पण जर काम नाही केले तर मुलाच्या शिक्षणाचे कसे होणार .... घर कस चालणार .....पण ...काही जाहले ...तरी ...मुलाकडे दुर्लक्ष नको .... त्याच्या पासून त्याची आई दूर जायला नको ... मग आर्यांनी डब्ब्याचा लोड कमी करण्यासाठी .... आणि तिच्या मदतीसाठी एक बाई ठेवली .... तिच्या येण्या मुळे तिला मदत च होणार होती ...पण पैशाची तंगि ही असणारच होती ....पण ,तरीही आर्याने हार मानली नाही ....तिने थोडाफार खर्च कमी केला ....आता ती मुलाना जास्त वेळ देऊ लागली .तिचा मुलगा लक्ष तर तिच्या कुशीत शांत पणे झोपू लागला .रेवाचा अभ्यास घेणे ...आर्वी ला दूध पाजणे ....ही कामे ही ती करू लागली . त्या मायलेकराच प्रेम बघून ....राधा आजी ना मात्र खूप बरे वाटे...
वरून जरी आर्या खम्की असली, तरी ...आतून मात्र ती खूप नाजूक जाहली होती ....आपल दुःख लपवण्याच्या नादात ...आता तिला रडू येणे च बंद जाहले होते . ती च घर मुलांनी भरलेले होत ... पण तरीही तिला आतून कुठेतरी एकट वाटत होत . प्रत्येकाला जोडीदाराची गरज असतेच ना ...प्रेमाने, मायेने बोलणारे कोणीतरी हवं असतच ना ....कुठे दुखले खुपले तर जवळ घेणार ...लागतच ना .....प्रेमाची गरज तर सगळ्यांनाच असते ना ? त्यातून अमन सारखा जोडीदार तिला मिळाला .....ह्याच दुःख ही होत .ज्याच्यासाठी आपण आई वडील सोडले ...तो असा निघावा .....आणि ह्या सगळ्याच्या सोबत ....आपल्या तिन्ही मुलाचे आई आणि वडील दोघे ही व्हायचे ह्याच प्रेशर होतच ....
पण म्हणतात ना ....देवालाच काळजी असते ...तसच काहीसे आर्यांच्या बाबतींत होत होते ...तिचा घरगुती डब्बे बनवण्याचा बिज़्नेस खूप चालु लागला होता . दिवसेंदिवस तिच्या डब्ब्याचि संख्या वाढू लागली होती .काम वाढू लागल्यामुळे घरात पैसा येऊ लागला ... तिने कामाला आणखीन दोन बायका ठेवल्या ....त्या मुळे तिचा थोडासा कामाचा लोड कमी जाहला. मुले ही थोडी मोठी जाहली होती, बऱ्या पैकी एकमेकांना ती सांभाळून घेऊ लागली होती .... आता राधा आजी थकू लागल्या होत्या ......त्यांना मरण्याचा आधी एकदा आपल्या मुलाला पहावे, त्याला कुशीत घ्यावे अस, खूप वाटत होते .दिवसेंदिवस त्या मुलाच्या ह्या आठवणीने खचत चालल्या होत्या . आर्या ला हे सगळे कळत होते ......पण ती तरीही काय करणार? त्याचा अमेरिकेत गेलेल्या मुलाला ती तरीही कुठे शोधणार ...राधा आजी ना त्याच्या विषयी काहीच माहीत नव्हते .फक्त खूप दिवसापूर्वी त्याच्या मुलांनी अमेरिकेत जातांना त्याना फोन नंबर आणि पत्ता दिला होता .. आर्याने त्यांवर कॉंटेक्ट करायचा खूप प्रयत्न केला ...पण काहीच उपयोग जाहला नाही .तो नंबर चुकीचा आहे, अस सांगण्यात आले .अर्याला काहीच कळेना ....ज्या राधा आजी तिची नेहमी संकटाच्या वेळी मदत केली . तिला आई सारखे प्रेम दिले ....त्याना आज त्याच्या मुलाला भेटायचे आहे .तर ,मी त्यांना भेटवू शकत नाही ....का? तर तो अमेरिकेत आहे ना? आर्यांचे मन तील तील तुटत होते .पण तिचा ही नाईलाज होता . कारण ती काहीच करू शकत नव्हती .त्याच्या मुलाला ती एथे बसून अमेरिकेत कस काय शोधणार होती? शिवाय कोणाची मदत ही घेऊ शकत नव्हती .कशी घेणार ;? कोण मदत करणार?
