तर आजची एक छोटी भयकथा तुमच्या साठी ..
ही एक कोकणातील , रत्नागिरी जिल्ह्यातील सत्य घटना आहे ...
एका प्रतिलिपी वरील वाचकाने मला ही कथा सांगितली आहे ........
वाचकाने नाव हे गुपित ठेवायला सांगितले आहे ..
कारण हा त्याचाच अनुभव आहे ....
शरद मामाच्या गावाला गेला होता , खरे तर तो नेहमीच जायचा पण दिवाळीच्या सुट्टीत तो कमीत कमी एक महिना तरी त्या गावात राहायचा ...
शरद ला सायकल वर हिंडायला फार आवडत होते , शरद चे मामी मामा त्याला नेहमी सांगायचे की रात्री सात वाजेच्या आत घरी येत जा ?
कारण गावच्या वेशिजवळ एक विहीर आहे ...
ती जागा बरी नव्हे ?
शरद ला नेहमीच नवल वाटायचे .....
त्याला ती सगळी मजाक वाटायची कारण त्याला अजिबात भीती वाटत नव्हती ..
आज रविवारचा दिवस होता , दिवसभर घरी राहून शरद खूप बोर झाला होता ...
त्याने आपली सायकल काढली आणि मामीला सांगून तो फिरायला गावच्या बाहेर निघाला ...
कोकणातील निसर्ग म्हणजे साक्षात स्वर्गच असतो , सगळीकडे हिरवळ ...
शरीराला लागणारा सुखद असा गार वारा ....
आणि उंच डोंगराच्या रांगा ...
आता चांगल्या चांगल्या माणसांना , कोकण भुरळ घालत होते ...तर या चौदा वर्षाच्या पोराची काय गोष्ट करता ?
शरद आपल्या सायकलचा वेग कमी करून , इकडे तिकडे बघत गाणे म्हणत म्हणत चालला होता ....
शरद बघता बघता खूपच दूर गेला होता , तो घरून साडे पाचच्या सुमाराला निघाला होता ...
आता तर त्याला बाहेर पडून एक तास झाला होता ....
सूर्य डोंगरा आड गेला तेव्हा त्याला कुठे समजले की आता रात्र होणार आहे ...
घरी लवकर जायला पाहिजे नाहीतर मामी खूप ओरडेल ....
त्याने तशीच सायकल परतीच्या मार्गाने फिरवली ...
सूर्य जसा जसा डोंगराच्या मागे गुडूप होत होता ,तसा तसा अंधार पडत होता ...
पण जे व्हायचे नव्हते तेच झाले ......???
त्याला गावाबाहेर पोहोचायला उशीर झाला होता ....
कारण शरद वेगाने सायकल चालवत असताना ,त्याला हे कळालेच नाही की आपण रस्ता चुकलो ......
तो भलत्याच मार्गाने जाऊ लागला ......
नेहमी घरा बाहेर पडणारा शरद , हा सगळा रस्ता माहीत असताना सुद्धा ........
तो रस्ता कसा काय चुकला होता ?
हेच त्याला कळत नव्हते ???
तो पुन्हा त्या चुकलेल्या रस्त्याने परत निघाला ......
जेव्हा दोन फाटे लागले तेव्हा कुठे त्याला कळाले की आपण खूप मूर्ख आहोत ....
आपण शेवली च्या रस्त्याने न जाता ..
साठेगावच्या रस्त्याने गेलो ....??
शेवली म्हणजे त्याच्या मामाचे गाव ...
तो स्वतः वर हसू लागला .....
पण या त्याच्या छोट्याशा चुकीमध्ये आज किती तरी मोठे संकट दडलेले होते ?
कदाचित ही त्याची चूक नसून ...
कुणीतरी घडवून तर आणली नसेल ना ?
कारण कोकणात वाट चुकण्याचा , भलत्याच गोष्टी घडत असतात ....
शरद ला गावा बाहेर यायला , कमीत कमी एक तास लागला ......
आता साडे सात झाले होते .....
हिवाळ्याच्या दिवसात एक तर दिवस लवकर मावळतो , आणि वरून थंडीच्या लहरा , अंगावर काटे आणून सोडतात ....
त्याने आपल्या पायांचा वेग वाढवला , सायकलचे पैंदल तो जोरात फिरवू लागला ...
वेशीच्या बाहेर एक पडकी विहीर लागत होती ....
त्या विहिरी बद्दल मामांनी खूप काही भीतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या ...
कोकणात एक तर भीती म्हणजे एक दुष्मनच आहे ...
पण शरद धीट होता , त्याला अशा गोष्टी म्हणजे फालतू वाटायच्या .....
कारण तो शहरात राहत होता ...
त्याला ती पडकी विहीर आता दिसु लागली होती ....
अंधार आज काही एवढा दाट नव्हता , अर्ध्या चंद्राचा तुरळक असा प्रकाश होता .....
त्याच्या भरवशावर हा आपली सायकल चालवत होता ....
अचानक वातावरणात गारवा वाढला होता , त्याच्या अंगाला थंडीच्या लाटा आता झोम्बू लागल्या होत्या ....
आणि अचानक काय झाले काय माहीत , त्याच्या पायाचा वेग आता कमी व्हायला लागला होता ....
त्याला काय होत आहे हेच कळत नव्हते , त्याला वाटले थंडी मुळे आपले पाय अकडले असावे ???
