Thats all your honors - 16 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१६)

Featured Books
Categories
Share

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१६)

दॅट्स ऑल युअर ऑनर -१६
“ पण पटवर्धन हे आरोपीचे वकील आहेत.तिच्याच वतीने ते काम बघत आहेत.म्हणजे त्यांची उपस्थिती ही आरोपीची उपस्थिती असल्या सारखीच आहे.” दैविक दयाळ म्हणाला.


“ मी माझा आदेश दिलाय. ” न्या.भाटवडेकर म्हणाले.


अॅड.खांडेकर उठून उभे राहिले. ते एकदम जाड जुड आणि भरदार शरीर यष्टीचे होते. दमदार आवाजात ते म्हणाले, “ कोर्ट माझं म्हणणे ऐकून घेईल का? ”


“ बोला.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


“ हे गंभीर प्रकरण आहे आणि अचानक उद्भवले आहे त्यामुळे आम्हाला या बाबतीत न्यायालयाने दिलेले निवाडे वानगी दाखल देण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु माझी खात्री आहे की पटवर्धन आणि आरोपीचे परस्पर संबंध हे एजन्सी म्हणजे प्रतिनिधी या व्याख्येत बसणारे आहेत त्यामुळे प्रतिनिधीने केलेली कृत्ये ही ज्याने प्रतिनिधी नेमला त्याच्यावर म्हणजे आरोपीवर बंधनकारक असतात. हवे तर आम्ही आरोपीला सक्ती करून पटवर्धन च्या कृतीला एकतर समर्थन द्यायला लावू किंवा नाकारायला लावू.”


“ मिस्टर अॅड.खांडेकर , कोर्टाने आधीच निर्णय दिलाय. मोठ्या कोर्टाने अशाच प्रसंगात जर मी दिलेल्या निर्णयाच्या पेक्षा वेगळा निर्णय दिला असेल तर तो मला लेखी स्वरूपात दाखवा, अन्यथा मी याच आधारावर निर्णय दिला आहे की आरोपीच्या गैर हजेरीत जे काही संवाद झाले असतील ते आरोपीवर बंधन कारक नसतात.मग पटवर्धन तिचे वकील आहेत का किंवा एजंट आहेत का हे मी ऐकायला तयार नाही जो पर्यंत तुम्ही वरिष्ठ कोर्टाचा लेखी निवडा मला दाखवत नाही.” न्या.भाटवडेकर यांनी अॅड.खांडेकर ना सुनावले.


“न्यायमूर्ती महाराज, ही अगदी साधी गोष्ट आहे, या प्रकारणामधील सर्वात मोठा पुरावा म्हणजे बूट आणि पॅण्ट हा त्या गॅरेज मध्ये ठेवला गेला आहे आणि पटवर्धन त्या ठिकाणी रंगे हाथ पकडला गेलाय. आता हे स्वाभाविक पणे गृहीत धरता येते की मेसल ला जरी तो पुरावा तिथे ठेवत असताना कोणी बघितले नसले तरी ” अॅड.खांडेकर यांनी युक्तिवादाचा प्रयत्न केला.


“ सरकारी पक्षाच्या दृष्टीने तुम्ही विचार करताय” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ तुम्ही एक महत्वाची शक्यता गृहित धरलेली नाही.सर्वात जास्त संधी त्या व्यक्तीला होती, जिचे ते गॅरेज आहे.ती म्हणजे मैथिली आहुजा.”


“ पण तिला त्या वस्तू कुठे मिळाल्या होत्या? खुनाच्या रात्री ती त्या आऊट हाऊस वर गेलीच नव्हती. ” अॅड.खांडेकर म्हणाले.


“ तुम्हाला काय माहिती ,की ती तिकडे गेली होती की नव्हती?” पाणिनी ने विचारले.


“ मला माझ्या कामात कोणाची लुडबूड नकोय.” पाणिनी कडे बघत अॅड.खांडेकर म्हणाले.


