Shri Sant Eknath Maharaj Shri Guru Dattatreyanni gave grace in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | श्री संत एकनाथ महाराज श्री गुरू दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला

Featured Books
Categories
Share

श्री संत एकनाथ महाराज श्री गुरू दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला

श्री संत एकनाथ महाराज” ४ “श्री दत्तात्रेयांनी अनुग्रह दिला.”

चरित्र”

एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण व

मातोश्रीचे नाव रुक्मिणीबाई होते.त्यांचा जन्म शके १४५०

चे सुमारास झाला.त्यांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला होता.त्यांच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांनी त्यांच्या माता पित्याचा अंत झाला.

त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचा सांभाळ केला.

एकनाथ महाराजांची बुद्धी कुशाग्र होती.लहानपणा पासून

त्यांची लहान मोठी स्तोत्रे पाठ होती.त्यांची मुंज सहाव्या वर्षी झाली.त्यांच्या आजोबांनी त्यांना संस्कृत शिकवण्यासाठी एका विद्वान

पंडितांची नेमणूक केली.गुरू कडून रामायण, महाभारत याचे ज्ञान मिळाले.सहा वर्ष्याच्या कालावधीत सर्व विद्या एकनाथ महाराजानी आत्मसाथ केली.बालवयात त्यांनी,मनन हरिचिंतन याशिवाय अन्य गोष्टीत लक्ष घातले नाही. ते अत्यंत नम्र

स्वभावाचे होते. एकदा ते शंकराच्या देवळात ध्यानस्थ बसले असता,त्यांना देवगिरी येथे श्री जनार्दन स्वामींकडे3 जाऊन गुरू मंत्र घेण्याची प्रेरणा झाली. व एके दिवशी कोणास न सांगता ते घरून देवगिरी येथे,श्री जनार्दन स्वामींच्याकडे गेले.त्यांचा शोध त्यांच्या आजी,आजोबांनी केला पण ते सापडले नाहीत.श्री जनार्दनस्वामी यांनी श्री एकनाथ महाराजांची तेजस्वी मूर्ती पाहून आपला शिष्य म्हणून ठेऊन घेतले.श्री एकनाथ गुरुगृही त्यांची सेवा अनन्य भावाने करीत असत..त्यांची उत्कट सेवा विचारात घेऊन त्यांना अनुग्रह द्यावा असे श्री जनार्दनस्वामी यांनी ठरविले.एकदिवस श्री जनार्दन स्वामी एकनाथांना घेऊन नेहमीच्या जंगल ठिकाणी श्री दत्तात्रेयाला भेटायला गेले.त्या ठिकाणी श्री एकनाथांना प्रत्यक्ष श्रीदत्तात्रेयाचे दर्शन झाले व त्यांना त्यांच्या पासून अनुग्रह मिळाला.श्री जनार्दनस्वामींनी श्री एकनाथांना तीर्थयात्रा करण्याचा आदेश दिला.तीर्थयात्रा करीत असतांना त्यांना चंद्रभट नावाचा विद्वान ब्राम्हण भेटला.पंचवटी पर्यंत श्री जनार्दनस्वामी व चंद्रभट श्री एकनाथांबरोबर होते.पंचवटीला

श्रीरामाच्या समोर श्री जनार्दनस्वामींनी श्री एकनाथांना चतु:श्लोकी भागतावर प्राकृत टीका करावी म्हणून आज्ञा केली.

एकनाथांची भाषा समृध्द होती,त्यांच्या जिभेवर सरस्वती लोळण घेत होती.

श्री जनार्दन स्वामींनी त्यांना

पुढील यात्रा करण्यास सांगितले. उतरेकडेल सर्व तीर्थांचे दर्शन घेत श्री एकनाथ पैठण येथे परत आले. वृध्द आजी,आजोबांना

खूप आनंद झाला.गुरू आज्ञेप्रमाणे त्यांनी पैठण येथे कायमचे वास्तव्य केले.एकनाथ महाराजांचे घर म्हणजे भक्ती रसाची पाणपोई होती.वैजापूर येथील

एका संपन्न ब्राम्हणाची मुलगी चक्रपाणींनी श्री एकनाथ महाराजांना वधू म्हणून पसंत केली..”व एका सुमुहूर्तावर त्यांचे लग्न त्या

मुलीबरोबर लावले.त्या मुलीचे नाव गिरीजाबाई असे ठेवण्यात आले.श्री एकनाथ बाह्य दृष्टीने जरी ते संसारी होते तरी आतून ते निरिच्छ होते.त्यांना उध्दव नावाचा एक उत्तम शिष्य मिळाला.तो शेवटपर्यंत त्यांच्या जवळ होता.नाथांच्या प्रपंचाला पत्नीही उत्तम मिळाली.त्या शांत,सुशील व दयाळू होत्या.रात्री अपरात्री क्षुधितास

जेऊ घालण्याचा गिरीजबाईंनी

कधी कंटाळा केला नाही.प्रपंचाचे अंतरंग गिरीजबाईंनी व बहिरंग उद्ध वाने सांभाळले.त्या दोघांनी नाथांची अनन्यभावे सेवा करून आपला परमार्थ साधला.एकादशीस स्वयंस्फूर्तीने कीर्तन केले.ते इतके चांगले झाले की,लोकांचे त्यांच्यावर प्रेम बसले.नाथांच्या कीर्तनाला एकदा त्यांचे गुरू जनार्दनस्वामी उपस्थित होते.नाथांच्या कीर्तनाला उत्तरोत्तर रंग चढू लागला. कीर्तन व नामस्मरण यावर नाथांनी पुष्कळ अभंग रचना केली आहे.यातून नाथांच्या भजनी भारुडाचा जन्म झाला.

सर्व दानात श्रेष्ठ जे अन्नदान ते त्यांनी हयातभर केले.त्यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताचा वास असल्याने त्यांना कसलीही कमतरता भासली नाही.,नाथांना त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षामुळे निवडक व छलक फार निर्माण झाले.

परंतू त्यांची सोशिकता,क्षमाशीलता व समता अलौकीक असल्यामुळे,निंदक व छलक

यांचे काही चालले नाही. निंदकाचा व छलकाचा त्रास प्रत्येक थोर पुरुषाला सहन करावा लागला आहे.नाथ याला अपवाद नव्हते.नाथांनी

एका अभंग चरणात म्हंटले आहे.की,’निंदक आमुची काशी । आमची पातके अवघी नाही ।।असे

कर्नाटकात एका सावकाराने विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती कारागिरा कडून करविला. तो त्याची स्थापना करणार तोच त्याला सतत V दिवस स्वप्नात दृष्टांत झाला की, पैठण येथे एक एकनाथ नामक एक सत्पुरुष आहे ,त्यास या मूर्ती नेऊन दे,त्या प्रमाणे त्या सावकारानी,त्या सुंदर मूर्ती पैठण येथे जाऊन श्री एकनाथ महाराजांना दिल्या.एकनाथ महाराजांनी

शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या राहत्या वाडयात केली.त्या मूर्ती अद्यापही नाथमहाराजांच्या राहत्या वाड्यात आहेत.

सुधाकर काटेकर