Lord Prabhu Ramchandra Skilled Ingredients - 2 in Marathi Motivational Stories by Chandrakant Pawar books and stories PDF | भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक - २

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

भगवान प्रभू रामचंद्र कुशल संघटक - २

....श्रीरामचंद्र जसे पक्षीप्रेमी होते तसे ते प्राणी, पशु प्रेमी सुद्धा होते. रावणाशी लढणाऱ्या त्यांच्या सेनेमध्ये अस्वल, माकड असे योद्धे होते. रामसेतूच्या वेळी त्यांच्यासोबत काम करणारी खारु ताई होती. यावरून श्रीरामांचे पक्षी व प्राणी प्रेम दिसून येते. प्रभू श्रीरामचंद्र कट्टर निसर्गमित्र होते. राम-सीता-लक्ष्मण हे तिघेही निसर्ग मित्र होते. त्यांनी निसर्गाचा नाश केला नाही. उलट निसर्गाचे रक्षण केले. ते निसर्गाचे सच्चे भक्त होते. पर्यावरणाचे संवर्धक होते.
जंगलातून फिरताना अहिल्या नामक शिळेचे श्रीरामाने संवर्धन संरक्षण केले होते. तिचा उद्धार केला . समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगणारा दगड शोधून त्याचा त्यांनी रामसेतू बनवला होता... समुद्राच्या खाऱ्या पाण्यात तरंगणाऱ्या दगडाचा शोध रामसेनेने लावला होता . त्याची प्रचिती सुद्धा त्यानी दाखवून दिली होती.
श्रीराम, सीतामाता लक्ष्मण जंगलात फिरत होते. मनमुरादपणे जंगलामध्ये पर्यटनाचा आनंद घेत होते. काट्याकुट्यातून चालत होते.नदी ओलांडत होते. पर्वत पादाक्रांत करत होते. जंगलातील फळांचा आस्वाद घेत होते. फळा फुलांच्या अनेक जाती ते पाहत होते. बागडणारी हरणे पहात होते. नैसर्गिक पर्यटन ते अनुभवत होते. निसर्ग साक्षात्कार पर्यटन विचारांच्या असीम तंद्रीत असणाऱ्यांनाच मिळतो. तेच उत्तम पर्यटक ठरतात. निसर्गाच्या सानिध्यात असणार्‍याना त्या प्रकारचे पर्यटक ठरण्याचे भाग्य लाभते.
त्याच काळात सीतेचे अपहरण करण्यासाठी श्रीलंकेचा राजा रावण आकाश मार्गे विमानातून भारताचे पर्यटन करीत विहंगम दृष्य पहात भारत भूमीवर उतरला होता. त्याचा मुख्य हेतू सीता हरणाच्या होता. तो त्याच्या बहिणीला शूर्पणखाला भेटून श्री रामाच्या शोधार्थ जंगल फिरत होता. त्या निमित्ताने त्याला भारतीय भूमीचे पर्यटन लाभले. हजारो वर्षापूर्वीच्या पुराण काळातील तो पहिला विदेशी पर्यटक होता. रावणाने सीतेचे मातेचे हरण केले तेव्हा सीता श्रीलंकेमध्ये अशोक वनांमध्ये एक वर्षभर एक ते दोन वर्षे बंदिवासात राहिली. सीतामाता श्रीलंकेतून भारतामध्ये परत आली तेव्हा तिचे वय 33 वर्षाचे होते. आणि श्रीरामाचे वय चाळीस होते. रावणाचे वय हजारो वर्षाचे होते....
