gift from stars - 3 in Marathi Love Stories by siddhi chavan books and stories PDF | नक्षत्रांचे देणे - ३

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

नक्षत्रांचे देणे - ३

पासपोर्ट, कपडे, खाण्याच्या वस्तू वैगरे वैगरे सगळं भरून झालं. भूमी परत परत चेक करून बघत होती.

"भूमी हा फराळ आणि गोडाधोडाचे डब्बे घेऊन जायला परवानगी आहे ना? नाहीतर सगळं काढून घेतील चेकिंगच्या वेळेस..." माईंनी तिच्यासाठी बनवलेला फराळ, काही स्वीट्स सुद्धा बॅगमध्ये व्यवस्थित ठेवून दिले होते.

"सगळं चालत हो माई. " आवराआवर करत भूमी एकेक सामान चेक करत होती.

"माझ्या लेकाला पण दे हो थोडं. स्वतःच नको खाऊ..." माई हसत-हसत म्हणाल्या.

"हो माई." एवढंच बोलून भूमी अंगणात आली. तुळशी वृंदावनासमोर हात जोडून ती आता घराचा निरोप घेणार होती. खरं तर असं खोट सांगून निघणं तिच्या तत्वात बसत नव्हतं, नाना आणि माईंना खऱ्या गोष्टी सांगण्याची हिम्मतही कुठून येणार. त्यांना ते सहन होणार नाही. आणि कमीतकमी या वयात आपल्याकडून तरी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, याची ती पुरेपूर काळजी घेत असे. दोघांचाहि निरोप घेऊन भूमी बाहेर पडली. एअरपोर्टसाठी टॅक्सी दारात उभी होती. एवढंच कि परदेशी जाणाऱ्या फ्लाईटने विभासला भेटायला जाणार नसून भूमी आपल्या स्वप्नांच्या मागोव्यावरती निघाली होती. आयुष्याला कलाटणी देणारा एक मोठा गिअर टाकून ती निघाली.

माईंना बाहेर येण्याचे धाडस होईना. नानांचे डोळे अश्रू धारांनी भरून वाहत होते. एवढ्या वर्षात त्यांचा एकमेव आधार म्हणजे भूमी. घर आणि माई-नानांना सोडून ती कुठे जात नसे. आता एवढ्या लांब, ते पण अनिच्छित काळासाठी जाणार, एकटी… हे त्यांना पटतच नव्हते. आपल्याजवळ अजून किती दिवस त्या तरुण मुलीला ठेवणार? हि सल नानांच्या मनात टोचत होतीच आणि एकाएकी विभासचे बोलावणे आले. यामुळे अजिबात आढेवेढे न घेता दोघांनीही भूमीला परदेशी जाण्यास परवानगी दिली.

'भूमी या घरात आल्यापासूनच एकेक दिवस माईंच्या आठवणीत होता. बघताच क्षणी कोणाच्याही ह्रदयात स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व. उंची जेमजेम पण टपोरे पाणीदार डोळे, नाजूक सडपातळ बांध्याची गोरीपान भूमी, चेहऱ्यावर सदैव हास्याची छटा घेऊनच घरात वावरायची. सळसळणाऱ्या लांब केसांप्रमाणेच सदैव सळसळणारे चैतन्य होते तिच्या रूपात. विभासाठी तिची निवड करताना माईंना आपल्या मुलाचा हेवा वाटाला होता. घरंदाज सून घरी येणार म्हणून आजूबाजूच्या लोकांनाही त्यांचे कौतुक होते.'

गॅसवरचा चहा आटायला आला होता, याची जाणीव झाल्यावर आपल्याच विचारात गढलेला माई उठल्या.

"जाऊ दे तिला विभासकडे. तिने तरी तिची हॊसमौज कधी करायची. आमच्या म्हाताऱ्याचं काय, आज आहोत, उद्या नसू. आणि मुलगाच परदेशी आहे तर काय करणार." म्हणत नाना देखील आपल्या आराम खुर्चीवर डोकं टेकून पेपर चाळू लागले.

