आता सागर ला आर्यांचा आधार वाटु लागला होता .आणि आर्या ला सागरचा ....दोघेही एकमेकांसोबत खूष होते . आता अर्याची मुले ही मोठी होऊ लागली होती .आपपल्या शाळेत अभ्यासात व्यस्त राहू लागली होती .आर्यांचा ही टिफ्फिन चा व्यवसाय छान चालु होता . त्याचबरोबर रडिओचि नोकरी ही मस्त चालली होती . तीन मुलाची जबाबदारी ती एकटी व्यव्स्त पार पडत होती .राधा आजी ची कमी तर तिच्या अयुषततुन कोणीच पूर्ण करू शकत नव्हते .तरी ही त्या मरणा नंतर कोठेतरी अजून आहेत ...तिच्यावर तिच्या मुलांवर दुरून लक्ष ठेवतात... अस तिला सतत वाटत होते . आर्या च्या अयुषत सगळ व्यव्स्तीत चालले होते .. पण, राधा आजी चा मुलगा सागर त्याच्या अयुषत मात्र काहीच व्यव्स्तीथ नव्हते .खरंतर त्याच्या अयुषा बदल आर्या ला ही फार काही माहीत नव्हते . ते जरी चांगले मित्र जाहले असले तरी राधा आजी च्या आजार पणा मुले आणि त्याच्या अश्या अचानक जाण्यामुळे तिला त्याला त्याच्या खाजगी अयुषा बदल फार काही विचारता नाही आले. पण राधा आजी कडून तिला थोडीफार महिती होती ...तेवढीच ... काय ती? सागर च आयुष्य खूप अस्वस्थ असल तरीही .....त्याची जराही कुणकुण तो अर्यला लागून देत नव्हता ...तिच्या सोबत तू नेहमी खूष राहत असे ...तिच्या मुलांसोबत ही तो खूप खूष असे . तिच्या मुलांनाही तो खूप आवडत असे . एके दिवशी आर्या ला समजले, की सागर ची अमेरीकेत्ली नोकरी गेली आहे .आणि तो एथे नवीन नोकरी शोधतोय .अर्यला समजताच ...तिने तिच्या रेडियो मधे त्या नोकरी देऊ केली. सागर ला ह्या नोकरीची गरज होती .त्या मुले त्याने ही ती नोकरी स्वीकारली ... आणि लवकरच तो ऑफीस मधे ही सगळ्याचा आवडती चा जाहाला. त्याचा स्वभावच तसा होता .सगळ्यावर छाप पडण्यासारखा....घरी तर होतीच पण आता ऑफीस मधे ही सागर आणि अर्यची जोडी खूप धमाल करत होती. एरव्ही आर्या आणि सागर खूप मज्जा करायचे .पण जर कधी आर्या ने किंवा ई तर कोण्ही चुकून सागर च्या मागच्या आयुष्या बदल विचारले .तर तो विषय टाळ्यांचा.... आर्यांच्या ही आता हे सगळ लक्षात येऊ लागले होते . ह्या आधी सागर ला वाईट वाटेल म्हणून ती फार काही विचारत नसे .पण आता तिला ते माहीत होणे ही, तितकेच गरजेच वाटु लागले .गेले तीन महिन्यांपेक्षा ते दोघे एकत्र होते .पण तिला त्याच्या विषयी काहीच माहीत नव्हते . आर्यांनी ऑफीस मधून घरी जातांना त्यां ला विचारायचे ठरवले . .....घरी जाण्याची वेळ जाहली .सागर त्यचा डेस्क आवरून आर्या च्या कडे आला ...आर्या चल आवर ....निघू या घरी ....आर्या ने...ही ....हो, म्हणत दुजोरा दिला ...आणि तिने डेस्क आवरायला घेतला ... डेस्क आवरताना तिने एक नजर ऑफीस मधे टाकली ....सगळे निघून गेले होते ....एक दोन जण कामानिमित्त थांबले होते .आर्याने एक नजरेचा कटाक्ष सागर कडे टाकला ..त्याचा मूड ही चांगला होता . आर्याने ठरवल हीच ती संधी ...ह्याच संधीचा फायदा घेऊन आपण त्याला आज सगळ विचारून टाकू ... काहीतरी मनाशी ठरवून आर्या पटकन डेस्क आवरून निघाली .....आर्या ला अस अचानक गडबडीत निघताना पाहून सागर ला थोड विशेष च वाटल ....पण काहीही न विचारता तो ही निघाला . ....आर्याने निवांत बोलता यावे म्हणून कॉफी शॉप मधे ज्याचे ठरवले . सागर ला घेऊन ती ऑफीस च्या जवळ असलेल्या कॉफी शॉप मधे घेऊन आली ..सागर ला आर्यांचे वागणे थोडे विचित्रच वाटले .पण असेल काहीतरी असे म्हणून त्याने ते सोडून दिले .