेली गुंतवणूकच आहे आणि ही भविष्यातील उत्पन्नाची बचत व खर्च करण्याची आपण तयार केलेली योजनाच आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणून जाणीवपूर्वक आर्थिक नियोजनाचे धडे घेणे प्रत्येकासाठी महत्वाचे ठरते.

या साहित्यामधून आर्थिक नियोजन, आर्थिक साक्षरतेतील प्रमुख संकल्पना, विविध गुंतवणुकीचे पर्याय, बचत आणि गुंतवणूक उत्पादने, विमा आणि निवृत्तीवेतन, सेवानिवृत्ती नियोजन, पॉन्झी व फसव्या योजनांपासून सावधगिरी, कर बचत पर्याय, गुंतवणूकदार या सर्व संकल्पना स्पष्ट होतात आणि हे साहित्य वैयक्तिक व सामाजिक अर्थ विश्वाचे योग्य आकलन तुम्हाला प्रदान करते. हे छोटेसे पुस्तक सामान्य गुंतवणूकदारांसाठीच आहे आणि हे वाचून पूर्ण झाल्यावर, वाचकांना त्यांच्या वैयक्तिक जमा-खर्चाची अधिक चांगली समज आणि उत्तम व्यवस्थापन करण्याचे ज्ञान मिळण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांना आपले आर्थिक कल्याण साधता येईल. हे आर्थिक शिक्षण प्रत्येक पालकाने स्वतः आर्थिक ज्ञान घेऊन आपल्या मुलांना शालेय जीवनापासूनच शिकवणे आवश्यक आहे. मुलांना लवकरात लवकर बचतीची सवय लावणे, त्यांना आर्थिक साक्षर करून गुंतवणूक करायला शिकवणे व त्यांचे आर्थिक भविष्य सहजपणे सुरक्षित करणे या गोष्टी साध्य होतील या हेतूने ही माहिती आपल्यासमोर मांडत आहे. असे आर्थिक शिक्षण आपण पिढ्यानपिढ्या घेत-देत राहिलो तर काही वर्षातच आपला मराठी समाज हा 'सुशिक्षित व श्रीमंतांचा समाज' म्हणूनही नक्कीच ओळखला जाईल व आपली ही ओळख कधीही पुसणार नाही याची तीळमात्र शंका नाही.

गुंतवणूक म्हणजे काय ?

लहानपणापासूनच आपण आपल्या जीवनामध्ये कळत-नकळत वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकींबद्दल शिकत असतो. आता आपण गुंतवणूक हा विषय जाणीवपूर्वक एक आर्थिक संकल्पना या दृष्टीकोणातून अभ्यासणार आहोत. गुंतवणूक म्हणजे जाणीवपूर्वक, पैशावर पैसा कमवण्यासाठी, आपली आर्थिक संपत्ती वाढवण्यासाठी केलेला व्यवहार असतो. आपल्याकडील संपत्ती घर, जमीन, गाडी, रोख रक्कम, दागिने अशा व यासारख्या अनेक विविध स्वरुपात विभागलेली असते. हीच संपत्ती भविष्यात आपल्याला आणखी संपत्ती कमवण्यासाठी वापरता येते, पण त्यासाठी योग्य प्रकारची गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न मिळविणे आवश्यक आहे. आपल्याकडे फक्त संपत्ती असणे म्हणजे खूप काही आहे, आपल्याला आणखी कुठे विशेष गुंतवणूक करायची गरज नाही असा अनेकांचा समज असतो. हा असा समज काहीप्रमाणात योग्यही आहे, कारण जमीन, सोने अशा आपल्याकडील संपत्तीच्या किंमतीत वेळेसोबत वाढ होतच असते. परंतु आजपर्यंत त्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे म्हणजे भविष्यातही वाढ होणारच असा समज चुकीचाच आहे. भविष्यात त्यांच्या किमती काही कारणास्तव कमीही होऊ शकतात हे लक्षात घेऊन विविध ठिकाणी योग्य प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे. याचबरोबर आपल्याकडील विविध वस्तू, उपकरणे, वाहने यांची किंमत ते जसे जुने होत जाईल तसे कमीच होणार आहे. आपण एखादी गाडी घेतली आणि पाच वर्षांनंतर ती विकली तर आपल्याला खरेदीच्या किंमतीपेक्षा कमीच किंमत मिळणार आहे. म्हणून अशा किंमत कमी होणार्‍या वस्तु गरज असेल तरच खरेदी केलेल्या फायद्याचे आहे. असे असले तरी तुम्ही तुमच्याकडील गाडी भाड्याने देऊन उत्पन्न कमवू शकता. मग हे आशाप्रकारे गाडी भाड्याने देऊन उत्पन्न कमावणे म्हणजे गुंतवणूकच होय. याचप्रकारे तुमच्याकडे एखादे घर असेल, जमीन असेल तर तेही भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न कमवू शकता. याचप्रकारे तुम्ही कोणत्याही वस्तूचा किंवा निव्वळ पैशाचा वापर करून उत्पन्न कमवू शकता. यावरून असे कळते की आपल्याला उत्पन्न कमवून देणारे व्यवहार म्हणजेच गुंतवणूक होय. तुम्ही एखादी नोकरी करता ती सुद्धा एकप्रकारची गुंतवणूकच आहे, कारण तुम्ही तुमचे कष्ट, कौशल्य कामाच्या ठिकाणी गुंतवता आणि त्याच्याच आधारावर तुम्हाला उत्पन्न मिळते. परंतु नोकरी हा तुमच्या प्राथमिक उत्पन्नाचा मार्ग आहे, अशा प्राथमिक उत्पन्न मिळवून देणार्‍या व्यवहारांना आपल्याला तशा अर्थाने गुंतवणूक म्हणता येणार नाही. तुम्ही जे प्राथमिक उत्पन्न कमवता त्याचा दुसर्‍या ठिकाणी उपयोग करून इतर मार्गाने पैसे कमवण्याच्या हेतूने केलेला व्यवहारच आपल्याला गुंतवणूक म्हणून गणता येईल..........