*****

आज मेघाताईंना राहून राहून काहीतरी चुकल्या सारखं वाटत होत. साठे काकांचा फोन येऊन गेला होता.

काका असं का म्हणाले? 'क्षितिजचे नक्षत्र त्याला फिरवत आहेत, योग चांगला आहे, पण नवीन गाठीभेटी होतील आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटना घडू लागतील. सुरुवात आजपासूनच होणार.’

देवाने त्याच्या नशिबात अजून काय-काय वाढून ठेवलय तेच कळत नाही. आपल्या आयुष्यात कोणाला डोकावू देईल तर शपथ. एकटा पडलाय तो. मैथिली त्याच्या आयुष्यात आली तो एक अपघातच. तिथून त्याचे ग्रह बदलत गेले. पैसे, प्रसिद्धी हे सगळं जरी मिळाल, तरीही त्यात त्याच सुख गेलं. हसरा खेळता क्षितिज त्यानंतर काही पाहायला मिळाला नाही. फक्त मैथिलीच्या शुद्धीवर येण्याचा आशेवर जगतोय तो. ती शुद्धीवर आली तरीही शारीरिक अपंगत्व घेऊनच, मग काय? तो ते सहन करू शकेल का? तिच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत, असं वाटत त्याला. कोणीतरी अशी त्याच्या आयुष्यात येउदे कि मला माझा जुना क्षितिज ती पुन्हा मिळवून देईल.'

"बसली का शून्यात जाऊन? दुनियादारी आटोपली वाटत."

७०-८० च्या घरात असणार पण स्वतःला १६ वर्षाची तरुण मुलगी समजणारी आजो, म्हणजेच मेघाताईंच्या आई आणि क्षितिजची आज्जी, आपला बॉबकट नीटनेटका करत मेघाताईंच्या रूममध्ये शिरल्या आणि तडक टेबल उघडून आपल्या फंकी पीच वनपीसवर मॅच अश्या काही ऍक्सेसरीज मिळतायत का पाहू लागल्या होत्या.

"हो झाली दुनियादारी. तुला काय पाहिजे? आणि हा काय ड्रेस घातलास ग?" मेघाताई उठून त्यांच्या मदतीला आल्या.

"हा काय ड्रेस म्हणजे, वनपीस आहे माझा. पार्टीला जातेय, मेघे मॅचिंग नेकपीस असेल तर दे ग." एव्हाना ड्रॉव्हर मधला पसारा बाहेर काढून त्यांनी हवा तो नेकलेस घातला सुद्धा. आपल्या लेकीकडे एक लाडिक कटाक्ष टाकत, त्यांनी नजरेनेच विचारले. 'कशी दिसतेय?'

आपली आई या वयातही अल्लडपणाच उत्तम उदाहरण, मेघाताई तरी काय बोलणार, 'फारच सेक्सी म्हातारी ' म्हणत त्यांनी सगळं सामान ड्रॉव्हर मध्ये ढकललं आणि पुन्हा येऊन पलंगावर बसल्या.

"बर, माझ्या नातवाला सारखा त्रास देत जाऊ नकोस. त्याला मर्जीप्रमाणे जगुदे त्याचं आयुष्य. कोणीतरी माझ्यासारखी सेक्सी भेटली कि बघच, कसा उड्या मारत लग्नाला तयार होतो."

बाहेर पडत त्या मेघाताईंना बजावत होत्या. आणि अचानक काही तरी आठववल्या सारखं परत माघारी फिरून त्यांनी एक लिफाफा मेघाताईंचा हातात ठेवला. " याचा पीक पाठव त्याला, दिल्लीला गेलाय तर दोन दिवसांनी हे फंगशन पण अटेंड कर म्हणावं. माझ्या नात्यातल लग्न आहे. "

ऑर्डर सोडून त्या निघूनही गेल्या.


क्रमश:
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com