“ तुम्हाला ज्या प्रश्नामुळे लुडबूड झाली असे वाटतंय, तोच प्रश्न कोर्टाच्या मनात निर्माण झालाय.” न्यायाधीश न्या.भाटवडेकर उत्तरले. “ खुलासा करा की मिस आहुजा त्या रात्री तिकडे गेली नव्हती कशा वरून?”


“ आम्ही ते सिध्द करू.” अॅड.खांडेकर चिडून म्हणाले.


‘ करा सिध्द.” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ तुमचा सगळा पुरावा सादर करून झाल्या नंतर जर तुम्हाला आणखी काही परिस्थितीजन्य पुरावा मिळाला की ज्यामुळे असे सिध्द होणार आहे की त्या वस्तू त्या गॅरेज मधे आरोपीने किंवा तिच्या सांगण्यावरून कोणीतरी ठेवल्या आहेत, तर तुम्हाला त्या व्यक्तीला साक्षीदार म्हणून बोलावण्याची मी परवानगी देईन. दरम्यान आधी उल्लेख केल्या प्रमाणे तुमच्याकडे वरिष्ठ कोर्टाचे काही निवाडे सापडले तर द्या.सध्या तुम्ही फक्त तुमचा अंदाजच व्यक्त करताय की त्या वस्तू पटवर्धन ने ठेवल्या असाव्यात म्हणून.”


अॅड.खांडेकर नाईलाजाने खाली बसले.दैविक दयाळ आहुजाच्या अपार्टमेंट मधील व्यवस्थापक मुली कडे पुन्हा वळला आणि म्हणाला “ तू या महिन्याच्या पाच व सहा तारखेला. तिथे व्यवस्थापक म्हणून होतीस का?”


“ हो.”


“ मैथिली ला तू ओळखत होतीस? तिला सह तारखेला तू पाहिलं होतंस? ” दैविक दयाळ ने विचारले.


‘ पाहिले होते.”


“ किती वाजता पाहिलं होतंस?”


“ अनेकदा पाहिलं. दिवस भरात.”


“ मला विचारायचयं होतं संध्याकाळी भेटली होती का , तिच्याही काही संवाद झाला का?” दैविक दयाळ ने विचारले.


“ हो ”


“ सहा तारखेला आरोपीला पाहिलेस का?”


“ हो, पाहिलं.”


“ काय घडलं तेव्हा? ”


“ त्या दिवाही दुपारी मैथिली ने आरोपी, आकृती ला तिच्या बरोबर आणले.ती लिफ्ट च्या दिशेनेच चालली होती तेव्हा माझ्य शी ही तिने ओळख करून दिली.आणि म्हणाली आकृती काही दिवस तिच्या कडे राहणार आहे.येत जात राहील. ”


“ आणि हा संवाद आरोपीच्या समोरच झाला? ”


“ हो,”


“ मी तुला एक ड्रेस दाखवतो जो पुरावा म्हणून ब -८ म्हणून सादर झाला आहे.तुझ्या ओळखीचा आहे का तो ड्रेस?”


“ हो ”


“ कुठे पहिला तुम्ही तो या पूर्वी? ”


“ सहा तारखेला आकृती च्या अंगावर ”


“ त्या नंतर सहा तारखेला च पुन्हा कधी पहिलात ? ”


“ सहा तारखेला संध्याकाळी मैथिली आहुजाने तो घातला होता.”


“पुरावा म्हणून ब -८ म्हणून सादर झाला आहे त्याच ड्रेस बद्दल तू बोलते आहे ना? जो अत्ता माझ्या हातात आहे? ” दैविक दयाळ ने खात्री करून घेण्यासाठी विचारले.


“ हो सर.”


“ आणि ती कुठे होती जेव्हा तू तिला या ड्रेस मधे पाहिलंस ? ”


“ ती बाहेर जायला निघाली होती.”


