Husband and wife's rusve-fugve ... 13 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१३

Featured Books
Categories
Share

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...१३

तर मित्रांनो तुम्ही मागच्या भागात पाहिलंच सासरवाडी जाऊन माणूस कसा लंबा लागतो,

सालीबाईच रागवण म्हणजे आपल्या खिशाला फसवण... 😝 २४०० रुपयाचा लॉन्ग ड्रेस घेऊन बसलेला फटका....
आणि आता पुढे......
________________________________________


खिशाला दणका, पण कृपाच्या चेहऱ्यावर हास्य लॉन्ग ड्रेस मुळे आल......असो पैसा गेला पन ती आनंदी झाली...😊
त्यात पावसाचं वातावरण झाल्यामुळे सासरे बुआ, रितू, आणि तिच्या तिन्ही भावांचे फोनवर फोन यायला लागले. एक झाला कि एक कॉल रिसिव्ह करत होतो. तेव्हा कळलं लोक सासरवाडी मध्ये अधून-मधून का जातात.

भलताच मान, हव ते खायला, वरून प्रत्येक जण काळजी घेतो, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत जे लागतं ते आटोमॅटिक मिळतं, आता माझ्या लग्न न झालेल्या भावांनो घाई करु नका लग्नाची....! त्याला पण नशीब लागतं चांगल्या घरचा जावई व्हायला, नाही तर कुत्र सुध्दा विचारत नाही बरं का... Point be noted.... लग्न न झालेली मंडळी...मि पन हं...😝😁


. ****
पटकन किक मारली आणि घराच्या दिशेने यायला लागलो, आभाळ भरगच्च भरलेलं होतं, चारही दिशा काळ्याकुट्ट वाटत होत्या, हवेमध्ये गारवा निर्माण झाला मध्येच वाऱ्याची गार हवेची झुळूक यायची या वातावरणात मजा घेत शेवटी घरी पोहोचलो. तर चक्क सर्व चे सर्व वाट बघत होते.......
मनात विचार आला बापरे एवढी काळजी माझी😳 कमाल आहे बाबा..😁 घरी येताच फ्रेश व्हायला पाणी वगैरे टाकल, जसं काय त्या दिवसाचा मी राजाच होतो असं वाटत होत. आणि इथं घरी राजाला कोणी पाणी पी कोणी म्हणत नाही हो...

असो जय सासरवाडी,
खायला दे बासुंदी कडी..😝



आता संध्याकाळ झाली होती आणि पावसाच वातावरण हे बदलले होत.. जेवणामध्ये आंब्याचा रस, पुरणपोळी, भात, भजी, उडिदाचे पापड हे फक्त माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी मटण, कारण आपल्याला मटण वगैरे काय चालत नाही बाबा...😊

त्यात जेवणाला सुद्धा अहो घ्या हो, एक चपाती‌ तरी घ्या, आंब्याचा रस घ्या थोडातरी, भजी घ्या, पापड घ्या, काहीतरी घ्यावाच लागेलच खूपच आग्रह बाबा....
मध्येच कृपा रस वाढायला येते न्
तिला बघताच....: अगं नको कृपा भरपूर आहे अजून ताटा मध्ये लागलं तर नक्की घेईल...

कृपा : नाही नाही तुम्हाला एवढं घ्यावाच लागेल.

आताच साली एवढ आग्रहाने म्हणते तर घ्यावाच लागेल. घ्याव लागेल नाही, तर " मला पाहिजेच होता रस कारण रितू डार्लिंगने तिच्या हाताने बनवलेला होता" एकदम टेस्टी...😋😋😋

तर बघा न ते आता मला कळलं, लोक पंधरा दिवस झाले की सासरवाडीला का जातात...😝😝😁
कोणी कोणी तरच सासरवाडीला पडीक असतात बाबा. आणि पडीक जावयांना कोणी विचारत नाही बरका, घरजावाई बनू नका, नाहीतर प्यायला पाणी सुद्धा आपल्या हाताने घ्यावा लागत बर आधीच सांगतो भो... बरं ते काही असो पडीक राहू नका हं तुम्ही सासरवाडीला. नाहीतर बसणार बोंबलत...😝😝😁



जेवण वगैरे आटोपलं आणि संध्याकाळी रितू च्या भावाची मुलं, रितू आणि कृपा, घराच्या समोर फिरत असताना, रीतुच्या भावाच्या मुलांना पेरू दिसतात.

आणि रितूला : आत्तू पेरू तोडून देणा ना ग,
त्यात मधेच छोटा मुलगा रडायला लागतो. आणि खूप हट्ट करत मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर मी इथ लोटांगण घेईल मातीमध्ये आणि रडायला लागतो. आमच्या रितूला त्याचं रडणं बघावल जात नाही, आधीच बिचारी कोवळ्या मनाची, पटकन दया तीला येते... लहानपणी झाडावर चढायची, म्हणून आत्ता सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स घेऊन... लागली ना चढायला पेरूच्या झाडावर, आधीच पेरूचे झाड चिकन, पाच सात पेरू तोडले आणि थोडं वरती चढायला लागताच सटकला पाय आणि पडली ना खाली धपकन. हे बघताच लहान मुल हसायला लागले. त्या लहान मुलांना हसतांना बघून मला सुद्धा हसायला आलं. अचानक तीच लक्ष माझ्यावर गेल, आणि बापरे काय ते डोळे मोठे, चेहरा लालबुधं, नाक तर अस लाल झालं होतं बोरासारखं आणि खून्नसपणे मनातल्या मनात म्हणत असेल थांबा तुम्ही घरी चला मग सांगतो तुम्हाला...😠
ते बघून मला राहवलं नाही.....
पळतच फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली तिच्याजवळ जाऊन, तिला उठवून पाणी पाजले. हाता, पायाला वरखडे गेलेली बघून मला ते वाईट वाटलं..... तसंच तिला दोन्ही हातावर उचलून तिला रूम मध्ये घेऊन आलो, आणून बेडवर बसवणार तेवढ्यात ती stupid सोड मला.. मग काय दिलं न वरूनच सोडून...😝 नशीब बेडवरच पडली खाली पडली असती तर बापरे माझं काय झालं असतं आणि काय नाही ....😝😝

तिला मलम, पायाला बँडेज बांधत असताना, मधेच साला येऊन टपकतो... काय जीजु खूप काळजी घेतात माझ्या बहिणीची...


मि : हो हो....ये तुझी पण काळजी घेतो...ये ये बस इथ...
साला पडून गेला तर पुन्हा आलाच नाही...😜😜😜

पुन्हा कुठ दुसरीकडे तिच्या हातापायाला लागलंय का बघतो तर.‌... ती मिठीच मारून बोलते stupid, पागल....love you veda 😘....






क्रमश :
________________________________________
शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव..
________________________________________