कोल्हापूर महाराष्ट्र राज्यातील दक्षिणेकडील शेवटचा जिल्हा.कोल्हापूर बद्दल जितकं सांगितलं जाव तितकं कमीच असेल.सह्याद्रीच्या पर्वत रांगानी सुजलाम सुफलाम झालेल्या व ऐतिहासिक गड कोटानी वेढलेला कोल्हापूर जिल्हा पर्यटना साठी उत्तम आहे.दुर्ग ,थंड हवेची ठिकाणे , अभयारण्य,हेरिटेज वास्तू ,धरणे,जंगल सफरीचा ठिकाणे असे वैविध्य कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते.कोल्हापूर मधील वर्षभरातील तापमान १२ अंश सेल्सिअस ते ३५ अंश सेल्सिअस या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या म्हणजेच सातारा,सांगली ,सोलापूर जिल्ह्याच्या व इतर शहराच्या तुलनेने थंड पणं जास्त दमट असतो.कोल्हापूर पश्चिम घाटा जवळ असल्याने जून ते सप्टेंबर दरम्यान भरपूर पाऊस पडतो त्यामुळे बरेचदा पुरा ची स्थिती उद्भवते.कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे पणं त्या साठी कोणती एक गोष्ट कारणीभूत नाही तर अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे कोल्हापूरचा डंका सर्वत्र गाजला आहे.कुस्तीगीरा चा जिल्हा,तांबड्या पांढऱ्या रश्याचा जिल्हा,करकरीत वाजणाऱ्या कोल्हापुरी चप्पलाचा जिल्हा..या कोल्हापूर मधील कोल्हापुरी चप्पला इतक्या प्रसिद्ध झाल्या की परदेशात ही याची मागणी वाढली गेली.याच बरोबर कोल्हापूरला दक्षिण काशी म्हणून ही ओळखले जाते.राजर्षी शाहू महाराजांच्या पावन चरणानी पवित्र झालेला जिल्हा,आणि विशेष प्रसिध्दी म्हणजेच करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाई चे निवास स्थान असलेला जिल्हा.
देवीच्या साडे तीन शक्ती पिठान पैकी एकशक्ती पिठ हे अंबाबाई कोल्हापूर जिल्ह्यात आहे.करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी स्वतः इथे वास करते असे मानले जाते .कोल्हापूर जिल्ह्याच्या नावा मागे ही एक कथा आहे.राक्षसा चा राजा केशी याचा पुत्र कोल्हासुर खूपच धुमाकूळ घालत सुटला होता...त्याच्या आत्याचाराला त्रस्त होऊन सर्व देव देवीला शरण गेले..त्यांची प्रार्थना ऐकुन देवीने कोल्हासुराशी युद्ध केले..हे युद्ध नऊ दिवस चालले .. व शेवटी देवीने कोल्हासुराचा वध केला पणं कोल्हासुर देवीला शरण गे ला.. व त्याने देवी जवळ वर मागितला की त्याचं ने राज्य कोल्हापूर व करवीर नगरी म्हणून होते ..तेच नाव त्या राज्याचं कायम राहाव..त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याचे नाव कोल्हापूर असेच राहिले.
श्री महालक्ष्मी मंदिर हे चालुक्य काळात बांधले गेले असा समज आहे तसेच या मंदिराचे महाद्वार हे पश्चिमेकडे आहे.मंदिराचा गाभारा व रांडमंडप हे सर्वात पुरातन भाग आहेत..महालक्ष्मी मंदिर हे शिल्प कलेचा उत्तम नमुना आहे.भव्य आणि सुंदर असे हे मंदिर सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत दर्शना साठी खुले असते.कोल्हापूर एस टी स्टँड पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे .
अशा या सुंदर व सुजलाम सुफलाम ,नाना कारणानी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यावर एक मोठं संकट कोसळणार होत.याची माहिती रॉ या गुप्तचर संघटनेला मिळाली होती. नव नियुक्त पंतप्रधान नीलमनी कामत हे एक युवा नेतृत्व देशाला लाभलं होत.त्यांनी कार्य भार हाती घेतल्या पासून देशात बरेच बदल घडून आले होते.लाच देणे आणि घेणे यावर त्यांनी पूर्ण पने बंदी घातली होती आणि असा अपराध करताना कोण दिसून आले तर त्यावर कडक कारवाई केली जात असे.आतंकवादी ना डायरेक्ट इन काऊंटर मध्ये मारण्याची परवानगी त्यांनी सुरक्षा खात्यांना दिली होती त्यामुळे आतंकवादी गिरोह त्याच्या वर जास्तच चीडून होता.तरुणान साठी अनेक रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे देशात समाधानाचे वातावरण होते. निलमनी कामतांचे आजोळ हे कोल्हापूर होते तसेच त्याच्या पत्नी शालिनी कामत या महालक्ष्मी च्या निस्सीम भक्त होत्या.आश्विन शुद्ध पंचमीला महालक्ष्मी चा मोठा उत्सव कोल्हापूर जिल्ह्यात साजरा केला जात असे याच दिवसाचे औचित्य साधून नीलमनी व शालिनी कामत कोल्हापूर ला देवीच्या दर्शनाला येणार होते.परंतु याची माहिती आतंकवादी संघटना झंझर ला झाली होती.या संघटनेचा प्रमुख सय्यद बझमी याने त्याचं मोक्याचा फायदा उचलून महालक्ष्मी मंदिर बॉमबस्फोटांत उडविण्याचे नियोजन आखले होते.. बॉमबस्फोटा त निलमनी मारला जाईल व हिंदूचे श्रध्दा स्थान असलेले पुरातन मंदिर ही बेचिराख होईल व भारतात आपली दहशत टिकून राहील असे त्याचे मनसुबे होते.त्या साठी त्याने तयारी सुरू केली होती.पणं रॉ ला याची माहिती मिळाल्या मुळे रॉ व आय बी या दोन्ही संघटने नी मिळून या झंझर चा इरादा निस्त्नाबुत करण्याचे ठरवले होते.त्यासाठीच रॉ ने आपला जाबाज एजन्ट सावध पाटील ला या कामगिरी साठी नेमले होते.सावध ची काबिलियत बरोबरच अजून एक कारण होतं त्याला त्या कामगिरी वर पाठवण्या मागे ते म्हणजे तो मूळचा कोल्हापूर चा होता..त्यामुळे त्याला कोल्हापूर विषयी खडान खडा माहिती होती.