त्याने सर्व शक्तीनिशी पाय वेगाने फिरवायला सुरुवात केली .....
पण पुन्हा त्याला असे वाटू लागले की आपल्या पायाला , म्हणजेच सायकलच्या पेंडल ला कुणीतरी पकडले आहे ...
आता मात्र त्याच्या मनात थोडीशी का होईना , भीतीने जागा केली होती .....
त्याने यावेळी आपल्या पायाच्या झटका पेंडल ला दिला .....
आणि ताडकन आवाज झाला ....
त्याच्या सायकलची चैन तुटली होती .....
आता मात्र त्याची चांगलीच पंचाईत झाली होती ....
एक तर चैन पडली असती , तर पुन्हा बसवली असती .....
पण चैन तुटली होती त्यामुळे आता त्याला पायीच चालणे भाग होते ......
तो खाली उतरला आणि समोर चालू लागला ...
त्याच्या मनात आता वाटू लागले की इथे काहीतरी विचित्र आहे ?
पण त्याच धीट असं मन त्याला समजावत होते की काही नाही ..... इथे काय असणार ?
उगाचच लोक काही पण सांगतात ??
तो आता विहिरीच्या जवळून जाऊ लागला ,
आपली सायकल लोटत लोटत तो गावच्या रस्त्याने जात होता .......
कोणीतरी लांब असा श्वास घेत आहे , असा आवाज त्याच्या कानावर ऐकू आला .....
त्याने थोडे गोंधळून इकडे तिकडे बघितले .......
पण आसपास कुणीच नव्हते ....
तो पुन्हा चार पाच पावले समोर टाकत गेला ...
एखादी स्त्री जशी खिदी खिदी हसते , तसा खिदळण्याचा आवाज त्याच्या कानावर आला ....
आता मात्र त्याच्या अंगावर भीतीने काटा आला होता ....
त्याचे धीट मन आता हार मानू लागले होते .....
त्याने सायकल जोरात लोटण्याचा प्रयत्न केला ,
पण सायकल समोर जात नव्हती ......
कारण तुटलेली चैन चाकाच्या चक्रामध्ये अडकत होती ......
त्याने चैन थोडी सैल केली , आणि तो पुन्हा सायकल लोटू लागला .......
त्याने शंकेने विहिरीकडे बघितले ......
त्याच्या ह्रदयाचा ठोका चुकला .....
कारण विहिरीजवळ थोडा उजेड पडला होता .....
आणि विहिरी तुन एक पांढरे शुभ्र साडी घातलेली स्त्री बाहेर आली .......
तिचे लांब असे केस .....
हिवाळ्याच्या थंडीत सुदधा शरदला चांगलाच घाम फुटला होता ........
त्याला काय करावे हेच सुचत नव्हते .....
इथून सायकल तशीच टाकून पळून जावे असे त्याला वाटले ....
त्याने सायकल सोडून दिली आणि धावायला पाऊल उचलणार तोच .............
त्या पडक्या विहिरीत त्या स्त्रीने उडी टाकली ......
तिचा आक्रोश त्या शांत अशा वातावरणात घुमत होता ....
शरद आता चांगलाच घाबरला होता ......
त्याने सर्व शक्ती एकवटून दुसरे पाऊल उचलले खरे पण विहिरी कडून समोर बघे पर्यंत त्याच्या समोर तीच .....
विहिरीत उडी मारलेली स्त्री उभी होती ........
तिचे लालभडक असे डोळे आणि आ वासून फाटलेला जबडा .........
पाहून शरद जागेवरच बेशुद्ध पडला .......
काही वेळाने त्याला शुद्ध येत होती ......
तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करीत होता ,पण त्याला आता भीती वाटत होती की आपण डोळे उघडावे आणि ती बाई आपल्या समोर उभी असली तर .......
पण शेवटी त्याने डोळे उघडलेच .....
पण समोर मामी उभी होती .....
त्याला धक्काच बसला कारण .......
तो तालुक्याच्या दवाखान्यात एका बेडवर झोपलेला होता , हातात सलाईन जोडलेले होते .....
जवळच मामी आणि मामा उभे होते ....
तो शुद्धीवर आल्यामुळे ते आता थोडे सावरले होते ......
त्याला एक क्षण असे वाटले की , आपण एखादे भयानक स्वप्न तर बघत नाही ना .......????
पण त्याने स्वतः च्या तळ हाताकडे बघितले ....
त्याच्या हाताला चैनीचे ऑइल लागल्या मुळे काळे डाग लागलेले होते ........
डॉक्टर बरेच प्रश्न विचारत होते ?
पण शरद च्या डोक्यात काहीच जात नव्हते .......
बराच काळ लोटल्या नंतर कुठे त्याला कळाले की आपण रात्रभर बेशुद्ध होतो .........
आणि आपल्याला कुणीतरी दवाखान्यात आणलेले होते ........
तेव्हा पासून शरद मामाच्या गावला गेल्यानन्तर त्या विहिरी जवळून एकटा कधीच फिरकला नाही ......
जेव्हा त्याच्या तोंडून ही कथा सर्व गावभर पसरली , तेव्हा पासून त्या गावात त्या विहिरी बद्दल असलेली भीती द्विगुणित झाली ...............
..............................समाप्त.....................