श्रीरामाने रावणाचा वध ज्या बाणाने केला तो बाण खूपच रहस्यमयी होता. तो बाण रावणाच्या शयन गृहातील पलंगाच्या खांबामध्ये एक कप्पा करून रावणाने लपवून ठेवला होता. फक्त त्याच बाणाने रावणाचा मृत्यू होऊ शकतो असा वर त्याला मिळाला होता. ही गोष्ट विभीषणाला माहीत होती. ते रहस्य विशेषणाने प्रभू श्रीरामचंद्राला सांगितले. युद्धाच्या काळामध्ये तो बाण श्रीलंकेतून रामाला श्री हनुमानाने आणून दिला होता. त्यासाठी हनुमानाने ज्योतिषाचे वेषांतर करून रावणाची पत्नी मंदोदरी हिला भेटून ज्योतिष शास्त्रा प्रमाणे तो अपशकुनी बाण घरात असणे म्हणजे रावणाची मृत्यूची घंटा आहे. त्यामुळे तो बाण मंदोदरीने घाबरून पती रक्षणासाठी ज्योतिषाच्या वेशात असलेल्या हनुमानाला देऊन टाकला होता.
त्या काळामध्ये समुद्र गमन हे वर्ज्य होतं.
तरीही श्रीरामांनी समुद्र गमन करून भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राम सेतू बांधला होता. श्रीराम आद्य पर्यटन कार होते.
नंतरच्या काळामध्ये भारतामधून वेगवेगळ्या देशांमध्ये लोकं कामानिमित्त नोकरीनिमित्त गेले होते.
त्यांच्याच प्रेरणेतून आता अमेरिका रशिया जपान चीन आणि इतर देश पर्यटन आणि गिर्यारोहण या क्षेत्रांमध्ये आघाडीवर गेले.
त्याची सुरुवात भारतीय भूमीतून झाली होती हे विसरून चालणार नाही हा पुरातन राष्ट्रीय वारसा सर्व जगाला भारतीयांनी दिलेला आहे.... त्यामध्ये श्रीराम, मातासीता, श्री हनुमानजी. आणि समस्त वानरसेना यांना पर्यटन आणि गिर्यारोहण यांचे श्रेय दिले जाईल. यात जराही शंका नाही. रावणाचा भाऊ बिभीषण सुद्धा श्रीलंकेतून भारतामध्ये त्यावेळी आला होता. त्यामुळे अर्थात त्याचे श्रेय रावण, विभीषण, आणि शूर्पणखाला थोडे फार जाते.
श्रीरामाने पायी पर्यटन केले. त्यामुळे श्रीरामाच्या ज्ञानात नक्कीच भर पडली असणार. त्यामुळेच तर नंतर त्याने दीर्घकाळ राज्य केले होते...
जय श्रीराम, जय सीतामाता ,जय लक्ष्मण, श्री हनुमान की जय............ .......
श्रीरामाच्या जेष्ठ बहिणीचे नाव शांता होते. ती श्रीरामाच्या अगोदर पासून एका राजाला दत्तक दिली होती. कौशल्या मातेची बहीण म्हणजे श्रीरामाची मावशी हिला शांता दत्तक दिली होती. श्रीरामांची माता कौशल्याच्या बहिणीचे नाव वर्षिणी होते . शांता नावाची श्रीरामाची बहिण जास्त कुणाला माहीत नाही. श्रीरामाला आणखीन एक बहीण होती . तिचे नाव कुकबी असे होते. म्हणजे श्रीराम, श्री लक्ष्मण, श्री भरत, शत्रुघ्न यांना दोन बहिणी होत्या. शांता ही कौशल्याची मुलगी होती. कौशल्या श्री रामचंद्रांची माता होती. दशरथ श्रीरामांचे पिता होते...
