sparsh pavsacha - 2 in Marathi Love Stories by Akash books and stories PDF | स्पर्श पावसाचा? - 2

The Author
Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

स्पर्श पावसाचा? - 2

पाऊस पडून थांबला होता पोटात दुखत आहे सागितल्या मुळे आज मी जरा उशिराच उठलो होतो दरवाजा मधून वाकून पाहिले की ती दिसते का सकाळी उठल्या बरोबर आपल्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा पहिला की दिवस चांगला जातो एकले होते मानून पाहिले पण कुठे काय दरवाजा बंद होता मला वाटले ती पण उशिरा उठली असेल माजा सारखी मी लागलो आपला ब्रश करून अंघोळीच्या नादी मला अंघोळीला थोडा जास्तच वेळ लागायचा तशी माझी अंघोळ लवकर व्हायची पण पहिला पाण्याचा मग हा उशिरा डोक्यावर पडायचा
माजी आंघोळ झाली आई ने चहा आणि पोहे तयारच ठेवले होते मला आज पोहे नको पोटात दुखत आहे असे बोलून नुसता चहा प्यालो तसा चहा मला खूप आवडतो पोटात खरोखर जरी दूकत असते तर मी चहा पिलाच असता पोहे पण खल्ले असते पण पोटामध्ये खरंच दुखत आहे असे घरी वाटावे मनून आणि लवकर घराचा बाहेर पडायचे होते मनून पण नाही खाले
चहा पिला आणि घराचा बाहेर पडलो तोच ती त्याच्या घराचा पायरीवर बसलेली दिसली मी खूप खुश झालो जाऊदे बोलो सकाळी उठल्या वर नाही तर घराचा बाहेर पडताना तर दिसली मनून पण ती खूप उदास वाटत होती तिचे डोळे पाणावले होते खूप रडली आहे ती असा तिचा चेहरा झाला होता मी विचारावे मंटले काय झाले आहे मी बोलणार तेवढ्या मध्ये तिचा आई ने तिला आवाज दिला आणि ती मला पाहतच घरात निघून गेली
मी ही काही ना बोलत रोजचा प्रमाणे देवाच्या पाया पडायला गेलो
देवाचा पाया पडून घरी आलो तेव्हा समजले की तिची आज्जी ची तबीयत जास्तच खराब झाली होती मनून काल रात्रीच त्यांना हॉस्पीटल मध्ये घेऊन गेले त्या मुळेच ती बहुतेक उदास होती आणि रडली पण असावी बहुतेक
बरोबर आहे ना ती आज्जी इथे एकटीच राहते कोणी सोबत नसते तिच्या त्याच्याघरचे तिथे दुसऱ्या शहरा मध्ये तर ही इथे एकटीच काळजी घेणारे कोण नाही ना विचारणारे कोणी नाही मग आजारी पडणारच ना
दुपारी तिची आई आणि ती दोखे घरी आले होते मंजे आईने बोलावले होते आज्जी ची विचार पुस करायला ती आली होती पण अजून उदासच दीसत होती मला कसे तर वाटत होते तिला पाहून मग मी एक युक्ती कीली आणि टीव्ही लावली आणि कार्टून चॅनल चालू केले तसे कार्टून मला ही आवडायचे पण घरी जास्त बघू देत न्हवते आई आणि काकू ते गप्पा मारण्यात रमले आणि आमी कार्टून बघण्यात कार्टून बघून तिच्या चेहऱ्यावर जे हसू आले ते पंहून मी खूप खूष झालो आणि मी लावलेली युक्ती खूप भारी होती आणि मी खूप हुशार जसा काय की एखादा सायंटिस्ट आहे असे वाटू लागले
तेवढ्यात आई ने मला आवाज दिला आणि बोली की जा दुध घेऊन ये काकू साठी चहा करायचा आहे चहा बोले की लगेच मी दुध आणायला उठलो मला ही चहा आवडायचा तसे पण मला दाखवाचे होते की मी किती काम करतो चांगले इम्प्रेशन पडण्या साठी तसा मी लगेच आई कडून पैसे घेऊन निघालो तेवढ्यात काकू बोले तेजु तू पण जा आकाश सोबत दुकानला तसे तिचे नाव खरे तेजस्विनी पण तिला प्रेमाने तेजू बोलायचे तिचा घरचे आणि मी तेजी बोलायचो आणि ती मला अक्क्या तसे सर्व मित्र असेच बोलायचे पण हिने बोललेले फिलिंग च वेगळी असायची असो काकू ने तेजी ला माजा सोबत पाठवले मी उगा वरचा मनाने बोलो नको काकू कशाला मी घेऊन येतो मनून मला ही वाटत होते की ती माजा सोबत यावे मनून कार्टून बघून तिचा मूड जरा बरा झाला होता तिनेही हो मम्मी बोली आणि आमी निघालो दुध आणायला