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेला सावध आजोबांचा फार लाडका.. आर्मी रिटायर्ड अधिकारी होते त्याचे आजोबा त्यामुळे देशभक्ती लहान पना पासून सावध च्या नसा नसात भिनली होती.अगदी छोट्या वयापासून सावध मध्ये कमालीची चौकस बुद्धी होती..कोणत्या ही गोष्टीच्या मुळाशी गेल्या शिवाय त्याला चैन पडत नसे. एखादी गोष्ट सावध ने एकदा पहिली की त्याच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट सुटत नसे.खेळाची आवड ,देशभक्ती,प्रामाणिक पना, देशा साठी प्रसंगी आपले प्राण ही देण्याची तयारी पहिल्या पासून च सावध मध्ये होती..त्याची हीच आवड लक्षात घेता ..आजोबांनी त्याला आय बी क्षेत्रात उतरायला लावले होते .पणं त्याच्या घरी मात्र सावध एका कंपनी मध्ये एम्पोरट एक्सपोर्ट च काम करतो अस माहित होत.त्याची खरी ओळख त्याच्या आजोबन व्यतिरिक्त कोणाला ही माहित नव्हती. आय बी म्हणजेच intelligence bureau मध्ये चांगली कामगिरी करून आपली छाप सोडून सावध ने रॉ ही संघटना जॉईन केली होती.रॉ (Research and analysis wing) या संघटनेचा सिध्दांत च होता धर्मो रक्षती रक्षित..म्हणजेच जो मनुष्य धर्माची रक्षा करतो तो सदैव सुरक्षित राहतो.रॉ जॉईन करण्यासाठी सावध ने सेल्फ डिफेन्स ची कठीण ट्रेनिंग पूर्ण केली होती. रॉ एजट ला प्रत्येक गोष्टीत एक्स्पर्ट असावे लागते ..त्यामुळे सावध प्रत्येक गोष्टीत तरबेज होता..अनेक विदेशी भाषांचं ज्ञान त्याने आत्मसात केलं होत... सी आय ए,केजिबी अशा अनेक गुप्तचर संघटनेच्या केसचा अभ्यास त्याने बारकाईने केला होता.सावध लंब गोल चेहरा..घव्हाळ रंग..पाच फूट नऊ इंच उंची... परफेक्ट व ट्रेंगिन मध्ये अधिकच बळकट झालेली फिट आणि फाईन बॉडी.. चित्या सारखी चाल...चाणाक्ष नजर..चपळाई..प्रत्येक हालचालीत रुबाबदार पना.. रस्त्याने सहज जरी चालला तरी मुली काय मुलांनी ही वळून पहावं अस व्यक्तिमत्व...Beretta ९.२ ही त्याची फेवरेट गण..या गणची विशेषतः होती की ही खूप भरो से मंद होती..त्याचं बरोबर वापरण्यास सुलभ होती..त्यामुळेच सावध तिला त्याची मक्खन बोलत असे ..ही त्याची प्रिय मक्खन नेहमी त्याच्या सोबत असे.अशा या सावध ला मिशन महालक्ष्मी साठी कोल्हापूर ला पाठवण्यात आले होते.. वेष बदलण्यात सावध चा कोणी हात धरत नसे..त्यामुळे तो वेष बदलून कोल्हापूर मध्ये केव्हाच दाखल झाला होता.परंतु सावध कोण आहे कसा आहे या बद्दल कोणाला काहीच माहिती नव्हती..सावध सोबत च या मिशन मध्ये आय बी चे तीन एजन्ट गिरीश लाड,नीरज उपाध्याय ,रमाकांत शर्मा हे ही होते .. व त्यांना मदती साठी १० जणांची टीम ही होती..गिरीश ,नीरज,रमाकांत हे तिघे सोडले तर सावध बद्दल कोणाला काहीच माहिती नव्हती.. व कोणी त्याला पाहिलं ही नव्हत.
क्रमशः