Navra baaykoche rusve-fugve - 7 in Marathi Comedy stories by शब्द बिंधास्त..Mk books and stories PDF | नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...७

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

नवरा बायकोचे रुसवे-फुगवे...७


(यार तुम्हीच लग्न करणार काय आम्हाला पण करू द्या... आमचा पण जीव आहे 😜😜🤪)

आतापर्यंत माझ्या स्वप्नातल्या रितुला रियल आयुष्यात "उभ्या या आयुष्याची जोडीदारीन बनवण्यासाठी थोडावेळ तिला शोधायचा प्रयत्न केला पण काय करावा रितु सारखीच स्वभावाने छान, समजून घेणारी, प्रत्येक गोष्टीत माझ्या हो मध्ये हो म्हणणारी, मला वाटेल तसं वागणारी, मला हवं ते मी न सांगताच माझ्यासमोर आणून देणारी, चेहऱ्यावरून आणि बोलण्यावरून मला ओळखणारी, आणि प्रत्येक गोष्टीत रुसून बसणारी, मला धमक्या देणारी, पोकळ धमक्या बरं...😜, तू फक्त माझाच आहे असं कवटाळून सांगणारी...😜😜 अशीच काहीशी माझ्या रियल लाईफ मध्ये रितू मिळाली.... डायरेक्ट शब्द बिंधास्त..mk च्या डोक्यातूनच love you ch😘

तसं कोरोनाच्या कहर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे..... लग्नाला कुणाला बोलवता आलं नाही.. त्यासाठी क्षमा असावी...🙏🙏🙏😜

म्हणून थोडक्यात थोडक आटपून घेतले...😁 ‌तस तर काही नाही, फक्त खर्च वाचवायचा होता, हाच मोठा उद्देश.🤪🤪 तुम्हाला तर चांगल्या प्रकारे माहीत आहे.

ते काही असो माझ्या आयुष्याची जोडीदारीण आता स्वप्नातल्या रितुच्या जागी रियल रीतुने घेतली.....😁 आणि आज सकाळीच तीच्या सासरी म्हणजे तिच्या स्वतःच्या घरी, आज सकाळी सकाळी तिच्या पायाचे तिच्या स्वतःच्या होणाऱ्या घराचा उंबरठा (दार) ती ओलांडणार होती तेवढ्यात माझ्या लाडक्या बहिणीच्...
अशा कश्या अबंरठा पार करी रायणत वहिनी तुम्ही.. जरा नाव ल्या मना भाऊना ....😊

रितु लाजुनच, "अहो ताई नाही ना‌ जमत मला"

अहो वहिनी ‌असा कसा नहि जमत तुम्हलै... नाव‌तर लैवानच पडि...

बर बर घेते हा....😊

"प्रेमाच सुरवात झाली तेराच्या चादंण रातीतून,
मोगरा, चाफ्याच्या सुगंधाने दरवळले नाते आमचे दोघांचे,
माझ्यासाठी तर कायम माझे लाडके "Stupid mk" ते '' राहतील,
तरीपण संपुर्ण परीवारासमोर "Stupid Mk रावाच" नाव घेते, मि तुमच्या परिवाराची सुन...😊

हा सर्व कार्यक्रम संपून उद्याच्या कार्यक्रमाची सर्वांना चाहूलच लागते.. 😜
आता आमच्या खानदेशातला उद्याचा कार्यक्रम काय असेल हे तुम्हाला कळलेच असेल कदाचित कोणाला कळलं नसेल..😜😜
चला जाणून घ्यायचे आहे ना...
उद्याचा कार्यक्रम काय असेल...😁
चला मग बघू... थोडा उद्याचा कार्यक्रम..

तो उद्या उजाडतो... आणि सकाळी सकाळी नऊ वाजेच्या वेळेला कार्यक्रमाला सुरुवात होते तो कार्यक्रम कोणता तर न्हानोऱ्याचा...😜

न्हानोऱ्याचा कार्यक्रम असल्यावर म्हाताऱ्या बायांची तर उपस्थिती आवर्जून असते... आणि त्यात मुलींनाही हा कार्यक्रम बघायची एक वेगळीच आस असते.. आणि त्यात मुलींना बघायची मुलांची वेगळाच काही विषय असतो..😁
आणि म्हाताऱ्या बाया असल्या वर ती मजाच काही वेगळी असते..😜 म्हाताऱ्या बाया नसतील तर समजा तो कार्यक्रम एकदम भंगार झाला असंच समजा..😁

केव्हा कुठे काय बोलतील याचा अंदाज कुणालाच नसतो...🤪 आणि केव्हा कुणाची काय मजाक करतील याचा अंदाज त्यां "नासा" वाल्यांना ही काढता येत नाही... 😜😜

तसंच काही आज....
न्हानोऱ्यासाठी (हळद फेडण्यासाठी) दोन पाठ घेऊन नवरीची बहिण आली आणि पाठ ठेवून निघताच.

एक म्हातारी तिला म्हणत : पाठ ठि सन‌ कथा जाई रायनी व माय तु..? तुले आखो एक पाठ लि ये , पाठ नही व्हयी त नवरदेनी मांडीवर बशी लै जो...😜😜
घाघर वर खळशी बरी शे तू...😁

अस एकूण नवरीची बहीण अशी पळाली कि थांबलीच नाही.

नवरदेव आणि नवरीला पाटावर बसून हळद उतरवण्याचा कार्यक्रम चालू असतो .
त्यात एक म्हातारी..... हे पोरी दोन पान बनवून आण, आणि खोबरे पण घेऊन ये...😜😜

खोबरं चावून एकमेकांचा चेहऱ्यावर गुळण्या करण्याचा कार्यक्रम चालू असतांना.

मधेच दुसरी म्हातारी... बस व्हयना आथे.... ता पान आणा न् नवरदेव ना तोंड मा द्या..... पान वगैरे तयार करून नवरदेवाच्या तोंडात देतात.

आणि नवरी त्या पानाला दाताने तोडण्याचा प्रयत्न करते... तेवढ्यात नवरदेव त्या पानाला ......😜

बाकी नंतर च्या पार्ट मध्ये बघू...... आताच कुठे निघालेत वाचायला धीर धरा वाचू नंतरच्या पार्ट मध्ये😁😜😜





‌ क्रमश :


___________________________________________

शब्द बिंधास्त...mk
किरण सुरेश मगरे
जळगाव