“ जेव्हा ती परत आली तेव्हा पुन्हा तिला पाहिलंस का? ”


“ हो सर ”


“ कधी आली ती पुन्हा ? ”


“ साधारण तीन तासांनी.”


“ तेव्हा तिने काय घातले होते अंगावर? ”


“ तिने वेगळाच पोषाख घातला होता. माझ्या मनात आलचं की तिला विचारावे पण मी टाळले.”


“ हे सगळे सहा तारखेला घडले , बरोबर? ” दैविक दयाळ ने खुंटा हलवून बळकट करण्यासाठी विचारले.


“ हो.” बीना रुईया म्हणाली.


“ पटवर्धन , विचारा तुमचे प्रश्न.”


“ लोक जेव्हा ये-जा करतात अपार्टमेंट मध्ये तेव्हा तुला दिसतात?” पाणिनी ने सुरुवात केली.


“ नेहेमीच दिसतात.मी राहते ऑफिसच्या मागच्या इमारतीत पण दिवसाचा बराचसा वेळ मी ऑफिसातच असते रस्त्याकडचा दरवाजा जेव्हा उघडा असतो तेव्हा तर मी नक्कीच व्हरांड्यात बसून असते. ” बीना रुईया म्हणाली.


“ तुला बसायची व्यवस्था काय आहे?”


“ एक काउंटर आहे.आणि खुर्ची. फोन ची सोय नाहीये तिथे. पण त्याची गरज नाही पडत.ज्यांना फोन करायचा असतो ते घरातला किंवा पॅसेज मधला फोन वापरू शकतात.” बीना रुईया ने सविस्तर माहिती दिली.


“ या महिन्याच्या पाच तारखेला तू मैथिली आहुजाला पाहिलेस? ”


“ हो.”


“ संध्याकाळी? ” पाणिनी ने विचारले.


“ ती कामावरून आली तेव्हा संध्याकाळी. फार तर दुपारी उशिरा असे म्हणता येईल. ”


“ पाच तारखेला शेवटचे कधी पाहिलेस?”


“ या प्रश्नाला आमची हरकत आहे.कारण आम्ही सर तपासणीत पाच तारखे बद्दल काहीही विचारले नव्हते.त्यामुळे उलट तपासणीत पटवर्धन हे विचारू शकत नाहीत.” दैविक दयाळ दयाळ म्हणाला.


“ साक्षीदाराची स्मरण शक्ती किती आहे ते मला तपासायचे आहे आणि त्याचा मला अधिकार आहे.” पाणिनी म्हणाला.


“ तुमची हरकत अमान्य करण्यात येत आहे, पटवर्धन च्या प्रश्नाला साक्षीदार उत्तर देतील.” न्या.भाटवडेकर यांनी फर्मावले.


“ मी तिला पाच तारखेला दुसऱ्या वेळी पहिले ते रात्री नऊ च्या सुमाराला.”


“ तू तिला रात्री नऊ च्या सुमारास पाहिलंस तेव्हा ती काय करत होती? ” पाणिनी ने विचारले.


“ ती बाहेर निघाली होती.” बीना रुईया म्हणाली.


“ त्या रात्री ती परत आल्याचे तुला दिसले का?”


“ नाही दिसले.” बीना रुईया म्हणाली ”


“ तू रात्री कुलूप लावल्यावर ती आली का? ”


“ हो ”


“ आणि तू किती वाजता तू कुलूप लावलेस? ”


“ साधारण रात्री अकरा वाजता.”


“ आता मला सांग की ज्या ड्रेस चा उल्लेख तू केलास तो तिने पाच तारखेला घातला होता?” पाणिनी ने विचारणा केली.


“ नाही , तिने दुसरेच कपडे घातले होते.” बीना रुईया म्हणाली.


“ तो पोषाख तुझ्या एवढा लक्षात कसा राहिला? ”


“ माझा अगदी बरोब्बर तसाच एक ड्रेस आहे. या वरून पूर्वी तिचीं नी माझी चर्चा झाली होती ”


“ मैथिली ने पाच तारखेला घर सोडले? ” पाणिनी ने विचारले”


“ हो.”


