gift from stars 26 in Marathi Love Stories by siddhi chavan books and stories PDF | नक्षत्रांचे देणे - २६

Featured Books
Categories
Share

नक्षत्रांचे देणे - २६

''भूमीला कळवायचं का हो?'' माई नानांना विचारत होत्या.

 

''नाही, कोणतीही गोष्ट सांगण्याची काहीही गरज नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. आता या मुलाचं रडगाणं ऐकवून तिला का त्रास द्यायचा?''

नाना

 

''ते बरोबर आहे हो. पण विभास तिला फोन करून सांगणार आहे, त्याआधी आपण थोडी कल्पना देऊ म्हणते.'' माई

 

''काय गरज आहे? तिला फसवताना त्याने काही कल्पना दिली होती का? आता ती फॉरेनर त्याला सोडून गेली, त्याला भूमी काय करणार. याच्या सुखदुःखाशी भूमीचा काडीमात्र संबंध नाही.'' नाना फार चिडले होते. त्यांनी माईना ताकीद दिली, भूमीला विभासच्या कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही कळवायचं नाही. माईंना विभास बद्दल वाईट वाटत होते. शेवटी पोटचा मुलगा.

 

‘नानांना मात्र वेगळाच संशय होता. ते आपल्या मुलाला खूप चांगलं ओळखत होते. 'आपण प्रॉपर्टीमधून त्याचे नाव काढून टाकले... ती परत मिळवण्यासाठी त्याने हा डाव रचला असावा. सहानुभूती मिळवण्यासाठी तो हे मुद्दाम करत असणार. लग्न करताना त्याने इकडे आईबापाला अजिबात कळवले नाही. आता ती मुलगी सोडून गेल्यावर याला भारतात यावेसे वाटावे. का? आणि जिला आम्ही पाहिलंही नाही, ना आमची पसंती होती. ती सोडून गेल्याच दुःख आम्ही का करत बसावं?' काहीतरी विचार करून त्यांनी भूमीला मेसेज केला.

‘विभास भारतात परत आला आहे, त्याचा फोन वेगैरे आला तर घेत जाऊ नकोस. काळजी घे.'

 

'हा आपली दुःख कहाणी ऐकवत बसेल, साधी भोळी मुलगी आहे. तिला खरं वाटेल याच सगळं. संपत्तीसाठी किंवा कशासाठीही असो, पण हा मुलगा तिच्याबरोबर परत संसाराची स्वप्न बघत असेल, तर मी तसे होऊ देणार नाही. तेवढी पात्रता नाही त्याची. पुन्हा लग्नाचा  विचारच करू नये त्याने.'  नाना स्वतःशीच बोलत होते.

 

*****

 

ऑफिसमध्ये मुखर्जी आणि वेदांत यांच्यामध्ये गुपचूप विषय रंगला होता. भूमी वरती बारीक लक्ष ठेवून असलेले मुखर्जी चिंतेचं होते. त्यांना या गोष्टीची भनक लागली होती कि, फ्रॉडच्या मागच्या काही केस बद्दल भूमी शोधाशोध करतेय. वेदांत देखील तिच्यावर नजर ठेवून होता. शिपायाला पाठवून तिची केबिन साफ करण्याचा डाव क्षितिजने हाणून पडला होता. त्यानंतर मात्र मुखर्जी आणि वेदांतला काहीही करणे शक्य झाले नाही.

''सर आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आपल्याकडून भूमीची नेमणूक झाली असती तर आपण तो बॉण्ड साइन करून घेतला असता. आणि तिला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागलं असत, पण गोष्टी आपल्या विरुद्ध घडत आहेत.'' वेदांत

 

''पागल हो क्या. आबा वो मॅडम डायटेक्ट सावंतने अँपॉईंट कि है. बॉण्ड का नाम भी मत निकाल. किसीने सुना तो गडबड हो जायेगा. अब उलटा-सिधा कुछ मत करो.'' मुखर्जी

 

''पण सर काहीतरी केलं पाहिजे. वरना सब हातसे निकल जायेगा.'' वेदांत

 

''कुछ नही होगा. उस मॅडम के खिलाफ ऐसा कुछ धुंडो कि हम उसका इस्तेमाल करके उसको ब्लॅकमेल कर सकेंगे.'' मुखर्जी

 

''सर आजकाल क्षितिज बरोबर जास्त दिसतात त्या मॅडम. ऑफिस मधून येता-जाता एकत्र असतात. मला तर दाट संशय आहे, समथिंग इस फिशी.'' वेदांत

 

''मैथिली और क्षितीज के बारेमे थोडा गॉसिप चालू कर दो. ये बात भूमी मॅडम तक पाहूचादो... देखो कहाणीने ट्विस्ट आयेगा.''   मुखर्जी

 

''बडीया सर जी. आजच कामाला लागतो.'' वेदांत

 

''बाकी मेरे कुछ लोग भूमी मॅडम के पिछे है... देखते है, कुछ इंटरेस्टिंग बात हात लगती है तो मजा आजाएगा.'' म्हणत मुखर्जींनी हसून वेदांतील टाळी दिली.

