vighav in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | विघाव

Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 24

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 10

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • మనసిచ్చి చూడు - 9

                         మనసిచ్చి చూడు - 09 సమీరా ఉలిక్కిపడి చూస...

  • అరె ఏమైందీ? - 23

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 9

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

Categories
Share

विघाव

विभा आणी राघव एक जोडपं लग्न होऊन पाच सहा महिने झालेले विभा एका ऑफिसमध्ये काम करायची तर राघव स्वताचा ट्रान्स पोटचा बिझनेस सांभाळायचं...

म्हटलं तर त्याचं अरेंज मॅरेज होत पाच महिने लग्नाला होऊ सुध्दा त्यांच्यात आपलुकी प्रेम कुठेच दिसत नव्हतं विभाला ह्याची खंत नेहमी जाणवायची पण राघव आपल्या कामात एवढा व्यसत असायचा की त्याला विभाची खंत कळायची नाही विभा बोलायला गेली की मग खटके उडायचे एका छताखाली राहुन परक्या सारखे वागायचे ते ...


त्या दिवशी तर कहर झाला विभा ऑफिसमधून आली व स्वयंपाक करायला लागली आज ती राघवच्या आवडीचे अळुवडे करणार होती पटपट तिने स्वयंपाक आवरला आणी नेहमी प्रमाणे राघवची वाट पाहत बसली वाट पाहता दहा वाजले .."करु का फोन" ? विभाच्या मनात प्रश्न आला पण लगेच राघवच बोलणं आठवलं "कळंत नाही तुला मी कामात असतो परत परत फोन करु नकोस...."विभाने पटकन फोन खाली ठेवला आता तिची नजर होती त्याच्या येण्याकडे.... घड्याळयाचे काटे पुढे सरकत होते पण राघवचा पत्ता नव्हता विभा ने टेबलावर डोके ठेवले आणी तिला जाग आली ती दरवाजा उघडल्याच्या आवाजाने राघव आला होता ती त्याला म्हणाली "मी जेवण वाढते तुझ्या आवडीच्या अळुवड्या केल्या आहेत तो पटकन म्हणाला "मिंटीग होती जेवुन आलोय आणी तो निघुन गेला. वीभा तर उपाशी होती पण त्याने तिला जेवलीस का असं सुध्दा विचारलं नव्हतं ही गोष्ट विभाला खुप लागली तीची भुक मेलेली तिने फक्त पाणी पिलं आणी मनाला सावरत झोपी गेली सकाळी उठल्यावर वीभाला अशक्त वाटुन लागलं तरी तिनी ब्रेकफास्ट तयार केला राघवला दिला आणी आपण खात खात तिने राघवला प्रश्न केला "काल फोन करून कळवायच तरी उशीर होणार म्हणून "?मी रात्री जेवली नाही वाट पाहुन " राघव पटकन म्हणाला" कोणी सांगितले उपाशी राहायला तुला माहीत आहे ना मी बीझी असतो ते" आणि तो ऑफिससाठी निघुन गेला... विभा मात्र त्यांच्या पाठमोरी आकृती कडे बघत राहिली आणी आसवे गळत होती पण स्वताला सावरत आपल्या ऑफिसमध्ये जाण्यास निघाली. विचार मात्र तिचे चालू होते आणी अचानक काय झालं तिला कळ नाही

तिच्या नजरे समोर खूप लोकांचा घोळका होता आणि पुढचे तिला काहीच आठवले नाही आणि विभा हॉस्पिटलच्या बेडवर निशब्द पडलेली ...


लोकांनी विभाच्या मोबाइलला वरून राघव ला फोन गेला पण त्यानी रिसिव्ह केला नाही मग आणि कोणाचं म्हणजे विभाच्या आईला त्या घोळक्यातला एकाने परिस्तिथीची जाणीव करून दिली तशी विभाची आई बाबा भाऊ लगेच हॉस्पिटलात पोहचले विभाची आई रडून रडून थकली होती तिथे पोचताच विभाच्या भावाने राघव आणि त्याच्या घरातल्याना खबर गेली तसे ते हि तिथे पोहोचले आता फक्त डॉक्टर येणाची वाट सगळे पहाता होते राघव ने विभा कडे पहिले डोळे मिटून निशब्द पडलेली डोक्याला बँडेज

सलायन चालू होते


तेवड्यात डॉक्टर आले आणि विभाला त्यांनी तपासले ते बाहेर येताच त्यांनी एवढच सांगितलं" ती शुद्धी वर लवकर येवो मगच पुढे काही सांगू शकतो "हे ऐकताच विभाची आई उभी होती ती खाली कोसळली आता सगळेच वाट पाहत होते विभाच्या शुद्धीवर येण्याची रात्रीचे दहा वाजले तरी विभा काही शुद्धीवर अली नाही सिस्टरने सगळ्या सांगितले "पेशंट बरोबर कोणी एकटेच थांबा बाकीच्यांनी घरी गेले तरी चाललेले उगीच गर्दी करू नका "मग विभाचा भाऊ आणि आई थांबले .....