“ दोन मोठ्या सुटकेस घेवून? ”


“ हो.”


“ तू बघितलस तिला, घर सोडताना? ”


“ हो.”


“ ती कुठे जात्ये किंवा किती दिवसांसाठी बाहेर निघाली आहे या बद्दल तिने तुला काही सांगितले? ” पाणिनी ने विचारले.


“ काहीच कल्पना दिली नाही तिने..”


“ हे वेगळं वाटलं नाही का तुला? ”


“ जो पर्यंत वेळच्या वेळी भाडे येते आहे तो पर्यंत मी त्यांच्या वैयक्तिक बाबतीत नाक खुपसत नाही.” बीना रुईया म्हणाली.


“ माझा प्रश्न नीट लक्षात घे.” पाणिनी म्हणाला. “ कुठे जाते आहे आणि कधी येणार हे न सांगता ती गेली हे वेगळं वाटलं नाही का तुला? ”


“ नक्कीच वाटले ना वेगळे. ”


“ ती अशा प्रकारे गेल्या नंतर तू तुझ्या जवळच्या किल्लीने तिचे घर उघडलेस?”


“ हे विचारले जाण्याला माझी हरकत आहे. संदर्भ हीन आणि काहीही अर्थ नसलेला प्रश्न आहे हा.” दैविक दयाळ म्हणाला.


“ साक्षीदाराची मानसिकता कशी होती हे सिद्ध करण्यासाठी मी हा प्रश्न विचारलाय. ” पाणिनी ने खुलासा केला.


न्यायाधीश न्या.भाटवडेकर थोडे अडखळले. “ मी देतो परवानगी या प्रश्नाला.” ते विचार करून म्हणाले “ उत्तर दे बीना रुईया.”


“ हो. उघडलं तिचे घर.”


“ आणि तू आत गेलीस? तू एकटीच होतीस की कोणी तुझ्या बरोबर होतं? ” पाणिनी ने विचारले.


“ इन्स्पेक्टरइन्स्पे.तारकर माझ्या सोबत होते.”


“ काय सापडले तुला तिच्या घरात? ” पाणिनी म्हणाला.


“ न्यायमूर्ती महाशय आता हे मात्र फारच झालं. आम्ही सर तपासणीत या बद्दल काहीही प्रश्न विचारले नसताना उलट तपासणीत मात्र या गोष्टी आणल्या जात आहेत आमची हरकत आहे याला.” दैविक दयाळ म्हणाला.


“ कोर्टाचे मत आहे की हरकत योग्य आहे. साक्षीदाराचा खरेपणा आणि प्रामाणिक पणा तपासण्यासाठी हवे तेवढे स्वातंत्र्य कोर्टाने पटवर्धन यांना दिले आहे.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


पाणिनी ला ते अपेक्षितच होते.त्याच्या तोंडावर स्मित रेषा उमटली. “ दॅट्स ऑल युवर ऑनर. माझे प्रश्न संपले.”


“ जर कोर्टाने परवानगी दिली तर बूट आणि पॅण्ट या दोन वस्तू आम्ही पुरावा म्हणून सादर करून घेऊ इच्छितो आणि या वस्तू जिथे सापडल्या त्या ठिकाणी पाणिनी पटवर्धन बरोबर जो संवाद झाला तो कोर्टाच्या निदर्शनाला आणण्याच्या आमच्या विनंतीचा फेर विचार व्हावा अशी शिफारस करतो. ” दैविक दयाळ म्हणाला. “ आम्हाला असं वाटतंय की पटवर्धन यांनीच त्या वस्तू तिथे ठेवल्या हे सिद्ध करण्या एवढा परिस्थितीजन्य पुरावा आहे.”


न्या.भाटवडेकर यांनी नकारार्थी मान हलवली. “ तुम्ही अजून ते पुरेसे स्पष्ट केलेले नाही.”