फसव्या योजना

कमी वेळात जास्त परतावा कमवण्याची ईच्छा सगळ्यांनाच असते. नेमकं ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन काही चतुर परंतु ठगण्याचा हेतू असलेले लोक अशा योजना बनवतात. आपल्या त्या ईच्छेला खतपाणी घालून आपण बाळगलेली ईच्छा योग्यच आहे आणि ती सत्य होऊ शकते अशा प्रकारचा विश्वास आपल्या मनात निर्माण करण्याची कला ह्या फसव्या लोकांकडे असते. पैशाच्या बाबतीत असा विश्वास निर्माण करण्यासाठी मोठ्या लोकांची भरमसाठ उदाहरणं दिली जातात. इतरांना दिलेल्या खोट्या परताव्याचे पुरावे आपल्याला दाखवले जातात. अमक्याच्या मामाचा मुलगा, तमक्याच्या आत्या कशा श्रीमंत झाल्या किंवा अमक्या-तमक्याने आमच्याकडे एवढी गुंतवणूक केली, याची उदाहरणं सांगितली जातात. आपण अशा उदाहरणांनी (ऐकीव उदाहरणे) भारावून जातो आणि अशा फसव्या लोकांच्याकडे पैसे गुंतवतो. आपण पैसे गुंतवण्यापूर्वी एक विचार केला पाहिजे की, असे जर सहज श्रीमंत होता येत असेल तर ती योजना घेऊन हा व्यक्ती गावोगाव भटकत का फिरत आहे? तो का श्रीमंत झाला नाही? किंवा तो हे श्रीमंतीचे सीक्रेट असं वाटत का फिरत आहे? तो व्यक्ती जर अशा योजनांमुळे श्रीमंत झाला असता तर असा भटकत फिरला नसता. त्यामुळे अशा योजनांपासून दहा हात लांबच रहा.

