Mi ti aani shimla - 7 in Marathi Fiction Stories by Ajay Shelke books and stories PDF | मी ती आणि शिमला - 7

Featured Books
Categories
Share

मी ती आणि शिमला - 7

बस नक्की काय बोलावं, कसं बोलावं, हेच मनात फिरू लागलं आपण आहोत कुठे वगेरे सर्व विसरून गेलो. कान चींगग आवाज करत होते. मंद वारा वाहत होता एवढच समजत होत आणि बेंच वर माझ्या डाव्या हातावर कोमल हात जाणवला आणि मी हलकेच बाजूला पाहिलं तर स्वरालीचा चेहेरा मावळत्या सूर्याच्या प्रकाशात एवढा सुंदर वाटत होता की शब्दात वर्णन करता ही येत नाही.
"तस मला फक्त तुझं हे ओव्हर स्मोकिंग पटत नाही बाकी मला काही प्रोब्लेम नाहीय". तिचे बोल कानवराती आले आणि चींगग पणा निघाला. "सॉरी" एवढच शब्द बाहेर आला आणि मी उठून गाडीकढे चालू लागलो आणि गाडीत जाऊन बसलो. अजून शेवट चे ५-७ मिनिटे बाकी असतील सूर्यास्त होण्यासाठी आणि गाडीतून सुध्धा तेवढाच अप्रतिम सौंदर्य दिसत होत निसर्गाचं आणि त्या गाडीकडे येणाऱ्या अप्सरेच. ती बाजूला येऊन बसली आणि दरवाजा लावला. गाडीत हिटर चालू होता समोर दिवस मावळात होता आणि मनात वार फिरत होत आणि मग ठरवलं आज नाही तर कधीच नाही.
"पण मला तुझ्यात अस खटकन्याजोग काही वाटत नाही तुझी प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे". "बरं मग मला नाही वाटत काही अडचण आहे म्हणून". "आहे एक माझ्या मते". "कोणती अडचण आहे सांग". "ते ते तुझ केस मोकळे सोडून राहणं मला ते अजून तुझ्या प्रेमात पाडत आणि आणि बस मला राहवत ना ना ना नाही तुझ्या जवळ आल्याशिवाय". "फक्त मला एवढं सांग रू की तुला मी तुझ्या सोबत असल्या शिवाय कसं वाटत ते?"
"you feel like a home" मी एवढं उत्तर दिलं आणि गाडी चालू केली आणि गाडी घेऊन निघालो ते डायरेक्ट हॉटेलकडे. सर्व रस्त्यात काही एक शब्द निघाला नाही माझ्या तोंडून ना तिच्या तोंडातून, ना माझी तिझ्याकडे पाहण्याची हिम्मत ना तिची माझ्याकडे शेवटी हॉटेल मध्ये आलो गाडी ची चावी हॉटेल स्टाफकडे दिली आणि लिफ्टच बटन दाबल तेच स्वराचा हात माझ्या हातावर आला तसा मी झटकन हात मागे घेतला आणि मागे सरकलो.
लिफ्ट खाली येत होती आणि माझ्या जीवाची घालमेल चालू होती. लिफ्ट येताच आम्ही आत गेलो आणि तिथून रूम मध्ये आणि रूम मध्ये जाताच स्वराली रडायला लागली. तेही मंद आवाजात सुस्कारे घेत मला आधी ते उमगले नाही पण दरवाजा लाऊन बाथरूमकडे जाताना मला ते अश्रू दिसले.
ह्या आधी मी कधीही ह्या व्यक्तीला अस रडताना पाहिले नव्हत त्या मुळे मला जरा काळजी वाटली आणि तिच्या जवळ जाऊन बसलो तेच तिने मला मिठी मारली आणि आत्ता मोठयाने रडू लागली आणि सुस्करत बोलू लागली."का रे तुला अस माझ्या बद्दल फील कसं होऊ शकत ? बरं ठीक आहे कंफर्ट झोन आहे, फ्रेंडशिप आहे समजल पण तू चक्क बोलतोस की you feel like a home अरे तुला घर कसं असतं ते माहीत नाही आणि सॉरी अस बोलते बट सिरीयसली तुला घर कसं असत आई बाबा कोण भाऊ बहिण यांचं प्रेम, कसं वागावं ते माहीत नाही तरी तू चक्क मला सर्वात वरचा म्हणजे अरे काय बोलू तुला यार". "हो तू शांत हो आधी पाहू" मी एवढच बोलून तिला शांत करू लागलो कारण मला सुद्धा माहीत होत आज तागायत तिला अस कोणी उत्तर दिलं नव्हत आणि एवढ्या वरच्या उत्तराची किंवा भावनेची तिला अपेक्षा नव्हती. तीच हळू हळू रडणे कमी होऊ लागले तशी तशी आमची मिठी सैल होत गेली आणि शेवटी मिठी सुटली आणि ती बेडवरती झोपली.
ती झोपतच तिचे मोकळे केस मोराच्या पिसऱ्या सारखे पसरले आणि रडल्या मुळे गुलाबी लाल झालेला चेहेरा खूपच गोंडस वाटत होता. मी तिच्या कडे पाहत होतोच तेच तिने तसा तिने माझा डावा हात बाजूला पसरवला आणि माझ्या हातावर डोकं ठेऊन आणि मला चिटकुण झोपली आणि मला एवढं बरं वाटत की कारण आज तागायात मी कोणाला बिलगून झोपलेलो नव्हतो असो. अस तिला बिलगून झोपल्यामुळे मला सुद्धा कधी झोप लागली समजलच नाही आणि माझा सुद्धा डोळा लागला.
जेव्हा डोळे उघडले तेव्हा सर्व खोलीत अंधार होता एसी चा आवाज घुमत होता आणि बाहेर अंधार पडलेला.
अवेळी झोपल्यामुले वेळेचा अंदाज लावता येत नव्हता आणि डोळे सुद्धा दुखत होते मोबाईल पाहिलं तर माझा फोन बॅटरी विना बंद झालेला त्यामुळे मी स्वराचा फोन घेतला तर त्यात रात्री चे सव्वानऊ झाले होते. वेळे पाहून झाली तर मी उठू लागलो तर स्वरा परत बिलगू पाहत होती पण आत्ता जेवायला जायचं असल्यामुळे अवरावर करावी लागणार होती कसं बस मी स्वराला बाजूला करून उठलो तेच मला तिचा फोनचा वॉलपेपर आठवला मी परत फोन हातात घेऊन पाहिलं तर त्यावर माझ्या कुत्र्याचा फोटो होता. तो फोटो जेव्हा मी त्याला माझ्याकडे पहिल्यांदा आणलेला आणि मी तिच्याकडे पाहिलं तर स्वरा माझ्याकडेच पहात होती आणि


क्रमशः