“ न्यायाधीश महाराज, या वस्तू तपन च्या मालकीच्या होत्या. कोर्टाच्या आणि पोलिसांच्या मनात सहानुभूती निर्माण होईल अशी कथा आरोपीने म्हणजे आकृती ने रचली.ती खरी वाटावी म्हणून आपल्यावर तपन ने हल्ला केल्याचा, काटेरी कुंपणाच्या खालून सरपटत गेल्याचा, कुंपणाला ड्रेस अडकून फाटल्याचा ओल्या रस्त्याने जाण्याचा, टाचांचे ठसे मातीत उठल्याचा पुरावा तिला निर्माण करायचा होता.आपल्याला हे तर अनुमान काढता येतं ना की पटवर्धन यांनीच मैथिली ला तिचा ड्रेस आणून आकृती च्या घरात ठेवायला लावला आणि त्याचा तुकडा काटेरी कुंपणाला अडकल्यासारखा वाटेल अशा पद्धतीने तिथे ठेवला.आम्ही हे दाखवलय की हा पुरावा सहा तारखेलाच संध्याकाळी तिथे तयार केलेला असू शकतो. खुनाच्या वेळे नंतर बहुदा चौवीस तासातच. आम्ही हे पण दाखऊन देऊ की पटवर्धन यांनी तपन चे बूट आणि पॅण्ट मिळवले, बूट चिखलात लडबडवले. त्यावर गवताचे कण लागतील अशी व्यवस्था केली जेणे करून असे वाटावे की आकृती ने सांगितल्या प्रमाणे खरोखरच तपन तिला शोधत चिखलातून आणि गवतातून फिरत होता. आम्ही हे दाखवून देऊ की पटवर्धन आणि आरोपीने परस्पर संगनमताने हे कृत्य केले आहे. ” दैविक दयाळ ने मोठे निवेदन केले.


“ ते सगळे ठीक आहे हो , पण तुम्ही त्याचा संबंध आरोपीशी कसा लावणार? मुळात पटवर्धन यांच्याशी कसा लावणार? ” न्या.भाटवडेकर म्हणाले.


“ युअर ऑनर, पटवर्धन आणि त्यांची सेक्रेटरी त्या गॅरेज मधे रंगे हाथ पकडले गेलेत.” दैविक दयाळ म्हणाला.


“ नाही, बिलकुल नाही.” न्यायाधीश न्या.भाटवडेकर ठाम पणाने आपली मान हलवत म्हणाले. “ पटवर्धन यांचे हात रंगलेले नाहीत ! मुळातच ते इन्स्पे.तारकर तिथे येण्यापूर्वी काही सेकंदच आधी आले होते. आणि ते तिथे पुरावा शोधायला आले होते.इन्स्पे.तारकर ने सांगितलंय की तो आणि जयराज आर्य तिथे पुरावा शोधायला गेले होते.आता असा विचार करा की इन्स्पे.तारकर आणि जयराज आर्य आधी गेले असते आणि नंतर पटवर्धन व सौम्या सोहोनी गेले असते तर तुम्ही म्हणाला असतात का ,कीइन्स्पे.तारकर आणि जयराज आर्य यांना पटवर्धन ने तिथे पुरावा पेरत असताना रंगे हाथ पकडले.म्हणून ?”


“ नक्कीच तसा अर्थ नसता काढला मी.” दैविक दयाळ म्हणाला.


“ बरोबर ना? मग अगदी तसच पटवर्धन च्या बाबतीत घडलंय.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


“ पण पटवर्धन ना तिथे पुरावा निर्माण करायला सबळ कारण होते.तो पुरावा तिथे टाकणे हे त्याच्या अशिलाच्या फायद्याचे होते.” दैविक दयाळ ने आपली बाजू लाऊन धरण्याचा प्रयत्न केला.


