Shri Sant Eknath Maharaj3 Guru Bhakti in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | श्री संत एकनाथ महाराज3 गुरूभक्ती

Featured Books
Categories
Share

श्री संत एकनाथ महाराज3 गुरूभक्ती

“श्री संत एकनाथ महाराज”

“गुरू भक्ती” 3

ग्रंथाच्या शेवटी एकनाथ महाराज लिहितात.

ग्रंथारंभ प्रतिष्ठानी।तेथ पंचाध्यायी संपादूनी।उत्तर ग्रंथाची करणी।आनंदवनी विस्तारिली।।जे विश्वेश्वराचे क्रीडास्थान।जेथ स्वानंद क्रीडे आपण । यालागी ते नंदनवन ।ज्या लागी मरण अमर वांछिती ।। तया वाराणसी मुक्तीक्षेत्री। माणिकर्णिका महातीरी । पंचमुद्रापीठामाझारी ।एकदशावरी टिका केली ।।

या प्रमाणे नाथांची भागवत टीका काशी क्षेत्रात गाजली.त्यावेळी काशीत तैलंगस्वामी नावाचे एक योगी पुरुष होते.ब्रिटिश राज्याच्या सुरवातीला हे स्वामी बालोन्मत्त

पिशाचावत स्थितीत विवस्त्र हिंडत होते.ते पाहून त्यावेळच्या कोलेक्टरने मडमेच्या सूचनेवरून

पोलिसाच्या कोठडीत बंदिवान करून ठेवले व नग्न फिरू नये असी ताकीद दिली.परंतु दुसऱ्या दिवशी हे स्वामी रस्त्यात नग्न फिरत असलेले पुन्हा दृष्टीस पडले. पोलिसाकडे चौकशी केल्यावर कळले कीतुरंगातील त्या कोठडीला बाहेरून कुलूप होते,तसेच असतांना ते बाहेर कसे आले ते समजत नाही.कलेक्टरने पुन्हा त्यांना पकडून कोठडीत घालून स्वतः

कुलूप लावून त्यावर लाखेने मोहर करून चावी आपणाकडे ठेवली.तरी स्वामी तिसऱ्या दिवशी बाहेर फिरत असलेले दिसले!त्यांचे आणखी काही चमत्कार कलेक्टरच्या दृष्टीस पडल्यामुळे त्याने हा मनुष्य

अतिमानुष (सूपर ह्युमन पॉवर)

आहे,ह्याच्या वाटेला कोणी जाऊ

नये असे फर्मानच काढले म्हणे!

ह्या दीर्घायुषी तैलंगस्वास्वामिंनी त्यावेळी नाथ भागवताच्या तीनशे प्रति लोकांकडून काढवून घेतल्या व त्या ग्रंथास गंगेचा हात लागला,तो ग्रंथ प्राकृत मनुष्याच्या हातात पडू नये म्हणून,संन्याशाला जशी समाधी

देतात तशीच या पवित्र ग्रंथाला,विधिपूर्वक मोठ्या आदराने समाधी दिली,अशी आख्यायिका तेथे प्रसिद्ध आहे.

नाथांनी त्या समाधी स्थानावर

मुरलीधराची मूर्ती स्थापन केली आहे

नाथांच्या गुरू भक्तीचे फळ म्हणजे श्रीखंड्याचे सेवा.गुरू सेवेबद्दल नाथराय म्हणतात-

न करिता सद्गुरूभजन।नव्हे

भववृक्षाचे छेदन। जरी कोटी कोटी साधन। आने आन केलिया ।। हनुमंत देखता दिठी। भुते पळती बारा वाटी । तेवी गुरुभजन । परिपाठी।

पळे उठाऊठी भवभय ।।“ गुरू म्हणजे थोर व ब्रम्ह म्हणजे थोर ‘ज्याचे जया ध्यान । तेची

होय त्याचे मन ।।‘ हा एक श्रुष्टी नियम आहे.या नियमानुसार दृश्य पतीस व दृश्यमा नवी गुरुस

ब्रम्ह’ मूर्ती समजून भजावयाचे

ही शिकवण शास्राने दिली आहे ती शिष्याच्या अंगी ब्राम्हस्थिति बणण्यासाठी होय.

