Thats all your honors - 18 - last part in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | दॅट्स ऑल युअर ऑनर - १८ - (शेवटचे प्रकरण)

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

दॅट्स ऑल युअर ऑनर - १८ - (शेवटचे प्रकरण)

दॅट्स ऑल युअर ऑनर -१८
(शेवटचे प्रकरण)

या निकाला नंतर आकृती ,सौम्या कनकओजस पाणिनी पटवर्धन बरोबर त्याच्या ऑफिसात बसले.आकृती तर आनंदाने वेडी व्हायचीच बाकी होती.आपल्या डोळ्यातून अश्रूंना मोकळे पणाने वाट करून देत होती.सौम्या तिला प्रेमाने थोपटत होती.

“ चला , एक प्रकरण संपले ! ” पाणिनी उद्गारला.

“ तुमच्या दृष्टीने अनेक खटल्यातला एक खटला संपला पण माझ्या दृष्टीने एक नवी सुरुवात झाली आहे.नव्या जीवनाची सुरुवात.” आकृती म्हणाली.

“ पाणिनी काय झालं नक्की ? बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.”ओजसम्हणाला. “ म्हणजे मैथिली पूर्वीच अभिज्ञा बोरा कशी पोचली तिथे.आणि मैथिली आधी पोचली असती तर काय बदल झाले असते ?”

“ साधे आणि सोपे आहे.” पाणिनी म्हणाला “ मैथिली हुशार होती.तिने ओळखले होते की कपडे आणि बूट जर अभिज्ञा बोरा आणून देणार होती तर तपन ला मी कशाला हवे होते? अर्थात स्त्री म्हणून उपभोग घेण्यासाठी.म्हणजे जे आकृती बाबत घडले ते तपन ने तिच्या बाबत केले असते.म्हणून तिने अभिज्ञा बोरा ला सांगितलेच नाही की तपन ने तिला म्हणजे मैथिलीला पण बोलावले आहे. तिने एवढेच सांगितले की तातडीने कपडे आणि बूट घेऊन तपन ला नेऊन दे.अभिज्ञा बोरा गेल्या नंतरच जायचे असेच नियोजन मैथिली ने केले होते.तरी तपन समोर एकटे जायला लागू नये म्हणून तिने जयराज आर्य या आपल्या प्रियकराला सोबत यायला सांगितले.”

“ पण अभिज्ञा बोरा स्वतःची गाडी न नेता अग्नी रोधकाजवळ लावलेली तपन ची च गाडी घेऊन का नाही गेली तपन कडे?”ओजसने विचारले.

“ अभिज्ञा बोरा ला मैथिली ने कुठे सांगीतले होते की त्याची गाडी घेऊन ये म्हणून तिला माहीत पण नव्हते तेव्हा की त्याची गाडी अग्नी रोधकासमोर लावली वगैरे.तपन च्या डोक्यात होत की मैथिली ने तपन ची गाडी घेऊन त्याच्याकडे यावे,अभिज्ञा बोरा तिच्या स्वतःच्या गाडीने त्याच्या घरून त्याच्या वस्तू घेऊन येईल ,नंतर अभिज्ञा बोरा आणि मैथिली या दोघीजणीअभिज्ञा बोरा च्या गाडीने परत जातील आणि तपन स्वतःची गाडी घेऊन आकृती च्या घरी जाईल ,तिला आश्चर्याचा धक्का देईल आणि त्याची अपुरी इच्छा पूर्ण करेल. ”

“ कपड्यांचे काय? ”ओजसने विचारले.

“ अभिज्ञा बोरा ने त्याला दिलेले कपडे आणि बूट त्याने बदलले होते. मात्र त्याचे ओले कपडे आणि बूट तिथेच पडले होते.तो मेल्यावर अभिज्ञा बोरा निघून गेली तेव्हा पासून ते तिथेच होते.मैथिली आणि जयराज आर्य यांनी ते तिथून उचलले आणि नंतर गॅरेज मधे लपवले.मैथिली चा प्रयत्न सर्वाना वाचवण्याचा होता,आकृती बद्दल वाईट मत होऊ नये असा,अभिज्ञा बोरा आणि जयराज आर्य वर आळ येऊ नये असा. त्यामुळे तिने तपन ची गाडी पुन्हा बरोबर अग्नी रोधकासमोर ठेवली. ज्या पद्धतीने आकृती ने ठेवली होती तशीच.ठेवली.तिचा आणि जयराज आर्य चा अंदाज होता की आकृती गेल्यावर काय झाले त्या आऊट हाऊस् मधे हे कोणालाही कळणार नाही. ”

“ खून झाल्याचे समजून ही पोलिसांना कळवले नाही हा मैथिली आणि जयराज आर्य चा गुन्हा नाही का? ”ओजसने विचारले.