“ पटवर्धन च्या अशिलाच्या दृष्टीने म्हणजे आरोपी आकृती च्या दृष्टीने विचार केला तर इन्स्पे.तारकर ने तिथे त्या वस्तू लपवणे हे पोलिसांच्या आणि जयराज आर्य च्या फायद्याचे होते असे पटवर्धन म्हणू शकतात.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


“ आपण वास्तव वादी विचार करणारे लोक आहोत.आपल्याला माहित्ये काय झालंय ते.” दैविक दयाळ म्हणाला.


“ तुमचा जो अंदाज आहे की काय घडलं असावं, तेच घडलंय असं तुम्हाला वाटतंय.पण तुम्हाला जे वाटतंय ते आरोपीवर बंधन कारक नाही हे लक्षात ठेवा.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


दैविक दयाळ चिडला.“ कोर्टाची अशी अपेक्षा असेल की पाणिनी पटवर्धन ट्रंकेत त्या वस्तू भरत असताना ते पाहिलेले साक्षीदार आम्ही कोर्टात हजर करावेत तर ते शक्य नाही. जेव्हा एखादा हुशार माणूस गुन्हा करतो तेव्हा कोणी बघत नसतानाच करतो.”


“ हे सगळ समजण्या एवढे कोर्ट हुशार आहे.कालच जन्मलेले नाही. परिस्थितीजन्य आणि अन्य पुराव्या वरूनच गुन्हा झाला की नाही हे तपासावे लागते हे मान्य आहे तरीही प्रश्न उरतोच की आरोपीला काही गृहीतकांचा फायदा देता आला पाहिजे.शहाणपणाचा दृष्टीकोन ठेवणे हेच कोर्टाचे काम आहे.”


दैविक दयाळ काहीतरी बोलणार होता पण न्या.भाटवडेकर ना पुढे बोलायचे आहे हे लक्षात आल्यावर तो थांबला.


“ अत्ता जो पुरावा समोर आलाय त्या नुसार कोर्टाला वेगवेगळे पर्याय समोर दिसतात.त्यातला एक आहे की ज्या व्यक्तीने ते गॅरेज भाडयाने घेतले होते त्याच व्यक्तीला त्या ठिकाणी त्या वस्तू ठेवायची संधी होती. कोर्टाला या गोष्टीचा विसर पडलेला नाही की पायस हिर्लेकर या माणसाने अग्निशमानाच्या खांबा समोर गाडी तून उतरणारी स्त्री म्हणून सुरुवातीला मैथिली आहुजा चे च नाव घेतले होते.अगदी मोकळे पणाने सांगायचे झाले तर खटला संपवायची घाई न करता मला या गोष्टीच्या मुळापाशी जायचयं.मला असे वाटतंय की पायस हिर्लेकरला पुन्हा साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावून प्रश्न विचारावेत. वकिलांनी नाही तर स्वतः कोर्टाने विचारावेत. ”


“ परंतू युवर ऑनर , पायस हिर्लेकर त्याच्या कामावर गेलाय.” दैविक दयाळ दयाळ म्हणाला.” न्यायाधीश म्हणाले,-“ त्याला पुन्हा इकडे बोलावून घेऊन साक्ष घेण्यात फार वेळ जाईल.हा खटला लौकरात लौकर निकाली काढण्यात कोर्ट फार आतुर आहे आणि त्याला आम्ही पण साथ देऊ इच्छितो,आणि पुन्हा नव्याने त्याच्या साक्षीतून काही निष्पत्ती होईल असे वाटत नाही त्यामुळे त्यात वेळ वाया घालवू नये असे वाटते. ”


“खटला लौकरात लौकर निकाली काढण्यात कोर्ट फार आतूर आहे हे खरे आहे पण त्यापेक्षा योग्य न्याय देण्यास जास्त आतूर आहे. ” न्या.भाटवडेकर यांनी फटकारले.