तस .....तिला काहीच मार्ग दिसत नव्हता .पण ...तरीही एकदा अंजलीच्या कानावर ही गोष्ट घालावी म्हणून तिने अंजली ला बाहेर भेटायला बोलवले .अंजली ही काहीही कारण न सांगता तिला ....भेटायला आली .आर्याने अंजली ला जाहले ला सगळा प्रकार सांगितला . अंजली ला ही ह्या प्रकरणात आर्या ची मदत कशी करावी? काहीच कळेना ....तरीही काही तरी करू ....अस, सांगून तिला धीर दिला ...आणि घर गाठले .
पण, अंजली च्या मनात ही तो विचार घोळू लागला . कस शोधायचे? राधा आजीच्या मुलाला ....ती विचार करत बस्लीच होती, की .....तिथे अंजली चा नवरा आला .ती काहीतरी विचार करत बसली आहे ....हे पाहून त्याने तिला तिच्या काळजीचे कारण विचरले . अंजली ने ही त्याला लगेच सगळे सांगून टाकले . पण, तो ह्या सगळ्यातून मार्ग काढेल .अस, अंजलीला वाटले सूध्हा नव्हते . गौतम अंजली चा नवरा त्याने लगेच त्याच्या अमेरिकेतील मित्राला फोन केला ....आणि राधा आजी ने जो त्या च्या मुलाचा फोन नंबर आणि घराचा पत्ता सांगितला तो त्या मित्राला सांगितला . त्याने लगेच तिथे शोध करून अंजली च्या नवऱ्याला फोन केला . त्याने दिलेल्या महिती ऐकून ... अंजली ला आणि तिच्या नवऱ्याला खूप आनंद जाहला. ती सगळी महिती तिने लगेच फोन करून अर्याला सांगितली ...अर्याल ही ती महिती ऐकून आनंद जाहला. राधा आजी तर फक्त नाचायच्या बाकी होत्या . मरणाच्या आधी एकदा तरी आपल्याला आपल्या मुलाला डोळे भरून पहायला मिळेल ....अस त्यना वाटू लागले .
ठरलेल्या प्रमाणे अंजली च्या नवऱ्याने राधा आजी ची आणि त्याच्या मुलाची भेट घडवून आणली . नेहमी प्रमाणे त्यांची सुन त्यांना भेटायला न आल्यामुळे त्याची नातवाशी भेट होऊ शकली नाही .पण मुलगा तरी भेटायला आला ह्यातच त्यानी समाधान मानले .
ठरलेल्या दिवशी राधा आजी ची आणि त्याच्या मुलाची भेट जाहाली .त्याला भेटून राधा आजी खूप खूष झल्या .पण ...राधा आजी ना भेटून त्याचा मुलगा ही तितकाच खूष जाहला होता . राधा आजी च्या आनंदा साठी अंजली ने त्यांना दोन तीन दिवस राहण्याची विनंती केली .त्याने ही फार आ ढे वेढे न घेता ....रहायला तयार जाहला. त्याला पाहून राधा आजी चा तर आनंद च गगनात मावत नव्हता . सागर नाव होत त्याच ....आर्या ऑफीस वर गेलेव्यार ....... सागर, सूध्हा मुलाची काळजी घेऊ लागला . मुलाची आणि त्याची चांगलीच गट्टी जमली होती . सागर आल्यामुळे घरातले वातावरण ही बदलून गेले होतेl . खेळीमेली च वातावरण होत . मूल ही रमून गेली होती .....
सगळ छान चालले होते ....
अचानक .....रात्री राधा आजी ची तब्येत बिघडली ...त्यांना हॉस्पिटल मधे णेह्ण्यात आले होते ....पण उपयोग ...जाहला नाही ......राधा आजी गेल्या ....सगळ्यांना सोडून ...ह्याचा फार मोठा धक्का सगळ्यां च बसला . आर्या आणि सागर दोघे ही कोल्मुडुन गेले . पण दोघांनी ही ह्या प्रसंगात एकमेकांना साथ दिली .आणि दोघे ही त्यातून बाहेर आले .पण ह्या सगळ्यात सागर आणि आर्या मनाने एकमेकांच्या जवळ आले . दोघाना एकमेकांचा आधार वाटू लागला . दोघे ही एकमेकांना आपली सुख दुखे सांगू लागली .