“ नक्कीच गुन्हा आहे, जर सरकारी वकील तो सिद्ध करू शकले तर.

“ ते का नाही सिद्ध करू शकणार? ”ओजसने विचारले.

“ त्या दोघांनी लग्न केलंय , त्यामुळे एकमेकांविरुद्ध ते साक्ष नाही देऊ शकत.खांडेकर असे सिद्ध करू शकतील की मैथिली ने अभिज्ञा बोरा ला फोन करूनआऊट हाऊस मधे जायला सांगितलं, पण ते कधीच ”सिद्ध करू शकणार नाहीत की प्रत्यक्षात मैथिली तिकडे गेली होती.याचे कारण असे की अग्नी रोधकापुढे गाडी लाऊन उतरलेली तरुणी मैथिली होती की आकृती यात पायस हिर्लेकर ने एवढा घोळ घातलाय की एकदा तो हो म्हणतो एकदा नाही म्हणतो कधी तरी म्हणतो मला सांगता नाही येणार. पोलिसांनीच त्याचा हा मानसिक गोंधळ घातलाय आणि स्वत:ची बाजू कमकुवत केली.” पाणिनी ने खुलासा केला.

“ ओमकार आणि मंडलिकबाईने जर तपन कडून पाच हजाराचा चेक घेतला तर तो बँकेत नेऊन रोख का नाही काढली? ” सौम्या ने शंका विचारली.

“ मला शंका आहे की त्यांचा आणखी एक कोणीतरी एक मध्यस्त असावा ,त्याच्याकडे त्यांनी चेक दिला असावा.माणूस मेल्यावर बँक त्याच्या सहीने काढलेल्या चेक चे पैसे देत नाही हे त्या मध्यस्ताला माहीत असावे.नसत्या लफड्यात अडकण्यापेक्षा तो बँकेत गेला नसावा. ” पाणिनी म्हणाला.

“ आणि नमन ने मैथिली ला दिलेला मोठ्या रकमेचा चेक? ” सौम्या ने विचारले.

“ तपन चा बाप नमन कितीही कडक असला आणि तपन ला ताब्यात ठेवायचा प्रयत्न करत असला तरी खून झाल्या नंतर त्याचा बाहेरख्याली पण समजा समोर येऊ नये अशी त्याची इच्छा असणारच.त्यामुळे जयराज आर्य आणि मैथिली दोघांना साक्षी करता बोलावले जाऊ नये म्हणून त्याने त्या दोघांचे लग्न लाऊन देण्याचे ठरवले.त्या दोघांना एकमेकात रस आहे हे त्याला माहिती असावे.नवरा बायको परस्पर विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत हे त्याला माहीत होते.लग्नासाठी आणि कोर्टात उपलब्ध न होण्यासाठी बाहेर गावी जाण्यासाठी म्हणून त्याने मैथिली ला मोठी रक्कम चेक ने दिली. ” पाणिनी म्हणाला.

“ पण नमनलुल्लाला सगळ अद्ययावत कसे कळत होते काय काय घडत होते ते? ”ओजसने विचारले.

“ विसरतोयस तू, कनक,मी तुला म्हणालो होतो की पूर्वी त्याच्याच कंपनीत नोकरीला असणारी मैथिली ही अत्यंत चाणाक्ष पोरगी आहे.! ” पाणिनी म्हणाला.

“ आकृती च्या फ्लॅट मधे तुझ्या समोरच ड्रेस बदलून आकृती चा ड्रेस अंगात चढवताना तू तिच्या बुद्धीचे कौतुक करत होतास की............????? ” कनक डोळा मारून म्हणाला.