आपन भाग दोन पाहिला आता पुढे.....
मोबाईल हातात असून मी माझ्या रितू डार्लिंगच्या आईचा फोन काहि रिसीव्ह केला नाही. त्यामुळे तिचे आता मोठे मोठे डोळे बघून आणि तिने धारण केलेला कालिंका देवीचा अवतार बघून जीवच घाबरला....😞
तिने फोन ठेवला न...
एकदम कालिंका देवीचे अवतार घेऊन मला जसं काय मारायलाच आली असं वाटलं..
बरं झालं तिच्या हातात त्रिशूल नव्हता. नाहीतर ही कथा इथेच बंद पडली असती..😜😜🤣
(पण केव्हा केव्हा वाटतं तिच्या हातात त्रिशूल असतं तर बरं झालं असतं त्या स्वर्गातल्या सुंदर सुंदर चेहरे तरी बघायला मिळाले असते... काय करा राव नशीब लय वाईट माझ असो.... 🤣🤣😜😜)
रीतू डार्लिंग एकदम रागातच आली आणि हातातला मोबाईल हिसकावूनच गेली. आता तर माझा जीवच जाईल असं वाटत होतं. त्यात तिची मैत्रीण मितू व्हाट्सअप ला चॅटिंग करत होती. रितू मोबाईल घेऊन पाण्याच्या टाकी जवळ जाऊन..
रितू : टाकू का मोबाईल पाण्यात...😠
मि : अग टाक
रितु : खरच टाकीन हं पाण्यात...😠
मि : अग टाक तु बिंधास्त...(.मि मनातल्या मनात विचार करत, मोबाईल टाकला पाण्यात तर खूप बर होईल रे देवा.) वाचव रे देवा...🙄
त्यात मितुचे मेसेज वर मेसेज येत होते, मोबाईलची मेसेज रिंग तुबलुक तुबलुक करत वाजत होते. त्यात त्या रिंगच्या आवाजाने माझ्या हृदयाचे ठोके वाढतच होते... इने जर पाहिलं तर जीवन घेईल माझा.. असंच वाटू लागल...
रितू पुन्हा बोलत....! आता खरच टाकून देईल ह.. मजाक करत नाहिय..!!😠
मी: टाक बिंधास्त... "हा बिंधास्त सांगतोय तुला"
हे माझं असं बोलन ऐकून रितुने रागारागाने मोबाईल माझ्या थोबारड्यावरच मारून फेकला...
परंतू
मोबाईल माझ्या थोबारड्यावर मारून फेकला,
तेव्हा इतकं छान वाटलं, इतकं छान वाटलं ... आता तुम्हाला काय सांगू...🤣🤣😜
"कुणालाच न भेटलेले सुख ते मला भेटलं"🤣🤣
आणि रितु रागा संतापाने.. धड धड धड चालुन आतल्या रूम मध्ये गेली न बेडवरच पडली. न माझी रितू डार्लिंग रडतच बसली...😏
"आता करू तरी काय....?
ती हसायला पाहिजे म्हणून मी मुद्दामच जोरात आवाज दिला.....
"अग ये रितु इथून कोणती ट्रक गेली ग.....!
एवढ्या धडधड धडधड वेगात...😜😜 अगं पाच फरश्या तुटून गेल्या आपल्या घरातल्या....
अग अग सॉरी सॉरी....हं माझ्या नाही हं...!
"हा माझ्या सासऱ्यांनी मला दिलेल्या घराच्या... अग सॉरी सॉरी सॉरी ह.. मला नाही, तुला दिलेल्या घराच्या तुटल्या 😜😜🤣
तरीसुद्धा रितु रागातच होती..
तिचा राग काही जात नव्हता. आता काय करावं मला पण कळत नव्हतं.. शेवटी टीव्हीवर चालू असलेल्या सीन कडे बघून माझ्या बिंधास्त डोक्यामध्ये टुप पेटली....😜🤘
"मग काय ठरलं न राव..."
रितू ऐ रितू...! ऐक ना ग...!!
रितू जोरातच....
हो तुमचंच ऐकायचा आहे आयुष्यभर..!
तुमचंच ऐकावं लागेल न आयुष्यभर आता पर्याय नाही.😠
रितू जवळ जाऊन......
love you n Ritu darling. तरीसुद्धा रितु रागाने हात झटकून फेकून द्यायची. मग मि पन तिच्या कमरेवर हात ठेवत..
" रितु सॉरी ना"कान पकडून सॉरी यार. तिच्या गालावर एक पप्पी घेत, तिला बेड वर उचलून लहान बाळासारखे कवेत पकडुन स्मित हास्य देत तिच्या ओठावर ओठ ठेकवत..... सॉरी यार कान पकडून...😏
ती गप्प बसा...😏
तुमचं असंच असते केव्हा पण...
सोडा मला स्टुपिड mk.. आपलं बाळ येईल. सोडा पटकन..
मी: सोडणारच नाही, आधी मला किस कर तेव्हाच सोडेल...😜🤣🤣
रितु हसतच स्टुपिडmk तुम्ही ना...! ऐकणारच नाही..
😘 बस आता खुश😊... सोडा आता मला..
तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली....
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग....
ती मला म्हणत...! बघा बर कोण आले...?
दरवाजा उघडताच मितु समोर दिसली.
आणि जोरात बोलायला लागली...
"काय पाहूण तुम्हाला केव्हाच मेसेज करते" रिप्लाय सुद्धा देत नाही हो तुम्ही म्हणून घरीच आले भेटायला ...
मी मितूला कसंतरी ऍडजेस्ट करत तुझी ताई घरी नाही तू नंतर ये भेटायला , मला थोडं काम आहे माझे फ्रेंड घरी येत आहेत,असं तस बोलून तिला वाटी लावून दिल..
हे सगळं रितु ऐकत होती. आणि आता पुन्हा रितु चा पारा चढला...
तिचे ते मोठे मोठे डोळे , चेहऱ्यावर राग, पदर कमरेला खोसत, व्हाट्सअप ला चॅटिंग, इथं घरी येणं, मी घरी आहे, म्हणून तिला मी घरी नाही सांगितलं, घरी नसते तर...?
काय घरी नसते मि तर...?
बोला...?
भयंकर खिजालेल्या अवस्थेत तिचे ते रूप पाहून.. मला तर असं वाटू लागलं आता मला खाऊन टाकेल कि काय आता...... हि 🥺🥺.
(शब्द बिंधास्त...mk)
किरण सुरेश मगरे
जळगाव
क्रमशः.....