तुम्ही भाग-11 मध्ये पाहिलंच... वरण बट्टी आणि वांग्याची भाजी , खानदेशातील सुप्रसिद्ध जेवण रितूने आज खूप चवदार बनवलं होतं. आणि घरची मंडळी जेवणात येवढी गुंग होतात कि स्वयंपाक कसा झाला ते न सांगता सर्व संपवून टाकतात. तर घरातील स्त्रियांना जेवन उरतच नाही..पून्हा रितू जेवण करायला स्वयंपाकघरात जाते....
आणि पुढे....😁
________________________________________
"काय पोटभरी दाबा भो वरण बट्टीले आखो फिरी येवू अन जेवाले बसू" आसा विचार करतस भो मना खानदेश ना लोके...😁
जेवण वगैरे आटपून सर्व मंडळी झोपी जातात...
दहा-बारा दिवसानंतर.......🤗
लग्न होऊन आता दहा-बारा दिवस होतात. मग काय येतो ना सासरवाडी वरून फोन मामाचा. लय भारी वाटतं मामा बोलायला...😜 आणि त्यावरून भारी तेव्हा वाटतं एवढा मोठा माणूस आपल्याला मान पान देतो..😊
बरं जावाई मी काय म्हणी रायनू.... येऊन जा गोड जेवणाला बरं वाटेल आम्हाला तुमची ओळख वगैरे होईल तर येऊन जा उद्या परवा. हे सर्व बोलण रितू एकदम कान देऊन ऐकत असते. आणि फोन ठेवताच काहीही न विचारता...
"कधी जायच मग माझ्या बाबांकडे"😊
अग रीतू थोडं थांब... भाऊ गाडी घेऊन गेलाय तो येईल दोन-चार दिवसात तो आला की आपण जायच ना.
रितू काही ऐकत नाही बाबा, मला गाडी मध्ये नाही जायचं मला बाईक वर आवडेल जायला...😊
बरं झालं बाबा तेवढं तरी ईला बाईक वर आवडते जायला, आता मी मनामध्ये विचार करत होतो, दोन हजार रुपयाचे डिझेल, वरून तिकडे खर्च, पूर्ण खर्चच खर्च...
त्या पेक्षा बरी आहे आपली बाईक 105 रुपये लिटर झालं तरी, दोनचाशेच्या पेट्रोलमध्ये घरी येऊन जाते... पण बाबा गाडिला तर अख्खी दोन हजाराची नोट लागते. असो बायकोने आज थोडे पैसे तरी वाचवले...
मी खुश बायको खुश...😜😝
"आपला खर्च वाचला, तिला आनंद झाला"😁
ठरलं मग उद्या जायचं...
उद्या सकाळी निघायचं म्हणून रितू बॅग पॅक करून एकदम रेडी झाली.
उद्या सकाळी तयारी वगैरे करून निघालो.
शेवटी पोहोचलो बाबा सासरवाडीत...🤭
मग काय.... येऊन बसले माझ्यापेक्षा मोठ मोठे माझे तीन तीन साले बुवा...😝😜 नमस्कार वगैरे करून झालं, खूप आदर करू लागले, खूप आदराने बोलू लागले, त्यात मला खूप मोठा प्रश्न पडला, हे तीघ माझ्यापेक्षा मोठे यांना हाक देताना म्हणून तरी काय..? 😁 कारण तीघही माझ्यावरुन मोठमोठे.... असो करणार तरी काय शेवटी "अहो का हो वरच बोलणं चालणं चालू केलं"
तेवढ्यात रितू सारखीच सेम दिसणारी, रितूची लहान बहीण कृपा, क्लास करून घरी येते.
मी जोरातच ऐ बाई आत्ताच आली न कुठे स्कूल बॅग घेऊन कोणत्या शाळेला निघाली बस ना गप्प घरी...
तेवढ्यात माझ्या शेजारी बसलेले माझे तिन्ही साले, जोर जोरात हसायला लागले, अहो जिजू आमची लहान बहीण आहे ती, दोघी बहिणी मध्ये काही फरक नाही फक्त दोन इंचाचा, उंची मध्ये फरक आहे. इचे केस लांब तर तिचे थोडे कमी, बस दुसरा काही फरकच नाही. जाम कन्फ्युज करून टाकलं ना बाबा या कृपा ने तिची कृपा करून....😝😝
हे कृपाला कळताच अहो जिजू मला ओळखलं नाही का..? जा...व्हा...! मी आता तुमच्याशी बोलतच नाही मला कसं ओळखलं नाही तुम्ही...!😏
मी मनातल्या मनात बापरे पहिल्याच दिवशी सालीचे हे रुसवे-फुगवे... 😳
कृपाला मनवत, अग माझी आई आता तुमच्या सेम दिसण्याच्या कृपेने अशी कृपा घडून आली तर मी काय बरं करू....
कृपा : हं.... मग असं बोलना जिजू...😊 तुम्ही एक काम करू शकता. माझ्या मैत्रिणीने एक मस्त छान लाॅगं ड्रेस घेतला, मला पण तसाच पाहिजे. आणि तो पण आत्ताच घेऊन देणार तर बोलते नाहीतर, नाही...😏
मला तर धक्काच बसला.... इथे मी पेट्रोल-डिझेल वाचवण्याच्या नादात, आणि साली ड्रेस घ्यायचा नांदात...
इथं माझे साले तिच्याकडे डोळे वटारुन वटारुन बघतात, पहिल्याच वेळेस आले आणि ही कृपा अशी करत आहे... कृपा कडे बघत माझे तीनही साले कृपाकडे मोठ मोठे डोळे करून बघता. हे मला कळतं पण कृपा काही त्यांच्याकडे लक्ष देत नाही..😝😝😁
काय करणार बाबा असो घ्यावा तर लागणारच... चल ग माझी सालीबाई, चल जाऊ आणि घेऊन येवू... तुला तुझ्या आवडीचा लॉन्ग ड्रेस.
हे शब्द ऐकताच कृपा डायरेक्ट गाडी जवळ जाऊन थांबली. आणि आवाज देत "चला हो जीजु उशीर होतोय खूप"
काय करणार बाबा आता, सालिने फार 2400 रुपये मध्ये ड्रेस काढला... बरं झालं बाईक घेऊन आलो, नाहीतर अख्खा पाच हजारात लंबा लागला असतो.😝😝
आता तुम्हाला काय सांगू... एवढे भारी वाटतं ना सासरवाडीत जाऊन मानपान मिळाला की असं वाटतं स्वर्गसुख मिळालं...😝😝😜 पण खर्च झालं ना लई म्हणजे लई म्हणजे जाऊद्या आता....😝😝😝..
काय लग्न झालेली मंडळी बरोबर आहे ना...? कि काही चुकलं...!😝😁😁
सर्व वाचक मित्रांनो तुम्ही आता मनाला लावून घेऊ नका तुमचं लग्न झाले की तुम्हालाही कळेल....😝😝
क्रमश:
________________________________________
शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव
________________________________________