राघव घरी आला त्याच्या आई बाबानी पण दिवस भर काही खाल नव्हतं मग त्यांनी थोडस खाल .राघव रूममध्ये आला त्याला आज विचित्र असं जाणवत होत तो बेडवर बसला आणि चारहि बाजूनी नजर फिरवली आणि पाकीट देवण्यासाठी त्याने ड्रॉवर उघडला त्याला तिथे एक डायरी दिसली हि कोणाची डायरी म्हूनन त्याने ती उघडली आणि तो वाचू लागला

"लग्न म्हणजे अडजस्टमेन्ट का "?

हो तर ती मी गेली ....

माहित नाही आयुष्यात काय चालाय ...

पण आयुष्य मात्र चालू आहे काही ....

काळोख भरला भविष्यात .....

आशेचा किरण मात्र दिसत नाही ......


रोजची भावना विभाने प्रत्येक पानावर उमटली होती राघव एक एक पान वाचत होता आणि त्याच्या कधी डोळा लागला तो सकाळी उठला तर ती डायरी त्याच्या समोरच होती लगेच त्याने ती डायरी ड्रॉवर मध्ये ठेवली आणि आवरून हॉस्पिटल साठी निघाला ...त्याला त्या डायरी तले शब्द आठवू लागले कुठेतरी अपराधी वाटू लागला खरच आपण विभाशी वाईट वागलो का हा प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होता ....


तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला विभा अजूनही शुद्धीवर आली नव्हती जो तो देवाला सांकडे घालता होता राघवने विभा कडे पहिले आणि त्याचे डोळे डबडबले आणि तो तडक डॉक्टरच्या केबिन मध्ये गेला तिथे त्याला फक्त तिला कसे शुद्धीवर आणू शकता हे पहा असे सांगितले डॉक्टरची परमिशन घेऊन तो विभा कडे गेला आज त्याला खूप भरून आल होत...निशब्द पडलेल्या विभाकडे बघून तो म्हणाला ...


"विभा जागी हो माहित आहे मला मी खूप वाईट वागलो तुझ्याबरोबर मी तुला समजून नाही घेतल बिसनेस ह्या पुढे तू माझ्या आयुष्यत आहे हे मी विसरलो होतो तू उपाशी आहेस कि रडतेस कधीच विचारल नाही कधी तुच्या बरोबर चार प्रेमाचे शब्द बोलो नाही पण खर सांगू आज खूप एकाकी पडलो मी मला तू हवी आहेस सगळे तू चे दुःख त्या डायरीत बंद केलस आणि कशी माहित नाही ती माझ्या हाती लागली वाचून गळालो मी पण ह्या पुढे मी तुला रडूच देणार नाही फक्त तू परत ये जे झालं ते वाईट सवपन म्हूनन

विसरू जाऊ आणि नव्या आयुष्याची सुरवात करू ज्यात मी तुला कधीच अंतर देणार नाही फक्त विभा तू परत ये" म्हूनन तो रडू लागला आणि नकळत त्याचे अश्रू विभाच्या हातावर पडले आणि विभाचा हात हळू लागला राघवने पटकन डॉक्टरना हाक मारली तसे डॉक्टर आले विभा शुद्धीवर आली होती डॉक्टर नि विभाला तपासले आणि सांगितले ती जरी शुद्धीवर आली असली तरी तिला टेन्शन होईल असं काही वागू नका तरच ती यातून लवकर बरी होईल ...


विभाने डोळे उघडून सगळीकडे पहिले पण बोलण्याच्या त्राण तिच्यात नव्हतं. कधी नाही तो राघव तिच्या समोर होता सगळ्याना तिला काही सांगायचे होते पण सिस्टर ने सांगितले कोणी एकटेच इथे थांबा बाकीचे बाहेर जा म्हटल्यावर विभा शुद्धीवर आली ह्या समाधानवर सगळे बाहेर आले राघव मात्र तिथंच बसला राघव विभाकडे पाहून म्हणला

"विभा चल लवकर बरी हो मला बाबा एकट वाटतंय तुच्या हातच्या अळूवड्या खायच्या आहेत मला आणि तुला माहित आहे का तू बरी झाली कि आपण दहा दिवस कुठे तरी फिरायला जाऊ तू म्हणशील तिथे फक्त तू बरी हो आणि मी ठरवलंय आज पासून तुला वेळ देणार. तुला एकट कधीच वाटू देणार नाही आणि तू डायरी मध्ये आपल्या नावाचा उल्लेख केलास ना कि विभातला - वि आणि राघवत ला -घाव च्या नात्याने तुला इतके दिवस विरुद्ध दिशने घाव दिले ना ....आता विघाव नाही विभार विभाचा भार मी उचलणार"

विभा सगळ एकत होती एव्हडी अशक्त असताना सुद्धा आज तिला मनातून ताकद आली होती तिने राघवकडे पहिले तिच्या अशक्त चेहऱयावर ते आनंदित हास्य खुलून दिसत होते ....