एकनाथ महाराज 2
नाथांचे घरी हरी पाणी भरी
“आवडिने कावडिने,प्रभुने सदनात वाहिले पाणी। एकची काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी ।जपि
तपि सन्याशाहून, श्रीहरिला भक्त फर आवडतो ।स्पष्ट पहा
नाथगृही घेऊनि वाहे जलची कावड तो ।।--मोरोपंत
द्वारकेत मादनराय शर्मा नावाचा एक महाराष्ट्रातील ब्राह्मण श्रीकृष्ण दर्शना करीत
तप करीत बसला होता,त्याला
बारा वर्षां नंतर रुक्मिणी मातेने
स्वप्नात येऊन,सांगितले की,भगवान येथे नाहीत,दक्षिणेत
गोदावरी तीरावरील पैठण येथे भक्त एकानाथाच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत
आहेत,तिकडे जा म्हणजे दर्शन
होईल.त्या प्रमाणे तो द्वारकेहुन
निघून मजल दर मजल करीत
तो पैठण येथे आला व नाथांच्या घराचा शोध करीत
नाथांना येऊन भेटला.नाथांनी त्याचे स्वागत
केले.तो आला त्या वेळी भोजनाची तयारी झाली
होती. तेथील लोक पाटावर
येऊन बसले होते.त्या ब्रह्मणालाही जेवणास
बसण्याची विनंती केली. तो ब्राम्हण म्हणाला मला
तुमच्या घरातील श्रीखंड्याची भेट घ्यायची आहे.
तो भेटल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. नाथानी श्रीखंड्याला बोलावून आणण्यासाठी दूत पाठविले.फुल बागेत,गोदतीरावर तो जिकडे
कामाला जात असे तिकडे शोध घेतला.पण श्रीखंड्या मिळाला नाही.नाथांनी ब्राह्मणाला विनंती
केली की,जेवणाची वेळ झाली आहे, जेवण करून घ्या.श्रीखंड्या कुठे बाहेर
गेला असेल तो इतक्यात येईल व आपणास भेटेल पण ब्राम्हण
काही ऐकेना.त्याने हंबरडा फोडला व नाथांच्या गळ्यात
मिठी मारून,श्रीखंड्या दाखवा,श्रीखंड्या दाखवा म्हणून ओरडू लागला नाथानी विचारले तो तुमचा कोण?येईल आता घाबरू
नका..ब्राम्हण म्हणाला हे एकनाथ तुम्ही ओळखले
नाही हो! तो श्रीकृष्णपरमात्मा.मी त्याच्या दर्शना करिता
द्वारकेत बारा वर्षे तप करीत बसलो होतो,श्रीरुक्मिणीमातेने मला स्वप्नात सांगितले की,भगवान येथे नाहीत.,पैठणाचा एकनाथांच्या घरी
श्रीखंड्याच्या रूपाने सेवा करीत आहेत.हे ऐकताच नाथांचेही हृदय भरून आले!त्यांनी टाहो फोडला! नाथ म्हणाले देवा तुम्ही मला असे फसविले का हो! म्या तुमच्या
कडून किती किती व कसली कसली तरी सेवा करून घेतली!
धिक्कार असो मला! ब्रह्मणामुळे ही तुमची माया मला कळून आली! ह्या अपराधाची क्षमा करा व दर्शन द्या! असे म्हणून देवघरासमोर उभे राहून नाथ त्या
ब्राह्मणाला पोटाशी धरून एकसारखे रडू लागले!देव के दूर होता व आहे?
‘दूरस्थं चांतिके च तत’ असा तो परमात्मा शंख-चक्र-गदा-पद्मधारी, कामालनेत्र किरीटकुंडलमंडित,श्यामसुंदर देवघरातून बाहेर आला.,त्या दिव्य रुपाला पाहून दोघांनीही त्याला मिठी मारली. देवांनीही
त्या दोघांनाही पोटाशी धरले.
हे त्रिमूर्तीचे दृश्य पाहून त्यावेळी जवळ असलेल्या लोकांनी”हरि हो!हरि हो!हरि
हो! जय वासुदेव हरि!जय वासुदेव हरि अशी एकच आरोळी ठोकली.नाथांनी व त्या ब्राम्हणाने मिठी सोडून
प्रभूच्या पायांवर दीर्घदंड नमस्कार घालून मस्तक ठेवले.
ब्राम्हणाने उठून प्रार्थना केली की,हे पुराण प्रसिद्ध दिव्यरूप पाहून कृतार्थ झालो!अनंत जन्मीचा शीण गेला! परंतु श्रीखंड्याचे
स्वरूप पाहण्याची इच्छा आहे.देवाने लगेच ते रूप धारण
करून दर्शन दिले व गुप्त झाले.मेघ मंडळांतील वीज
चमकावी व नाहीशी व्हावे असे त्यावेळी झाले! ज्या खांबा कडे श्रीखंड्या उभा राहून गुप्त झाला
तो खांब,नाथांच्या देवघरा समोर
चौकात आहे.त्याला गंध फुल वाहतात, ज्या सहानेवर भगवान गंध उगाळीत असतात,त्या सहानेची पूजा करतात. नाथ षष्टीला रांजनाची पूजा
करतात.
फाल्गुन पौर्णिमेपूर्वी तो रांजण धूउन,पुसून साफ करतात मानतात त्याला धुपाचा धूर देतात,त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र, थोडेसे खोलगट करून घट्ट
बांधतात.”प्रतिपदे पासून लोक त्यात पाण्याच्या
घागरी ओततात.,”हजारो लोक ही सेवा करतातल.कोणी दहा,कोणी वीस कोणी शंभर आशा घागरीचे नवसही
करतात.नाथ षष्टीला मोठी यात्रा भरते. हजारो लोक येतात.गोदेचे स्नान करून लोक
घागरीतून पाणी आणून रांजनात ओततात.कोणाच्या तरी रूपाने येऊन कृष्ण घागर घालीत असतात.कृष्णाची घागर पडली म्हणजे तो रांजण भरतो.
हा चमत्कार अजूनही दृष्टीस पडतो असे म्हणतात.ज्या ब्रह्मणामुळे श्रीखंड्याचे स्वरूप कळून आले.त्याचे आभारी होऊन नाथांनी त्याचा मोठा सत्कार केला.
सुधाकर काटेकर
संदर्भ श्री एकनाथी भागवत.