उत्तर प्रदेशातील आयोध्या राजधानीतून म्हणजे जिथे श्रीरामाचा जन्म झाला. त्या भूमीतून श्रीराम १४ वर्षे वनवासाला निघाले. तेव्हा ते अनेक ठिकाणी फिरले. आयोध्य मार्फत मार्गक्रमण करीत ते गोमती नदीला आले. तिथून गंगा नदी पार करून म्हणजे प्रयाग अलाहाबाद इथून चित्रकूट पर्वताजवळ आले. चित्रकूट पर्वताच्या जवळपास राम आणि भरत यांची भेट झाली. त्यावेळी भरताने श्री रामाच्या पादुका अयोध्या मध्ये नेल्या आणि पादुकांच्या नावाने राज्यकारभार सुरू केला. चित्रकूट जवळच यमुना नदी आहे. त्या मार्गाने ते मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या घनदाट जंगलामध्ये ते शिरले. त्याच जंगलाचे नाव दंडकारण्य होते. अनेक मुनींच्या आश्रमात त्याने वास्तव्य केले. दर मजल करीत नद्या सरोवर पर्वत जंगल पार करीत ते नाशिकला अगस्ती ऋषीच्या आश्रमात पंचवटी येथे पोचले. येथेच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. येथे जटायू आणि श्रीरामाची मैत्री झाली होती. अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही विदर्भ कन्या होती.
रावणाशी युद्ध करण्यासाठी श्रीराम केरळ मधील हम्पी नदी पार करून समुद्राजवळ पोहोचले.दंडकारण्या मध्येच सीता हरणाच्या वेळी जटायू आणि रावणाचे युद्ध झाले. जिथे जटायुचा मृत्यू
ती जागा आता नाशिकच्या जवळपास इगतपुरी येथे आहे.
केरळमधून ते पंपा नदीजवळ शबरीच्या आश्रमात गेले. पंपा याठिकाणी बोराची असंख्य झाडे आहेत. पंपा म्हणजेच हम्पी . हंपी वानर आणि अस्वल यांची किकिंष्धा नावाची नगरी होती.
आंध्रप्रदेशमध्ये भद्रांचल येथे रावणाने त्याचे पुष्पक विमान तेथील विमानतळावर उतरवले. त्या विमानतळावरुन रावणाने सीतामातेला लंकेला नेले. हम्पी पासून काही अंतरावर पार केल्यानंतर त्याची श्री हनुमान आणि सुग्रीववाशी भेट झाली तेथे वालीचा वध करून श्रीराम आणि मलय पर्वत पार केला. नद्या, धबधबे, जंगले पार करून ते समुद्रकिनारी आले होते. तामिळनाडूतील वेलंकनी येथे श्रीरामांनी वानर सेनेला एकत्र केले आणि त्यांची संघटना निर्माण त्यांची केली. त्यांना समुपदेशन करून रावणाचा विरुद्ध मदत करण्यास सांगितले. वानर सेना एकत्र झाल्यानंतर त्यांना घेऊन राम-लक्ष्मण रामेश्वरला गेले. रामेश्वर येथे समुद्र थोडा शांत आहे तेथे त्यांनी पूल बांधण्यासाठी जागा शोधली आणि धनुष्यकोडी याठिकाणी तीन दिवस ते जागा शोधत होते. धनुष्यकोडी येथे पूल बांधण्याचे निश्चित झाल्यावर त्यांनी नल आणि नील या वानरांच्या मदतीने श्रीलंके जवळच्या समुद्रात धनुष्यकोडी याठिकाणी समुद्राची खोली कमी आहे. ते ठिकाण धनुष्याच्या आकाराचे आहे तिथून श्रीलंका जवळ आहे.

तीस मैल लांब आणि एक मैल रुंद असा रामसेतू श्रीराम सेनेने तयार केला .सध्या रामसेतू समुद्राच्या पाण्यात तीस फूट खाली बुडालेला आहे. त्या पुला साठी त्यांनी समुद्रात तरंगणाऱ्या विशिष्ट प्रवाळ दगडांचा वापर केला . श्रीलंकेत पोचल्यावर आताच्या काळामध्ये असलेल्या " नोवारा इलिया " पर्वतापासून शंभर किलोमीटर जवळ रावणाची राजधानी होती. तिथल्या एका उंच पर्वतावर रावणमहाल होता. रावणाचा राजवाडा होता. तिथल्याच अशोक वाटीकेत बागेमध्ये सीता मातेला बंदी करून ठेवले होते. सीता मातेला रावणाने भारतामधून पळवून नेल्यानंतर सीता वाटिकेतील बंदीवासात असताना तिला स्पर्श केला नव्हता. याचे कारण रावणाला शाप मिळाला होता. एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध पुन्हा पुन्हा स्पर्श केला तर त्याचा मृत्यू अटळ होता. श्रीरामाने सीता मातेला रावणाने पळवून नेल्यानंतर तिचा शोध घेत लंका गाठली होती. हे बघून रावणाचे धाबे दणाणले होते.