फसव्या योजनांचे अनेक प्रकार समोर आले आहेत; त्यापैकी सर्रास घडलेला अन घडत असलेला प्रकार म्हणजे पॉन्झी योजना. तुम्ही अशा योजनेबद्दल ऐकले असेल की, एकाने त्याचे तीन मित्र जोडायचे त्या तिघांचे कमिशन पहिल्याला मिळणार आणि परत त्या तिघांनी प्रत्येकी तिघांना जोडायचे, अशी ही साखळी वाढत जाणार आणि सगळ्यांना कमिशन मिळत जाणार, या अशा योजनांना पॉन्झी योजना म्हणतात. असल्या योजनांमध्ये बहुतेक वेळा लोकांचाच पैसा लोकांना वाटला जातो अन खूप सारे लोक जोडले गेले की, सगळा मुद्देमाल घेऊन ती योजना चालवणारी कंपनी फरार होते. या अशा योजनेचा फटका महाराष्ट्रातील गावोगावच्या लोकांना बसला आहे. यापासून सावध रहा. असा जर सहज पैसा मिळत असता तर मोठ्या उद्योगपतींनी सगळा पैसा ह्यात गुंतवला असता, ते लोक आठ-दहा टक्के नफ्यासाठी मोठ मोठ्या कंपन्या कशाला चालवत बसले असते? झटपट पैसा फक्त लॉटरी मध्ये मिळू शकतो किंवा योगायोगाने एखाद्या शेअरचा किंवा क्रिप्टो करन्सीचा भाव कमी वेळात अनेक पटींनी वाढतो तेव्हा मिळू शिकतो. या तीन मार्गाव्यतिरिक्त झटपट पैसा कमवण्याची कोणतीच टेकनिक सध्या अस्तीत्वात नाही. तुम्ही एखादा उद्योग करून त्याचे कमी वेळात जास्त ग्राहक वाढवले तरीही तुम्ही झटपट पैसे कमवू शकता; पण काहीच न करता फक्त गुंतवणुकीतून झटपट पैसे कमवण्याच्या लॉटरी व शेअर बाजार किंवा क्रिप्टो करन्सी या तीनच शक्यता आता अस्तीत्वात आहेत.

आणखी एका प्रकारे लोकांना फसवले जाते. एखाद्या माहीत नसलेल्या कंपनीचा सेल्समन तुमच्याकडे येतो अन तुम्हाला कंपनीचा प्रॉडक्ट विकून कमिशन मिळू शकते असे प्रलोभण देतो. आपल्याला ही चांगली योजना वाटते आणि आपण प्रॉडक्ट विकायला तयार होतो. मग प्रॉडक्टची ऑर्डर द्यायला म्हणून आपल्याकडून अडवांस रक्कम घेतली जाते, खरी वाटणारी खोटी पावतीसुद्धा दिली जाते. पैसे घेऊन सेल्समन गायब होतो अन आपण फक्त कंपनीचा माल येईल याची वाट पाहत राहतो. या अशा बिनओळखीच्या लोकांबरोबर असले व्यवहार टाळले पाहिजेत. अशा फसव्या योजनांपासून नेहमी सावध रहा, पैशाचा लोभ नुकसान करू शकतो. तुम्हाला कमाई वाढवायची असेल तर एकाच्या जोडीला इतर छोटे व्यवसाय करा, आहे तो व्यवसाय वाढवण्यावर लक्ष द्या, भरवश्याच्या बँक व सरकारी योजनांमध्येच पैसे गुंतवा.

झटपट पैसे कमवण्याचा विचार डोक्यातून काढून टाकणे हा सर्वात चांगला उपाय तुम्हाला फसव्या योजनांपासून नक्कीच दूर ठेवेल. झटपट पैसे कमवण्याच्या हेतूने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर त्याआधी शेअर बाजार काय आहे, कसा काम करतो हे शिकून घ्या. शेअर बाजारातही लगेच पैसे कमवतो असे नाही, तिथे तर तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा द्यावी लागते. वर्षानुवर्षे चांगला शेअर ओळखून होल्ड करून ठेवला तर कुठे त्याची फळे खायला मिळतात. म्हणून योग्य शिक्षण न घेता गुंतवणूक करू नका.

उर्वरित संपूर्ण eBook अमेजॉनवर (Amazon) उपलब्ध.

आपल्या आजूबाजूला अनेक गुजराती, मारवाडी कुटुंबं राहतात. बहुतेक वेळा असेच दिसते की ते सर्व एकत्र कुटुंब पद्धतीत राहतात. हे लोक आपल्या मुलांना लहानपणापासूनच आर्थिक शिक्षणाचे धडे देतात. कुटुंबामध्ये आर्थिक पारदर्शकता ठेवतात, यामुळे लहान वयातच त्यांची मुले पैसा कमवण्याचा विचार करू लागतात व आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाणारी विचार प्रक्रिया सुरू होते. ही अशीच विचार प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू व्हाही याच हेतूने हे छोटेसे पुस्तक सादर केले आहे. या पुस्तकातील बहुतेक माहिती अनेकांना माहीतही असेल किंवा ही माहिती म्हणजे अगदीच प्राथमिक स्वरूपाची वाटेल पण हीच माहिती आर्थिक समृद्धीकडे घेऊन जाणारी विचार प्रक्रिया आपल्या डोक्यात नक्कीच सुरू करेल असा मला विश्वास आहे आणि म्हणूनच ही माहिती म्हणजे 'श्रीमंतीची सुरुवात' आहे असे मी म्हणेन.