“ मला नाही वाटत की त्याला इथे यायला फार वेळ लागेल म्हणून आणि तो येई पर्यंत आपण पुढचे काम करू शकणार नाही असे नाही ना? ”


“ मला वाटते की पायस हिर्लेकर येई पर्यंत मी कोर्टाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून इन्स्पे.इन्स्पे.तारकर ला बोलावून घेतो , मला त्याची पुन्हा उलट तपासणी घ्यायचीच आहे.” पाणिनी ने सुचवले.


“ हे ठीक राहील.” न्या.भाटवडेकर म्हणाले.


अॅड.खांडेकर उठून उभे राहिले, “ ही फक्त प्राथमिक सुनावणी आहे न्यायाधीश महाराज.आरोपीने गुन्हा केलाय का.......”


“ मिस्टर अॅड.खांडेकर , आता हे प्रकरण त्याच्या पुढे गेलंय.पाणिनी पटवर्धन आणि त्याची सेक्रेटरी या दोघांच्या प्रामाणिक पणावर आणि नीतीमत्ते बद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिलंय.मी आदेश देतो की इन्स्पे.तारकरने साक्षीसाठी हजर व्हावे.आणि पोलिसांना आदेश देतो की पायस हिर्लेकर यांना इथे हजर करावे.” न्या.भाटवडेकर यांनी कडक भूमिका घेतली.


इन्स्पे.तारकर पुढे आला आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला.


“पोलिसांना तिथे खरकट्या डिश मिळाल्या?” पाणिनी ने विचारले.


“ हो , मिळाल्या.”


“ त्या लॅब मध्ये पाठवल्या?”


“ पाठवल्या सर.”


“ त्या वरचे हाताचे ठसे मिळण्याच्या दृष्टीने तपासणी झाली?”


“ झाली.”


“ त्यावर आरोपीचे ठसे मिळाले? ”


“त्या वर आरोपीचे ठसे मिळाले?” पाणिनी ने विचारले.


“ हो मिळाले.”


“ ही गोष्ट तू सरतपासणी मध्ये का नाही सांगितलीस?”


“ मला विचारले नाही तसे ”


सरकारी वकिलांनी स्वार्थासाठी मुद्दामच हा प्रश्न विचारला नाही हे पाणिनी ने न्यायाधीशांच्या बरोबर लक्षात आणून दिले.


“ कुठे कुठे मिळाले ठसे तुला?” पाणिनी ने विचारले.


“ बऱ्याच ठिकाणी मिळाले.”इन्स्पे.तारकरम्हणाला, “ वेगवेगळया ताटल्या वर,ज्यामध्ये बिस्किटाचे पीठ कळवले होते त्या वाडग्यावर.”


“ कॉफी च्या कपावर?”


“ नव्हते.”इन्स्पे.तारकरम्हणाला.


“ ताटावर? ”


“ एकाच ताटावर आम्हाला मिळाले ठसे.”इन्स्पे.तारकरम्हणाला


“ अर्थात, मयत तपन चे पण ठसे मिळाले असतील.” पाणिनी म्हणाला.


“ हो, त्याचे पण मिळाले.”इन्स्पे.तारकरम्हणाला


“ त्या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी किमान एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले , त्या ताटावर किंवा डिश वर,बरोबर आहे का? ”


इन्स्पे.तारकर उत्तर देताना जरा संकोचला.अडखळला.अस्वस्थ पणे त्याने चुळबूळ केली आणि म्हणाला,


“ हो खरे आहे, त्या दोघांशिवाय आणखी एका व्यक्तीचे ठसे मिळाले आम्हाला. ”


“ ते कुणाचे होते याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही? ” पाणिनी ने विचारले.


“ अजून तरी नाही ”इन्स्पे.तारकरम्हणाला


“ आरोपीचे ठसे मिळाल्याचे तू सरतपासणी मधे सांगितले नाहीस कारण सरकारी वकिलांनी तुला सांगितले होते की जर तू तसे सांगितलेस तर उलट तपासणी मधे पटवर्धन तुझ्या कडून बरोब्बर वदवून घेईल की आरोपी शिवाय आणखी एका व्यक्तीचे ठसे तुम्हाला मिळाले होते.बरोबर की नाही मी म्हणतोय ते? ” पाणिनी कडाडला.