रावणाला वाटले होते आपला देश श्रीलंका हा चारही बाजूंनी समुद्रामध्ये असलेला आहे त्यामुळे इकडे कोणी येऊ शकणार नाही किंवा आक्रमण करू शकणार नाही .परंतु श्री राम लक्ष्मण आणि त्याची वानरसेनेने ती समजूत खोटी ठरवली . परकीय भूमीवर पाऊल ठेवून श्रीराम श्रीलंका देशांमध्ये पोहोचले होते. रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीलंकेमध्ये श्रीराम तीन महिने थांबले . त्यांनी विभीषणाला तिथला राजा घोषित केला. विभीषणाने रावणाची पत्नी मंदोदरी हिच्याशी लग्न केले.
त्या विवाहाचा उद्देश असा होता. रावणाचे जे हितचिंतक होते .प्रशासक होते. रावणावर प्रेम करणारी रावणाची जनता होती. त्यांनी विभीषणाला त्यांचा राजा मानावा. त्यामुळे मंदोदरीचे लग्न श्रीलंकेचा राजा बनलेल्या विभिषणाशी जुळवण्यात आले.मंदोदरी आणि विभीषण एकमेकांना पती-पत्नी मानत नसतील तरी लोकांच्या दृष्टीने ते त्यांच्या लग्नामुळे पती-पत्नी होते. त्यामुळे श्रीलंकेचा पुढील कारभार करण्यास सोपे गेले.
नाहीतर श्रीलंकेत बंड माजून अनागोंदी कारभार निर्माण झाला असता. हा धोका टाळण्यासाठी बिभीषणाने स्वतःच्या भावाची पत्नी आपली बायको म्हणून स्वीकारली. मंदोदरी ही पतिव्रता म्हणून ओळखली गेली आहे. पतिव्रता म्हणजे एकाच पतीशी एकनिष्ठ असलेली स्त्री.
ज्याप्रमाणे द्रौपदीला पतिव्रतेचा वर प्राप्त झाला होता त्याप्रमाणे मंदोदरीला सुद्धा तसाच वर प्राप्त होता. रावणाच्या बेंबीत रामाने विशिष्ट बाण मारल्यानंतर रावणाचा मृत्यू जवळाला त्यावेळी मृत्यूसमयी रावणाने लक्ष्मणाला उद्देश केला की हे लक्ष मला तू तुझ्या भावासाठी एकनिष्ठ झालास त्यामुळे श्रीराम हे युद्ध जिंकले जर माझा भाऊ बिभीषण माझ्यासोबत असता तर हे युद्ध जिंकलो असतो. माझा भाऊ घरभेदी निघाला पण तू बंधू भक्त राहिलास. जरी तुझा सीतेने उपमर्द केला अपमान केला तरीही तू तुझ्या भावासोबत कट्टर पणे राहिलास हे रामाचे आणि तुझे पुण्य म्हणून घडले.