 

*****

 

''साठे काकांना फोन केला तर उचलत नाहीत ग. आजकाल येत पण नाहीत इकडे.'' मेघाताई बाल्कनीत येरझाऱ्या घालत होत्या. नेलपेंट लावणार्या आज्जो वरती न बघताच ''हू.'' म्हणाल्या.

 

''मम्मा तू पार्टीला जाण्याची तयारी करत आहेस का?'' आज्जोकडे बघत मेघाताईंनी विचारले.

 

''होय, आणि तू पण स्टाइलिश वनपीस घालून येणार आहेस. झाली का तयारी? कि रोजची महाराणी आपली पैठणी काढून ठेवलेस? '' आज्जो

 

''माझं काय चाललं आहे. आणि तुला काय पार्टीची पडलीय. मी नाही येत. जा तूच.'' मेघाताई त्यांच्या आईना म्हणाल्या.

 

''मी जाणार आहेच आणि तू पण येतेस. तुझ्या स्मार्ट यंग मॅनला घेऊन.'' आज्जो

 

''संजय नाही येणार.'' मेघाताई

 

''संजय अंग्री यंग मॅन आहे ग. मी क्षितीज बद्दल बोलतेय.''  आज्जो

 

''क्षितिजला या पार्टीज आणि ते लाऊड म्युझिक नाही आवडत. तुला माहित आहे तो नाही येणार.'' मेघाताई

 

''येणार तो. मला माहित आहे. तू तयारी कर. नाहीतर मी आहेस तशी तुला घेऊन जाईन.'' आज्जो

 

''ते व्यंकटेश काका येणार असतील ना. जा त्यांच्या बरोबर.'' मेघाताई

 

''ए वेंकी बोल. व्यंकटेश काका काय? हि इस यंग.'' म्हणत आज्जो एखाद्या अल्लड वयाच्या तरुणी सारखं लाजली.

 

मेघाताईंनी कपाळाला हात लावला. ‘’या वयात नातवाच्या मुलांना खेळवायचं तर मित्र गोळा करतेय.'' मेघाताई

 

''गप ग तू. मैत्रीला वय नसत. तुला हे समजलं असत तर संजय सारख्या अरसिक माणसाशी लग्न केलं नसतस म्हणा.'' आज्जो

 

'' संसारात अरसिक असला तरी हाडाचा बिझनेसमन आहे. मला पाहिजे ते न मागताच हजार असत. अजून काय पाहिजे.'' मेघाताई

 

''हे मात्र खर बोललंयस. मला असा कोण मिळाला असता तर कश्याला हे मित्र गोळा करत बसले असते. तुझा बाबा माहिते ना... नुसता घुम्या होता. घुम्या.'' आज्जो थोडी रागावली होती.

 

''मम्मा पुरे. तुझं म्हणणं खर करायला बाबाला मध्ये आणू नको. क्षितिजच माहित नाही, आपण जाऊया पार्टीला, मग तर झालं. तू तरी कधी एन्जॉय करणार म्हणा. बाबाच्या राज्यात नाही जमाल, जावयाच्या राज्यात मजा कर.''   मेघाताई हसत हसत आपल्या आईला समजावत म्हणाल्या.

 

''आता कसं. क्षितीज पण येणार, बघच तू. मी तशी सेटिंग लावून आलेय.'' आज्जो

 

''म्हणजे?'' मेघाताईंनी आश्चर्याने विचारले.

 

'' कळेल लवकरच….'' म्हणत आज्जो उठून खाली हॉलमध्ये आल्या. मेघाताई मात्र साठेकाकांशी काही कॉन्टॅक्ट होत का यासाठी प्रयत्न करत होत्या.

 

*****

 

कंपनीमध्ये काही लोग क्षितीज आणि मैथिली बद्दल गॉसिप करत आहेत, असं भूमीला जाणवत होत. ती जातायेता काहींना काही ऐकत होती. त्यामुळे ती थोडी डिस्टर्ब् होती.

 

क्रमश 

https://siddhic.blogspot.com/