“ स्वतः हून काही माहिती द्यायची नाही असं मला सांगण्यात आलं होतं ”इन्स्पे.तारकरअस्वस्थ होत म्हणाला


“ पोलिसांच्या रेकॉर्डवर मैथिली आहुजाचे ठसे आहेत का? ”


“ नाहीत सर.”


“ त्यामुळे त्या ताटावर जे अनोळखी व्यक्तीचे ठसे मिळाले ते मैथिली चे आहेत की नाहीत हे तुला सांगता येणार नाही.? ” पाणिनी ने प्रश्न केला.


“ आम्हाला नाही माहिती ते ठसे कुणाचे आहेत, ते मंडलिक बाईचे नाहीत याची आम्ही खात्री केली कारण ती तिथे भांडी घासायला आणि तत्सम कामाला जाते त्यामुळे तिचे ठसे असण्याची शक्यता होती म्हणून तेवढे आम्ही तपासले.”इन्स्पे.तारकरम्हणाला.

“ आरोपीने जेव्हा तिची हकीगत तुम्हाला सांगितली, तेव्हा ती म्हणाली का, की तपन ने तिच्या जवळ या गोष्टीची कबुली दिली की त्या आऊट हाऊस मधे आल्यावर सुरुवातीला आत न जाता जेव्हा आकृती त्याच्या गाडीत बसून राहिली होती आणि जेव्हा तपन एकटाच आत गेला तेव्हा तपन ने त्याच्या मित्राला फोन करून सांगितले होते की पाच मिनिटांनी मलाआऊट हाऊस च्या नंबर वर फोन कर ” पाणिनी ने चौकशी केली.

“ हो. अशी कबुली तपन ने आकृती समोर दिली होती हे आकृती ने आम्हाला सांगितले.” इन्स्पे.तारकरम्हणाला.

“ मग तो फोन कोणाला केला गेला होता हे तू शोधून काढलेस? ”

“ केवळ तोच फोन असे नाही तर त्या रात्री तिथून केले गेलेले सर्व फोन आम्ही तपासले. ” इन्स्पे.तारकर ने उत्तर दिले.

“ पुन्हा माझे तेच म्हणणे आहे की हे तू सरतपासणी च्या वेळी का नाही सांगितलेस?” पाणिनी ने विचारले.

“पुन्हा माझे ही तेच म्हणणे आहे की मला कोणी हे विचारले नाही.” इन्स्पे.तारकरम्हणाला.

“ आता तुला विचारतोय मी.दे उत्तर.” पाणिनी म्हणाला.

“ कोणा विशिष्ठ माणसाला नव्हता केला.लुल्लाकंपनीच्या ऑफिस मधे टेलीफोन बोर्डावर केला गेला होता. ”

पाणिनी या उत्तराने जरा निराश झाला. “ जेव्हा तपन पावसातून भिजून आत आला आणि त्याचे कपडे आणि बूट खराब झाले तेव्हा त्याला कोरड्या कपड्याची आणि बुटाची गरज होती.ते मिळावेत म्हणून त्याने कोणाला फोन केला?” पाणिनी ने नेमके पणाने प्रश्न केला.

“ आमची या प्रश्नाला हरकत आहे कारण हा प्रश्न वाद निर्माण करणारा आहे,पुराव्यात नसलेल्या गोष्टी गृहीत धरून हा प्रश्न विचारला गेला आहे.” अॅड.दैविक दयाळम्हणाला.

“ मी काही प्रमाणात ही हरकत मान्य करतो ” न्या.भाटवडेकरम्हणाले. “ तपन ने अन्य कोणाला फोन केले ? एवढंच प्रश्न गृहीत धरून उत्तर द्या इन्स्पे.तारकर .”