रावण रामाचे युद्ध एक महिना चालले. राम-रावणाचे युद्ध इसवीसन पाच हजार वर्षांपूर्वी झाले. याप्रसंगी रामाने स्वतःच्या कोदंड धनुष्याचा सहायाने रावणाच्या बेंबीत विशिष्ट बाण मारला आणि रावणाच्या बेंबीत असलेली अमृताची कुपी फोडली. ज्या अमृताच्या कुपीचे रक्षण कुंडलिनी शक्ती करत होती . ते बघून रावणाला जराही आश्चर्य वाटले नाही. त्याच्या बेंबीतील अमृताची कुपी फुटली होती याचा अर्थ त्याने त्याच्या पलंगात लपवलेल्या विशिष्ट बाणाने अमृताची कुपी फोडली होती . मंदोदरी ही सुद्धा रामाला सहाय्यभूत झालेली आहे. हे त्यांने ओळखले होते. रावणाचे केस सोनेरी रंगाचे होते. श्रीीरामाचे शरीर, चेहरा निळ्या रंगाचे होते. लक्ष्मण भरत शत्रुघ्न. यांचे शरीर गोरे होते. सीतामाई हीसुद्धा गोरीपान होती.
विभीषण, कुंभकर्ण, मंदोदरी रावणाचा मुलगा इंद्रजीत उर्फ मेघनाद . मेघनादची पत्नी सुलोचना आणि रावण पुत्र अक्षय कुमार या सर्वांनी रावणाला खूप समजावले होते. रामाची युद्ध करू नको जो माणूस दुसऱ्या देशातून मध्ये भारतातून पूल बांधून आलेला आहे त्याची इच्छाशक्ती किती मोठी असेल याचा विचार करायला हवा मात्र रावणाने कुणाचेच ऐकले नाही. रावण हा कुबेर हा चुलत भाऊ होता. कुबेराला हरवून रावणाने लंका काबीज केली होती . कुबेर हा देवांच्या तिजोरीचा कारकून होता. रावणाचे वडील विश्वश्रवा होते. त्याचे आजोबा पुलस्य ऋषी होते. ते ब्राह्मण होते. रावणाची बहीण शूर्पणखा आणि रावणाची दुसरी बहीण कुंभीनी होती. रावणाला एकूण सहा भाऊ होते. युद्ध कले सहर रावण ६४ कला मध्ये प्रवीण होता. रावणा पेक्षा भारी वाली होता. त्याने रावणाला युद्धात हरवले होते. आणि काखेमध्ये दाबून ठेवले होते.
श्रीलंकेला भारतामधून पोहोचण्या आधी श्रीरामांनी २०० ठिकाणी पर्यटन केले होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक , पंचवटी, दंडकारण्य, छत्तीसगड ,ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ असे अनेक प्रदेश त्यांनी पादाक्रांत केले होते.
राम एक पत्नी होता .एक वचनी होता. एक बाणी होता. मर्यादापुरुषोत्तम होता. रामाच्या भात्यातून सुटलेला बाण लक्ष्याचा भेद केल्याशिवाय पुन्हा माघारी भात्यात येत नव्हता. रामाची पत्नी सीता महा पतिव्रता होती. लक्ष्मणाच्या तीन पत्नी होत्या. त्याची पत्नी उर्मिला ही सीतेची लहान बहीण होती. जीतपद्मा ही मध्य प्रदेशाची होती. वनमाला ही महिधर राजाची मुलगी होती. तिने लहानपणापासून लक्ष्मणाशीच लग्न करेन असे ठरवले होते. जेव्हा तिचे लग्न दुसऱ्याशी लावण्याचे ठरले. त्यावेळी तिने एका झाडाला गळफास बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिचे लग्न अखेर लक्ष्मणाशी झाले. वनमाला ही लक्ष्मणावर अतोनात प्रेम करत होती.
राम एक पत्नी होता .तरी लक्ष्मण रामापेक्षा लक्ष्मण कमी असण्याचे कारण नव्हते. वनवासा मध्ये रामा सोबत त्याची प्रिय पत्नी सीता सोबत होती मात्र लक्ष्मणा सोबत त्याच्या तीन पत्नी पैकी एकही पत्नी सोबत नव्हती. वनवासात असताना लक्ष्मण आणि ब्रह्मचर्य व्रत घेतले होते. बंधू व्रत घेतले होते... यासाठी लक्ष्मण रामाच्या सानिध्याने महान बनला होता.​​