ध्यानबळाने आपला आत्मविकास ब्रम्ह व ब्रम्ह स्थिरचरव्यापक ही धारणा केवळ धर्मशास्त्रदृष्ट्या नव्हे, तर

विज्ञान शास्राप्रमाणे इंद्रिय निग्रह व ध्यानसातत्याने बळकट केलेली धारणा हे अद्भुत सामर्थ्य प्राप्त होते.

गुरुचरित्रातील वेदधर्मऋषींच्या

संदीपक शिष्याची आपल्या गुरुवर अशीच निष्ठा होती,म्हणून शंकर व विष्णू न

त्याला वर देण्यास गेले.संदीपकाने त्यांना विचारले,मी तुमची भक्ती करीत नाही,तुमचे नावही कधी घेत नाही असे असता,हजारोवर्षं तुमच्या नावाचा जप करीत तप करणाऱ्या लोकांना न भेटणारे तुम्ही,मला वर घ्या म्हणून का आला?त्यावर ते म्हणाले,तुझ्या गुरुभक्तीचे व सेवेचे ओझे आम्हावर झाले ते उतरण्याकरीता आम्ही आलो आहो.हाच संदीपक शिष्य द्वापारयुगामध्ये संदीपनी होऊन कृष्णाने त्याला गुरू करून त्याची सेवा केलीय होती.श्री एकनाथ महाराजांची गुरू निष्ठा अशीच अलौकिक होती.श्री जनार्दनस्वामी यांच्यावर ब्रम्ह भावना केली नाही,तर ब्रम्हावर

जनार्दनभावना त्यांची सेवा केली.या त्यांच्या अलौकिक निष्ठतेमुळेच भगवान श्रीकृष्ण

श्रीखंड्याच्या रूपाने बारा वर्षे त्यांच्या घरी सेवेस राहिले.असा

हा गुरू सेवेचा महिमा आहे.नाथांची गुरू सेवा म्हणजे देव पुजेची उपकरणे घासून पुसून स्वच्छ करण्या पासून ,गुरूंचे घर झाडून लोटून स्वच्छ

करण्यापर्यंत चालत असे.,घराचा

हिशोब राखण्यापासून तो जनार्दनस्वामींच्या दरबाराचे कागदपत्रे सांभाळण्याचे कामही नाथ करीत असत.एकदा सरकारी कामाचे प्रसंगी नाथांनी गुरूंचा लष्करी पोशाख चढवून लढाई मारल्याची गोष्ट त्यांच्या चरित्रात प्रसिद्ध आहे.जनार्दनस्वामी मोठे भगवद्भक्त,तसेच शूर लढवय्ये

होते.त्यांना दोन बायका होत्या,त्या सुद्धा घोड्यावर बसून लढाईत पतीला मदत करण्याकरीता जात असत. असे जनार्दनस्वामीच्या चरित्रात आहे.हे पहिले म्हणजे भक्तीमार्गात पडलेले लोकही

व्यवहारातील सर्व प्रकारचे शिक्षण घेत असत व बायकांनाही युद्धकलेची शिक्षण

हे दिसून येते.,आणि अशा व्यवहारी लोकांनाही व्यवहार सांभाळून परमार्थ उत्तम प्रकारे साधता येतो,हेही एक जनार्दनस्वामीच्या चरित्रावरून

सिद्ध होते.

भगवान श्रीकृष्ण नाथांच्या गुरुसेवेने आभारी होऊन ‘श्रीखंड्या’ या नावाने नाथांच्या

घरी सेवेकरिता येऊन राहिले.

रांजण म्हणजे जमिनीत बांधलेले चुनेगच्ची हौद.नाथांच्या घरातील हौद सुमारे दीड पुरुष व सात,आठ हात लांब व चार हात रुंद असा आहे.नाथांच्या घरी नित्यश्री-नित्यमंगल चालत असे.मुक्तद्वार भोजन नित्य असल्यामुळें त्यांना पाणी फार लगे व तो पुरवठा करण्याचे मुख्य व मोठे काम श्रीखंड्या करीत असे.व इतर किरकोळ कामेही तो करीत होता.

आवडीने कावडीने,प्रभूने सदनात वाहिले पाणी । जपि-तपि सन्याशाहुनि, श्रीहरिला भक्त फार आवडतो । स्पष्ट

पाहा नाथगृहि घेऊन वाहे जलची कावड तो ।।

सुधाकर काटेकर

संदर्भ एकनाथी भागवत